स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
13 Sep 2011 - 5:12 pm

स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार?
(Times of India मधील बातमीचे भाषांतर)
स्विस बॅंकातील गुप्त खात्याबद्दलची माहिती जाहीर करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या रुडॉल्फ एल्मर यांनी यांनी या काळ्या पैशाची पाळेमुळे खणण्यात भारत सरकारने प्रामणिकपणे पुढाकार घेतला नाहीं अशी खंत आज व्यक्त केली. स्वत: "ज्युलियस बार" या स्विस बॅंकेत एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत असताना अशा तर्‍हेने "शिट्टी फुंकून" गुप्त बातम्या जाहीर करणारे रुडॉल्फ एल्मर यांच्यासारखे फार थोडेच लोक असतात. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही पत्करावा लागला आहे. नुकतीच त्यांची कारावासातून सुटका झाली. वरील खंत त्यांनी त्यानंतर लगेच व्यक्त केली. कारावासातून बाहेर पडल्यानंतरच्या एका चित्रवाणीला दिलेल्या पहिल्या-वहिल्या निवेदनात ते म्हणाले कीं भारत सरकारने या दिशेने पुरेसे प्रयत्न केलेले नाहींत. त्यासाठी भारतीय जनतेने सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला पाहिजे. भारत हा एक मोठा देश आहे आणि तो दिवसेंदिवस अधिकाधिक बळकटही होत आहे. त्यामुळे वाटाघाटींत आपल्यासारखे निर्णय करवून घेण्यासाठी लागणारी ताकत भारताकडे पुरेशी आहे.
एल्मर पुढे म्हणाले कीं भारतीय कंपन्या, श्रीमंत भारतीय नागरिक (ज्यात क्रिकेटमधले व सिनेजगतातले तारे-तारकाही आहेत) आपले पैसे ठेवण्यासाठी आयकर व इतर करांबाबत ढिले असलेल्या "केमन"सारख्या बेटांचा (Cayman Islands) दुरुपयोग करत आहेत. त्यांनी २००८ मध्ये जाहीर केलेल्या करचुकव्यांच्या नावांच्या यादीत अनेक भारतीय नांवें आहेत. पण असे असले तरीही कुठल्याही भारतीय नावाचा थेट उल्लेख करायचे त्यांनी नाकारले. सध्या त्यांच्यावर स्वित्झरलंडमध्ये त्या देशाचे गोपनीयतेचे कायदे मोडल्याबद्दल खटला चालू आहे.

एल्मर यांच्या मते फक्त अमेरिकन सरकार आपल्या नागरिकांचा/कंपन्यांचा करचुकवेपणा आणि त्याच्या संदर्भात घडणारे इतर बेकायदेशीर धंदे बंद करण्याबाबत प्रामाणिक आहे. अलीकडील अहवालांनुसार स्विस बॅंकांनी अमेरिकन अधिकार्‍यांना त्यांच्याकडे खाती असलेल्या करचुकव्या अमेरिकन नागरिकांबद्दल माहिती देण्यास सुरुवातही केलेली आहे. एल्मर यांनी करचुकव्यांविरुद्ध लढण्यासाठी जागतिक स्तरावरच्या बांधिलकीची आणि कारवाईची मागणी केली आणि असे करचुकवे नागरिक गुन्हेगार असल्याचे मत व्यक्त केले.
एल्मर यांनी करचुकव्याविरुद्ध आणि स्वित्झरलंडच्या बॅंकांच्या गुप्ततेच्या धोरणाविरुद्ध उघड-उघड युद्ध पुकारले आहे. त्यासाठी त्याला दोनदा अटक आणि कारावासही झालेला आहे. २०११ च्या जानेवारीत त्यांनी करबुडव्यांची आणि स्विस बॅंकांच्या गुप्ततेचा दुरुपयोग करणार्‍यांची २००० पेक्षा जास्त नावे असलेली CD विकीलीक्सला सादर केली. या यादीतील तपशील अद्याप जाहीर व्हायचा आहे.

अर्थकारणराजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

कारावासातून बाहेर पडल्यानंतरच्या एका चित्रवाणीला दिलेल्या पहिल्या-वहिल्या निवेदनात ते म्हणाले कीं भारत सरकारने या दिशेने पुरेसे प्रयत्न केलेले नाहींत. त्यासाठी भारतीय जनतेने सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला पाहिजे. अण्णांची मोहीम हे काम करो हीच सदिच्छा!

