Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 08/29/2011 - 14:45
ह्या कवितेच (आ)जन्मस्थळ म्हणजे आमचा धंदा-भिक्षुकी उर्फ भटजीगिरी...विशेषतः श्रावण ते (नाकी)नवरात्र या कालावधीत आंम्हा भटजींवर या खिचडीचा जो मारा होतो,त्या---होय...होय..त्याच वेदनेतुन ही कविता प्रसवली आहे...म्हणजे हीचं आमच काही वैर नाही,पण,''त्रास होतो हो हीचा(म्हणजे खिचडीचा ;-))''...असं प्रामाणीक पणे सांगूनही,,,नाही नाही गुरुजी आंम्हाला बंरं वाटावं म्हणुन खा...खा...खा...अंसं काखा वर करुन ठ्ठो ठ्ठो ठ्ठो करत कस्टमर सॉरी सॉरी यजमान मागे लागतात...आणी आंम्हाला कारणं देता देता पळता भुई थोडी होते,,,एरवी ही बया आंम्हाला अवडत नाही असं कुठाय?मी तर माझ्या या मुळातल्या प्राणप्रीय परंतु अतीपरीचयात अवज्ञा झालेल्या या खिचडीला पहीली सलामी एका श्लोकाच्या ओळीच्या विडंबनातूनच दिली होती-म्हणजे,,, ''विश्वाधारं गगन सद्रुशं मेघवर्णं शुभांगम'' असं आहे की नाई,त्याला ''साबुदाणं रबर सद्रुशं श्वेतवर्णं च्युईंगम''...असं मी चावलं होतं ;-)...असो अता जास्त च्यावच्याव न करता उरलेलं कवीतेवर सोडतो---तर श्रोतेहो खिचडी करीता वाहातो,ही शब्दांची खिचडी....................(ही आमची पारंपारीक-गुरुजी/यजमान म्याच आहे.) यजमानांनी विचारलं-उपास...? जरा खिचडी देऊ का? चपला घालतच म्हणालो त्या पेक्षा मी येऊ का? का हो?तुंम्ही गुरुजी.. आणी खिचडीला भिता? अहो,वाचायला फार सोपी ही पचायला अवघड गीता अहो,मस्त दही टाका मजबुत दाबून हाणा.. म्हणजे नंतर सहा तास पोटात गोळे आणा? जुने गुरुजी मजबुत खायचे... एक/दोन प्लेट?...विसरा पूर्वीच्यांना उद्योग ठेवलावतात का खाण्यापलीकडे...दुसरा? पूर्वीचे गुरुजी कामं करुन पराती करायचे फस्त अहो,जुना स्कुटरचा काळ तो एव्हरेज पेक्षा इंधन जास्त जाउ दे गुरुजी आता.. राग विसरा..हट्ट सोडा कालची खिचडी पचायला आधी आणा १ सोडा अशा तह्रेनी आंम्ही यजमानांचा १प्लेट अपराध पोटात घातला पण नंतर दिवसभर... तो आमच्या पोटात उतला श्रावणाचा संपत सोमवार आंम्ही या खिचडीवर सोडला आणी यजमान/गुरुजी नववादाचा अजुन एक नारळ फोडला..... :-)

Submitted by सविता on Mon, 08/29/2011 - 15:07

Permalink

कविता आवडली. आम्च्य गुरूजींना

कविता आवडली. आम्च्य गुरूजींना आम्ही मसाला दूध आणि केळी देतो ... त्यांना पण खिचडी बहुधा फारशी आवडत नसावी (किंवा आपल्यासारखी केस असावी).. नेहमी नाहीच म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 08/29/2011 - 16:39

In reply to कविता आवडली. आम्च्य गुरूजींना by सविता

Permalink

मसाला दूध /केळी

आयला अजूनही ते या गोष्टी तुंम्ही दिल्यावर खातात, म्हणजे भलतेच तयार आहेत ते...कींवा त्यांचे पोट... :-) बाकी त्यांची केस तरी आमच्यापेक्षा वेगळी काय असणार म्हणा?.... ;-) ते सुपात आहेत,आंम्ही जात्यात आहोत...
  • Log in or register to post comments

Submitted by पप्पु अंकल on Mon, 08/29/2011 - 15:09

Permalink

जबरदस्त

कविता खुप, खुप आवडली.......... पुढील लेखनास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 08/29/2011 - 15:22

Permalink

हा हा हा

मस्त हो दिवेकर भटजी. एकदम आवडेश. आधी चुकून लेखन विभाग चुकला का काय असे वाटले होते, पण लेखन उघडल्यावर मस्त करमणूक झाली. अवांतर :-
''साबुदाणं रबर सद्रुशं श्वेतवर्णं च्युईंगम''
ह्यावरून 'उपासाचा आनंद ह्या, मॅनफोर्स आता साबुदाणा फ्लेवर मध्ये' हे आठवले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 08/29/2011 - 16:44

In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार

Permalink

मेनफोर्स....

