मिथुनायण भाग २ - आग ही आग

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
23 Aug 2011 - 8:21 am

साधारणपणे पंजाबी ड्रेसनी झाकलं जाईल इतकं अंग झाकणारा स्विम सूट घालून एक तरूणी समुद्रातून बाहेर येत, उर्सुला अँड्रेस च्या थोबाडीत मारेल अशी उन्मादक एंट्री घेते. दुसर्‍या क्षणी ती एका माणसाला खंडणीसाठी फोन करते. हिचं नाव डायना. तो हिम्मतवान व्यापारी तिला उत्तर देतो "तुम डायना हो या डायन, लेकीन मेरा खून नहीं चूस सकोगी". काही वेळातच त्या माणसाला त्याच्या बाणेदारपणाचं फळ मिळतं. त्याला त्याच्या घराच्या पार्कींग लॉट मधेच गोळी घालून ठार करण्यात येतं. मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो.

डायना टायगर गँग नावाच्या एका खुँखार गँगची मेंबर असते. त्यांच्यासोबत भ्रष्ट पोलिस अधिकारी, एक मंत्री, अशी पिलावळही असते.

आता, टायगर गँग मुलाला जिवंत सोडण्याच्या बदल्यात त्या विधवेकडून खंडणी मागते. नवर्‍याला जिवे मारण्याच्या धमकीला एक रुपयाही द्यायचा नाही असं ठणकावून सांगणारी ती नारी मुलाच्या जिवावर आल्यावर तडक ५० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोचते. इथे मिथुनदांनी समस्त नवरे जमातीला एक गुप्त संदेश दिला आहे. ती खंडणी देणार इतक्यात तिथे असलेल्या सगळ्या गुंडांना एक बंदुकधारी हात धडाधड गोळ्या घालून ठार करतो. तो हात असतो अर्थातच मिथुनदांचा. ह्या सिनेमात त्यांच्या अवताराचं नाव आहे 'इन्स्पेक्टर अजय'. ह्या मारामारीच्यावेळी तिथे एक पिकनिकला आलेलं जोडपं आणि एक फोटोग्राफरही असते.

ह्या खुनखर्‍याब्याबद्दल मंत्री कमिशनरकडे जाऊन त्याला अजयला थांबवायला सांगतो. (आता इथे डायलॉग्सच्या भयानक फैरी झडतात.) त्यावेळी तिथे अजय पोचतो आणि मंत्र्याची कानउघाडणी करतो "अरे तू तो वो सियासी दलाल है जो मुर्दे का कफन छीनकर अपनी खाल पर ओढ लेता है". कमिशनर पुढे मंत्र्याला ऐकवतो "मगरमछ के आंसू, कुत्ते का भोंकना, लोमडी की चालाकी ये सारी चीजें लेकर तू पैदा हुवा है गोपाल भारती". इतकं सुंदर व्यक्तीचित्रण पु.लं. ना तरी जमलं असतं का? कमिशनर आणि अजय नी केलेल्या अपमानामुळे चवताळलेला मंत्री त्या दोघांची बदली करायची धमकी देतो. अजय उत्तर घेऊन तयारच असतो "तू हमारी बदली करवाएगा? अरे तीन साल में तू पांच पार्टीयां ऐसे बदल चुका है जैसे बेघर बंदर जिंदगीभर डालींया बदलता रहता है".

ह्या सिनेमान आपला लक्ष्या सुद्धा आहे. त्याच्या जोडीला आहे जॉनी लिव्हरचा डुप्लीकेट. ते दोघे जासूद असतात आणि टायगरला शोधत असतात. "मैने मरें हुएं भैस से दूध निकाला है, अंडे से निकली हुई मूर्गी को डंडे मारकर अंडे में बंद कर दिया है, कबरस्तान से निकले मुर्दे को कबरस्तान में वापस बंद कर दिया है" असं लक्ष्या स्वतःच वर्णन करतो. आता बोला.

मधे मधे सिनेमात जॅकी श्रॉफही दर्शन देत असतो. ते कशासाठी हे अर्धा सिनेमा होईपर्यंत कळत नही.

कमिशनर आता अजयला सरकारी ट्रेझरीच्या संरक्षणाची जबाबदारी देतो. इकडे टायगर गँग ही ट्रेझरी लुटायचा प्लॅन बनवत असते. तितक्यात तिथे कमिशनर पोचतो. सगळे पळू लागतात इतक्यात कमिशनर त्यांना थांबवतो "ओ बेवकूफी के अंडों से निकले कबुतरों, मैं कमिशनर नहीं टागर हुं". टायगर जेंव्हा जवळ येतो तेव्हा कळतं की तो कमिशनरचा विद्रुप हमशकल आहे. ह्या टेझरी मधे २५० कोटींचे हीरे असतात. एकेका हिर्‍याचा आकार टग्ग्या इतका असतो. संपूर्ण सिनेमाभर ह्यांचा आकार बदलत राहतो. सिनेमाच्या शेवटी ह्या टग्ग्यांचे रव्याचे लाडू झालेले असतात.

