चीता तैल, धार्मिक अपराध वगैरे..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
10 Oct 2011 - 11:12 am

काही दिवस हरिद्वारला गेलो होतो.

नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज.. तिथे दिसलेल्या एका "चिजे"वर मात्र हलकीफुलकी फुलक्यासारखी पोस्ट काढायचा मोह आवरला नाही. म्हणून गंगेचे फोटो सोडून बाजारभर हिंडून हेच करत होतो.. खास मिपासाठी..

काय?.. सांगतो..

सविस्तर साग्रसंगीत मुद्देसूद अस्ताव्यस्त माहिती देणार्‍या पाट्या हा पुण्याचा खास मानाचा तुरा आहे अशी माझी आजपर्यंत समजूत होती. पुण्याला पूर्ण मात देण्याइतकी नाही पण तरी चांगलीच कांपिटिसन अश्या पाट्या मला हरिद्वारात दिसल्या.

तर त्यातली काही "ताझा तस्वीरें" इथे पेश करतोय. टिप्पणीची फार आवश्यकता नाहीच. पण तरीही केल्या आहेत कारण पुण्याइतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि "ठ्ठो" पाट्या अजून हरिद्वार शहरात नाहीत. शिकत असावेत अजून ते. सगळ्या पाट्यांमधे काही धमाल जोक आहे असं नव्हे पण महाराष्ट्रात कानी न पडणार्‍या वेगळ्याच शुद्ध घी मधल्या हिंदीच्या शब्दांचीही झलक इथे दिसतेय.

फोटो सौजन्य : मीच

पाट्यांचे फोटो काढताना मी संशयास्पद ठरुन मार खाण्याचा अनुभव इथे लिहायची वेळ येऊ नये म्हणून मोबाईलमधून जमेल तेवढ्या झपाझप फोटो काढले आहेत. कलादालन म्हणून पाहू नये असं म्हणून पाहतो.

१)


१ वर टिप्पणी: भात नाही घेतलात तर किती पोळ्या जास्त मिळतील हे बाहेरच पाटीवर लिहिण्यातले "डीटेलिंग" पाहून प्रिय पुण्याची आठवण झाली.

२)

२ वर टिप्पणी: सध्या बिझनेस खेचण्यासाठी वापरलेल्या गुडविलच्या "के बेटे..के बेटे" च्या माळेतले वरुन दुसरे प्राचीन पंडितजी श्री. मक्खन चक्खन यांचे नाव अत्यंत आवडण्यात आले आहे. सुखी माणूस असावा.

३)

३ वर टिप्पणी: पुण्याची तीव्र आठवण. भाषा वेगळी, भावना तीच..

४)

४ वर टिप्पणी: हा चष्म्याचा सेलवाला जाम चालू आहे. जो चश्मा गिर्‍हाईकाला आवडेल तो "फॅन्सी" ठरणार. आणि "फॅन्सी चश्मे"का रेट अलग से..

५)

५ वर टिप्पणी: वरुन चवथ्या क्रमांकाचे सूप (अगदीच अंदाज येत नसल्यास.. हॉट अँड सोअर सूप)आवडल्या गेले आहे. तिसर्‍या क्रमांकाचा पदार्थ मागण्याची इच्छा आणि धाडस झालेले नाही.

६)

६ वर टिप्पणी: हेच दुकानाचं नाव बरं का..
बाय द वे..दुकानाला काही "मनोज भांडार", "सत्कार भोजनालय" असं नाव द्यायलाच पाहिजे असं थोडंच आहे ?
प्रॉडक्ट आणि धंद्याचे नाव यांचं अद्वैत.

याच धर्तीवर पुण्यात "खमंग काकडी, साबुदाणा खिचडी" या नावाचं दुकान आता शोधीन.

७)

७ वर टिप्पणी: धार्मिक अपराध वाचून गांभीर्य पाळले गेले. हंसी मजाक होऊ नये म्हणून एक चांगला जोक आठवलेला असूनही हिला सांगितला नाही.