''ह्यावरून 'उपासाचा आनंद ह्या, मॅनफोर्स आता साबुदाणा फ्लेवर मध्ये' हे आठवले ''--- हे वाचून आंम्हाला प रा-कोटीचा आनंद जाहला, हा तुमचा मेन फोर्स असावा असे वाट्टे ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 08/29/2011 - 15:32

Permalink

पहिलं कडवं वाचलं आणी एकदम

:D :D :D पहिलं कडवं वाचलं आणी एकदम मोठ्याने हसलो...जबरा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 08/29/2011 - 16:51

Permalink

गुर्जी-यजमान

म्याच आवल्डी रे! साबूदाणं रबरसदृशं......श्लोकही भन्नाट ;) (साबूदाणा खिचडी प्रेमी) रंगाण्णा
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 08/29/2011 - 16:52

Permalink

धन्यवाद

सविता,पप्पु अंकल,प रा, किसनराव...सर्वांसी प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद........... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 08/29/2011 - 16:53

Permalink

प्र.का.

प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Mon, 08/29/2011 - 17:24

Permalink

साबुदाणं रबरसदृशं .. हे

साबुदाणं रबरसदृशं .. हे सर्वात जास्त आवडले :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 08/29/2011 - 17:31

Permalink

हाहा अतिशय विनोदी. पहीलं कडवं

हाहा अतिशय विनोदी. पहीलं कडवं भन्नाट!!
  • Log in or register to post comments

Submitted by जाई. on Mon, 08/29/2011 - 17:48

Permalink

हाहाहा

मस्त मजा आली. आता पुजेला भटजीकांकाना खिचडी देताना विचार करावा लागेल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 08/29/2011 - 18:01

Permalink

लय भारी भटजीबुवा... कधी चुकुन

लय भारी भटजीबुवा... कधी चुकुन माकुन तुम्हाला पुजेला बोलावलं तर तुम्ही म्हणाल ते खायला (आणि प्यायलासुद्धा ;) ) घालू. तो "शांताकारं..." च्या चालीवरचा श्लोक एकदम भन्नाटच !!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 08/29/2011 - 22:10

In reply to लय भारी भटजीबुवा... कधी चुकुन by धन्या

Permalink

ह्हा ह्हा ह्हा... धनाजीराव ,नका हो असं...

धनाजीराव,नका हो असं आमच्यात काय पण घालू.... ;-) मग आमचं यंत्र कसं ह्रायचं चालू? पर्वाच आम्चा केला 'अट्टल बिहारी'.....( परा-ठा हाऊस मधे... ;-) ) आणी तुंम्ही एवढ्यातच करताय लालू...? धनाजीराव खुर्दाबाद.....(संभाव्य)यजमानशाही खुर्दाबाद...! :-) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 08/29/2011 - 18:08

Permalink

मस्त

परागभटजी लै भारी कविता. उद्या/परवा खिचडी करून खायला लागेल. आम्हाला फक्त चतुर्थीलाच खायला मिळत असल्याने आम्हास साबुदाणा खिचडीचे फारच अप्रूप. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 08/29/2011 - 18:31

Permalink

'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे

'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे आवडले. कविताही चान चान !! साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याचे वडे उजवे मानतो बुवा आपण.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 08/29/2011 - 22:15

In reply to 'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे by सूड

Permalink

अहो वडे काय?....

