दिल्लीची कैरोच्या दिशेने वाटचाल?
अलीकडे पैसे खाऊन ते पैसे स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करताना त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरत नाहींत! आताशी तर हे चोरलेले पैसे शून्ये न वापरता 10^6, 10^8, 10^10 असे लिहायची गरज भासू लागली आहे. लहानपणी शिकलेले (पण कधीही न वापरलेले) अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंख, महाशंख, परार्ध असले एकक (units) नव्याने वापरावे लागत आहेत. अगदी अलीकडचे गुंडांनी वापरलेले "पेटी", खोका" हे शब्दही अपुरे पडत आहेत. मधे एक अलीकडच्या 'खाबूवीरां'च्या 'सन्मानार्थ त्यांची नावे वापरून केलेले नवे अंकगणितच आता उपयोगी पडेल असे वाटते. (त्यात शेवटचे नांव कुणाचे होते हे बहुतेकांना आठवत असेलच.)
सध्या भल्या-भल्या नेत्यांनी व त्यांच्या "पुण्यकर्मा"त सहभागी झालेल्या त्यांच्या साथीदारांनी हडप केल्याबद्दलच्या त्यांच्यावरील दोषारोपात जे आकडे वाचायला मिळतात त्यांचा हिशेब तोंडी तर सोडाच, पण सामान्य कॅलक्युलेटरवरही करता येणे शक्य नाहीं. त्यासाठी "स्प्रेडशीट"च वापरावा लागेल.
ही हडप केलेली सर्व संपत्ती भारतीय जनतेची, त्यांनी दिलेल्या करांतून जमविलेली आहे. तीच हडप केल्यामुळे सामान्य जनता संतापल्यास नवल ते काय? पूर्वी एक-दोन लाख खाल्ले तरी "अबब" व्हायचे, पुढे कोटी रुपये खाल्ले तरी कांहीं वाटेनासे झाले. संवयच झाली म्हणा ना! मग चारा-घोटाळ्यापासून (fodder scam) हजार कोटींचा आकडा वाचनात येऊ लागला व पचूही लागला. पण आता? "इतके लक्ष कोटी"पर्यंत मजल गेली. (कधी कधी असे वाटते कीं अकाउंटिंगच्या परिक्षांत हिशेब कसे ठेवायचे व हिशोबातल्या चोर्या कशा पकडायच्या हे शिकवायचे सोडून "नको ते" शिक्षण दिले जात आहे कीं काय!) काय करणार आहेत ही मंडळी या पैशांचे? कांहीं लाज, लज्जा, शरम? आम जनता १० हजार ते १० लाखांपर्यंत पगार मिळवते. पण हल्ली वाचनात ज्या राशी येतात त्या वाचल्यावर वाटते कीं "यत्र- यत्र धर्मस्य ग्लानिर्भवति भारत" अशा परिस्थितीत "संभवामि युगे युगे" असा आशिर्वाद देऊन गेलेले भगवान श्रीकृष्ण आता कशाची वाट पहात आहेत? कीं तेच आज अण्णा हजारेंच्या रूपाने प्रकट झाले आहेत?
पण आपल्या सरकारचे रागरंग पहाता त्याला अद्याप जनतेच्या क्षोभाच्या तीव्रतेचा किंवा तो क्षोभ किती खोल आहे याचा अंदाजच आलेला नाहीं. कालची राजघाटावरील अण्णांच्या चिंतनाबद्दलची बातमी टीव्हीवर पाहिल्यावर असे वाटले कीं सरकारने नीट विचार केला नाहीं तर राजघाटाचा किंवा जयप्रकाश नारायण उद्यानाचा तेहरीर चौक व्हायला वेळ लागणार नाहीं. मनिष तिवारींचे अण्णासाहेबांच्या बाबतीत ’तुम’ ’तुम्हारी’ सारखे सौजन्यहीन उद्गार, कपिल सिब्बल यांच्या चेहर्यावरचे "अतिहुशारी" दर्शविणारे लबाड हास्य आणि अंबिका सोनींचे एकाद्या ४-५ वर्षाच्या मुलाला समजावे तसे जनतेला सांगणे म्हणजे कहरच झाला आहे असे वाटते.
