हल्ली मी लिहीतच नाही ...(२)...

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
18 Nov 2011 - 10:13 am

हल्ली मी लिहीतच नाही ...(२)...

वेडावलेले मन एकदा
कागदावर उमटलेले व्यर्थ ...
आणि उगीचच निघाला अर्थ
त्या अर्थाची व्यापकता कुणा कळतच नाही

हल्ली मी लिहीतच नाही ...

लिहीण्याची कारणे होती हजार
शाळा, कॉलेज, प्रेम आणि मग संसार ...
रंगीत कागद घेतला तरीसुद्धा .....
लेखणी आता खुलतच नाही

हल्ली मी लिहीतच नाही ...

नाही नाही म्हणत बरीच बरी
जमली एकदा कविता ...
दिली वाचायला कुणाकुणाला ...
मिळालेली दाद आणि मनातला वाद
यांची सांगड घालणे पण जमलेच नाही ....

हल्ली मी लिहीतच नाही ...

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Nov 2011 - 10:32 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मिळालेली दाद आणि मनातला वाद
यांची सांगड घालणे पण जमलेच नाही ....

क्या बात!! सुंदर!!

वाहीदा's picture

18 Nov 2011 - 6:26 pm | वाहीदा

कविता आवडली !

दि ग्रेट मराठा's picture

19 Nov 2011 - 10:04 pm | दि ग्रेट मराठा

अप्रतिम...
खूप छान!!