उप-वास स्पेशलः-साबुदाणा खिचडी....

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
29 Aug 2011 - 2:45 pm

ह्या कवितेच (आ)जन्मस्थळ म्हणजे आमचा धंदा-भिक्षुकी उर्फ भटजीगिरी...विशेषतः श्रावण ते (नाकी)नवरात्र या कालावधीत आंम्हा भटजींवर या खिचडीचा जो मारा होतो,त्या---होय...होय..त्याच वेदनेतुन ही कविता प्रसवली आहे...म्हणजे हीचं आमच काही वैर नाही,पण,''त्रास होतो हो हीचा(म्हणजे खिचडीचा ;-))''...असं प्रामाणीक पणे सांगूनही,,,नाही नाही गुरुजी आंम्हाला बंरं वाटावं म्हणुन खा...खा...खा...अंसं काखा वर करुन ठ्ठो ठ्ठो ठ्ठो करत कस्टमर सॉरी सॉरी यजमान मागे लागतात...आणी आंम्हाला कारणं देता देता पळता भुई थोडी होते,,,एरवी ही बया आंम्हाला अवडत नाही असं कुठाय?मी तर माझ्या या मुळातल्या प्राणप्रीय परंतु अतीपरीचयात अवज्ञा झालेल्या या खिचडीला पहीली सलामी एका श्लोकाच्या ओळीच्या विडंबनातूनच दिली होती-म्हणजे,,, ''विश्वाधारं गगन सद्रुशं मेघवर्णं शुभांगम'' असं आहे की नाई,त्याला ''साबुदाणं रबर सद्रुशं श्वेतवर्णं च्युईंगम''...असं मी चावलं होतं ;-)...असो अता जास्त च्यावच्याव न करता उरलेलं कवीतेवर सोडतो---तर श्रोतेहो खिचडी करीता वाहातो,ही शब्दांची खिचडी....................(ही आमची पारंपारीक-गुरुजी/यजमान म्याच आहे.)

यजमानांनी विचारलं-उपास...?
जरा खिचडी देऊ का?
चपला घालतच म्हणालो
त्या पेक्षा मी येऊ का?

का हो?तुंम्ही गुरुजी..
आणी खिचडीला भिता?
अहो,वाचायला फार सोपी
ही पचायला अवघड गीता

अहो,मस्त दही टाका
मजबुत दाबून हाणा..
म्हणजे नंतर सहा तास
पोटात गोळे आणा?

जुने गुरुजी मजबुत खायचे...
एक/दोन प्लेट?...विसरा
पूर्वीच्यांना उद्योग ठेवलावतात का
खाण्यापलीकडे...दुसरा?

पूर्वीचे गुरुजी कामं करुन
पराती करायचे फस्त
अहो,जुना स्कुटरचा काळ तो
एव्हरेज पेक्षा इंधन जास्त

जाउ दे गुरुजी आता..
राग विसरा..हट्ट सोडा
कालची खिचडी पचायला
आधी आणा १ सोडा

अशा तह्रेनी आंम्ही यजमानांचा
१प्लेट अपराध पोटात घातला
पण नंतर दिवसभर...
तो आमच्या पोटात उतला

श्रावणाचा संपत सोमवार
आंम्ही या खिचडीवर सोडला
आणी यजमान/गुरुजी नववादाचा
अजुन एक नारळ फोडला..... :-)

हास्यमौजमजा

प्रतिक्रिया

कविता आवडली.

आम्च्य गुरूजींना आम्ही मसाला दूध आणि केळी देतो ... त्यांना पण खिचडी बहुधा फारशी आवडत नसावी (किंवा आपल्यासारखी केस असावी).. नेहमी नाहीच म्हणतात.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 4:39 pm | अत्रुप्त आत्मा

आयला अजूनही ते या गोष्टी तुंम्ही दिल्यावर खातात, म्हणजे भलतेच तयार आहेत ते...कींवा त्यांचे पोट... :-)

बाकी त्यांची केस तरी आमच्यापेक्षा वेगळी काय असणार म्हणा?.... ;-) ते सुपात आहेत,आंम्ही जात्यात आहोत...

पप्पु अंकल's picture

29 Aug 2011 - 3:09 pm | पप्पु अंकल

कविता खुप, खुप आवडली..........
पुढील लेखनास शुभेच्छा.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Aug 2011 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त हो दिवेकर भटजी.

