असा मी तसा मी भाग-२

अविनाश खेडकर's picture
अविनाश खेडकर in जे न देखे रवी...
16 Nov 2011 - 2:21 am

सत्तेच्या त्या खुर्चीसाठी
सगळेच कसे खेळ खेळतात
शेंडीवाले ब्राम्हणही आता
सुंथेवाल्याच्या पायी लोळतात
............................................................

तु निघुन गेल्यावर
नेहमिच असं घडणार
डोळे कोरडे ठेवतांना
मन मात्र रडणार
..............................................................

आठवतय मला अजून
झुल्यावर आपण झुललेलं
तुझ्या अधरावर होतं
प्रेमगीत खुललेलं
...............................................................

गावकुसाच्या वडाची
पाने असतात झडलेली
जशी गावातील माणसचं
म्हसणवाट्यात गाडलेली
...............................................................

ध्येय आणि प्रयात्नासोबत
दिशा जेंव्हा ठरवतो
एक शुद्र कासव मग
सशालाही हरवतो
..............................................................

कोणीतरी ओळखावं म्हणून
आपण सगळ करत असतो
किर्तीच्या मोहापायी
रात्रन् दिवस झुरत असतो
............................................................

पोर्णीमेच्या रात्री तुला
गच्चीवरून पाहिली
माझ्या मनाची फुले तुला
त्या क्षणी वाहिली.
.............................................................

रोजगार हमीच्या कामात
शासनाने कहर केला
तरुणपणी काम केलं
म्हातारपणी पगार झाला
...............................................................

माझं तुझ्यावर प्रेम जडलं
यात काय गैर आहे?
तरी तुला तसं वाटलचं तर
ते गैर नाही तुझे प्रेमाशी वैर आहे.
................................................................

आपण लावलेले आंबे
यंदा खूप मोहरले पण
तु दुखावलेले मन
आणखी नाही सावरले
...............................................................

आपल्या पहिल्या भेटिचा प्रसंग
अजुन मनात लपलाय
तु चुकून दिलेला गुलाब
मी आत्तापर्यंत जपलाय
..............................................................

चारोळ्या

प्रतिक्रिया

गार्गी_नचिकेत's picture

16 Nov 2011 - 10:10 am | गार्गी_नचिकेत

"आपल्या पहिल्या भेटिचा प्रसंग
अजुन मनात लपलाय
तु चुकून दिलेला गुलाब
मी आत्तापर्यंत जपलाय"

खूप छान.......

मदनबाण's picture

16 Nov 2011 - 10:12 am | मदनबाण

मस्त... :)

प्रभाकर पेठकर's picture

16 Nov 2011 - 4:55 pm | प्रभाकर पेठकर

असा मी, तसा मी च्या ह्या चारोळ्याही अतिशय सुंदर. अभिनंदन.

सुंदर ..
परंतु भाग १ जास्त छान होता...

असेच लिहित रहा... वाचत आहे.....

अविनाश खेडकर's picture

16 Nov 2011 - 11:09 pm | अविनाश खेडकर

गुलाबांच्या ताटव्यातून चालताना निवडुंगाकडे लक्ष दिल्याबद्ल धन्यवाद

तुमचा लोभ आहे तोपर्यंत लिहीत राहील.

दि ग्रेट मराठा's picture

17 Nov 2011 - 1:37 pm | दि ग्रेट मराठा

अप्रतिम... खूप छान

धन्यवाद...

अविनाश खेडकर's picture

18 Nov 2011 - 12:13 pm | अविनाश खेडकर

दि ग्रत मराठा प्रतिक्रियेबद्ल आभारी आहे