८)

८ वर टिप्पणी: नाही.. मुळातच मान्य करतो की हे तेल जबरी गुणकारी आहे. पण नेमके कशावर? "चोट मोच" आणि "जले कटे" हे दोन विकार वगळून बाकीच्यापैकी एकातरी रोगाच्या नावाचा अर्थ कोणी माफक शुल्क घेऊन सांगेल का?

...

...

...
याखेरीज हरिद्वारमधे एक "मेल-फिमेल" फॅमिली हॉटेल असे हॉटेल पाहण्यात आले. त्याचा, विशेषतः बोर्डाचा फोटो विविध कारणांस्तव आणि मारभयास्तव काढता आला नाही याची रुखरुख लागली आहे.

ऑस्सम फोटो झाला असता यार. हो. "मेल फिमेल फॅमिली हॉटेल" अशा नावाचं हॉटेल.. खरंच.. मी पाहिलं डोळ्यांनी..

......

हे ठिकाणप्रतिसादआस्वाद

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

10 Oct 2011 - 11:33 am | किसन शिंदे

हॅहॅहॅ...... :D :D

५व्या नंबरचा फोटो आणी त्यावरची टिप्पणी पाहून जाम हसतोय.

मेल-फिमेल नावाच्या हाटिलाचा फोटू पहायला आवडलं असतं, फोटो का नाही काढलात हो गवि?

नगरीनिरंजन's picture

10 Oct 2011 - 12:30 pm | नगरीनिरंजन

सहमत.

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2011 - 11:37 am | प्रभाकर पेठकर

फलकावर ४ रोट्या दाखवल्या आहेत आणि भात न घेतल्यास ६, म्हणजे भात न घेतल्यास एकूण १० रोट्या मिळाव्यात अशी, माफक, पुणेकरी अपेक्षा.

राही's picture

10 Oct 2011 - 2:39 pm | राही

मनात आले होते.

प्रचेतस's picture

10 Oct 2011 - 11:48 am | प्रचेतस

एकदम खुसखुशित, चुरचुरित पाट्या. बघून जाम मजा आली.
बाकी तिकडे स्वस्ताई प्रचंड दिसतेय. ३० रू थाळी फक्त.

तो ३र्‍या क्रमांकाचा पदार्थ पटाटो चाप म्हंजे बटाटा चॉप्स असावेत.
खखाँ म्हणजे खोकला बिकला आणि बिवाई म्हणजे बिमारी असावी. :)

>>तो ३र्‍या क्रमांकाचा पदार्थ पटाटो चाप म्हंजे बटाटा चॉप्स असावेत.
काय हे वल्ली, निदान बटाट्याच्या सळ्या तरी म्हण की !! ;)
गवि फोटो मस्तच, ते होडन सावर वाचल्यावर थोडी कल्पना आलीच, तोवर तुमची कमेंट वाचली आणि खात्री पटली. ते लोक हातकणंगल्याला 'हाथ का लंगडा' म्हणतात असं कुठेसं वाचलेलं आठवलं.

मराठी_माणूस's picture

10 Oct 2011 - 12:05 pm | मराठी_माणूस

ते लोक हातकणंगल्याला 'हाथ का लंगडा' म्हणतात असं कुठेसं वाचलेलं आठवलं.

हातकणंगल्याच्या रेल्वे स्टेशन वरचा बोर्ड हेच नाव दर्शवतो

मास्टरमाईन्ड's picture

12 Oct 2017 - 7:48 pm | मास्टरमाईन्ड

हातकलंगडे पण म्हणतात

मन१'s picture

10 Oct 2011 - 11:45 am | मन१

अरेरे.....

प्रचेतस's picture

10 Oct 2011 - 12:18 pm | प्रचेतस

मनोबा,
इथला अन् तिथला प्रतिसाद उलट सुलट झाला की काय?

http://www.misalpav.com/node/19378#comment-345263

कृपया संपादित करून घ्या. (नायतर कोणीतरी तिथं बूच मारेल) ;)

पैसा's picture

10 Oct 2011 - 12:39 pm | पैसा

तिथे "मस्त" बघून मला पण एकदम चक्कर आली होती पण कोणाच्या लक्षात आलं नसेल तर राहू दे म्हणून गप्प बसले..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Oct 2011 - 9:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> "मस्त" बघून मला पण एकदम चक्कर आली होती .....