ह्या सिनेमातला अजयचा दुखरा कोपरा म्हणजे त्याची स्वयंघोषीत प्रेयसी. ही दुर्दैवाने त्याच्या स्वर्गवासी बायकोसारखीच दिसत असते. मिथुनदा आणि त्याच्या सुखी कुटुंबाची वाताहात होण्याआधीच्या त्यांच्या संसाराची ओळख आपल्याला करून दिली जाते. "जो तेरा इश्क मिला, प्लॅटिनम डिस्क मिला" अशा मधुर शब्दांतून आपल्या भूतकाळात चक्कर मारून आणली जाते. मिथुनच्या बायकोचा गुंडांनी बलात्कार करून खून केलेला असतो. मिथुनदा शेवटी नव्या मैत्रीणीच्या प्रेमात पडतोच.

टायगर, डायना, मंत्री आणि त्यांची पिलावळ मिथुनदांना लगाम घालण्यासाठी त्यांना विधवेच्या खुनाच्या आरोपाखाली जेल मधे टाकते. इथे कळतं जॅकी दादा म्हणजे मिथुनदाला खबरा पुरवणारा खबरीलाल. कमिशनरचं अपहरण करून त्याच्या जागी टायगर जातो. मिथुनदा आणि जॅकी बाबा ह्या नव्या कमिशनरला घोडा लाऊन जेल मधून सुटतात आणि एकेका गुंडाचा खात्मा करायला सुरुवात करतात.

सिनेमाचा मुख्य व्हिलन "टायगर" आहे. पण त्याला घाबरायचं की त्याच्यावर हसायचं हेच कळत नाही. कारण डायना, मंत्री आणि गँगमधले अजून १-२ मेंबर्स टायगरला सिनेमाभर येता जाता हिडीस फिडीस करत असतात. त्याला "देख लुंगा टायगर के बच्चे" अशा धमक्याही देतात. हे कमी की काय म्हणून त्याला ब्लॅकमेलही करतात. धन्य आहे.

सिनेमाच्या मधेच कधी तरी आपल्याला टायटल साँग ऐकवण्यात येतं "क्या क्या संभालोगी जवानी में, आग ही आग है पानी में". आश्चर्य म्हणजे ह्या गाण्यात डायना, मिथुनदांची प्रेयसी आणि एजून एक अशीच आयटम ह्या मिळून मिसळून नाचतात. ह्या गाण्यात प्रेक्षकांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात - लटके संभालू के झटके संभालूं? झुमका संभालूं के ठुमका संभालू? दिलकी लगी क्या बुझाये बुझेगी? आजु संभालूं के बाजू संभालूं? चुम्मा संभालूं के जुम्मा संभालूं, या अपने दिलका कबुतर संभालूं?

प्रेक्षकांना प्रश्नात टाकून सिनेमा पुढे सरकतो.

यथावकाश हिरे लुटले जातात. मिथुनदांची प्रेयसी मिथुनदांवर नाराज असते. तिचा असा समज झालेला असतो की मिथुनदांनीच विधवेचा खून केला आहे हिरेही पळवले आहेत. पण त्यांच्यातला गैरसमज लवकरच दून होतो आणि आपल्याला अजून एक सुंदर गाणे ऐकवले जाते "जब मिले दो जवानी, बने एक प्रेम कहानी, बजते हैं दिल के तार".

हळू हळू सगळ्यांना कळतं की हा कमिशनर तोतया आहे आणि तोच टायगर आहे. व्हिलन गँग पैकी एक मिथुनदांच्या प्रेयसीचा मामा असतो. तो टायगरला चुना लाऊन हिरे भाचीच्या घरात लपवतो. हिर्‍यांच्या मोहापाई आता मिथुनदांची प्रेयसी, आधीची उगाच आयटम ह्यांना कमिशनरसोबत बांधलं जातं. इतके दिवस बंदीवासात असूनही कमिशनर त्याच वर्दीतल्या कडक इस्त्रीच्या शर्ट मधेच असतो.

हिरे घेऊन टायगर पळणार इतक्यात मिथुनदा अड्ड्यावर पोचतात. शेवटची हाणामारी होते, मिथुनदा आणि जॅकी बाबा आपल्या अक्षय बंदुकांनी गुंडांचा खात्मा करतात, सगळीकडे आनंदी आनंद होतो.

सिनेमातले निवडक यादगार संवाद:

१. चोट खाते खाते फौलाद भी चिखने लगता है, तो तू क्या चीज है.

२. जो हमारी बात मानता है वो हसता है, जो नहीं मानता वो खून के आंसू रोता है.

३. मौत कभी ठोकर खा कर वापस नहीं जाती टायगर, आती है तो जान लेकर ही जाती है.

४. मेरा सबसे बडा खजाना मेरी बेटी है.

५. हम कानून को जिंदा रखने के लिया कानून का गैर कानूनी ऑपरेशन करते हैं.

६. जब कभी मैं जुर्म का जुआं खेलता हुं तो जोकर हमेशा अपनी जेब में रखता हुं.

७. टाईम कम है. सोचना शुरू करदे अब उपर वाले को क्या जवाब देना हैं.