अहो वडे काय नी खिचडी काय.......? परतायच्या ऐवजी तळलं,तरी रबर निबरच असतं ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Mon, 08/29/2011 - 22:32

In reply to 'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे by सूड

Permalink

सुड, तुझा वड्यावर फारच जीव

सुड, तुझा वड्यावर फारच जीव रे! आता पाकृ सेक्शनमध्ये "याचे वडे कसे करता येतील?" असा प्रश्न तुझ्याकडून आला तर आश्चर्य वाटायला नको! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 08/30/2011 - 10:39

In reply to सुड, तुझा वड्यावर फारच जीव by अन्या दातार

Permalink

साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा

साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याचे वडे उजवे मानतो बुवा आपण हे वडेश्वरा.. हे वेगळे सांगायची काही गरज आहे का? तू तर आपल्या सामर्थ्याने फणसाचेही वडे करशील.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 08/30/2011 - 10:48

In reply to सुड, तुझा वड्यावर फारच जीव by अन्या दातार

Permalink

साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा

साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याचे वडे उजवे मानतो बुवा आपण हे वडेश्वरा.. हे वेगळे सांगायची काही गरज आहे का? तू तर आपल्या सामर्थ्याने फणसाचेही वडे करशील.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 08/30/2011 - 19:01

In reply to साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा by गवि

Permalink

खिक्क् फणसाचे वडे !!

खिक्क् :D फणसाचे वडे !! :D
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 08/30/2011 - 19:09

In reply to खिक्क् फणसाचे वडे !! by सूड

Permalink

हसायला काय झालं? शिकून घे ते

हसायला काय झालं? शिकून घे ते वडे!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 08/30/2011 - 20:17

In reply to हसायला काय झालं? शिकून घे ते by रेवती

Permalink

बरं बरं !!

बरं बरं !! ( ही देवळात गेली होती ना, कधी आली ?? )... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 08/30/2011 - 22:02

In reply to बरं बरं !! by सूड

Permalink

:)

सूड आता सूडास लागला म्हणायचा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 08/29/2011 - 19:59

Permalink

इश्श्य......... उभ्या

इश्श्य......... उभ्या दामादामातूनी टोलवाटा कुणी सदेहयात्रेत या अडकले? अल्प त्याच्या वेळेच्या या कडा अन खड्ड्यात ट्राफिक तुंबले... ......खुर्ची
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 08/29/2011 - 21:03

Permalink

मस्त हो!

दिवेकर गुर्जी, रबर असो आणि काही असो, आम्हाला साबुदाणा खिचडी आवडते हो, मात्र रोज खाऊन तुमची वाट लागली असेल हे नक्कीच!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 08/29/2011 - 22:19

In reply to मस्त हो! by पैसा

Permalink

धन्यु हो...

तुंम्ही म्हणताय ते खरय.... पण फक्त वाट लागलेली नाही,आंम्हीही वाटेला लागलोय........... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 08/29/2011 - 22:41

Permalink

असं काय म्हणता हो

असं काय म्हणता हो गुरुजी? आमच्याकडे लघुरुद्राला येणारे ११ गुरुजी आवडीने खिचडी खातात असा अनुभव आहे. पण तुम्ही म्हटल्यानुसार कंटाळा हा येतच असणार्........मग सध्या गुरुजींचा आवडता, कंटाळा न आलेला पदार्थ तरी सांगा. आम्ही मेन्युमध्ये बदल करू. कवीता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 08/30/2011 - 00:13

In reply to असं काय म्हणता हो by रेवती

Permalink

ह्हा ह्हा ह्हा...असो.... अहो रेवतीताई... ते आवडीनी वगैरे....

ते आवडीनी वगैरे तितकसं काही खंरं नसतं... तो आजकालच्या काळातला कस्टमर सर्व्हीसचा भाग झाला आहे,यजमानाला जे आवडेल ते सगळ बिनबोभाट करायच,असा हल्ली संकेतच झालाय...प्रत्येक व्यवसायात. त्याचाच तो परिणाम,दुसरं काय?तरी तुंम्ही फर्माइश केलीये म्हणुन सांगतो,,, बटाट्याचा तिखट (लाल) चिवडा आणी फ्रूटसेलेड,असा थोडा हटके मेनू ठेऊन बघा.आणी फक्त आग्रह करू नका...बघा काय होतं ते... अवांतरः-मी उपासाचा काढलेला अर्थ म्हणजे,पोटातल्या गिरणी कामगारांना हाफ डे देणं कींवा पूर्ण रजेवर ठेवणं असा आहे.(शास्त्रातही उपवास यापेक्षा निराहार हीच संज्ञा रूढ आहे.) पण उपासाचे सगळे पदार्थ पाहीले की हाफडे,पूर्ण रजा सोडाच...पण तो ओव्हरटाईम दील्यासारखा वाटतो...म्हणुनच मी माझ्या अनेक यजमानांना ''हे'' विवेचन गळी उतरवून पोहे,उप्पीट कींवा कुठलाही हलका आहारच योग्य हे पटवलय आणी आमलातही आणवलय...
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 08/30/2011 - 00:21

In reply to ह्हा ह्हा ह्हा...असो.... अहो रेवतीताई... ते आवडीनी वगैरे.... by अत्रुप्त आत्मा

Permalink

चालेल. हा मेन्युही चांगलाच

चालेल. हा मेन्युही चांगलाच आहे. गुरुजींना आवडल्यास मी आवर्जून कळवीन. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Tue, 08/30/2011 - 00:27

Permalink

सह्ही!