सेम टू सेम.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

10 Oct 2011 - 11:55 am | पैसा

हस हस हसतेय!
पुरोहितानी बोर्ड लावायची कल्पना अतिशयच आवडल्या गेली आहे. त्यातून "मख्खन चख्खन" ........
"होडन सावर" आणि "पटाटो चाप" =)) =)) मुंबईच्या हिंदीला कशाला हसायचं या लोकानी? या इंग्लिशला घाबरून अंग्रेजानी इथून काढता पाय घेतला असावा!
हंसी मजाक करना धार्मिक अपराध हैं? =)) =)) =))
बाकी चीता तैल... मधले गठिया म्हणजे गाउट, बयार म्हणजे हवा =)) हे माहिती होतं. बिवाई म्हणजे पायाच्या भेगा हे विकिवर सापडलं. त्या खखाँ चा उच्चार कसा करतात भाऊ?

खरवाँ आहे बहुतेक ते.

बाकी शब्दांचे अर्थ (नि:शुल्क) सांगितल्याबद्दल अनेक आभार मानले जात आहेत. ;)

मृत्युन्जय's picture

10 Oct 2011 - 12:11 pm | मृत्युन्जय

अगदी एवढी छप्पर फाडके नाही पण एका हाटेलाची मजेशीर पाटी पहलगाम मध्ये पाहिली होती:

सालं हाटेलाचं नाव देल्ली दी पंजाबी रसोई आणि स्पेशलायझेशन पंजाबी खाणे सोडुन सगळ्यात. ये बात कुछ हजम नही हुई. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Oct 2011 - 12:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मजा आला...
गवि, तुमच्या कल्पकतेची दाद द्यायला पाहीजे :)

कारण पुण्याइतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि "ठ्ठो" पाट्या अजून हरिद्वार शहरात नाहीत. शिकत असावेत अजून ते.

ठ्ठो.... ;)

गणपा's picture

10 Oct 2011 - 1:02 pm | गणपा

हरिद्वारी पाट्या आवडल्या.
लोकं उगाच आमच्या पुण्याला नावं ठेवतात. :)

माझीही शॅम्पेन's picture

10 Oct 2011 - 1:06 pm | माझीही शॅम्पेन

शोलिद !

________/|\___________

त्या वंशावळीच्या पाटीत पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत काय, मधल्याच विकेट पड्लेल्या दिसत आहेत. बाकी पाट्या लई भारी,

अवांतर - एक आव्हान

इथल्या सर्व कुक व कुकीण मंडळीना जाहीर आव्हान, येत्या २४ तासात होडन सावर ची पाक्रु टाकुन २५ प्रतिसाद मिळवणा-यास शाजी पराठे पुणे येथे प्यार्टी.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Oct 2011 - 6:01 pm | अत्रुप्त आत्मा

पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत काय, ...आगागागागा :bigsmile:

त्या वंशावळीच्या पाटीत पहिले दोन गृहुस्थ स्व. नाहीत काय,मधल्याच विकेट पड्लेल्या दिसत आहेत. > :-D खपलो.... खत्री निरीक्षण...

त्या पाटीवरचे निरिक्षण चांगले आहे.
शिवाय शेवटून दुसरा, ज्याचं नाव मोनू आहे त्याच्या मुलाचं नाव राज!
म्हणजे खापर किंवा खापर खापर पणजोबा जिवंत असल्याचं खापर कोणावर फोडायचं हा प्रश्न वेगळा!;)
बाकी ते होडन सावर सूप प्यायला तुम्ही हरिद्वार गाठायलाच हवं म्हणजे गंगा मईया (संदर्भ:छोले पुरीची पाटी.) तुमच्यावर प्रसन्न होईल आणि पाय बरा करेल.;)

फारएन्ड's picture

10 Oct 2011 - 1:40 pm | फारएन्ड

मेलो हसून :) ५० फक्त चे निरीक्षणही जबरी :)

मेघवेडा's picture

10 Oct 2011 - 2:29 pm | मेघवेडा

हा हा हा.. मजा आली! 'होडन सावर' ब्येष्ट!