पण अण्णांना उपोषण करायला बंदी घालून "आताचे गांधी" इंदिरा-जींचे अनुकरणच करत आहेत कीं काय? त्यांना या देशात पुन्हा आणीबाणी आणयची आहे काय? हे देशाचे तारू भरकटत कुठे न्यायचे आहे त्यांना? काय म्हणून उपोषण करण्याचा हा अधिकार अण्णांना हे सरकार नाकारीत आहे? आपल्याला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालेलेच नाहीं असे अण्णा म्हणाले ते खरेच आहे. फक्त "गोर्या इंग्रजां"च्या जागी "सावळे इंग्रज" आले. जी बंदी गोर्या इंग्रजांनी महात्मा गांधींच्या उपोषणावर घातली नाहीं ती बंदी हे गांधींचे नाव घेणारे आजचे "सावळे इंग्रज" आजच्या युगातल्या गांधींच्या नव्या अवताराला कां नाकारत आहेत? आणि ते आता बंदिवासात अन्नच काय पण पाणीही त्यजून उपोषणाला बसले आहेत तर अटकेने सरकारने काय साधले? आज भारतभर-अगदी केरळ-तामिळनाडूपासून उत्तरेत हरियानापर्यंत व राजस्थानपासून आसामपर्यंत सारे लोक अण्णांच्या मागे उभे आहेत. एकादी ठिणगीच पडायचाच अवकाश आहे. मग असे पेटेल कीं कैरोतल्या तेहरीर चौकाचीच पुनरावृत्ती होईल.
मागे फिलिपीन्समध्ये जेंव्हां अशीच चळवळ कोरी अक्वीनोबाईंनी सुरू केली त्यावेळी त्यावेळी जनसमुदाय असाच चौकात जमला होता. त्यातल्या कॉलेजकन्यकांनी मशीनगनधारक थाय सैनिकांना गुलाबाची फुले दिली. ती कृती इतकी परिणामकारक ठरली कीं सारे सैनिक कोरीबाईंच्या बाजूला आले व पाठोपाठ रामोस हे संरक्षणमंत्रीही कोरीबाईंना येऊन मिळाले. दिल्लीच्या गर्दीतही खूप स्त्रिया दिसत आहेत. त्यांनी या पोलिसांच्या व सैनिकांच्या हातात राखी बांधायला हवी. मग हे बंधू काय या निदर्शकांवर हल्ला करतील? काय बिशाद!
अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यासाठी २२ अटी? कशाला? एक नि:शस्त्र अहिंसावादी देशभक्त भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला उभा रहातोय् व तेही फक्त स्वत: अन्न नाकारून, तर यात पोलिसांना "सुरक्षे"ची काय समस्या दिसली? अतिरेक्यांना सोडून ते या आधुनिक महात्म्याच्या कां मागे लागले आहेत? आणि तीनच दिवसांची परवानगी काय म्हणून? आमरण उपोषण तीन दिवसात कसे संपेल? शिवाय ५००० पेक्षा जास्त लोक येणार नाहींत याची खात्री अण्णा कसे देतील? ती व्यवस्था गर्दीचे योजनाबद्धपणे नियंत्रण करून पोलिसांनाच करायला हवी! कार पार्कमध्ये ५० पेक्षा जास्त गाड्या किंवा दुचाकी वाहने चालणार नाहींत हीही जबाबदारी अण्णांची कशी? ती व्यवस्थाही पोलिसांनीच नको कां पहायला?
"सरकारचे डोके टिकाणावर आहे कां?" असेच म्हणायची आता पाळी आलेली आहे. सरकारला सुबुद्धी सुचो व या "भ्रष्टासुरा"चा संहार होवो ही आशा करत-करत आत पुढच्या शुभ वार्तेची वाट पाहू या!
प्रतिक्रिया
16 Aug 2011 - 4:34 pm | इरसाल
काका पयले हा लेख इथून हलवा हि विनंती.(मला अगोदर तुमची कविता वाटली )
दुसरे म्हणजे तुमच्या शब्द शब्दाशी सहमत आहे पण "शिवाजी जन्मावा तो दुसर्याच्या घरी माझ्या घरी नको ".