एकदम आवडेश. आधी चुकून लेखन विभाग चुकला का काय असे वाटले होते, पण लेखन उघडल्यावर मस्त करमणूक झाली.

अवांतर :-

''साबुदाणं रबर सद्रुशं श्वेतवर्णं च्युईंगम''

ह्यावरून 'उपासाचा आनंद ह्या, मॅनफोर्स आता साबुदाणा फ्लेवर मध्ये' हे आठवले ;)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 4:44 pm | अत्रुप्त आत्मा

''ह्यावरून 'उपासाचा आनंद ह्या, मॅनफोर्स आता साबुदाणा फ्लेवर मध्ये' हे आठवले ''--- हे वाचून आंम्हाला प रा-कोटीचा आनंद जाहला, हा तुमचा मेन फोर्स असावा असे वाट्टे ;-)

किसन शिंदे's picture

29 Aug 2011 - 3:32 pm | किसन शिंदे

:D :D :D
पहिलं कडवं वाचलं आणी एकदम मोठ्याने हसलो...जबरा आहे.

चतुरंग's picture

29 Aug 2011 - 4:51 pm | चतुरंग

म्याच आवल्डी रे!
साबूदाणं रबरसदृशं......श्लोकही भन्नाट ;)

(साबूदाणा खिचडी प्रेमी) रंगाण्णा

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा

सविता,पप्पु अंकल,प रा, किसनराव...सर्वांसी प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद........... :-)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 4:53 pm | अत्रुप्त आत्मा

प्र.का.टा.आ.

प्रीत-मोहर's picture

29 Aug 2011 - 5:24 pm | प्रीत-मोहर

साबुदाणं रबरसदृशं .. हे सर्वात जास्त आवडले :)

हाहा अतिशय विनोदी. पहीलं कडवं भन्नाट!!

जाई.'s picture

29 Aug 2011 - 5:48 pm | जाई.

मस्त मजा आली.
आता पुजेला भटजीकांकाना खिचडी देताना विचार करावा लागेल.

लय भारी भटजीबुवा...

कधी चुकुन माकुन तुम्हाला पुजेला बोलावलं तर तुम्ही म्हणाल ते खायला (आणि प्यायलासुद्धा ;) ) घालू.

तो "शांताकारं..." च्या चालीवरचा श्लोक एकदम भन्नाटच !!!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 10:10 pm | अत्रुप्त आत्मा

धनाजीराव,नका हो असं आमच्यात काय पण घालू.... ;-)
मग आमचं यंत्र कसं ह्रायचं चालू?
पर्वाच आम्चा केला 'अट्टल बिहारी'.....( परा-ठा हाऊस मधे... ;-) )
आणी तुंम्ही एवढ्यातच करताय लालू...?

धनाजीराव खुर्दाबाद.....(संभाव्य)यजमानशाही खुर्दाबाद...! :-) :-)

प्रचेतस's picture

29 Aug 2011 - 6:08 pm | प्रचेतस

परागभटजी लै भारी कविता.
उद्या/परवा खिचडी करून खायला लागेल. आम्हाला फक्त चतुर्थीलाच खायला मिळत असल्याने आम्हास साबुदाणा खिचडीचे फारच अप्रूप. :)

'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे आवडले. कविताही चान चान !!
साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याचे वडे उजवे मानतो बुवा आपण.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 10:15 pm | अत्रुप्त आत्मा

अहो वडे काय नी खिचडी काय.......? परतायच्या ऐवजी तळलं,तरी रबर निबरच असतं ;-)

अन्या दातार's picture

29 Aug 2011 - 10:32 pm | अन्या दातार

सुड, तुझा वड्यावर फारच जीव रे! आता पाकृ सेक्शनमध्ये "याचे वडे कसे करता येतील?" असा प्रश्न तुझ्याकडून आला तर आश्चर्य वाटायला नको! ;)

साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याचे वडे उजवे मानतो बुवा आपण

हे वडेश्वरा.. हे वेगळे सांगायची काही गरज आहे का? तू तर आपल्या सामर्थ्याने फणसाचेही वडे करशील.. ;)

साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याचे वडे उजवे मानतो बुवा आपण

हे वडेश्वरा.. हे वेगळे सांगायची काही गरज आहे का? तू तर आपल्या सामर्थ्याने फणसाचेही वडे करशील.. ;)

सूड's picture

30 Aug 2011 - 7:01 pm | सूड

खिक्क् :D
फणसाचे वडे !! :D

हसायला काय झालं?
शिकून घे ते वडे!