विजय नरवडे's picture

10 Oct 2011 - 4:33 pm | विजय नरवडे

होडन सावर बेस्ट .....

जाई.'s picture

10 Oct 2011 - 5:00 pm | जाई.

मस्त

अत्रुप्त आत्मा's picture

10 Oct 2011 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा

ते वरती भात न घेतल्यास रोट्या ६,,,हे स्पष्टीकरण पुणेरी प्रव्रुत्ती दाखवतच,,पण पुण्यात ''भात न घेतल्यास जादा चपाती मिळत नाही'',,,''मागू नये''-हे त्या वाक्यातच ध्वनीत असतं.तर ''मागितल्यास इतर ग्राहकांदेखत अपमान करणेत येइल'' ही त्याची अध्याह्रुत ओळ असते...

या वरुन १ किस्सा अठवला,आमच्या नवी पेठेत चिमणबागेत तिलक हॉटेल आहे,(तिथला चहा पूर्वी फेमस होता :-( )...तिथे वडे पार्सल मिळण्या संदर्भात १ पाटी होती >दोन नगास चटणी पार्सल मिळत नाही मी त्यांना म्हणालो- अहो तुमच्या समोर तर हा एकच नग उभा आहे,,मग द्या की...? मालक ओळखीचा असल्यानी त्यानी मला चटणी तर दिलीच,,शिवाय ''काय राव तुंम्ही अमचा आज वडा केला...हे हे हे'' वगैरे संवाद होऊन,,,दुसय्रा दिवशी त्यानी नगा'चा 'वडा' केला... :-)

धार्मिक अपराध वाचून गांभीर्य पाळले गेले. हंसी मजाक होऊ नये म्हणून एक चांगला जोक आठवलेला असूनही हिला सांगितला नाही. >>> गवि, सगळ्या पाट्या आणि त्यावरच्या टिप्पण्या धमाल आहेत ! :smile:

प्रदीप's picture

10 Oct 2011 - 6:16 pm | प्रदीप

छान, खुसखुशीत फोटो व टिपण्णी.

ज्या गंगाकिनारी तुम्ही तो फोटो काढलाय, तिथे स्मशान होतं काय? सुतकी चेहर्‍याने माणसे तिथे वावरत होती का?

'होड्डन सावर' चा अर्थ लक्षात नव्हता आला, त्याचे इन्टर्प्रिटेशन केल्याबद्दल धन्यवाद.

ज्या गंगाकिनारी तुम्ही तो फोटो काढलाय, तिथे स्मशान होतं काय? सुतकी चेहर्‍याने माणसे तिथे वावरत होती का?

हा हा..
अजिबात नाही. सर्वजण मजेत होते. दूरवरही स्मशान नव्हते. पूर्ण घाट भरुन असेच मजकूर होते.

सगळा धागा वाचून, पाहून ख्या ख्या करून हसत होते.
होडन सावर सूप म्हणजे काय हे स्पष्ट केल्याशिवाय या जन्मात तरी समजलं नसतं.
पटाटो चाप भारी आहे.
गंगा किनारे ची सूचना फार आवडली. सरळ पापपुण्याच्या भाषेतच समजावलय.;)
ज्यांनी दुसर्‍या साईडचा ढाबा विकलाय त्यांनी लिहिलेलं 'कृप्या' वाचून डोळे पाणावले.;)
'के बेटे, के बेटे' अशी परंपरा राजकारणात आलिये ती हरिद्वारहूनच!
मीही एके ठिकाणी पाटी वाचली होती.
येथे शाखाहारी आणि मौसाहारी जेवण मिळेल.

प्राजु's picture

12 Oct 2011 - 7:49 am | प्राजु

हेच म्हणते... होडन सावर हे स्पष्ट केल्याशिवाय समजलं नव्हतंच मला.. :)

मस्त धागा! खूप ह्सले वाचून! :)

साधामाणूस's picture

10 Oct 2011 - 7:11 pm | साधामाणूस

मस्त धागा. आवडला.