अश्या परिस्थितीत वेगळे काही घडेल हि आशाच फोल ठरते. आणि आपण सध्या मेणबत्त्यांचा वापर/व्यापार वाढवलाय.
16 Aug 2011 - 8:00 pm | अप्पा जोगळेकर
लेखातील भावनेशी संपूर्णपणे सहमत. पण जितके वाटते तितका देश पेटलेला नाही हीच खेदाची बाब आहे आणि त्याला बर्याच अंशी आमच्यासारखे नोकरदार लोक जबाबदार आहेत.
विरोधकांचा सुद्धा तोंडदेखला पाठिंबा आहे कारण ज्या बिलासाठी हे आंदोलन चालू आहे ते त्यांना स्वतःलाही त्रासदायकच ठरणारे आहे.
काल बाळ ठाकरेनी तर सरळ सरळ अण्णा हजारेंच्या विरोधी भूमिका घेतली. सगळेच एकाच माळेचे मणी.
मग ती इटालियन बारबाला असूदे नाहीतर गल्लीत भाषणे ठोकणारा गुंड.
-- बाकी हे आंदोलन समजा यशस्वी झालेच तरी बिल पास होणार नाही याची खात्री वाटते. तरीदेखील हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा प्रयत्न करण्याला महत्व देणारे आंदोलनकर्ते वंदनीय वाटतात.
17 Aug 2011 - 8:11 am | विजुभाऊ
मग ती इटालियन बारबाला असूदे नाहीतर गल्लीत भाषणे ठोकणारा गुंड.
आप्पा जोगळेकरजी कृपया हे असले हिणकस शेरे लिहून तुमच्या उथळ वृत्तीचे प्रदर्शन करू नका.
बारबाला म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला?
समजा एखाद्याने विद्यार्थी असताना शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हॉटेलमध्ये नोकरी केली तर तो कमी पणा आहे असे का म्हणायचे आहे ?
17 Aug 2011 - 5:20 pm | शाहिर
इटालियन बारबाला असा उल्लेख करायचा काहीही कारण नाही ..हे चुकि चे अहे
हिंदु संस्क्रूती मधे ते बसत नाही ..
17 Aug 2011 - 5:57 pm | इरसाल
शाहीर .....शाहीर................का उगा त्यांच्या फ्युजनचा व्हिजन बदलू पाहता आहात.
आता बघा बारबाला हा शब्द म्हणजे दोन संस्कृतींचा मिलन आहे. बारगर्लच बारबाला म्हणजे इंग्लिश चे मराठीबरोबर फ्युजन .
16 Aug 2011 - 8:16 pm | सुधीर काळे
पण टीव्हीवर जे दाखवत आहेत ते खूपच प्रोत्साहक वाटले. आज सुटीचा दिवस नसूनही खूप लोक रस्त्यावर आलेले दिसले.
कदाचित प्रत्येक दिवशी गर्दी वाढत जाईल. तेहरीर चौकात असेच झाले. सुरुवात अशीच संथ झाली पण कांहीं दिवसानी ती अचानक पेटली व मग होस्नी मुबारक यांचा बळी घेऊनच शमली.
आंदोलन यशस्वी होत आहे असे दिसले कीं लोक आपोआप मागे येतात. म्हणूनच म्हणतात कीं Nothing succeeds like success.
16 Aug 2011 - 8:18 pm | प्रियाली
मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली आणि फारतर गुजरात म्हणजे भारत का?
तामिळनाडु, कोलकाता-बंगाल, बिहार, आंध्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान, ईशान्यभारत येथला अहवालही द्या.
16 Aug 2011 - 9:13 pm | सुधीर काळे
प्रियाली,
आज सकाळी मी टाइम्सच्या वेबसाईटवर वाचलेल्या बातमीत त्रिवेंद्रम-चेन्नाईपासून हरयानापर्यंतचा (जम्मू-काश्मीरचा उल्लेख नव्हता!) आणि राजस्थानपासून बंगाल, गुवाहातीपर्यंतचा उल्लेख होता. The whole nation is united behind Anna अशीच हेडलाईन होती. सायंकाळीही गुवाहातीची बातमी झी न्यूज व समय या वाहिन्यांवर दाखविली होती.
