हल्ली मी लिहीतच नाही .....

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
8 Nov 2011 - 4:47 pm

हल्ली मी लिहीतच नाही .....

हल्ली मी लिहित नाही
शब्दांची उधळण झेपत नाही
बोचरे शब्द व तुटक्या भावना ...
म्हणून मी कागद आता शोधतच नाही ....

हल्ली मी लिहीतच नाही .....

मनात राहून गेलेले
अस्फुट काहीतरी .....
कवितेमध्ये कधी उमटलेच नाही ....
भावना कमी पडली कि प्रतिभा
याचा विचार आता करतच नाही ...

हल्ली मी लिहीतच नाही .....

काही आठवणी खरडल्या खुळ्या
त्याच मग घेऊन गेल्या टाळ्या.....
हसता हसता पण
रडणे कधी जमलेच नाही ......

हल्ली मी लिहीतच नाही .....

लिहायला घेतले कि आता पाऊस येतो
इतका बरसतो कि कागदच ओला होतो
चिंब डोळे पुसले तरी
आठवणी पुसणे जमतच नाही ......

हल्ली मी लिहीतच नाही .....

कविता

प्रतिक्रिया

व्वा व्वा क्या बात ! क्या बात ! क्या बात :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Nov 2011 - 5:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर रचना!! खुप आवडली.

लिहायला घेतले कि आता पाऊस येतो
इतका बरसतो कि कागदच ओला होतो
चिंब डोळे पुसले तरी
आठवणी पुसणे जमतच नाही ......

क्या बात!!

मदनबाण's picture

8 Nov 2011 - 5:30 pm | मदनबाण

अप्रतिम... :)

चित्रा's picture

8 Nov 2011 - 7:02 pm | चित्रा

आवडले.

एकच सुधारणा सुचवते: "कि" हे "की" असे लिहावे (मी तरी ते तसेच वाचलेले आहे).

अवांतर: आंतरजालावर मनोगतावरचा हा दुवा अतिशय उपयुक्त आहे. - जे आपल्या लिखाणासंबंधी जागरूक आहेत, अशांनी तो जरूर पहावा. http://www.manogat.com/node/6774
आपल्या सर्वांच्याच र्‍ह्स्व दीर्घाच्या चुका नेहमीच होत असतात.
http://www.manogat.com/node/6734

विदेश's picture

8 Nov 2011 - 7:15 pm | विदेश

चिंब डोळे पुसले तरी
आठवणी पुसणे जमतच नाही ......

मस्त !

वाहीदा's picture

8 Nov 2011 - 7:22 pm | वाहीदा

मनात राहून गेलेले
अस्फुट काहीतरी .....
कवितेमध्ये कधी उमटलेच नाही ....
भावना कमी पडली कि प्रतिभा
याचा विचार आता करतच नाही ...

___/\____

जाई.'s picture

8 Nov 2011 - 7:25 pm | जाई.

छान

लिहायला घेतले कि आता पाऊस येतो
इतका बरसतो कि कागदच ओला होतो
चिंब डोळे पुसले तरी
आठवणी पुसणे जमतच नाही ....

वा! खूपच छान ...

पण आठवणी पुसायच्या कशाला ? आपल्याच असतात.... जपून ठेवायच्या .

सुरेख कविता !

सुहास झेले's picture

9 Nov 2011 - 9:42 am | सुहास झेले

सुंदर... अप्रतिम रचना :) :)

क्लास्स्स्स्स.

अम्मळ जास्तच हळवी वाटते कविता.

sneharani's picture

9 Nov 2011 - 10:39 am | sneharani

मस्त कविता!
:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2011 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

न लिहिण्याची कारणं कवितेतून उत्तम व्यक्त झाली आहेत.
अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

सुंदर कविता

लिहायला घेतले कि आता पाऊस येतो
इतका बरसतो कि कागदच ओला होतो
चिंब डोळे पुसले तरी
आठवणी पुसणे जमतच नाही ......

मस्त

वपाडाव's picture

9 Nov 2011 - 12:05 pm | वपाडाव

अव्वल !!!
माणगये उस्ताद....