"कढी़ चावल राजमा छोले पूरी" ... बराच वेळ मी हे "द्योले" काय प्रकरण आहे या विचारात पडलो होतो. !!
बायदवे: मामलेदाराची मिसळ जिथे मिळते त्या दुकानाचं नाव नक्की काय आहे?

त्यावरचं गंगा मईया वाचलत का?
हा हा

रमताराम's picture

10 Oct 2011 - 7:52 pm | रमताराम

'होडन सावर' हिट्टं.

चतुरंग's picture

10 Oct 2011 - 8:27 pm | चतुरंग

खल्लास हो गवि.

होडन सावर हे जबराच!! ;)
पं. मख्खन चख्खन सुद्धा शॉल्लिट.
बाकी टमाटर मधले 'ट' आणि 'मा' हे खास पंजाबी उच्चारानुसार जोडून लिहिलेले बघून ड्वाले पाणावले. ;)

(होडनसावरप्रेमी) पं. चतुरंग चतुर्वेदी

यकु's picture

10 Oct 2011 - 8:31 pm | यकु

इंदूरला आल्यापासून माझ्यासुध्दा मनात असा उद्योग करायचा किडा येतोय.
पण कॅमवाला मोबाईल घेईपर्यंत वाट पहावी लागेल.
इथे तर चक्क
शासकिय मदिरालय ;-)
असे लिहीलेले बार आहेत.. विश्वास नाही? थांबा आता गविंसारखेच फोटो टाकतो..

चेतन सुभाष गुगळे's picture

10 Oct 2011 - 8:54 pm | चेतन सुभाष गुगळे

<< शासकिय मदिरालय >>

हे वाचून धर्मेंद्र च्या (बहुदा प्रतिज्ञा) चित्रपटामधील सरकारमान्य देसी पुलिस चौकी आठवली.

शिल्पा ब's picture

10 Oct 2011 - 8:48 pm | शिल्पा ब

एक्दम मजेदार बोर्ड आहेत. त्यांचं हिंदी समजायला बराच वेळ लागला हेसुद्धा जाता जाता सांगते.

काही दिवस हरिद्वारला गेलो होतो.
नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज..

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =))=)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

_____/\____

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Oct 2011 - 9:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगा किनारे बैठकर हसी मजाक.....ला पैकीचे पैकी मार्क दिले. :)

-दिलीप बिरुटे

प्रीत-मोहर's picture

10 Oct 2011 - 11:20 pm | प्रीत-मोहर

हाहाहा=)) =)) =))
होडन सावर भारीच :)

=)) =)) कित्ती तरी वेळ हसले हा लेख वाचुन :)

पाषाणभेद's picture

11 Oct 2011 - 12:22 pm | पाषाणभेद

खरोखर असलीच परिस्थिती.

एका ठिकाणी मी पण असेच पाहीले होते जसे की:
थमसअप
पवा म्हणजे पोहे

गुजराती भाषेत पोह्यांना पोवे म्हणतात...
अन बटाट्याला बटाका.....
असे बरेच वुच्चार आहेत जे थोडेफार प्रदेशानुसार चेंज होत असतात......

सगळे एकाहून एक भारी .

मालक हरिद्वारला दिल्लीहून गेला असाल.
अगोदर कळवते तर भेटलो असतो ना?

दिल्लीहून नव्हे.. गुरगाव.. सॉरी गुरुग्रामवरुन.. इट्स डिफरन्ट.. (आठवा.. मॅगी हॉट अॅन्ड स्वीट चिली टॉमॅटो सॉस.. इट्स डिफरंट..).

लेट उत्तराबद्दल क्षमस्व.

चेतन सुभाष गुगळे's picture

11 Oct 2011 - 12:54 pm | चेतन सुभाष गुगळे

आजच ही एक पाटी फेसबुकावर पाहिली.

बहुदा वाड्याला फ्लॅटपण देणार्‍यांनी केलेल्या सततच्या विचारणेला कंटाळून लावली असावी.

