मागे हरिपूरला जाऊन आल्यावर हा लेख लिहिला होता. लेखाचा सूर थोडासा नाराजीचा असल्याने फोटो टाकायचे टाळले होते. आज सहज कॅमेरा मेमरी कार्ड स्कॅन करता करता तिथले फोटो सापडले. ते इथे डकवित आहे.
संगमेश्वर मंदीर प्रवेशद्वार
दीपमाळ
बाल्कनीतून दर्शनाची व व्हेंटीलेशनची खास सोय :)
बाल्कनीतून कॅमेर्यात बंदीस्त केलेले शिवशंभो
हीच ती सहाण
कृष्णेचा (खरवडलेला) काठ
पाळण्यात बसण्यासाठी चिल्लर पार्टीची उडालेली झुंबड
प्रतिक्रिया
23 Nov 2011 - 8:19 pm | मी-सौरभ
:)
23 Nov 2011 - 8:22 pm | प्रचेतस
सुरेख फोटो रे.
कृष्णाकाठचा फोटो तर मस्तच.
तुझ्या मेमरी कार्डातले अजूनही फोटू येऊ देत की.
आम्हाला खरगपूर, तिथलं खैराच झाड यांचे पण फोटू दाखव की.
23 Nov 2011 - 8:49 pm | अन्या दातार
वल्लीशेठ,
इथे टाकलेत काही फोटो खडगपूराचे. खैराचा फोटो मात्र असातसा नाही मिळणार हो ;)
23 Nov 2011 - 8:54 pm | मी-सौरभ
:)
खैर नाही तर नारीचा तरी टाक की ....
24 Nov 2011 - 11:11 am | पियुशा
फोटो मस्त :)
पण सहाण म्हणजे काय रे अन्या?
24 Nov 2011 - 12:17 pm | अन्या दातार
अगं, ज्यावर चंदनाचे खोड उगाळून गंध बनवतात ना त्या दगडी ताटलीला सहाण म्हणतात. कळलं का?
24 Nov 2011 - 12:22 pm | प्रचेतस
अगाथा ख्रिस्ती माहीत नसलेल्या पियुशाला सहाणही माहित नसावी यात आश्चर्य ते काय?
सहाण म्हणजे दगडापासून बनवलेला गुळगुळीत पृष्ठभागाचा वर्तुळाकार प्रकार.
बाळाला गुटी देण्याआधी काही जायफळ, वेखंड इ. पदार्थ ज्याच्यावर उगाळून त्यांचा अर्क बाहेर काढतात ती वस्तु म्हणजे सहाण.
जडीबूटीवाल्या़कडेही सहाण दिसते.
24 Nov 2011 - 1:06 pm | वपाडाव
अगाथा ख्रिस्ती अन सहाण दोन्हीही म्हणजे काय रे भौ ???
24 Nov 2011 - 1:10 pm | पियुशा
@ वल्ली
अगाथा ख्रिस्ती माहीत नसलेल्या पियुशाला सहाणही माहित नसावी यात आश्चर्य ते काय?
हायला , तुमची काय ईच्छा आहे मग ?
या अज्ञ्यानी मुलिने फासावर जावे का मग ? ;)
24 Nov 2011 - 1:27 pm | प्रचेतस
नाही नाही, फासावर न जाता सामान्य ज्ञान अधिक वाढवून घ्यावं हीच अपेक्षा आहे.
(पळा आता, पियुशा हाणतीय आता) ;)
24 Nov 2011 - 5:46 pm | ५० फक्त
अगाथा खिस्ती अन सहाण या दोन गोष्टींचा एकमेकांशी अन सामान्य ज्ञानाशी काय संबंध ?
या दोन्ही गोष्टी माहीत असण्यासाठी सामान्य पेक्षा थोडं जास्त ज्ञान असावं लागतं असं माझी कल्पना आहे.
अगाथा खिस्तीची सहाण अशी काही भानगड असेल तर मला माहित नाही ब्वा.