सूड's picture

30 Aug 2011 - 8:17 pm | सूड

बरं बरं !! ( ही देवळात गेली होती ना, कधी आली ?? )...
;)

प्रचेतस's picture

30 Aug 2011 - 10:02 pm | प्रचेतस

सूड आता सूडास लागला म्हणायचा. :)

विजुभाऊ's picture

29 Aug 2011 - 7:59 pm | विजुभाऊ

इश्श्य.........
उभ्या दामादामातूनी टोलवाटा
कुणी सदेहयात्रेत या अडकले?
अल्प त्याच्या वेळेच्या या कडा अन
खड्ड्यात ट्राफिक तुंबले...
......खुर्ची

पैसा's picture

29 Aug 2011 - 9:03 pm | पैसा

दिवेकर गुर्जी, रबर असो आणि काही असो, आम्हाला साबुदाणा खिचडी आवडते हो, मात्र रोज खाऊन तुमची वाट लागली असेल हे नक्कीच!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 10:19 pm | अत्रुप्त आत्मा

तुंम्ही म्हणताय ते खरय.... पण फक्त वाट लागलेली नाही,आंम्हीही वाटेला लागलोय........... :-)

रेवती's picture

29 Aug 2011 - 10:41 pm | रेवती

असं काय म्हणता हो गुरुजी?
आमच्याकडे लघुरुद्राला येणारे ११ गुरुजी आवडीने खिचडी खातात असा अनुभव आहे.
पण तुम्ही म्हटल्यानुसार कंटाळा हा येतच असणार्........मग सध्या गुरुजींचा आवडता, कंटाळा न आलेला पदार्थ तरी सांगा. आम्ही मेन्युमध्ये बदल करू.
कवीता आवडली.

ते आवडीनी वगैरे तितकसं काही खंरं नसतं... तो आजकालच्या काळातला कस्टमर सर्व्हीसचा भाग झाला आहे,यजमानाला जे आवडेल ते सगळ बिनबोभाट करायच,असा हल्ली संकेतच झालाय...प्रत्येक व्यवसायात. त्याचाच तो परिणाम,दुसरं काय?तरी तुंम्ही फर्माइश केलीये म्हणुन सांगतो,,, बटाट्याचा तिखट (लाल) चिवडा आणी फ्रूटसेलेड,असा थोडा हटके मेनू ठेऊन बघा.आणी फक्त आग्रह करू नका...बघा काय होतं ते...

अवांतरः-मी उपासाचा काढलेला अर्थ म्हणजे,पोटातल्या गिरणी कामगारांना हाफ डे देणं कींवा पूर्ण रजेवर ठेवणं असा आहे.(शास्त्रातही उपवास यापेक्षा निराहार हीच संज्ञा रूढ आहे.) पण उपासाचे सगळे पदार्थ पाहीले की हाफडे,पूर्ण रजा सोडाच...पण तो ओव्हरटाईम दील्यासारखा वाटतो...म्हणुनच मी माझ्या अनेक यजमानांना ''हे'' विवेचन गळी उतरवून पोहे,उप्पीट कींवा कुठलाही हलका आहारच योग्य हे पटवलय आणी आमलातही आणवलय...

चालेल. हा मेन्युही चांगलाच आहे.
गुरुजींना आवडल्यास मी आवर्जून कळवीन.
धन्यवाद!

साती's picture

30 Aug 2011 - 12:27 am | साती

मस्तच लिहिलीत कविता.

बरं मग तुम्ही पोथी वाचायला उपासाच्या दिवशी आल्यावर काय मेन्यू ठेवू?

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2011 - 7:49 am | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्ही.........आधी बोलवातर खंरं :-) आणी मेन्यू म्हणजे उपासाचा उप-वास नसलेला कोणताही पदार्थ ठेवा,मग येऊ हो आंम्ही...

साती's picture

30 Aug 2011 - 12:00 pm | साती

या या, कधीही या.
पत्ता संदेशातून कळवते. संदेश आवडतात का खायला?

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2011 - 2:00 pm | अत्रुप्त आत्मा

...........पचायला जड नसले तर ;-) आवडतात हो.......... :-) अट तीच आहे ''क्रुपया हलके देणे'' ;-)

५० फक्त's picture

30 Aug 2011 - 1:14 am | ५० फक्त

बुवा, शिंगाड्याच्या पिठात केलेले हरि मिर्चिचे पराठे चालतिल का खिचडी ऐवजी ?

