डेनिस रिचीला श्रध्द्दांजली

चेतन's picture
चेतन in जनातलं, मनातलं
14 Oct 2011 - 3:11 pm

'C' programming चा जनक डेनिस रिची आज आपल्यातुन निघुन गेला.

Unix operating system च्या निर्मीत्तीमध्येही याचा खुप मोठा वाटा होता.

Assembly च्या जमान्यात 'C' खरच एक रिव्होल्युशन होते. त्याला श्रध्द्दांजली

चेतन

समाजविज्ञानप्रकटन

प्रतिक्रिया

सुनील's picture

14 Oct 2011 - 3:18 pm | सुनील

डेनिस रिचीने ब्रायन कर्निहनसमवेत लिहिलेले C चे पुस्तक म्हणजे C भाषेचे बायबल!

श्रद्धांजली.

चेतन's picture

14 Oct 2011 - 7:35 pm | चेतन

K&R बायबलएव्हढे मोठे (आकाराने) नसले तरी तुलना अगदीच चुकिची नाही.

पण नविन C शिकणार्‍या माणसांना K&R वाचायला दिले तर तो बहुतेक C शिकायचा विचारही सोडुन देईल ;)

कर्निंघहॅम म्हणतो “There was a remarkable precision to his writing,” Mr. Kernighan said, “no extra words, elegant and spare, much like his code.”

रिचीचं UNIX बद्दलच क्वोट् खर पण मजेदार आहे "UNIX is very simple, it just needs a genius to understand its simplicity."

सध्या अस्तित्वात असलेल्या बहुतेक प्रत्येक Free OS मध्ये C चा खुप मोठा वाटा आहे.

तुर्तास एव्हढेच बाकी चिरोटा यांनी उत्तम माहिती दिली आहे.

#include

void main (void)
{
printf("Good Bye World");
}

धन्यवाद रिची

(C Programmer)चेतन

सोत्रि's picture

14 Oct 2011 - 3:30 pm | सोत्रि

श्रद्धांजली!

- (B) सोकाजी

शाहिर's picture

14 Oct 2011 - 3:47 pm | शाहिर

जॉब्स नंतर आता रीची ..

खर तर कॉलेज च्या दिवसां मधे "कशाला ही C शोधली".. "काम धाम नहित ह्याल" अशा कॉमेंट केलेल्या आठवतात ...आता रीची चे मोठेपण लक्षात येते

विशाखा राऊत's picture

14 Oct 2011 - 4:00 pm | विशाखा राऊत

श्रध्दांजली..

अवांतर : सगळे संगणक निर्माते/प्रणिते मिळुन चित्रगुप्तला टॅब नाहीतर लॅपटॉप बनवुन देणार नाहीत ना आता.. मग आपल्याला इमेल येईल.. "TIMEOUT"

मराठी_माणूस's picture

14 Oct 2011 - 4:52 pm | मराठी_माणूस

श्रध्दांजली.

संगणक क्षेत्राला वळण देणारे कार्य

मेघवेडा's picture

14 Oct 2011 - 5:00 pm | मेघवेडा

श्रद्धांजली..

अवांतर : मला नेहमी वाटायचं की यशवंत कानेटकरांनीच 'C Language' डेव्हलप केली आहे!