मस्तच लिहिलीत कविता. बरं मग तुम्ही पोथी वाचायला उपासाच्या दिवशी आल्यावर काय मेन्यू ठेवू?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 08/30/2011 - 07:49

In reply to सह्ही! by साती

Permalink

काय मेन्यु ठेवू ?

ह्ही ह्ही ह्ही.........आधी बोलवातर खंरं :-) आणी मेन्यू म्हणजे उपासाचा उप-वास नसलेला कोणताही पदार्थ ठेवा,मग येऊ हो आंम्ही...
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Tue, 08/30/2011 - 12:00

In reply to काय मेन्यु ठेवू ? by अत्रुप्त आत्मा

Permalink

आमंत्रण

या या, कधीही या. पत्ता संदेशातून कळवते. संदेश आवडतात का खायला?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 08/30/2011 - 14:00

In reply to आमंत्रण by साती

Permalink

संदेश आवडतात का खायला?

...........पचायला जड नसले तर ;-) आवडतात हो.......... :-) अट तीच आहे ''क्रुपया हलके देणे'' ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 08/30/2011 - 01:14

Permalink

बुवा, शिंगाड्याच्या पिठात

बुवा, शिंगाड्याच्या पिठात केलेले हरि मिर्चिचे पराठे चालतिल का खिचडी ऐवजी ?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 08/30/2011 - 07:56

In reply to बुवा, शिंगाड्याच्या पिठात by ५० फक्त

Permalink

हरी मिर्चीचे पराठे.......

नाय नाय पर्वा पाहीली हरी मिर्च,,,आणी मी ह र लो :-) त्या परा-ठ्या पुढे...त्यात शिंगाड्याचं पीठ म्हण्जे ए सी सी सिमेंटचा थर... हे पोटात गेलं की दुसय्रा दीवशी सकाळी आमची थरथर ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 08/30/2011 - 01:44

Permalink

मस्त. बहुतेक या मुळेच

मस्त. बहुतेक या मुळेच आमच्याकडे गेल्यावर्षी सत्यनारायण करायला आलेले गुरूजी.. "आम्ही फराळ करू फक्त.. पण साबुदाणा खिचडी सोडून.. काहीही करा. अगदी बटाटे पोहे सुद्धा चालतील" असं म्हणाले होते ते आठवलं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by निमिष ध. on Tue, 08/30/2011 - 02:14

Permalink

भन्नाट

एक भन्नाट कविता. आणि सुरुवातीचा श्लोक तर अत्त्युत्तम !!
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Tue, 08/30/2011 - 03:50

Permalink

आयला, मस्त कविता!!

आपण सगळे सणाला मारे उदार यजमान होऊन भटजींवर आदरातिथ्याचा मारा करतो... पण त्या बिचार्‍या भटजींची काय अवस्था होत असेल याचा विचारच करत नाही..... :) दक्षिणा नको पण खिचडी आवर!!!! :) जियो परागशेठ!!!
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Tue, 08/30/2011 - 09:36

Permalink

भन्नाट

मस्तच कविता आणि पहिला श्लोक तर अफलातून. वरती पिडा काकांनी म्हट्ले आहे तसेच म्हणते दक्षिणा नको पण खिचडी आवर!!!! जियो परागशेठ!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 08/30/2011 - 10:35

Permalink

सर्वांना........धन्यवाद.