दुर्दैवाने इतर बातम्यांना प्राधान्य दिल्यामुळे सध्या ती बातमी टाइम्सच्या वेबवरून "लोपली" आहे. पण सुदैवाने माझ्या वृद्ध आईसाठी मी ती बातमी छापून घरी आणली आहे. तुझा ई-मेल पत्ता दिलास तर त्या पृष्ठांचे स्कॅन तुला पाठवीन!
नेहमी असा संशय घेऊ नकोस.....
16 Aug 2011 - 9:15 pm | प्रियाली
मी सकाळपासून बातम्या पाहिल्या पण नाशिक, पुणे, मुंबई आणि दिल्ली वगळता इतरत्र कोठेही आंदोलन झाल्याचे वाचले नाही. परंतु ही माझ्या माहितीची व्याप्ती असू शकते म्हणून प्रश्न विचारला. बातम्यांतही राळेगणसिद्धीपासून दिल्लीपर्यंत आंदोलनाचे लोळ उठल्याचे म्हटले होते. पण राळेगणसिद्धी ते दिल्ली असा भारताचा नकाशा नाही म्हणून प्रश्न पडला.
संशय घेतला नाही तर तर माणूस डोळे मिटून विश्वास ठेवण्याचा संभव आहे. त्यापेक्षा शंकानिरसन झाल्यावर विश्वास ठेवणे कधीही उत्तम.
16 Aug 2011 - 10:04 pm | सुधीर काळे
तू कुठे रहातेस-भारतात कीं परदेशी-ते मला माहीत नाहीं. पण इथे जकार्तात आमच्या संकुलात झी टीव्ही व समय या दोन वाहिन्यावर बातम्या पहायला मिळतात. त्यात सर्व भारताला कव्हर केलेले आहे. अगदी राळेगणसिद्धीसुद्धा! काल रात्रीचे ८ ते ९ 'लाइट्स ऑफ'ही बर्याच शहरातले दाखविले होते. आम्हीही इथे दिवे बंद केले होते रात्री ९३० ते १०३० (जकार्ताची वेळ = भा.स.सा. + १.५ तास)
16 Aug 2011 - 10:58 pm | प्रियाली
समय माझ्याकडेही येते. टाइम्स नाऊ येते आणि स्टार माझाही येते. लाइट्स बंद केलेले मीही पाहिले पण ते प्रामुख्याने महाराष्ट्रातील शहरांचे होते. भारतात काही झाले तर एनआरआय लोकांना त्यात भारतीयांपेक्षा अधिक इंटरेस्ट वाटतो त्यामुळे काही परदेशी लाइट बंद झाले असतील तर कल्पना नाही पण परदेश हा भारतात सध्यातरी समाविष्ट नाही. माझ्या घरातले बरेचसे लाइट रात्री साडे आठला बंद होतात. तसे ते कालही झाले आणि भारतीय वेळ रात्री आठ असेल तर माझ्याकडे लाइट लावायचीच गरज नसते पण ते अण्णांचे कर्तृत्व नाही. ;)
माझा प्रश्न स्पष्ट होता. तमिळनाडु, आंध्र, केरळ, बिहार, ईशान्यभारत येथे आंदोलन झाले का? लाइट बंद करण्यात आले का? तसे झाले नसेल तर लोण भारतभर पोहोचले या गोष्टीत किती तथ्य आहे?
17 Aug 2011 - 8:17 am | सुधीर काळे
m.timesofindia.comhttp://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/9628615.cms
Anna Hazare arrest: A million mutinies erupt across India
Aug 17, 2011, 01.08AM IST TNN
No one really, certainly not the government, had anticipated the extent of countrywide support for Anna Hazare and his crusade against corruption.
NEW DELHI: No one really, certainly not the government, had anticipated the extent of countrywide support for Anna Hazare and his crusade against corruption. Within hours of the news of his arrest breaking on the networks, spontaneous protests broke out from Baroda to Bhubaneswar, Kanpur to Kochi, leaving the government gasping at the national demonstration of democratic dissent.
