फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच.
हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)...
भांजाळला गाल एकदा
पाठीवर उमटले वळ ...
आणि निघाली कमरेतुनी कळ
त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही
हल्ली मी काही घेतच नाही ...
घेण्याची कारणे होती हजार
चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ...
विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा .....
कळी माझी खुलतच नाही
हल्ली मी काही घेतच नाही ...
नाही नाही म्हणत परत
बळेच भरला ग्लास ...
पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट
यांची सांगड घालणे मला जमलेच नाही ....
पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...
प्रतिक्रिया
18 Nov 2011 - 8:06 pm | पैसा
पीने का बहाना चाहिए!!!
गणपाभौ, ही पाकृ पण मस्त. फोटो कुठेय?
18 Nov 2011 - 10:37 pm | सोत्रि
लै भारी, एक लंबर !
- (बहाणेबाज) सोकाजी
18 Nov 2011 - 8:10 pm | रेवती
स्वयंपाकघर सोडून गणपा तिर्थक्षेत्री वळलेला बघून भावना आवरता आल्या नाहीत.;)
आणि कमरेतुन निघाली कळ
याऐवजी आणि निघाली कमरेतूनी कळ हे कसे वाटेल?
अर्थात कसेही लिहिले तरी कळ काही थांबणार नाही.;)
18 Nov 2011 - 10:36 pm | सोत्रि
रेवतीतै,
सहमत!
आणि जास्त काळ कळ थांबली नाहीच तर मग काळंही थांबणार नाही ;)
- (कळकाढू) सोकाजी
19 Nov 2011 - 12:07 am | गणपा
बदल आवडल्या गेला आहे. :)
18 Nov 2011 - 8:16 pm | दि ग्रेट मराठा
छान आहे.
18 Nov 2011 - 8:24 pm | चाफा
एक विरोधाभास वाचुन गंमत वाटली मुळ कवितेपेक्षा विडंबन जास्त लोकप्रीय झालं :)
बाकी गणपा शब्द चपखल बसलेत :)
19 Nov 2011 - 12:17 pm | प्रभाकर पेठकर
मुळ कवितेतील आपली भावना सुंदर आहे पण ती 'कवी' पुरती संकुचित आहे. इतरांना त्याचा 'एहसास' होईलच असे नाही. पण, श्री. गणपा ह्यांनी व्यक्त केलेली भावना सर्वकालीक आणि सर्वसमावेशक असल्याने जास्त 'लोकप्रिय' झाली आहे.
18 Nov 2011 - 8:33 pm | प्रचेतस
_/\_
भन्नाट.
पाककलानिपुण तज्ज्ञ श्री श्री गणपा महाराज हे कवितानिपुण पण.
18 Nov 2011 - 9:09 pm | यकु
घेऊनच ईडंबन केलंय का?
अगदी पहिल्या धारेचं झालंय म्हणून हो. ;-)
18 Nov 2011 - 11:36 pm | नाटक्या
गणपाशेट,
तुम्ही सुध्दा?
19 Nov 2011 - 1:11 pm | अविनाश खेडकर
काय गणपाशेट लई भारी.
झिंग आली बरं का.......................................................
19 Nov 2011 - 1:35 pm | परिकथेतील राजकुमार
गणपा रं गणपा.. एक नंबर रे.
अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे :( आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो.
आमेन !
21 Nov 2011 - 7:02 pm | विजुभाऊ
अवांतर :- 'विडंबन म्हणजे दारू' हे चित्र कधी बदलणार ? हे विडंबन वाचून कवि गणेशा ह्यांच्या मनाला आता किती यातना होतील बरे आकाशातला बाप त्यांना अजून सहनशीलता देवो.
ग्ण्पा भौ क्व्ता छान आहे. क्दाच्ति प रा ( सालं हे टंकताना चुकलं की प रा चा उगाचच प्रा होतो) भौ नी मोकलाया दही दिश्या... ही क्विता वच्ली न्सावी. किवा त्य्ना फ्क्त द्रु च दिस्ते त्य्मुळे त्य्ना विंड्ब्न हे ब्निआ द्रुचे होतस्ते हे ठौक न्ही.त्यत त्यंची च्कू न्सावी
19 Nov 2011 - 2:11 pm | जाई.
भन्नाट विडंबन
19 Nov 2011 - 4:45 pm | सुहास झेले
व्वा गणपाशेठ.... एकदम जोरदार !! :) ;)
19 Nov 2011 - 11:11 pm | प्रभो
मस्त रे!!
20 Nov 2011 - 2:24 pm | सूड
भन्नाट!! आवडल्या गेले आहे.
21 Nov 2011 - 10:19 am | फिझा
नो कमेन्ट्स !!!
21 Nov 2011 - 3:48 pm | वाहीदा
चांगल्याच कवितेचे विडंबन येते अन मुख्य म्हणजे लोकप्रिय रचनेचेच
तुमची कविता लोकांना आवडली ही त्याची पावती आहे :-)
21 Nov 2011 - 4:19 pm | मदनबाण
मस्त ! ;)