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2011 - 7:56 am | अत्रुप्त आत्मा

नाय नाय पर्वा पाहीली हरी मिर्च,,,आणी मी ह र लो :-) त्या परा-ठ्या पुढे...त्यात शिंगाड्याचं पीठ म्हण्जे ए सी सी सिमेंटचा थर... हे पोटात गेलं की दुसय्रा दीवशी सकाळी आमची थरथर ;-)

प्राजु's picture

30 Aug 2011 - 1:44 am | प्राजु

मस्त.
बहुतेक या मुळेच आमच्याकडे गेल्यावर्षी सत्यनारायण करायला आलेले गुरूजी.. "आम्ही फराळ करू फक्त.. पण साबुदाणा खिचडी सोडून.. काहीही करा. अगदी बटाटे पोहे सुद्धा चालतील" असं म्हणाले होते ते आठवलं. :)

निमिष ध.'s picture

30 Aug 2011 - 2:14 am | निमिष ध.

एक भन्नाट कविता. आणि सुरुवातीचा श्लोक तर अत्त्युत्तम !!

पिवळा डांबिस's picture

30 Aug 2011 - 3:50 am | पिवळा डांबिस

आपण सगळे सणाला मारे उदार यजमान होऊन भटजींवर आदरातिथ्याचा मारा करतो...
पण त्या बिचार्‍या भटजींची काय अवस्था होत असेल याचा विचारच करत नाही.....
:)
दक्षिणा नको पण खिचडी आवर!!!!
:)
जियो परागशेठ!!!

सविता००१'s picture

30 Aug 2011 - 9:36 am | सविता००१

मस्तच कविता आणि पहिला श्लोक तर अफलातून. वरती पिडा काकांनी म्हट्ले आहे तसेच म्हणते

दक्षिणा नको पण खिचडी आवर!!!!

जियो परागशेठ!!!

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2011 - 10:35 am | अत्रुप्त आत्मा

प्रीत-मोहर,जाई,शुची,वल्ली,सविता००१,पि डां काका,निमिष ध,प्राजुताई, सर्वांना धन्यवाद.... :-)

प्रतिक्रीयेच्या निमित्तानी प्रतिक्रीया दिलेल्यांनाही धन्यवाद ;-)

स्पा's picture

30 Aug 2011 - 10:40 am | स्पा

__/\__

गुर्जी ...
साफ खपल्या गेलो आहे आहे असे नम्रपणे नमूद करू इच्छितो :D

स्पंदना's picture

30 Aug 2011 - 11:45 am | स्पंदना

जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे म्हणतात ते खरच आहे. मला वाटायच काय बुवा भटजी बुवांची चंगळ आहे, पण आज आतल खर बाहेर आल.
धमाल हो काव्यभट.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2011 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा

तरी आमचं बर आहे,,,आंम्हाला या ना त्या कारणांनी नको असलेला पदार्थ टाळता तरी येतो.पण आमच्यात नोकरी/व्यवसाय निव्रुत्त झाल्यावर निव्वळ श्राद्धाला जेवायला जाणारी वयस्कर मंडळींची टीम आहे, त्यांन्ना मात्र श्राद्धाचं पानात वाढलेलं खावच लागतं, आंम्हाला खिचडी तसं त्यांना ''लाडू खा,,,लाडू खा'' हा आग्रह अस्तो. त्यात पुन्हा गेलेल्या माणसाला आवडणारे पदार्थही (विशेषतः तेराव्याला व पहील्या वर्षाच्या श्राद्धाला) वाढले जातात...त्यात पुन्हा भटजी म्हणजे खादाड हा परंपरागत अपसमज,त्यांची बिचाय्रांची खरच वाट लागते...