कॉमन मॅन's picture

13 Sep 2011 - 5:19 pm | कॉमन मॅन

एल्मर यांचे कौतुक वाटते.

कॉमॅ.

सुधीर काळे's picture

13 Sep 2011 - 5:21 pm | सुधीर काळे

१०० टक्के सहमत! अशी माणसे खरंच विरळा!

अन्या दातार's picture

13 Sep 2011 - 5:27 pm | अन्या दातार

ताबडतोब प्रणब, चिदूंना फोनवा रे कुणीतरी.......... ;)

नितिन थत्ते's picture

13 Sep 2011 - 5:48 pm | नितिन थत्ते

२० ऑगस्ट २०११ पर्यंत तरी स्विस सरकारने (ज्या करारानुसार स्विस बँकेतील खातेदारांची नावे कळणार आहेत तो) करार रॅटिफाय केला नव्हता.

आज १३ सप्टेंबर आहे. अण्णांना तो करार ३० सप्टेंबरच्या आत मंजूर करावा म्हणून स्विस सरकारपुढे निदर्शने आणि उपोषण करण्यास फुल स्कोप आहे.

अवांतर: अधुनमधून कोणीतरी परकीय मनुष्य भारत सरकार प्रयत्न करीत नाही अशी विधाने करतो. जणु ते लोक यादी जवळ घेऊन बसलेच आहेत आणि भारताने यादी मागायचा अवकाश की ते यादी काढून देणार आहेत. परंतु भारत सरकारतर्फे (एन्फोर्स्मेंट डायरेक्टोरेट किंवा आयकर खात्यातर्फे) मागितलेली माहिती वेगवेगळी कारणे सांगून द्यायचे नाकारले आहे. पैसे परत आणणे दूर स्विस बँकेकडून नावे कळली तरी पुष्कळ आहे.

नितिन थत्ते's picture

13 Sep 2011 - 5:53 pm | नितिन थत्ते

या ठिकाणी खातेदारांची नावे प्रसिद्ध झाली आहेत.

परंतु काळेकाकांना अपेक्षित ;) असलेली नावे त्यात नाहीत. :(

परिकथेतील राजकुमार's picture

13 Sep 2011 - 6:11 pm | परिकथेतील राजकुमार

अशीच एक लिस्ट सध्या ढकलपत्रातून देखील हिंडत आहे ;)

@ काळे काका

खरं खरं सांगा, तुमचे किती पैसे आहेत स्विस बँकेत ?

सुनील's picture

13 Sep 2011 - 8:22 pm | सुनील

त्यातील १३ नंबरचे राज फौंडेशन कोणाचे बॉ?

विकास's picture

13 Sep 2011 - 8:59 pm | विकास

अशाच ढकलपत्रातून आलेले हे एक चित्रः (जालावर भरपूर ठिकाणी आढळेल.)

हे बातमी-चित्र तयार केलेले वाटते. अर्थात त्यातील नेत्यांची स्विसबँकेत खाती नसतीलच असे नाही!

श्रावण मोडक's picture

14 Sep 2011 - 10:49 am | श्रावण मोडक

प्रतिसाद आणि लेखनातील आशयांबाबत इग्नोअर, डिस्काऊंट, डिस्कार्ड अशा स्वरूपाच्या सुविधा असाव्यात, असे अलीकडे फार वाटत होते. विकास यांच्या या प्रतिसादातून त्याला पुष्टी मिळावी हे अनपेक्षीत होते. अनपेक्षीततेच्या आश्चर्याचा लाभ इतकाच की (त्यांच्यासह अशा विषयांवर होत असलेल्या) एकंदर लेखनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक विशाल झाला.

चीनला डॉलर मीच उसने देतो तेंव्हां कुठे 'फंड ट्रन्सफर'द्वारा ओबामांना पगार मिळतो! खरं कीं नाहीं?

परा चाचा. ती लिस्ट परीवारातील लोकानी बनवलेली आहे.

सुधीर काळे's picture

13 Sep 2011 - 9:04 pm | सुधीर काळे

नितिन, पहिली गोष्ट म्हणजे मला कुठलीच नांवे अपेक्षित अशी नाहींत, पैसे परत यायला पाहिजेत इतकेच. तुझ्याच मनात खोट आहे म्हणून तुला सगळीकडे भुतें दिसतात. पण आज तुझा वाढदिवस आहे म्हणून जास्त लिहीत नाहीं.
दुसरी गोष्ट म्हणजे तू दिलेल्या बातमीतील नावे LGT bank of Liechtenstein इथली आहेत तर एल्मर यांनी दिलेली नांवे वेगळ्याच बँकेतील आहेत. स्वित्झरलंडमध्ये हजारो बँका असतील त्यातल्या या याद्या म्हणजे Tip of the iceberg असाव्यात.