८. मेरे लिये किसी की जान लेना उतनाही आसान है जितना टेलिफोन पे बात करने के लिये रिसिव्हर उठाना.

शेवटची हाणामारी झाल्यावर "आग ही आग है पानी में" ह्या सुमधुर गाण्याने सिनेमाची सांगता होते. इथे आपल्याला कळतं की ही आग इंतेकामची नसून इश्काची आहे. किंवा "आग ही आग" मधली एक आग इंतेकामची आणि दुसरी आग इश्काची असंही असू शकतं. मधला "ही" म्हणजे अर्थातच मिथुनदा हे वेगळं सांगायला नकोच.

पुढच्या परीक्षणापर्यंत क्रमशः

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

स्पा's picture

23 Aug 2011 - 8:40 am | स्पा

हा हा हा

खपलो...

__/\__

पिलीयन रायडर's picture

23 Aug 2011 - 9:06 am | पिलीयन रायडर

आई शप्पथ... बेक्क्क्कार हसले.....

प्रचेतस's picture

23 Aug 2011 - 9:13 am | प्रचेतस

हेही परीक्षण लैच भारी.
अवांतरः आग ही आग याच नावाचा चंकी पांडेचाही एक असाच भयाण चित्रपट पाहिला होता.

विनीत संखे's picture

23 Aug 2011 - 11:05 am | विनीत संखे

हो मलाही चंकीचाच आठवला...

टुकार चित्रपट हे दिग्दर्शकाच्या अभिव्यक्तीची दाद देण्यासाठी पाहायचे असतात असं मीही मानतो.

आत्मशून्य's picture

23 Aug 2011 - 3:12 pm | आत्मशून्य

हेच मत आहे. काम करणार्‍याने मन लावून काम केलय ना ? मग बास, चित्रपटाची कथा काहीही असो जो पर्यंत मज्या येतेय, आपण दाद देतोच, चित्रपटाला (शक्यतो)नावं ठेवायची नाहीत :)

किसन शिंदे's picture

23 Aug 2011 - 9:21 am | किसन शिंदे

एकेका हिर्‍याचा आकार टग्ग्या इतका असतो. संपूर्ण सिनेमाभर ह्यांचा आकार बदलत राहतो. सिनेमाच्या शेवटी ह्या टग्ग्यांचे रव्याचे लाडू झालेले असतात.

हॅहॅहॅ... :D :D

हे लय भारी हा..

आणी परिक्षण तर त्याहून कडक..

मी-सौरभ's picture

24 Aug 2011 - 9:02 pm | मी-सौरभ

मंजे काय रे भाउ??
(आमच्या पुण्यात हा शब्द ऐकलेला नाही मी ;) )

पल्लवी's picture

23 Aug 2011 - 9:30 am | पल्लवी

एकच नंबर !!!

जाई.'s picture

23 Aug 2011 - 9:38 am | जाई.

धमाल परीक्षण
हहपुवा

प्रीत-मोहर's picture

23 Aug 2011 - 9:45 am | प्रीत-मोहर

हे परीक्षण ही जबर्‍याच रे....

अवांतरः आता रव्याचे लाडु इथल्या कोणत्या दुकानात मिळतात हे शोधावे लागेल :(

सविता००१'s picture

23 Aug 2011 - 10:02 am | सविता००१

हहपुवा. बेक्कार हसले

प्रास's picture

23 Aug 2011 - 10:20 am | प्रास

मजा आ गया, एकदम मज्जा!

मिठूनदा कि फिल्में तो देखी है रे, पर तुम्हारे परिक्षण पढनेपर वापस देखने की चाहत हो रहीं हैं रे.....

:-)

हे क्रमशः सुखावतंय.....

आदिजोशी's picture

23 Aug 2011 - 10:30 am | आदिजोशी

प्रभुजींच्या बर्‍याच चित्रपटांचं परिक्षण करणार आहे. शेवट अर्थातच गुंडा ने होईल. कारण गुंडा झाला की त्याच्या नंतर काहीच उरत नाही :)

शाहिर's picture

23 Aug 2011 - 3:03 pm | शाहिर

लोहा ला विसरु नका !!

रावण राज ,मिलिटरी राज , कालिया, भीष्मा हे सुद्ध माइल स्टोन आहेत

मिथुनदाच्या मुव्हीज ने सांस-बहुचा सुड घेणारा

हुप्प्या's picture

23 Aug 2011 - 10:39 am | हुप्प्या

जोशीबुवा तुम्हाला साष्टांग दंडवत!
आपली प्रतिभा अफाट आहे.
असाच ओघ असू द्या.

_/\_ _/\_ _/\_

मन१'s picture

23 Aug 2011 - 10:44 am | मन१

मेलो ....फुटलो.....