प्रीत-मोहर,जाई,शुची,वल्ली,सविता००१,पि डां काका,निमिष ध,प्राजुताई, सर्वांना धन्यवाद.... :-) प्रतिक्रीयेच्या निमित्तानी प्रतिक्रीया दिलेल्यांनाही धन्यवाद ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 08/30/2011 - 10:40

Permalink

आवरा

__/\__ गुर्जी ... साफ खपल्या गेलो आहे आहे असे नम्रपणे नमूद करू इच्छितो :D
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 08/30/2011 - 11:45

Permalink

जावे त्याच्या वंशा तेंव्हा

जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे म्हणतात ते खरच आहे. मला वाटायच काय बुवा भटजी बुवांची चंगळ आहे, पण आज आतल खर बाहेर आल. धमाल हो काव्यभट.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 08/30/2011 - 23:59

In reply to जावे त्याच्या वंशा तेंव्हा by स्पंदना

Permalink

अपर्णा अक्षय धन्यवाद

तरी आमचं बर आहे,,,आंम्हाला या ना त्या कारणांनी नको असलेला पदार्थ टाळता तरी येतो.पण आमच्यात नोकरी/व्यवसाय निव्रुत्त झाल्यावर निव्वळ श्राद्धाला जेवायला जाणारी वयस्कर मंडळींची टीम आहे, त्यांन्ना मात्र श्राद्धाचं पानात वाढलेलं खावच लागतं, आंम्हाला खिचडी तसं त्यांना ''लाडू खा,,,लाडू खा'' हा आग्रह अस्तो. त्यात पुन्हा गेलेल्या माणसाला आवडणारे पदार्थही (विशेषतः तेराव्याला व पहील्या वर्षाच्या श्राद्धाला) वाढले जातात...त्यात पुन्हा भटजी म्हणजे खादाड हा परंपरागत अपसमज,त्यांची बिचाय्रांची खरच वाट लागते... अतीअवांतरः- श्राद्ध विधींमधे श्राद्ध भोजनाला बसणाय्रा गुरुजींसाठी यजमानांनी म्हणायची १ प्रार्थना असते. तीचा साधारण आशय म्हणजे-''आज आंम्ही आपल्यासाठी भोजनाचे जे जे पदार्थ केलेत त्यांपैकी आपल्याला जे जे रुचतील ते ते नि:संकोच सेवन करा व जे रुचणार नाहीत त्यांचा त्याग करा(टाका) व तुंम्ही स्वस्थ अंतःकरणानी/सुखानी जेवा'' बाघा आता... तत्व कीती चांगलं आहे,,,पण परंपरेत रुजलेला व्यवहार कीती विपरीत आहे. सगळ्या धर्मांची हीच तर गोची आहे,जीथे तत्व चांगली आहेत तिथे व्यवहार वाईट आहे,,,आणी तत्व वाईट आहेत तिथे तर काही बोलूच नका (सुधारणावादातल तर अजीबात बोलू नका)अशी अवस्था,,,हा खंरं तर एका वेगळ्या लेखमालेचा विषय आहे. पण अत्ता अगदी न रहावलं गेल्यामुळे इथे लीहील गेलं.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Tue, 08/30/2011 - 14:22

Permalink

कविता भारीच. मला वाटल रेसिपी

कविता भारीच. मला वाटल रेसिपी असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवट on Tue, 08/30/2011 - 14:23

Permalink

गुर्जी.. दंडवत स्विकारा,

गुर्जी.. दंडवत स्विकारा, यावरून यजमानांना यमजान असा नवीन शब्द रूढ करायला हरकत नाही असे निरिक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 08/30/2011 - 14:52

In reply to गुर्जी.. दंडवत स्विकारा, by अर्धवट

Permalink

यम-जान ..ह्हाह्हाह्हा

हा शब्द आमच्यात फेमस करणार... :bigsmile:
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 08/30/2011 - 18:30

Permalink

दिवेकरांना शलुट ठोकत

दिवेकरांना शलुट ठोकत आहे.... वेगळ्या धर्तीवरची कविता..... ज्यांनी गुर्जींचे होणारे हाल खमंग अन छानशा कवितेत बांधुन जनतेसमोर ठेवलेत.... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवट on Tue, 08/30/2011 - 19:34

In reply to दिवेकरांना शलुट ठोकत by वपाडाव

Permalink

वपाडाव हा जयपालचा डुआयडी आहे

वपाडाव हा जयपालचा डुआयडी आहे अशी शंका येत आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 08/31/2011 - 10:07

In reply to वपाडाव हा जयपालचा डुआयडी आहे by अर्धवट

Permalink

नसावा.. ठाणे पुरेपूर

नसावा.. ठाणे पुरेपूर कोल्हापूर कट्ट्याला या दोन नावांनी दोन वेगवेगळ्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्याही एकाच वेळी. ;) हां अर्थात यामुळे आयडी डू नाही हे सिद्ध होत नाही.. :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 24235 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com