विकास's picture

13 Sep 2011 - 9:05 pm | विकास

या याद्या म्हणजे Tip of the iceberg असाव्यात.
सहमत.

सुधीर काळे's picture

13 Sep 2011 - 9:09 pm | सुधीर काळे

नितिन, पहिली गोष्ट म्हणजे मला कुठलीच नांवे अपेक्षित अशी नाहींत, पैसे परत यायला पाहिजेत इतकेच. तुझ्याच मनात खोट आहे म्हणून तुला सगळीकडे भुतें दिसतात. पण आज तुझा वाढदिवस आहे म्हणून जास्त लिहीत नाहीं.
दुसरी गोष्ट म्हणजे तू दिलेल्या बातमीतील नावे LGT bank of Liechtenstein इथली आहेत तर एल्मर यांनी दिलेली नांवे "ज्युलियस बार" या बँकेतील आहेत.
स्वित्झरलंडमध्ये हजारो बँका असतील त्यातल्या या याद्या म्हणजे Tip of the iceberg असाव्यात.
गांधी कुटुंबियांची नावे आली तर बघू पुढे काय ते, आतापासून या नांवांबद्दल अटकळी कशाला? जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाहीं तोवर सर्वच निर्दोष!
पैसे परत यायला हवेत इतके तरी तुला मान्य आहे ना? खूप झाले.....!

विनायक प्रभू's picture

13 Sep 2011 - 6:15 pm | विनायक प्रभू

अगदी अगदी.
मला नि.थ. चा वर पण साँशय हाय.

कुंदन's picture

13 Sep 2011 - 11:08 pm | कुंदन

ठाणे कर आहेत ना ते आणि तुम्ही पण....
तुमचा संशय खरा ठरो अशी थत्ते चाचांना वाढदिवसाची शुभेच्छा !!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2011 - 7:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो पण कशाला आणायचे तेच्च पैसे परत? त्यापेक्षा आत्ता चाल्लंय ते काय वाईट आहे? मस्तपैकी पैसे देशातच छापायचे, भारतातल्या छापखान्यातल्या लोकांनाही थोडा कामाचा अनुभव मिळेल (नाहीतर सतत त्या जळ्ळ्या परदेशी लोकांना अनुभव मिळतो), त्यांचे सीव्ही सुधारतील; शिवाय ते पैसे भारतात आणायचे तर इंधनाचा खर्चही होईल, ग्रीन हाऊस गॅसेस वाढतील ... चाल्लंय तेच बरं आहे.

स्विस फ्रँकचाही काही झोल सुरू आहे म्हणे! याचीही चौकशी करण्यासाठी अण्णांनी उपोषण केलं पाहिजे.

रेवती's picture

13 Sep 2011 - 8:35 pm | रेवती

हा हा हा

विजुभाऊ's picture

14 Sep 2011 - 11:06 am | विजुभाऊ

प्र का टा आ

विकास's picture

13 Sep 2011 - 9:03 pm | विकास

जसे आपले नेते स्विस बँकेत पैसे ठेवतात असे म्हणले जाते, तसे स्विस नेते त्यांचे काळे* पैसे कुठे ठेवत असावेत?

*आडनाव नाही ;)

काळे आजोबांनी स्विस बँकेला एक पत्र लिहावे अशी मी त्यांना विनंती करतो.

-निळे.

विनायक प्रभू's picture

14 Sep 2011 - 9:57 am | विनायक प्रभू

अगदी मनातले बोललास रे निळ्या.
ते पाठवलेले पत्र इथे मिपावर पोस्ट करावे अशी अ‍ॅडीशनल विनंती.

सुनील's picture

14 Sep 2011 - 9:43 am | सुनील

... उद्या स्वीस बॅकांमध्ये ठेवले गेलेले सगळे भारतीय पैसे भारतात परतले तर, चलनवाढ होऊन महागाई वाढेल काय?

सहज's picture

14 Sep 2011 - 10:08 am | सहज

पण मग सुनीलराव, हप्त्या हप्त्याने पैसे मागवूया. महागाई वाढली की पुढचा हप्ता आणुन त्याने समस्या हलकी करुया, कसे?