. ....मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो.
-----/\-----

वाचता वाचता
"मैने मरें हुएं भैस से दूध निकाला है, अंडे से निकली हुई मूर्गी को डंडे मारकर अंडे में बंद कर दिया है, कबरस्तान से निकले मुर्दे को कबरस्तान में वापस बंद कर दिया है" हे लक्ष्याच्या आवाजात ऐकुन पाहिलं, जाम आवडलं(त्याच्या अँ ऊं अ‍ॅ वाल्या शैलीसह. )

शिल्पा ब's picture

23 Aug 2011 - 10:52 am | शिल्पा ब

छान..पण एखादी एखादी यु ट्युबावरची लिंक सुद्धा देत चला.

प्रास's picture

23 Aug 2011 - 10:54 am | प्रास

अगदी हेच म्हणायला पुन्हा आलेलो.

आंतरजालावरची छायाचित्रेही वापरावीत.....

:-)

स्पा's picture

23 Aug 2011 - 11:02 am | स्पा

विनीत संखे's picture

23 Aug 2011 - 11:07 am | विनीत संखे

एक नंबर.

खेडूत's picture

23 Aug 2011 - 11:10 am | खेडूत

हा मात्र त्या वेळी मिस झाला ... कॉलेजात जायला लागल्या बरोबर हा आणखी एक आग हि आग आला होता. तो पाहिला होता.

खेडूत

जे.पी.मॉर्गन's picture

23 Aug 2011 - 11:14 am | जे.पी.मॉर्गन

दोन्ही परीक्षणं अफाट !! आयला सकाळी सकाळी हापिसात खुळ्यागत हसत बसलोय ! यू मेड माय डे !

_/\_ लेका तुझ्या प्रतिभेला !

जे पी

भीडस्त's picture

23 Aug 2011 - 11:17 am | भीडस्त

समी़क्षण अगदी 'आग' आहे.

बाकी

उर्सुला अँड्रेस च्या थोबाडीत मारेल अशी उन्मादक एंट्री घेते.

या आदरणीय विदुषींबद्दलही आमचं कुतुहलशामक ज्ञानवर्धन करांवं ही विनंती.

आदिजोशी's picture

23 Aug 2011 - 11:51 am | आदिजोशी

डॉ. नो ह्या पहिल्या बाँडपटात ती व्हाईट बिकिनी घालून समुद्रातून वर येते असा एक तुफान सीन आहे. तिच्या कपड्यांच्या आवडीमुळे त्यावेळच्या चित्रपट रसिकांनी आणि समिक्षकांनी तिला उर्सुला अनड्रेस असं टोपण नाव ठेवलं असा किस्सा ऐकिवात आहे. अधिक माहिती आणि सचित्र चरित्र जालावर कुठेही उपलब्ध आहे.

अन्या दातार's picture

23 Aug 2011 - 11:32 am | अन्या दातार

आगायाया!
कसलं भारी लिवता वो! _/\_

नंदन's picture

23 Aug 2011 - 11:46 am | नंदन

कं लिवलंय, कं लिवलंय - एक लंबर! आता 'गुंडा'च्या परीक्षणाची वाट पाहतोय :)

अवांतर - मिथुनदांना घेऊन कुणी एक मराठी चित्रपट काढायला हवा राव. नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार आणि गीतकार/संवादलेखक ठाण्यातले एक प्रथितयश शिक्षक-कम-लेखक!

धमाल मुलगा's picture

23 Aug 2011 - 5:55 pm | धमाल मुलगा

मिथुनदांना घेऊन कुणी एक मराठी चित्रपट काढायला हवा राव. नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार आणि गीतकार/संवादलेखक ठाण्यातले एक प्रथितयश शिक्षक-कम-लेखक!

कोल्लापूरच्या म्युन्सिपल गार्डनात कर्दळीच्या आगेमागे अलका बुकल काकूंसोबत थुई थुई नाचणारा मिथून डोल्यापुढं आला....आणि सद..सद्ग...सद्गदित झालो हों!

आणि मिथुनदाच्या तोंडी 'कष्टाच्या घुसळणीतून यशाचं नवनीत' वगैरे डायलॉग ऐकायला मिळण्याच्या धास्तीनं ब्लडप्रेशर हाय-लो हाय-लो व्हायला लागलं राव!

नम्रपणे गाण्यासाठी काही शब्द सुचवू इच्छितो..

इश्कात, स्वप्नात, ज्वानीत, मिठीत ये साजणा..
धुंदीत, रानात, कानात, पानात ये साजणी..

कोवळी ओली ही काया
जवळी घे ना तू राया

इ इ..

यात ज्वानी, कोवळी इत्यादिपैकी काहीही प्रत्यक्ष असणे अपेक्षित नाही. आजरोजीच्या वयाचे मिथुनदा आणि अलकाकाकू सुद्धा "जिथे आहे जसे आहे" तत्वावर घेतले तरी चालून जातील.

धन्यवाद.

धमाल मुलगा's picture

23 Aug 2011 - 6:52 pm | धमाल मुलगा

यात ज्वानी, कोवळी इत्यादिपैकी काहीही प्रत्यक्ष असणे अपेक्षित नाही. आजरोजीच्या वयाचे मिथुनदा आणि अलकाकाकू सुद्धा "जिथे आहे जसे आहे" तत्वावर घेतले तरी चालून जातील.