अतीअवांतरः- श्राद्ध विधींमधे श्राद्ध भोजनाला बसणाय्रा गुरुजींसाठी यजमानांनी म्हणायची १ प्रार्थना असते. तीचा साधारण आशय म्हणजे-''आज आंम्ही आपल्यासाठी भोजनाचे जे जे पदार्थ केलेत त्यांपैकी आपल्याला जे जे रुचतील ते ते नि:संकोच सेवन करा व जे रुचणार नाहीत त्यांचा त्याग करा(टाका) व तुंम्ही स्वस्थ अंतःकरणानी/सुखानी जेवा'' बाघा आता... तत्व कीती चांगलं आहे,,,पण परंपरेत रुजलेला व्यवहार कीती विपरीत आहे. सगळ्या धर्मांची हीच तर गोची आहे,जीथे तत्व चांगली आहेत तिथे व्यवहार वाईट आहे,,,आणी तत्व वाईट आहेत तिथे तर काही बोलूच नका (सुधारणावादातल तर अजीबात बोलू नका)अशी अवस्था,,,हा खंरं तर एका वेगळ्या लेखमालेचा विषय आहे. पण अत्ता अगदी न रहावलं गेल्यामुळे इथे लीहील गेलं.

कविता भारीच. मला वाटल रेसिपी असेल.

अर्धवट's picture

30 Aug 2011 - 2:23 pm | अर्धवट

गुर्जी.. दंडवत स्विकारा,

यावरून यजमानांना यमजान असा नवीन शब्द रूढ करायला हरकत नाही असे निरिक्षण नोंदवतो.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2011 - 2:52 pm | अत्रुप्त आत्मा

हा शब्द आमच्यात फेमस करणार... :bigsmile:

वपाडाव's picture

30 Aug 2011 - 6:30 pm | वपाडाव

दिवेकरांना शलुट ठोकत आहे....
वेगळ्या धर्तीवरची कविता..... ज्यांनी
गुर्जींचे होणारे हाल खमंग अन छानशा कवितेत बांधुन जनतेसमोर ठेवलेत....

वपाडाव हा जयपालचा डुआयडी आहे अशी शंका येत आहे ;)

गवि's picture

31 Aug 2011 - 10:07 am | गवि

नसावा..

ठाणे पुरेपूर कोल्हापूर कट्ट्याला या दोन नावांनी दोन वेगवेगळ्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्याही एकाच वेळी.

;)

हां अर्थात यामुळे आयडी डू नाही हे सिद्ध होत नाही.. :)

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2011 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा

शलुटचा विनम्रपणे स्वीकार करण्यात येत आहे......... :-) धन्यवाद

पाषाणभेद's picture

31 Aug 2011 - 12:19 am | पाषाणभेद

गुरूजी आमचे दंडवत आहे तुम्हाला. मस्त रेखाटलीय कविता

मयुरा गुप्ते's picture

31 Aug 2011 - 1:20 am | मयुरा गुप्ते

गुर्जी कविता छान आहे.

घरात वास्तुशांतीची पुजा केलेली, गुरुजीं करता साबुदाणा खिचडी व इतर नातेवाईकांकरता पोहे..नंतर नातेवाईकांनी येउन सांगितले खिचडी छान झालेली आणि गुरुजी म्हणाले पोहे छान झाले होते..तेच म्हंटलं गुरुजींना चॉईस दिल्यावर पोह्यांचा नंबर लागला.
तेव्हा कळलं नव्हतं पण आता संदर्भ लागतोय...

--मयुरा.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2011 - 12:19 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व प्रतिसादकांसी पुन्हा एकवार धन्यवाद..........:-)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2016 - 10:29 am | अत्रुप्त आत्मा

रेवाक्कांच्या खफ. वरिल विणंतीस मीण देऊन , साबुदाणा पुन्हा तळायला वर काढत आहे.

खिचडीबरोबर ताक हवेच तेव्हा ते ताकाचं लपविलेले भांडे पण वर काढा अता.

किसन शिंदे's picture

15 Jul 2016 - 10:43 am | किसन शिंदे

भांड्याबरोबर सायही यायला हवीये, तस्मात ती ही वर काढा.

नाखु's picture

15 Jul 2016 - 11:51 am | नाखु

साय आली की भाय ही येईल वडाच्या सावलीला धरून !!

अखिल मिपा वाचक ते वेचक एक वाचनीय चळवळ

टवाळ कार्टा's picture

15 Jul 2016 - 12:20 pm | टवाळ कार्टा

साय?

सूड's picture

15 Jul 2016 - 4:25 pm | सूड

तुला साय माहीत नाही?

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2016 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा

छाण तळलात साबुदाणा, सगळ्यांनी! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
दू दू दू दू दू! खौट! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

कविता वर काढल्याबद्दल धन्यवाद.

पद्मावति's picture

15 Jul 2016 - 8:11 pm | पद्मावति

:)मस्तं!