बादवे काळा पैसा बनुन बाहेर जायचे थांबले की काय? आणि एकटी स्वीस बँकच काळे पैसे घेते का? हवाला ने कोण कुठे पैसा पाठवते हे आपल्या सरकारी यंत्रणांना कळतच नाही ना ?

स्पा's picture

14 Sep 2011 - 9:59 am | स्पा

काळे आजोबा..एक मनापासून विनंती..
एखादी छान गोष्ट किंवा ललित , किंवा अगदी कविता पण चालेल

राजकारण सोडून काहीही चालेल..
लिहा न काहीतरी..
प्लीज्ज , मनावर घ्याच आता
तुमचा मेकोवर झालेला बघायचाय मला

-- नातू स्पा

प्रचेतस's picture

14 Sep 2011 - 10:01 am | प्रचेतस

वाटल्यास एखादा सलमानविरोधी लेख पण लिहा.

शिल्पा ब's picture

14 Sep 2011 - 10:12 am | शिल्पा ब

झेपत नसलेले धागे उघडतोस कशाला?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Sep 2011 - 4:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे

स्पा भाऊ, एक मनापासून विनंती
एखादा छान प्रतिसाद दे ना आता, अगदी वैचारिक दिलास तरी चालेल.

पण जिलबी, साचा, इतरांनी कसे धागे काढावे वा काढू नये हे सोडून काहीही चालेल.
प्लीज मनावर घेच आता
तुझा मेकोवर झालेला बघायचा आहे.

मित्र विमे ;-)

त्यापेक्षा 'मिपा'वरून गेलेले बरे!

वाटल्यास एखादा सलमानविरोधी लेख पण लिहा.

अगदी अगदी...
तोही मी आवडीने वाचेन... ;)

त्यापेक्षा 'मिपा'वरून गेलेले बरे!

स्पा's picture

14 Sep 2011 - 10:16 am | स्पा

त्यापेक्षा 'मिपा'वरून गेलेले बरे!

आईंग ??
कक्का रागावू नका हो.. गम्मत केलेली...

असे जाऊ नका कुठेही

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2011 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार

त्यापेक्षा 'मिपा'वरून गेलेले बरे!

काका आपण एक नविन संस्थळा काढूया का ?

आंतरजालावरील काही सदस्यांकडून त्यांचे काळे पैसे घेऊन तिथे गुंतवु आणि त्यांना पांढरे करुन देऊ.

काढा काढा, पर्‍याची संपादक व्हायची इच्छा तरी पुरी होईल. मग तो जाल सन्यास घेणार आहे म्हणे.

योगी९००'s picture

14 Sep 2011 - 12:35 pm | योगी९००

स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार?

समजा चुकून आणले..तर त्याचे काय करणार हा पण प्रश्न आहे...कारण एवढा पैसा कधीच आपल्या सरकारने पाहिला नसेल...

समजा..
१) तो पैसा गरिबांना वाटला किंवा सगळ्यांचा आयकर काही वर्षे रद्द केला...तर पैशाचे महत्व कमी होईल कारण सगळ्याकडेच पैसा आहे... म्हणजे ३ रू. चा चहा गाडीवर १०० ला मिळेल...
२) तो पैसा आपल्या काही बॅकांमध्ये ठेवला तर त्या बॅकांना त्या पैशाचा विनियोग करण्यासाठी अतिशय स्वस्त दरात कर्जे द्यावी लागतील आणि परत पैशाचे महत्व कमी होईल..
३) पैशाचा उपयोग देशावरील कर्ज कमी करणे, रस्ते, धरण, सुरक्षा यासाठी वापरणे...यामुळे सर्वसामान्य माणसांना काय फायदा होईल ते माहित नाही पण जर थोडे सुद्धा सामान्य माणसांचे उत्पन्न वाढले तर पैशाचे महत्व कमी होण्याचीच शक्यता जास्त...

म्हणजे थोडक्यात काय?...महागाई अजुन वाढेल...अर्थात हे मला वाटते..कदाचित मी पुर्णपणे चुकीचा विचार करत असेन..

एखादा econimist या वर चांगला प्रकाश टाकू शकेल.. (क्लिंटन साहेब कोठे आहात?)