मेलो! साफ खपलो. S)

इश्कात, स्वप्नात, ज्वानीत, मिठीत ये साजणा..

अग्गायायाया....बाकीचं ठीक आहे, पण 'ज्वानीत ये साजणा' ? परत? काय गाणं लिहिलंय का थर्टी प्लसची जाहिरात? :D

स्वतन्त्र's picture

23 Aug 2011 - 12:22 pm | स्वतन्त्र

थोडा थोडा वाचायचं ठरवलंय !
मघाशी जरा जास्त झालं तर हसून हसून पोट दुखायला लागलं.

चावटमेला's picture

23 Aug 2011 - 12:27 pm | चावटमेला

टारेंट डाऊनलोडला ठेवण्यात आले आहे :)

स्वैर परी's picture

23 Aug 2011 - 12:36 pm | स्वैर परी

हसुन हसुन जीव जायची वेळ आली. आईईई ग!!!!
अजुन येउद्यात! :)

सोत्रि's picture

23 Aug 2011 - 12:39 pm | सोत्रि

मिथुनच्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक जण मिथुन नसतो हे कळेपर्यंत त्याचा रोल संपलेला असतो.

_/\__/\__/\_

शब्द नाहीत ....खपलो आहे!!!

-(परम मिथुनभक्त) सोकाजी

समीरसूर's picture

23 Aug 2011 - 1:21 pm | समीरसूर

खूपच सही आहे हे आणि आधीचे परीक्षण!! :-)

धमाल! धमाल!!

अजून खालील चित्रपटांचे (नॉन-मिथून) परीक्षण करण्यास भरपूर वाव आहे. आदिजोशीसाहेबांनी किंवा अजून कुणी नुकतेच पाहिलेले असल्यास मज्जा येईल.

मक्सद (नागराजा, नागराजा, नागराजा तुम आ जाओ...घंटा बडवणारे जितेंद्र आणि राजेश खन्ना आणि घटांवर लोंबकळणारे साप)

आग और शोला (एक लडकी जिसका नाम मुहब्बत, वो तू हैं, तू हैं....मुहम्मद अझीझचा रम्य आवाज आणि आशिष चनाना नावाच्या हीरोची अफलातून अदाकारी...मंदाकिनी मात्र आपल्याला आवडायची बाबा, उगीच खोटे का बोला? 'जीवा' मधल्या 'रोज रोज आँखोंतले...' मध्ये काय छान दिसली होती...तेजाबमध्ये पण स्विमिंगपूलवरच्या प्रसंगातदेखील मंदाकिनी छान दिसली होती. अर्थात तिची कर्तबगारी मोस्टली तितकीच होती.)

घर घर की कहानी (कितने सावन, कितने यौवन, कितने यौवन बीत गये, तुम हो वहीं या और कोई, तुम लगने लगे नये....तेरे बदन के मुकाबिल क्या सूरज क्या सितारे, तेरे आगे कुछ नही हैं जन्नत के सारे नजारे....काय नजाकत आहे काव्यात...वा वा...आनंद बक्शी आणि लक्ष्मी-प्यारे या त्रिकुटाने गाण्यांचे जे वडापाव मोहम्मद अझीझच्या बेसनी आवाजात तळले हा त्यातलाच एक लालसर वडा)

नगीना (बलमा, बलमा तुम बलमा हो मेरे खाली नाम के, तुम्हे क्या मर जाऊ तो मर जाऊ मैं तुम किस काम केयेयेयेयेयेयेयेये....टुंग टुंग टुंग...श्रीदेवीचा अफाट नाच...गाणे हिट, पिक्चर सुपर हिट)

पाताल भैरवी (मेहमान नजर की बन जा, ईक रात के लिये, मैं जन्मों से तरसा हूं....तानादिनी तानादिनी सुन प्रिये.....चुम्मा चुम्मा जुम्मा चुम्मा..मुझ को बना ले प्रियतम्मा...)

--समीर

गणपा's picture

23 Aug 2011 - 1:26 pm | गणपा

अर्धवट's picture

23 Aug 2011 - 1:35 pm | अर्धवट

अगदी असेच करतो..

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Aug 2011 - 1:37 pm | बिपिन कार्यकर्ते

^न!

पहिल्या परिच्छेदानंतर पुढचे वाचायला जायला बराच वेळ लागला... हसून हसून मेलो!

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Aug 2011 - 1:46 pm | बिपिन कार्यकर्ते

अ‍ॅड्या... मिथुनच्या पोराचाही एक पिच्चर आला होता ना रे काही दिवसांपूर्वी?

अरे देवा.. जबरदस्त ठो ठो हसू आले आहे.

आग ही आग (चंकी पांडे) पाहिला होता. त्यामुळे स्टोरी वाचता वाचता बुचकळ्यात पडलो. नंतर उलगडा झाला.

अरे काय रे हे वस्त्रहरण.. :)

तुझ्याकडून अशाच अनेक परीक्षणांची डोळे लावून वाट पाहात आहे. एक मुद्दत नामक मिथुनदांचाच सिनेमा पाहिला होता. डिस्को डान्सर असतो मला वाटते तो त्यात. आणि "लडकी लडकी लडकी लडकी लडकी.." असं काहीसं अनेक पोरींसोबत स्टेजवर एक नाचगाणंही आहे त्यात.