Far away from the fast-moving developments in Delhi, people from all walks of life took to the streets spontaneously, in rain and shine, not just in the metros but even in smaller towns. Everywhere, the protesters denounced the government (no one was willing to accept that the police action was possible without the nod of government bigwigs) and chanted slogans demanding a stronger Lokpal Bill.
If TV channels brought the news of his arrest, social media networks like Twitter started buzzing to mobilize crowds, big and small, to amplify the message. Remarkably, despite the high level of popular anger, there was hardly any untoward incident-obviously Anna's message to maintain peace at all cost had reached his supporters, some of whom courted arrest while some others observed a day's fast.
The rains in north India didn't deter people from coming out on the streets, drenched and purposeful. Even those who have had reservations about Anna's methods, were angry with the government's high-handedness in muzzling the protest. As actor-director Farhan Akhtar said, "The Indian citizen has the right to protest peacefully. Anna's arrest is unconstitutional and shows symptoms of an authoritarian mindset." His father, lyricist Javed Akhtar, said, "I have had certain reservations about Anna's method, but his arrest cannot be condoned. It is undemocratic, unacceptable."
The fact that Anna had been lodged in Tihar's Jail No. 1, the same building in which CWG scam accused Suresh Kalmadi is also lodged, seemed to many an insult to injury. "Democracy had been murdered," was the common refrain across the country, as protesters swelled in numbers. Candlelight processions were taken out in the evening in several metros.
Social activist Medha Patkar led the demonstration at Azad Maidan in south Mumbai. Anna's followers raised slogans like "Anna Hazare, Hum tumhare saath hain" (Anna, we are with you) and "Corruption hatao" (Do away with corruption). Like everywhere else, the turnout was impressive in Mumbai.
Bollywood relied on Twitter to extend its support to Anna. "Voices of people like Anna can't be muffled," said filmmaker Madhur Bhandarkar on the social media network. In Nagpur, an army of protesters wore Gandhi caps proclaiming 'I am Anna'. They took over the main roundabout on the busy Nagpur-Jabalpur national highway before courting arrest. All normal activity came to a standstill in Anna's village of Ralegan Siddhi. Locals came out on the road with their cattle and blocked traffic. "The entire village is observing a bandh," said 73-year-old Datta Awari, Anna's associate.
Even distant Hyderabad wore a deserted look, with the city's multiplexes going empty and not too many people to be seen at the more popular hang-outs. Indira Park was the hub of protests. "The youth are better informed today and they have a platform," said G O Mathew, an MBA student sporting the 'I am Anna Hazare' sticker. Rishika, a 25-year-old engineer, described the system as "corrupt" and said "it was time to change it".
Political parties tried to cash in on Anna's popularity, with TDP leader Chandrababu Naidu embarking on a 'padyatra' and sitting on a fast. Demonstrators converged on traffic intersections in Visakhapatnam, Vijayawada, Guntur, Prakasam and several other towns in Andhra Pradesh.
In Bangalore, it was the member of the Lokpal Bill joint drafting committee, N Santosh Hegde, who was the guiding spirit for protesters at Freedom Park as they chanted nationalist slogans and decried Anna's detention. Hegde said, "I don't think corruption will end with the Lokpal Bill. But it will certainly bring down the scale of corruption." Outside the state capital, scores of people went on a fast in Mysore, Mangalore, Hubli, Bijapur and Belgaum.
Quite a few shops downed their shutters in different parts of Gujarat. In Surat, the protests were led by the ABVP, the students' wing of the BJP. The ABVP was also quite active in the demonstrations in Vadodara, Nadiad, Rajkot and Bhavnagar.
In Kolkata, over 200 people joined the fast at the Metro Channel in the heart of the city. Slogans were raised in support of a stronger Lokpal Bill. It was announced that the fast would continue till Anna was released. Students in IIT-Kharagpur also joined the protests.
Lawyers boycotted work at the Allahabad high court while students in Gorakhpur's BRD University staged a demonstration. A protest march was taken out in Lucknow and Anna's supporters blocked roads in Barabanki district. In the temple town of Varanasi, a man climbed an overhead water tank to register his protest.
Markets in several districts of Haryana were shut down and even train movement was disrupted. In Chandigarh, architects, teachers and lawyers joined the agitation. Protesters courted arrested in Jaipur and Ajmer while thousands participated in fasts at Bikaner, Rajsamand, Sriganganagar, Bhilwara, Kota and Bundi.