अविनाशकुलकर्णी's picture

14 Sep 2011 - 2:56 pm | अविनाशकुलकर्णी

काळे साहेब विसरा हे वाचा.............
अब काला धन वापस नहीं आएगा

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सेज के चेयरमैन प्रकाश चंद्र ने एक चौंकाने वाला बयान दिया. यह बयान स्विट्जरलैंड और भारत के बीच काले धन के मामले में हुए क़रार के बारे में है. इस समझौते को स्विट्जरलैंड की संसद की मंजूरी मिल गई है. इस क़रार में भारतीय नागरिकों के स्विस बैंकों के खातों के बारे में जानकारी प्राप्त करने का प्रावधान है. प्रकाश चंद्र ने कहा कि इस क़ानून के लागू होने के बाद खोले गए खातों के बारे में ही जानकारी मिल सकती है. इस बयान का मतलब आप समझते हैं? इसका मतलब यह है कि जो खाते इस क़ानून के लागू होने से पहले खुले हैं, उनके बारे में अब कोई जानकारी नहीं मिलेगी. यानी भारतीय अधिकारियों को अब तक जमा किए गए काले धन के बारे में कोई जानकारी नहीं मिल सकेगी. इसका मतलब यह है कि भारत सरकार ने स्विट्जरलैंड की सरकार से यह क़रार किया है कि जो खाते पहले से चल रहे हैं, उनकी जानकारी उसे नहीं चाहिए. मतलब यह कि सरकार उन लोगों को बचाने में जुटी है, जिन्होंने अब तक काले धन को स्विस बैंकों में जमा किया है. अब कोई मूर्ख ही होगा, जो इस क़ानून के लागू होने के बाद स्विस बैंकों में अपना खाता खोलेगा. अब यह पता नहीं कि सरकार किसे पकड़ना चाहती है.

http://www.chauthiduniya.com/2011/07/black-money-will-not-come-back.html

अविनाशकुलकर्णी's picture

14 Sep 2011 - 5:19 pm | अविनाशकुलकर्णी

काळेधन परत आणण्यास राज्यकर्ते गंभीर नाहीत !
स्विस अधिकोषांतील माजी अधिकारी एल्मर यांनी भ्रष्ट काँग्रेसी राज्यकर्त्यांचा बुरखा फाडला !