लहानपणी पाहिल्याने आता ष्टोरी नाय आठवत (तेव्हाही समजली असण्याची शक्यता कमी आहे कारण हिंदी पाचवीपासून पुढे सुरु झालं)

...

पुन्हा एकदा म्हणतो.. झक्कास ..अफलातून.. दणकेबाज लेख.. मिथुनदा स्टाईलमधे.. क्या बात..! क्या बात..!! क्या बात...!!! (आणि एक पिस्तुलाचा हवेत बार खुषीप्रीत्यर्थ..)

एक पिस्तुलाचा हवेत बार खुषीप्रीत्यर्थ..

ही कल्पना फार आवल्डी!!!!
आमचेही बार!!

मृत्युन्जय's picture

23 Aug 2011 - 3:21 pm | मृत्युन्जय

मेलो च्यायला हसुन हसुन

आयला हे हम मिथुन को जिंदा रखने के लिये उसकी पिक्चर का गैर कानूनी ऑपरेशन करत हैं. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Aug 2011 - 5:10 pm | परिकथेतील राजकुमार

अ‍ॅड्या अ‍ॅड्या अरे तू नावडता समिक्षक का नाही रे झालास ?

कालचा आणि आजचा लेख म्हणजे तडतड वाजणार बाजा आणि उड उड उडणार्‍या पॉपकॉर्नची तुफान मेजवानी आहे.

बर्‍याच दिवसांनी खळखळून हसलो रे :) धन्यवाद.

बादवे त्या सदाशिव अमरापूरकरचा एक शिणीमा आहे, ज्यात बहुदा आपला धर्मुदादा पण आहे. त्या शिणिमात अमरापूरकर साहेब जगावर राज्य करण्याची (आणी सगळ्यात आधी भारतावर) स्वप्ने बघत असतात. त्यात त्यांनी एक वाघ पाळलेला असतो. ह्या चित्रपटातल्या अनेक खल्लास संवादापैकी एक म्हणजे, 'वाघ का पाळला आहे' असे एका विदेशी माणसाने विचारल्यावर अमरापूरकर साहेब म्हणतात, "कुत्ते कुत्ते पालते है और शेर शेर !"

त्या शिणुमावरपण लिही रे एकदा.

मलाही सिनेमाचं नाव आठवत नाही पण हे तुम्ही म्हटलेलं नक्की आठवलं, पण तोच का हो सिनेमा ज्यात सदाशिव अमरापुरकर बँडवाल्यासारखा पण पांढर्‍या रंगाचा युनिफॉर्म घालून एका रथासारख्या गाडीतून फिरत असतात. (बाकी खांद्यावर एपिलेट्स् आणि खिशाला बँडवाल्यांसारखी मेडले वगैरे आहेतच..)

नावही भयंकर आहे त्यांचे त्यात प्रलयनाथ किंवा अशाच काही अशुभसूचक टाईपचं.

ओ गवी तो प्रलयनाथ (दिपक शिर्के) राहिला तिरंगा मध्ये.

मृत्युन्जय's picture

23 Aug 2011 - 5:52 pm | मृत्युन्जय

फरिश्तेच आहे तो. उत्कृष्ट चित्रपट आहे. दारु पिउन सुजलेले विनोद खन्ना आणि कुत्र्याचे रक्त पिण्याच्या वल्गना करणारा धर्मेंद्र. जोडीला तोंडी लावायला खलनिर्दालक भगवान रजनीकांत. त्यातला सदाशिव अमरापुरकरचा डायलॉग देखील मला चित्रपट अगदी काल बघितल्यासारखा आठवतो " देखो कैसे बंदर की तरह उछल रहा है" (हे रजनी अण्णाला उद्देशुन). शोल्लेट पिच्चर होता तो.

गवि's picture

23 Aug 2011 - 5:37 pm | गवि

हा का?

फरिश्ते?

प्रास's picture

23 Aug 2011 - 7:38 pm | प्रास

मला वाटतं हा "एलान ए जंग" असावा.

श्रीरंग's picture

24 Aug 2011 - 10:03 am | श्रीरंग

वरील चित्र "फरिश्ते" चित्रपटातलं असून, यूट्यूब लिंक "ऐलान-ए-जंग" चित्रपटाची आहे.
दोन्ही चित्रपटांत धरम-पाजी आणी सदाशिवरावभाऊ असल्यामुळे अभक्तांचा गोंधळ उडतो, कित्येकदा.

आदिजोशी's picture

23 Aug 2011 - 5:41 pm | आदिजोशी

सगळ्यात आधी मिथुनचे काही सिनेमे घेतलेत परिक्षणासाठी. ते झाले की मग वळूच इकडे तिकडे :)

स्वाती दिनेश's picture

23 Aug 2011 - 6:43 pm | स्वाती दिनेश

धमाल आली! वाचताना साक्षात मिथुनदा डोळ्यासमोर दिसायला लागला आणि म्हणू लागला.. क्या बात, क्या बात, क्या बात!
स्वाती

रेवती's picture

23 Aug 2011 - 7:01 pm | रेवती

खी खी खी

पैसा's picture

23 Aug 2011 - 7:08 pm | पैसा

मस्त रे आदि!