असो, अगदीच अवांतर होउ नये म्हणुन,
अन्या फोटो छान आहेत.
24 Nov 2011 - 1:15 pm | प्रभाकर पेठकर
@ पियुशा
सहाण म्हणजे काय?
'सहाण' हा अरेबिक शब्द आहे. 'सहाण'चा मुळ अर्थ 'ताटली' असा आहे. ज्याला इंग्रजीत आपण 'प्लेट' म्हणतो. तसेच, हा शब्द 'ताटलीच्या आकाराच्या' कुठल्याही वस्तूसाठी वापरतात.
मराठीत हा शब्द पुजासाहित्यातील ताटलीच्या आकाराच्या दगडी गोलाकार वस्तूसाठी वापरतात. त्याचा गंध, बाळाची गुटी वगैरे उगाळण्यासाठी उपयोग करतात.
24 Nov 2011 - 11:13 am | मदनबाण
छान... :)
24 Nov 2011 - 11:53 am | अमोल केळकर
अन्या भाऊ मस्तच!
त्या संगमेश्वराच्या मंदिरातील एकाच फोटोत ते तीन वेगळे देव दिसणार्या प्रतिकृतींचा फोटो टिपला नाहीत का?
( सांगलीकर ) अमोल केळकर
24 Nov 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार
येवढे कष्ट घेतलेच होतेत तर तो लेख सुद्धा क्रमवार चोप्य पस्ते करायचा ना फटूच्या खालती वरती :) आता लेख पुन्हा वाचा, फटूंचा संबंध जोडा... किती किती त्रास.
बघा जरा मनावर घ्या आणि एडिट करा बरे.
24 Nov 2011 - 1:06 pm | वपाडाव
अन्या, एकदा घेउन जा रे बाबा तिथं सगळ्यांना....
24 Nov 2011 - 1:21 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्रे छान आहेत.
पण, फक्त शेवटचे छायाचित्र वगळता, ' हरिपूर जत्रेचे टिपलेले क्षण' ह्या शीर्षकाला जागणारे, जत्रा सदृश, काही नजरेस पडले नाही.
24 Nov 2011 - 1:26 pm | अन्या दातार
वट्टात जिथे जत्रा माझ्या दृष्टीस पडली नाही, तर टिपणार काय? पण निदान त्या परिसराचे तरी दर्शन मिपाकरांना घडवावे म्हणून ही चित्रे डकवली आहेत. हवंतर शीर्षक बदलु.
24 Nov 2011 - 1:26 pm | किसन शिंदे
अन्या,
फोटो कमीच टाकलेस कि लेका, जरा अजुन जास्त फोटो टाकायला पाहीजे होते.
24 Nov 2011 - 6:25 pm | शशिकांत ओक
मित्रहो,
आमच्या लहानपणी, ६३ - ६५ च्या सुमारास, श्रावणातील सोमवारी हरिपुरच्या जत्रेला आम्ही मित्रमंडळी माधवनगरहून पायीपायी जात असू. कर्ण कटू पिपाण्या, काचेच्या चौकोनी तुकड्याला दोन्ही बाजूंनी चित्रांचे घडीकरून डकवलेले कागद पुन्हा पुन्हा उघडून पहाताना वाटणारे अप्रूप, मुलींना आवडत्या लाकडी बाहुल्या, बोळक्यांचे, भातुकलीच्या भांड्याकुंड्यांचे सेट, चक्री पाळणे, मौत का कुआ, वगैरे हरिपुरीतील जत्रेतून अनुभवल्याचे स्मरते.
तेथील कवठाची बर्फी त्या काळात एक आकर्षण असे. कै. गो.ब. देवलांचे घर आणि कृष्णाकाठच्या झाडांवर सायंकाळी घरी परतणा्ऱ्या पोपटांचे हजारोंच्या संख्येचे थवे पाहिल्याचे अद्याप आठवणींत आहेत.
24 Nov 2011 - 8:33 pm | Shreyas Joshi
अरे अण्ण्या फोटू जरा नीट काढत जा