गवि's picture

11 Oct 2011 - 1:06 pm | गवि

मी पुण्यात असताना लक्ष्मीरोडवर भली मोठ्ठी वाड्याच्या इतक्याच रुंदीची निऑन साईन तयार करुन लावलेली पाहिली.

"वाड्याचे मालक श्री.--- मालकाचे पूर्ण नाव नाव-वडिलांचे नाव-आडनाव---- हे आहेत. बहुधा मराठे किंवा तत्सम नाव होतं.

नंतर सुधीर गाडगिळांनी त्यावर लेखही लिहिला होता कुठेसा.

हल्ली काय स्थिती आहे माहीत नाही.

लक्ष्मी रस्त्यावर ..
मराठे आडनाव आहे..अजुनही आहे ती पाटी

आहे आहे ती पाटी अजुन आहे फक्त आता निऑन बंद असतात, त्या जागेची किंमत २०० ४ - ५ मध्ये साधारण ८-१० कोटी इतकी होति असे ऐकले आहे, मी ज्या दिवशी ती पाटी नेटवर पाहिली त्यादिवशीच रात्री प्रत्यक्ष बघायला गेलो होतो तिथे.

तिमा's picture

11 Oct 2011 - 8:28 pm | तिमा

गवि,
छान लेख. मला अजून 'होडन सावर' चा अर्थ कळला नाही.

- तिरशिंग डंबोणे

पैसा's picture

11 Oct 2011 - 10:55 pm | पैसा

मनचुरियन सूप आणि पटाटो चाप चापा.

पैसाताई, असा हँसी मजाक केलास तर गंगा मईयाँच्या दृष्टीने धार्मिक अपराध ठरतो.
त्यापेक्षा ति. मां. ना सांगून टाक ना हे हॉट आणि सावर सूप आहे ते!
अहो ति. मा., हॉट हा शब्द वेगळ्या तीर्थक्षेत्री चालतो इथं नाही!;)

प्राजु's picture

12 Oct 2011 - 7:52 am | प्राजु

अहो ति. मा., हॉट हा शब्द वेगळ्या तीर्थक्षेत्री चालतो इथं नाही!<<<<

भारी हं!! :)
बाकी गवि... खूप हसतेय मी. ५० फक्त यांची टिप्पणी आवडली.

स्पा's picture

12 Oct 2011 - 8:45 am | स्पा

__/\__

हसून हसून अतिशय वाईट प्रकारे खपल्या गेलो आहे :D

मग तुम्हाला मोनु किंवा राजु कडे जाउन चालणार नाही, श्री. मख्ख्नन चख्खन यांचेकडेच जावे लागेल, वाईट प्रकारे खपल्यास काय करायचे याचे ट्रेनिंग हे मोनु किंवा राजु यांनी घेतलेले नाही अजुन.

आत्मशून्य's picture

12 Oct 2011 - 10:27 am | आत्मशून्य

हॅ हॅ हाआआ

५० फक्त's picture

13 Oct 2011 - 10:01 am | ५० फक्त

ही पाटी बहुधा, इथं येणा-या परदेशी गे किंवा लेस्बियन पर्यंटकांचा गोधळ टाळण्यासाठी सिरियसली लावलेली असावी अशी एक प्रामाणिक शंका आहे.

इरसाल's picture

13 Oct 2011 - 11:56 am | इरसाल

गंगा किनारी बसून गप्पा, खाणे पिणे इ.इ. जर धार्मिक अपराध असेल तर.....
तिथे हॉट(गरमागरम) आणि सॉर (आंबट - शौकीन) लिहेले तर ते महापातक असावे म्हणून त्याला पर्यायी शब्द होडनसोर ;) वापरत असावेत.

आशु जोग's picture

14 Oct 2011 - 11:22 pm | आशु जोग

>> मक्खन चक्खन यांचे नाव अत्यंत आवडण्यात आले आहे. सुखी माणूस असावा.
मक्खन चक्खन यांचे नाव अत्यंत आवडल्या गेले आहे
सुखी माणूस मानल्या गेला आहे

सिरुसेरि's picture

12 Oct 2017 - 5:18 pm | सिरुसेरि

मजेशीर पाट्या आणि मजकुर .