मिथुनचे पिक्चर कसे पण असोत, अपुन मिथुन की फ्यान है!

या पिक्चर्समधल्या दिव्यांगना हीरविणी, बहुतेक वेळा कानठळ्या बसवणारी बेसूर आणि भेसूर शब्द असलेली गाणी, त्यांचं संगीत बहुधा बाप्पीदाचं असे. आणि बाप्पीदांच्या आवाजात ते "डॅन्स डॅन्स" वगैरे ऐकणं म्हणजे केवळ अवर्णनीय!!! त्यातून पुढच्या रांगात बसलेले प्रेक्षक ड्वायलॉकच्या बरोबरीने टाळ्या शिट्ट्या आणि कॉमेंट्सचा जो काय गोंधळ घालायचे तोही न विसरण्यासारखा. :D

पण मैत्रिणी आणि भावंडांच्या बरोबर रत्नागिरीच्या लता टॉकीजमध्ये १ रुपयाचं तिकीट घेऊन बघितलेल्या या सिनेमांनी जी गंमत यायची ती आता आयनॉक्समधे येत नाही. :(

चांगला दिग्दर्शक मिळाल्यावर ३ राष्ट्रीय पारितोषकं घेणारा हा गरिबांचा अमिताभ या पिक्चर्समधे असली कामं कशी काय करायचा हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे! :)

धमाल मुलगा's picture

23 Aug 2011 - 7:14 pm | धमाल मुलगा

चांगला दिग्दर्शक मिळाल्यावर ३ राष्ट्रीय पारितोषकं घेणारा हा गरिबांचा अमिताभ या पिक्चर्समधे असली कामं कशी काय करायचा हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे!

मोठा पाइंटाचा मुद्दा मांडलास गो बाय!

जोक्स अपार्ट, पण मिथुनने साकारलेले 'रामकृष्ण परमहंस' केवळ लईईई भारी!
पण हाच मनुक्ष इतर सिनेमे असा गंडल्यासारखा का करतो असा प्रश्न पडतोच.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Aug 2011 - 7:50 pm | बिपिन कार्यकर्ते

मिथुनभायचे प्याकेज डील असायचे. त्याला हीरो म्हणून घेतले की त्याच्या ऊटीच्या हॉटेलात सगळी सोय व्हायची युनिटची, तिथेच चित्रीकरण करायचे. हिरॉइन वगैरे फारशी महत्वाची नसायचीच. बरेचसे सिनेमे (विशेषतः नंतरचे) त्यानेच प्रोड्युस केलेले असायचे. सगळा घरचाच मामला!

धमाल मुलगा's picture

23 Aug 2011 - 7:56 pm | धमाल मुलगा

हे सगळं मान्य. पण च्यायला, कथा-पटकथा-संगीत-गीत वगैरे भानगडीसुध्दा गरजेच्या असतात सिनेमा काढायला. त्याचं काय>?

>>कथा-पटकथा-संगीत-गीत वगैरे भानगडीसुध्दा गरजेच्या असतात सिनेमा काढायला. त्याचं काय>
मग जाऊन एखादा यश चोप्रा(संगीत-गीत साठी) पिच्चर किंवा एखादी आर्ट फिल्म पहावी(कथा-पटकथा).. ;)

चित्रीकरणंही त्याच्या चहाच्या मळ्यात, बागात, झाडं, टेकड्या जे जे काय विकत घेतलय त्यात व्हायची. खर्च असा फारसा नसायचा. एखाद्या शिनेमात जर फक्त चहाच्या मळ्यात गाणी असतील तर त्यावेळी तेवढेच लोकेशन अ‍ॅव्हेलेबल आहे असे समजावे. एखाद्या शिनेमात झाडातून पळण्याचे गाणे चित्रित होत असताना दुसर्‍या चित्रपटात झाडात होत असलेल्या मारामारीचे धपाटे गाण्याचं शुटींगवाल्या हिरो हिरविनीलाही बसले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.;)

सोत्रि's picture

24 Aug 2011 - 3:05 am | सोत्रि

दहा लक्ष वेळा सहमत.

- (परम मिथुनभक्त) सोकाजी

श्रावण मोडक's picture

23 Aug 2011 - 7:13 pm | श्रावण मोडक

आ व रा !!!

प्रभो's picture

23 Aug 2011 - 7:22 pm | प्रभो

भारी रे!!!

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2011 - 9:45 pm | राजेश घासकडवी

नवर्‍याला जिवे मारण्याच्या धमकीला एक रुपयाही द्यायचा नाही असं ठणकावून सांगणारी ती नारी मुलाच्या जिवावर आल्यावर तडक ५० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पोचते. इथे मिथुनदांनी समस्त नवरे जमातीला एक गुप्त संदेश दिला आहे.

असल्या वाक्यांनी बहार आली. मस्त...

