पुन्हा एकदा... सलाम सबको सलाम !!

सुहास झेले's picture
सुहास झेले in जे न देखे रवी...
26 Nov 2011 - 7:13 am

पुन्हा एकदा... सलाम सबको सलाम !!

मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम...
हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम...
बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम...
तिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम...
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुंबईकरांना सलाम...
सागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्‍या सुरक्षा यंत्रणेला सलाम...
कोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम...
सीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम...
शहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम...
जाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्‍या लास्ट बुलेटला सलाम...
हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम...
त्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम...
मुंबईवर हल्ला करणार्‍या पाकिस्तानला सलाम…
पुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्‍या आपल्या नेत्यांना सलाम...
हल्लेखोर आम्ही नव्हेच म्हणणार्‍या त्यांच्या नेत्यांना सलाम...
हल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्‍याला मीडीयाला सलाम…
त्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम...
वर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्‍या प्रत्येकाला सलाम...
कोरडे अश्रू ढाळणार्‍या लोकांना सलाम…
शहीदांच्या पराक्रमांचे बॅनर लावणार्‍या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम...
कसाबला जिवंत पकडणार्‍या पोलिसांना सलाम..
त्याला पोसणार्‍या आपल्या सरकारला सलाम…
त्याला फाशी देणार्‍या आपल्या न्यायदेवतेला सलाम…
त्याला सुधारू द्या असा म्हणणार्‍या मानवाधिकार समितीला सलाम..
बॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्‍यांना सलाम…
मृतांचे फोटो पुन्हापुन्हा प्रदर्शित करणार्‍या वृत्तपत्राला सलाम..
पोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्‍याला सलाम..
उद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्‍याला सलाम…
फेसबुकवर स्टेटस टाकून श्रद्धांजली देणाऱ्याला सलाम...
कमीत कमी शब्दात जास्त सांगून जाणारे ट्विट करणाऱ्याला सलाम...
कॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..
सगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..
ज्यांना सलाम करायचा राहिला, त्या सगळ्यांना सलाम..
गांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…
लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..

सलाम तुम्हा सर्वांना सलाम… सलाम तुम्हा सर्वांना सलाम !!

कवितामुक्तकशब्दक्रीडासमाज

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

26 Nov 2011 - 7:15 am | सुहास झेले

मी टेक्स्ट मध्यभागी अलाईन करायचा प्रयत्न केला पण ते होत नाही आहे, कोणी मदत करू शकेल काय? संपादक मंडळींपैकी कोणी हा धागा संपादित करून दिला तर बरं होईल.

धन्स !!

सेंटर अलाईन केलं आहे. असच हव होतं का?

सुहास झेले's picture

26 Nov 2011 - 6:08 pm | सुहास झेले

धन्स रे गणपा :) :)

चिरोटा's picture

26 Nov 2011 - 2:07 pm | चिरोटा

मोजून ३६ सलाम मारले आहेत.
कवी आणि कविता,ह्या दोघांनाही सलाम.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Nov 2011 - 2:36 pm | अत्रुप्त आत्मा

कवी आणि कविता,ह्या दोघांनाही सलाम +++++++++++++++++११११११११११११११ :-)

किसन शिंदे's picture

26 Nov 2011 - 2:34 pm | किसन शिंदे

सलाम रे सुझे!!!

तुला आणी तुझ्या या कवितेला.

दादा कोंडके's picture

26 Nov 2011 - 3:06 pm | दादा कोंडके

आणखी काही ओळी जोडतो,

हिरव्या देशात बसून श्रद्धांजली वाहणार्‍या लोकांना सलाम,
भारतात राहून देशावर उपकारच करणार्‍या लोकांना सलाम,
रात्री दुचाकी वरून सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करणार्‍या आपल्या मित्राला सलाम, :)
पत्रं पाठवणार्‍या काकांनाही सलाम...

विसु: संबंधीतांनी ह घ्यावे.

तुमचा लिखाणाला सुद्धा सलाम ....एवढे छान सुचले त्याला सलाम ..... :)

माझा तर त्या कसाबचा नशिबाला सलाम ......एवढे मोठे पाप करून तीन वर्ष " अतिथी देवो भव :" करत भारत सरकार त्याला बिर्याणी खायला घालतेय ... त्याचा नशिबाला खरच सलाम ... (जेव्हा त्याला पकडले तेव्हा त्याला वाटले असेल कि आपण तर संपलोच ...मेलोच आता ....पण त्याला काय माहित त्याचा नशिबात काय चांगले लिहून ठेवले होते ते ....:)

विनायक प्रभू's picture

26 Nov 2011 - 6:40 pm | विनायक प्रभू

माझा तर हात ठेउन सलाम.

वाहीदा's picture

26 Nov 2011 - 6:53 pm | वाहीदा

लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..
____/\_____

मदनबाण's picture

28 Nov 2011 - 10:35 am | मदनबाण

26 /11 मधील पीडितांना अटक करुन
पुतळ्याचे अनावरण करणार्‍या राजकारणार्‍यांना सलाम !