हल्ली मी लिहीतच नाही ...(३)

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
29 Dec 2011 - 3:21 pm

हल्ली मी लिहीतच नाही ...(३)

सूर्य,चंद्र, समुद्र, पाऊस आणि वारा
यांची नुसती खुशाली विचारा,
नटवले सजवले कितीही तरीही आजकाल
कवितेमध्ये ते बंधतच नाहीत ......

हल्ली मी लिहीतच नाही .........

न जमलेली कविता फाडून टाकावी
आणि नकळता शब्दही खोडवा जरूर
यमकच जुळत नसते काही करून ...
शब्द आणि यमक आता एकत्र नांदतच नाहीत

हल्ली मी लिहीतच नाही .........

दिवस निघून जातो रिकामा रिकामा
रात्रही तशीच.... किर्र शांततेची,
कवितेची आणि माझी संगत उरे फक्त ..... पण,
तिला 'मी' आणि मला 'ती' आता उमगतच नाही .....

हल्ली मी लिहीतच नाही .........

हल्ली मी लिहीतच नाही .........

कविता

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2011 - 3:44 pm | परिकथेतील राजकुमार

बोंबला तेज्यायला !!

'हल्ली मी लिहीतच नाही .........' म्हणायचे आणि तासाला एक कविता प्रसवत बसायचे.

हे घ्या :-

@ प . रा . .....असमबद्ध शब्द प्रयोग करयचि गरज नहिये !!! आपले अफाट विचार सुसंक्सारीत भाषेत सांगता आले तर बघा !!!

@ प . रा . .....असमबद्ध शब्द प्रयोग करयचि गरज नहिये !!! आपले अफाट विचार सुसंक्सारीत भाषेत सांगता आले तर बघा !!!

प.रा. . ..... असंबद्ध शब्दप्रयोग करायची गरज नाहीये !!! आपले अफाट विचार सुसंस्कारित भाषेत सांगता आले तर बघा !!!

असे शुद्धीकरण सुचवू इच्छितो..

विनायक प्रभू's picture

29 Dec 2011 - 4:37 pm | विनायक प्रभू

भावी सुसंकारीत परा चा विचार करुन रुदय गल्बलले.

>>>सुसंक्सारीत
जरास्सा वेगळा वाचला गेला. अनुस्वाराऐवजी मात्रा बस्स.
नवीन शब्द मिळेल नै मंदाकिनी सीरिज साठी? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2011 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार

भाषेला कुस्करून टाकलाय पार भेंडी.

निश's picture

29 Dec 2011 - 3:45 pm | निश

अप्रतिम मस्त लय भारि

विनायक प्रभू's picture

29 Dec 2011 - 4:13 pm | विनायक प्रभू

@ प रा
हल्ली मी सुद्धा 'लिहीत' नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2011 - 4:41 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्हीपण टंचनिका ठेवली का काय ? घरी काकुंना माहिती आहे का ? का करू फोन ?

विनायक प्रभू's picture

29 Dec 2011 - 5:08 pm | विनायक प्रभू

काय करायचे ते टंचनिकाच करते.
असो.
माझे सोड.
तु कधीपासुन 'सुसंस्कार' वर्गा मधे बसणार आहेस ते सांग.
एखादा तास मी पण घेइन तुझा.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2011 - 5:23 pm | परिकथेतील राजकुमार

तिथे बसण्यापेक्षा खिडकीत बसेन मी ;)

साला आम्हीच सुसंस्कारीत झालो तर ऑलरेडी सुसंस्कृत असलेल्यांचा भाव संपून नाय जायचा काय ? आम्ही आहोत म्हणून जगाल सुसंस्कृत लोकांची किंमत आहे.

बाकी टंचनिका ठाण्याचीच आहे का वांद्रा-कुर्ला ? परवा आपण आम्हाला जी अशक्य कल्टी मारलीत, त्यात ह्या टंचनिकेचा हात किती? ;) सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या टंचनिकेला रस्सम / सांबार वैग्रे जमतो का ?

टंचनिका ठाण्याचीच आहे का वांद्रा-कुर्ला ?

या आणि इतर वरील सर्व प्रतिसादांशी माझा कोणताही संबंध नसल्याचे मी जाहीर करत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2011 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

चोराच्या मनात....