सहज's picture

24 Aug 2011 - 6:26 am | सहज

अर्थात महान भारतीय संस्कृतीरक्षक मिठून्दा यांनी गुप्त संदेश नव्हे तर 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते' हेच ऐतीहासीक सत्य पुन्हा एकदा उधृत केले आहे हे निदर्शनास आणुन देउ इच्छीतो.

कुळाचा_दीप's picture

23 Aug 2011 - 10:19 pm | कुळाचा_दीप

च्या मारी ..टांगा पलटी घोडे फरार ... बुंगाट परीक्षण !!!

बाकी, मिथुन्दांच्या सिनेमासाठी डायलॉग लिहिणारे ते अज्ञात डायलॉग लेखक जर कुठे भेटले तर त्यांना ...भर दिवसा लकडी पुलावर साष्टांग दंडवत घालीन.

मराठे's picture

23 Aug 2011 - 10:25 pm | मराठे

बहुतेक वेळेला ड्वायलाक म्हणून 'कादर खान' चं नाव वाचलं आहे.
" टमाटर और कुवांरी लडकी जादा दिन घर में नही रख्खा करते। "

प्रचेतस's picture

23 Aug 2011 - 10:35 pm | प्रचेतस

आताच कौन बनेगा करोडपती बघत असताना मिथुनचा एक महान ड्वायलाक ऐकला.
"जिनके घर शीशेके होते है वोह बेसमेंट मेंही कपडे बदलते है.-गोलमाल ३.

श्रीरंग's picture

24 Aug 2011 - 8:54 pm | श्रीरंग

बहुतेक मिथुनपट "बशीर बब्बर" यांच्या समर्थ लेखणीतून उतरले आहेत.

>>आता इथे डायलॉग्सच्या भयानक फैरी झडतात.>>

=)) =)) =))
खरच भयानक आहेत
कोणाला असले संवाद सुचतात ? :)

झकास.
दोन्ही परिक्षणे आवडलि. पुढचे भाग लवकर येउ द्यात.

अभिज्ञ.

चतुरंग's picture

24 Aug 2011 - 8:39 am | चतुरंग

<=०()8=<

प्यारे१'s picture

24 Aug 2011 - 9:15 am | प्यारे१

आदि रॉक्स.... णेहमीप्रमाणे.

८० च्या दशकातले स्वतःचे चित्रपट, त्याची कथानके, संवाद, अतर्क्य स्टंट्स, अतरंगी पोशाख आणि केशरचना पाहून स्वतः कलाकारच एकतर 'धाय मोकलून' हसत तरी असतील नाहीतर स्वतःची कीव तरी करत असतील.

कादरखानने इतरांसाठी लिहिलेल्या संवादांपेक्षा स्वतः भूमिका करताना म्हणत असलेले त्याचेच संवाद हे कधी कधी त्याला स्वतःला तरी कळत असतील का असा प्रश्न पडावा इतके लांब आणि रुपकात्मक असायचे. (कादरखान सारखंच मोठं वाक्य झालं. नाममाहात्म्य. दुसरं काय?)

बाकी त्या काळातल्या चित्रपटातील सगळे गुंड आपापली कॉर्पोरेट किंवा गेला बाजार युनियन तरी सांभाळत असावेत. आपल्या गँग मधल्या प्रत्येकाला व्यवस्थित दिलेला गणवेश अगदी 'युनिफॉर्म' असायचा.

शेवटच्या हाणामारीत 'शिवील' ड्रेस वाले रंगीबेरंगी (बहुतेकदा बेरंगीच) हिरो त्या गणवेशधारी गुंडांमध्ये अगदी 'उठून' दिसत असत. (गुंड धराशायी झाल्याने 'उभे' फक्त हिरोच)
कॉर्पोरेट म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे हे सगळे लोक बॉसने सांगितल्याशिवाय काहीच करत नसत. 'अरे देख क्या रहे हो, पकडो उन कमिनोंको' म्हटल्याशिवाय 'स्टार्ट घ्यायचा'च नाही असे सगळे ठरवून तंतोतंत चालू असे....!

और भी आन दो..!!

हा हा हा.
अगदी खरं.
गुंडांना युनिफॉर्म असणे ही भयानक कल्पना आहे.
असा एकेक शिनेमा घेऊन जर चिरफाड झाली तर आपण यापेक्षा कैकपटीनं बरे शिनेमे बनवू शकू असा आत्मविश्वास येईल.;)

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Aug 2011 - 12:38 pm | चेतन सुभाष गुगळे

<<साधारणपणे पंजाबी ड्रेसनी झाकलं जाईल इतकं अंग झाकणारा स्विम सूट घालून एक तरूणी समुद्रातून बाहेर येत>>

हा म्हणजे बहुधा असा काहीतरी असणार

http://3.bp.blogspot.com/_IVmjStWmaow/SoN-1yDmcuI/AAAAAAAACHE/Ox4-2dQb41...

आदिजोशी's picture

25 Aug 2011 - 3:30 pm | आदिजोशी

सगळ्यांचे मनापासून आभार :)