[एका मित्राला सहज म्हणून डॉलरचा हिशेब पैशात सांगितला नि एका डॉलरमध्ये
कमीत कमीत ३ किलो कांदे आले असते असे म्हणालो .नि येथे फक्त ३ कांदे आले.
त्यावरून त्याने गमतीशीर पत्र लिहिले .त्यावरून खालील सुचले ]
ह्या डॉलरच्या देशात रुपया चालत नाय
आनंद घ्यायला पैसा लागत नाय . .
मी एकडे तिकडे बघत चालतो
पोरगाच खिशातून कार्ड काढतो
काय करतो..? किती देतो..? मी बघत नाय
ह्या डॉलरच्या देशात रुपया चालत नाय
आनंद घ्यायला पैसा लागत नाय ...!!.
आभाळाचा रंग निळा
तेवढाच मी बघत बसतो
पिवळा पिवळा एक पक्षी
छान गाणे गात असतो
काय गातो कसा गातो मी बघत नाय
खिसा भरलेला त्याला रुपया चालत नाय
आनंद घ्यायला पैसा लागत नाय ....!!
रस्त्यावरून एकटाच चालतो
रस्ता अगदी शांत असतो
कोणीतरी अनोळखी सहज मोर्निग करतो
आपण पण तेच करतो
आपल्याला दुसरे येते काय ..?
खिसा भरलेला त्याला रुपया चालत नाय
आनंद घ्यायला पैसा लागत नाय .....!!
तू लिहिलेस नि मला सुचून गेले
मन गाणे गाऊन गेले
लिहायला फक्त थोडा त्रास
वाचता वाचता होतील भास
वाचायला तुला त्रास काय ...?
खिसा भरलेला नि ह्यालाबी पैसा चालत नाय
आनंद घ्यायला पैसा लागत नाय .....!!
प्रतिक्रिया
22 Aug 2011 - 10:49 am | निनाव
मस्तच प्रकाश दा. पुन्हा एक छोटी अशी गोष्ट पण खूप साधेपणानं आणिक सुंदर मांडली आहे.
कविते बद्दलः शेवटच्या कडव्यात अजुन थोडे बदल अपेक्षित होउ शकतात.. थोडंस खटकतंय.. रिदम थोडा सा गडबडतो आहे. तेवढंच. असे मला वाटते.
22 Aug 2011 - 9:32 pm | चित्रा
अगदी असेच म्हणते. कविता छान पण थोडे काही बदल हवे आहेत असे वाटले. विशेषतः शेवटच्या कडव्यात. शेवटचे कडवे थोडे अर्थात गोंधळ करते आहे असे माझे तरी झाले.
22 Aug 2011 - 10:52 am | जाई.
उत्तम कविता
22 Aug 2011 - 11:19 am | प्रीत-मोहर
मस्तचः)
22 Aug 2011 - 2:25 pm | पाषाणभेद
साक्षात भास्कर महाराज जे पाहू शकत नाहीत ते पाहाण्याची नजर आहे आपली.
22 Aug 2011 - 4:00 pm | अत्रुप्त आत्मा
रस्त्यावरून एकटाच चालतो
रस्ता अगदी शांत असतो
कोणीतरी अनोळखी सहज मोर्निग करतो
आपण पण तेच करतो
आपल्याला दुसरे येते काय ..?
खिसा भरलेला त्याला रुपया चालत नाय
आनंद घ्यायला पैसा लागत नाय .....!!..............''हे अतीशय बोलकं,आणी अप्रतीम'' :-)
22 Aug 2011 - 8:57 pm | गणेशा
आभाळाचा रंग निळा
तेवढाच मी बघत बसतो
पिवळा पिवळा एक पक्षी
छान गाणे गात असतो
काय गातो कसा गातो मी बघत नाय
खिसा भरलेला त्याला रुपया चालत नाय
आनंद घ्यायला पैसा लागत नाय ....!!
एकदम छान
24 Aug 2011 - 1:15 pm | मन१
आवडलं
24 Aug 2011 - 6:34 pm | मदनबाण
छान कविता...
25 Aug 2011 - 7:31 pm | चाल क बि.एन
मन गाणे गाऊन गेले
लिहायला फक्त थोडा त्रास
वाचता वाचता होतील भास
वाचायला तुला त्रास काय ...?
फार च सुन्देर ...
आभार..परत कधी ?