रुडॉल्फ एल्मर यांनी केलेला खळबळजनक खुलासा !
विदेशी अधिकोषांत राजकारण्यांबरोबरच, खेळाडू आणि अभिनेते यांचेही काळेधन
भारतियांनी विदेशात ठेवल्या आहेत सोन्यापासून चित्रांपर्यंतच्या मौल्यवान वस्तू
नावे घोषित केल्यास मला धोका
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर - स्वित्झर्लंडमधील एका अधिकोषातील माजी अधिकारी रुडॉल्फ एल्मर यांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशी अधिकोषांत काळेधन साठवण्यामध्ये राजकीय नेते आणि उद्योगपती यांच्याबरोबरच क्रिकेटचे खेळाडू आणि चित्रपट अभिनेते हेही आघाडीवर आहेत.
स्विस अधिकोषांत असणार्‍या काळ्या धनाविषयी भारतातील काँग्रेसचे राज्यकर्ते गंभीर नाहीत, असा आरोपही एल्मर यांनी केला आहे.
(काळे धन भारतात आणण्याविषयी भ्रष्ट काँग्रेसी राज्यकर्ते उदासीन आहेत, हे आता या अधिकोषांतील अधिकारीही सांगत आहेत. हिंदूंनो, तुमच्या असंघटितपणामुळे आणि राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयीच्या उदासीनतेमुळेच ही स्थिती उद्भवली आहे. - संपादक) एल्मर यांनी जरी ही माहिती दिली असली, तरी काळेधन साठवणार्‍यांची नावे
सार्वजनिक करण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे.
१७ जानेवारी २०११ या दिवशी रुडॉल्फ एल्मर यांनी स्वित्झर्लंडच्या कायद्याचे उल्लंघन करून अमेरिका, ब्रिटन आणि आशिया येथील २ सहस्त्र राजकारणी आणि उद्योगपती यांची नावे असलेली संगणकीय चकती (सीडी) विकिलीक्सचे संपादक ज्युलीयन असांजे यांना दिली. या चकतीमध्ये भारतातील काळे धन ठेवणार्‍यांचीही नावे आहेत. एल्मर यांनी अधिकोषांतील खातेधारकांची सूची असांजे यांना दिल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून कारागृहात डांबण्यात आले होते. २५ जुलै २०११ या दिवशी त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
एल्मर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना सांगितले, ‘‘काळ्या धनाच्या संदर्भात कारवाई करण्यासाठी विश्वातील सर्वच राष्ट्रांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. काळे धन साठवणारे गुन्हेगार आहेत. या गुन्हेगारांमध्ये क्रिकेट खेळाडू आणि चित्रपट अभिनेतेही सहभागी आहेत. (योगऋषी रामदेवबाबा यांनी काळ्या धनाच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केल्यानंतर शाहरुख खान आणि सलमान खान या दोन खानांनी त्यांच्या आंदोलनाला तीव्र विरोध केला होता. हिंदूंनो, त्यांचा हा विरोध का आहे, हे आता एल्मर यांच्या खुलाशाने तुमच्या लक्षात आले असेलच ! हिंदूंनो, अशा अभिनेत्यांच्या चित्रपटांवर आणि त्यांच्या सर्वच कार्यक्रमांवर बहिष्कार घाला ! - संपादक)
भारतीय राज्यकर्ते काळे धन भारतात आणण्यासाठी पुरेसे गंभीर नाहीत. ते गंभीर असते, तर त्यांनी अमेरिकेप्रमाणे काळे धन साठवणार्‍यांची सूची मिळवून कारवाई चालू केली असती. राज्यकर्त्यांनी काळे धन भारतात परत आणावे, यासाठी भारतीय जनतेने त्यांच्यावर दबाव आणायला हवा.’’ भारतियांनी विदेशी अधिकोषांत ठेवलेल्या संपत्तीच्या विवरणाविषयी एल्मर म्हणाले, ‘‘स्विस अधिकोषांत भारतियांनी केवळ पैसेच ठेवलेले नाहीत, तर सोन्यापासून महागड्या चित्रांसारख्या गोष्टीही ठेवलेल्या आहेत. मी या मंडळींची नावे सार्वजनिक केली, तर मला अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे मी ही नावे सार्वजनिक करू इच्छित नाही. भारतीय राज्यकर्त्यांची इच्छा असेल, तर ते हे काळेधन भारतात परत आणू शकतात.
(काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत सांगितले आहे की, स्विस अधिकोषांतील काळेधन भारतात परत आणण्यासाठी स्विस शासनावर दबाव आणत आहोत. प्रत्यक्षात एल्मर यांनी दिलेल्या या माहितीनुसार काळ्या धनाच्या संदर्भात भ्रष्ट काँग्रेसी राज्यकर्ते भारतीय जनतेची फसवणूक करत आहेत, हेच सिद्ध झाले आहे. असे राज्यकर्ते राज्य करण्यास लायक आहेत का ? ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमींचे हिंदुराष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! - संपादक)

काँग्रेसचे राज्यकर्ते काळे धन परत आणण्यास सक्षम नाहीत कि ते स्वतःच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न भाजपचे नेते वरुण गांधी यांनी काँग्रेसी राज्यकर्त्यांना केला आहे..................सप्रभात

असे गैरमार्गाने धन साठवणारे राजकारणी लोक, खेळाडू, उद्योजक यांचे शेवटी (म्हणजे म्हातारपणी) काय होते?
गरजेपेक्षा जास्त संपत्ती ही त्या मनुष्यालाच काय ईतरांनाही (वारसदारांना) वापरता येईल असे वाटत नाही.
एक दिवस (खरेखुरे) वेडे होतील की काय हे लोक? असे वाटले. जास्तीच्या (तेही काळ्या) येणार्‍या प्रत्येक पैबरोबर किती त्रासदायक, न सांगता येण्यार्‍या गोष्टी येत असतील? एका राजकारण्याच्या एकुलता मुलगा अपघातात गेल्यावर मला वाटले होते की आता हा मनुष्य कश्याला परत येतोय? पण नाही, राजकारणातील अनेक वाईट बाबी या नंतरच कानावर आल्या. काय मिळतं यातून? या लोकांवरही घरातून संस्कार झाले नसतील असं नाही पण ते सगळं कुठेतरी मागं सोडून वेगळ्या दुनियेत जातात. सत्ता असावी व मिळाल्यावर टिकावी म्हणून वाट्टेल ते करायला मनुष्यप्राणी धडपडत असतो. कोणावर तरी गाजवायला मिळणं हीच मूळ गरज (अन्न, वस्त्र, निवारा यानंतर) आहे की काय?;)