चिरोटा's picture

14 Oct 2011 - 5:43 pm | चिरोटा

जॉब्स नंतर रिची गेल्याने संगणकविश्व एका मोठ्या giant ला मुकले. दोघांत फरक हा की रिची ह्यांचे योगदान कुठल्या कंपनीला नसून संपूर्ण संगणक विज्ञाऩक्षेत्राला होते.
Applied Math /Physics मध्ये डिग्री घेतलेल्या रिची ह्यांनी बेल लॅब्स मध्ये कामाला १९६७ साली सुरुवात केली तेव्हा संगणक आकाराने प्रचंड होते आणी बहुतांशी सॉफ्ट्वेयर हे Fortran वा COBOL मध्ये लिहिले जाई. ह्या सॉफ्ट्वेयरचे धावणे वा 'रन' होणे हे त्याखाली असलेल्या हार्ड्वेयरवर अवलंबून असे. अनेक वेळा एकदा लिहिलेले सॉफ्ट्वेयर दुसर्‍या हार्डवेयरवर चालवण्यासाठी पुन्हा लिहिले जाई.
C आधी वरील वरील प्रचलित भाषांबरोबर फारशी माहित नसलेली BPCL नावाची भाषा होती. बेल लॅब्स मध्ये Multics नावाची OS बनवण्याचे काम चालु होते. बॅच प्रोसेसिंग काढून OS interactive बनवणे हा Multics चा मुख्य उद्देश होता. काही कारणांमुळे Multics चे काम बंद झाले पण त्यात काम करणारे केनिथ थॉम्प्सन ह्यांच्या मनातून ही OS जाईना. त्यांनी Unix नावाने हा प्रोजेक्ट चालु केला आणि नंतर रिची व ईतर त्यात सामील झाले.
Unix मध्ये रिची ह्यांचे मुख्य योगदान IO(Input/Output routines) मध्ये होते. १९७३साली Unix बेल लॅब्सने प्रकाशित केले.
अजून सॉफ्टवेयरचे हार्ड्वेयरवर अवलंबून असणे हा प्रॉब्लेम होता. रिची ह्यांनी BPCLवर आधारित नविन भाषा बनवली.B च्या पुढचे अक्षर म्हणून त्याला C हे नाव दिले.C भाषा यंत्र भाषेच्या(machine language) एक पातळी वर. C मध्ये सॉफ्ट्वेयर लिहिणे त्यामुळे सोपे झाले.साहजिकच C प्रचंड लोकप्रिय झाली. एका मशिनवर धावणारे सॉफ्ट्वेयर दुसर्‍या मशीन्वरही विशेष बदल न करता धावू लागले. मग पुढे सगळे Unixच रिची आणि थॉम्प्सन ह्यांनी C मध्ये लिहिले.OS ,भाषा,आणि त्यावर आधारित सॉफ्ट्वेयर कुठल्याही संगणकावर चालवता येवू लागले आणि संगणक विश्वात खर्‍या अर्थाने क्रांती झाली.
पुढच्या काळात तयार झालेल्या C++,Java,PERL वगैरे बनवताना मुख्य प्रेरणा- syntax,construct Cचा होता.अजूनही असतो. ४० वर्षे झाली तरी अजूनही C/Unix तरूण आहे त्यामागे रिची/थॉम्प्सन ह्यांची उदारमतवादी संशोधनाची परंपरा कारणीभूत आहे. पेटंटस बनवून गब्बर होणे त्यांना सहज शक्य होते पण त्यांनी ते टाळले.
रिची ह्यांना श्रद्धांजली

मन१'s picture

14 Oct 2011 - 9:37 pm | मन१

आवड्ला...

अप्पा जोगळेकर's picture

14 Oct 2011 - 10:25 pm | अप्पा जोगळेकर

यासंदर्भात स्वतंत्र लेख लिहू शकाल इतकी माहिती तुमच्याकडे असावी असे वाटते.
रिची यांना विनम्र अभिवादन.

विकास's picture

14 Oct 2011 - 11:54 pm | विकास

असेच म्हणतो...

रिचींना श्रद्धांजली.

चतुरंग's picture

15 Oct 2011 - 12:09 am | चतुरंग

डेनिस रीचींना श्रद्धांजली.
चिरोटा, डेनिस रीचीवर एक लेख लिहावा.

------------------

कॉलेजात डेनिस रीचीचे 'सी' वरचे बायबल बघितललेले आठवते. तसा प्रोग्रॅमिंगमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही फक्त असेंब्ली लँग्वेज फार म्हणजे फार आवडायची, अजूनही आवडते परंतु आता संबंध फारसा नाही. पहिली असेंब्ली शिकलो ती इंटेल ८०८५ प्रोसेसरवरची. ती इतकी आवडली की संपूर्ण इंस्ट्रक्शन टेबल पाठ होते ऑपकोडसहित. प्रोग्रॅमिंग करताना थेट ऑपकोडमधूनच करायचो. मजा यायची. रिअल टाईम क्लॉकचा प्रोग्रॅम केलेला आठवतो. पैजा लावून लावून प्रोग्रॅम छोटा छोटा करत नेलेला - शेवटी मला वाटते की फक्त २२ की २४ इंस्ट्रक्शन्स मधे संपूर्ण रिअल टाईम क्लॉक बसवले होते. असो. बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.

