नमस्कार मिसळ्पावकरांनो,
मी माझ्या चारोळ्या (असा मी तसा मी नावाखाली) या ठिकाणी वेगवेगळ्या भागात प्रकाशित करीत आहे
कृपया प्रतिक्रिया व चुकांवर मार्गदर्शन अपेक्षित.....
तुला पावसात पाहिल्यावर
मन तुझ्यात हरपलं
तु ओळख विसरलीस अन्
ते डोळ्यातुन झिरपलं
....................................................................
मरण दाराशी आल तेव्हा
त्याला एक सांगायच होतं
माझ जगुन झालय आता
तिच्यासाठी जगायच होतं
....................................................................
चुकुन माझा पाय एकदा
गरीबित घसरला
त्या दिवसापासुन समाज
माझ अस्तित्वच विसरला
.....................................................................
पोटातील कावळे आता
चांगलेच कळतात
इथली सर्व माणसं
त्यासाठीच तर पळतात
......................................................................
गावकुसाला एकांतच सारा
अन् तुझे केस वार्यावर
काळजाला कसतरी आवरलं
पण मन नव्हत थार्यावर
......................................................................
तु आलिस अन्
भाव स्पर्श बोलके झाले
तु गेल्यावर मात्र
शब्दही मुके झाले
......................................................................
तु जा म्हणशील
तर मी नक्की जानार आहे
तु म्हणुच नकोस
ती वाट सरणावर आहे.
.....................................................................
घेण्याचं माहित नाही
देणं मात्र ठाऊक होतं
तुझ्यापुरतं मन माझं
नेहमीच भाऊक होतं.
......................................................................
वळवांचा पाऊस पाहून
तुझी आठवण आली
तु दुखावलेल्या भावनांची
डोळ्यांत गर्दी झाली.
.....................................................................
कुण्या नाक्यावर एक कुत्र
प्राण जाऊन पडलं होतं
मांस त्याचं खाण्यासाठी
दुसरं कुत्र दडलं होतं.
.....................................................................
सांजकाळी कातरवेळी
सांग अशी का बावरलीस?
मजविना जगण्याच्या
कल्पनेलाही घाबरलीस?
........................................................................
जीवनात एक वेळ
मलाही प्रेम करायचय
तिच्या कोर्या काळजावर
माझ नाव कोरायचय
........................................................................
कायद्याची पुस्तके आता
वकिलाच्या पोटासाठी
न्यायालयात न्याय झाला
लाल हिरव्या नोटांसाठी
.......................................................................
प्रतिक्रिया
16 Nov 2011 - 10:01 am | फिझा
मस्त !!! अहेत चारोळ्या !!
16 Nov 2011 - 10:10 am | मदनबाण
मस्त... :)
घेण्याचं माहित नाही
देणं मात्र ठाऊक होतं
तुझ्यापुरतं मन माझं
नेहमीच भाऊक होतं.
वा...
और भी आने दो...
(४ओळी प्रेमी) :)
16 Nov 2011 - 10:17 am | मदनबाण
डोक्याला शॉट लावणारे
लेख मी काही वाचत नाही
चारोळी दिसली समोर तर
वाचल्या शिवाय राहत नाही. ;)
16 Nov 2011 - 10:32 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सर्व चारोळ्या सुंदर आहेत. एकीला वेगळं काढून दाद दिली तर इतर सर्व चारोळ्यांवर अन्याय होईल.
तरी त्यातल्या त्यात:
हि तर अप्रतिम!!
16 Nov 2011 - 1:58 pm | विदेश
सर्व चारोळ्यात डावी / उजवी करणे अवघड .
चांगल्या आहेत.
16 Nov 2011 - 3:53 pm | अविनाश खेडकर
प्रतिक्रियांबद्ल सर्वांचे मनापासुन धन्यवाद
16 Nov 2011 - 4:23 pm | सुहास झेले
मस्त.. अजुन येऊ द्यात :) :)
16 Nov 2011 - 4:50 pm | प्रभाकर पेठकर
अप्रतिम चारोळ्या. अभिनंदन.
16 Nov 2011 - 9:35 pm | गणेशा
मस्त चारोळ्या