(असेंब्लीप्रेमी) रंगा

वाहीदा's picture

15 Oct 2011 - 12:37 am | वाहीदा

प्रतिसाद आवडला !! एक स्वतंत्र लेख जरुर लिहावा

रिचींना श्रध्दांजली !!

सुहास..'s picture

14 Oct 2011 - 6:35 pm | सुहास..

श्रध्दांजली

प्रभो's picture

14 Oct 2011 - 7:22 pm | प्रभो

श्रद्धांजली..

माझ्या सारख्या कित्तेकाना अन्नाला लाउन गेला.

श्रद्धांजली.....

(C Programmer) आंबोळी

यकु's picture

14 Oct 2011 - 10:04 pm | यकु

रिचीला शांती मिळो!

च्यायला आम्हाला सी मधलं अक्षर कळल तर शपथ.
कुणी इथं लिहा कि रे एखादी लेखमाला.

वाहीदा's picture

15 Oct 2011 - 12:43 am | वाहीदा

Let 'C' who takes an initiative to write about him more !!
चिरोटा तुझ्या लेखाच्या प्रतिक्षेत आहोत आम्ही सर्व ...

नन्दादीप's picture

15 Oct 2011 - 11:15 am | नन्दादीप

श्रद्धांजली.....
कॉलेजात शिकताना "नसता ताप" होता ही c. आता कळतय तीच महत्व..... खरच त्या अफाट बुद्धीला सलाम....

सुहास झेले's picture

15 Oct 2011 - 1:40 pm | सुहास झेले

ऑक्टोबर टेक्नॉलॉजी जगतासाठी काळा महिना आहे....आधी स्टीव जॉब्स आणि आता डेनिस रिची :( :(

विनम्र अभिवादन !!

५० फक्त's picture

15 Oct 2011 - 6:22 pm | ५० फक्त

माझा डायरेक्ट काही संबंध नाही, पण हे लिहु शकतोय म्हणजे माझ्यावर पण त्यांचे उपकार आहेतच.

या निमित्ताने एक मुलभुत शंका, हे विंडोज / वर्ड / एक्सेल / अ‍ॅटोकॅड हे कशात लिहिलेले असतात.?

मला वाटते C, C++, and C# मध्ये
अन एम एस डॉस असेंब्ली लैग्वे़ज मध्ये. The majority of the Windows kernel is in C. You can also use Visual Studio Office Tools for programming microsoft Office.
कोणी जाणकार काही प्रकाश टाकतील का ?

आत्मशून्य's picture

15 Oct 2011 - 11:23 pm | आत्मशून्य

खास विंडोजबेस्ड अप्लिकेशन्ससांठी जास्त करून MFC (Microsoft Foundation Class) [vc,vb,c#] वगैरे वापरले जाते (जावा सूध्दा चाल्ते नाही असं नाही ;) ). तीच गोश्ट थ्रीडी रेंडरींग असणार्‍या प्रोग्रांम्सची आहे (ऑटोकॅड, गेम्स इत्यादी) पण त्यांसाठी वेगवेगळ्या लायब्ररीज/रेंडरींग इजीन्स/फ्रेमवर्क उपलब्ध असतात, या लाब्ररीज बर्‍याच आहेत व आपल्या गरजे नूसार योग्यती निवडू शकतो. पण C अर्थातच सगळ्यांचाच बेस आहे म्हटले तरी चालेल. उदा. अगदी तूम्हाला आयफोन/आयपॅडचे अ‍ॅप्लिकेशन बनवायचे असेल तर सर्वात जास्त ओब्जे़क्टीव C वापरले जाते. त्यामूळे C चा आवाका फार मोठा आहे.

अर्धवटराव's picture

15 Oct 2011 - 11:33 pm | अर्धवटराव

"सी" आमचं पहिलं प्रेम. तिच्या प्रेमाता कैफ अजुनही टवटावीत आहे मनात.... आणि संगणकाशी संबंध असेपर्यंत हा कैफ उतरणारही नाहि.
सासरेबुवांना श्रद्धांजली !!

@चिरोटा
इतरांप्रमाणेच माझिही विनंती... होउन जाऊ देत फर्रास लेख...

(सी प्रेमी) अर्धवटराव