Even Shillong was not cut off from the Anna wave. Teachers and students of the premier North Eastern Hill University (NEHU) staged a demonstration condemning the arrest.
17 Aug 2011 - 2:49 pm | प्रियाली
महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर काही शहरे वगळता इतरत्रही आंदोलन जोर पकडते आहे का हाच प्रश्न होता. त्याच्या सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद.
16 Aug 2011 - 8:38 pm | आत्मशून्य
फक्त उठ्सूठ "तेहरीर चौकात असेच झाले." , "तेहरीर चौकात तसे झाले." असं कृपया उदाहरण इतक्यातच देऊ नका, कारण जे तेहरीर चौकात झाले नाही तेसूध्दा इथे नक्कि घडू शकते.
16 Aug 2011 - 9:05 pm | धनंजय
+१
शिवाय : सामांतर्य बघावे, तर तहरीर चौकानंतर काय झाले? हेसुद्धा बघितले पाहिजे.
इजिप्तमध्ये सध्या कोणाचे सरकार आहे? की फडावरची नावे बदलून तीच धोरणे चालू आहेत?
16 Aug 2011 - 9:04 pm | सुधीर काळे
तेहरीर चौकात जे झाले ते इथेही होणारच आहे, फक्त तिथे ८००+ लोक मारले गेले तसे इथे होऊ नये इतकीच परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना. आणि पंतप्रधानासारख्या व्यक्तीला स्ट्रेचरवरून आणणारी आपली संस्कृतीही नाहीं त्यामुळे त्यांच्यावर खटला घालायच्या आधी त्यांना नक्कीच बरे होऊ दिले जाईल यातही मला शंका नाहीं.
पण खरे सांगायचे तर आता कुठल्याही क्षणी त्यांचा "आतला आवाज" (Inner voice) सजीव होईल, ते गादीवरून खाली उतरतील व अण्णांच्या खांद्याला खांदा लावून या चळवळीत उडी घेतील असेच मला वाटते.
पंतप्रधानकीची जबाबदारी परिस्थितीने त्यांच्यावर सोपविली आहे व त्यांनी आठ-एक वर्षे ती निभावलीही आहे. त्यांना या खुर्चीचा मुळीच लोभ नाहीं. उलट आता बाहेर पडले तर ते "भारतहृदयसम्राट" होतील व ती थोरवी "माजी पंतप्रधान" या बिरुदावलीपेक्षा कित्येक पटीने मोठी आहे.
16 Aug 2011 - 9:14 pm | गणपा
काका दिवास्वप्न पहावीत माणसाने नाही असंनाही पण त्याला ही काही मर्यादा?
अंमळ हसुच आलं तुमचा पराकोटीचा आशावाद पाहुन. :)
16 Aug 2011 - 9:45 pm | विकास
काका दिवास्वप्न पहावीत माणसाने नाही असंनाही पण त्याला ही काही मर्यादा?
सहमत!
सुधीरजी, आपल्या आशावादाशी सहमत होण्यापेक्षा, "दे दी हमे आझादी बीना खड्ग बीना ढाल..." या विचाराशी सहमत झालो, तर किमान अंशतः तरी प्रॅक्टीकली विचार करणारा ठरेन. ;)
बाकी मूळ लेखासंदर्भातः
भारताचे अरबस्प्रिंगशी तुलना मला पटत नाही. दोन्हीची कारणे, व्याप्ती आणि निघणारे आउटकम ह्यात जमीन अस्मानाचा फरक रहाणार आहे. यात मी भारताचे चांगले आणि तिथले वाईट असे अथवा त्याच्या उलट म्हणू इच्छित नाही. दोन्ही कडचा इतिहास, दडपशाही/भ्रष्टाचार, वृत्ती-प्रवृत्ती वगैरे सगळेच वेगळे आहे. असो.
"संभवामि युगे युगे" असे वचन देऊन गेलेले भगवान श्रीकृष्ण अण्णांच्या रूपात आले आहेत!
यातील आशावाद समजू शकलो तरी सहमत होऊ शकत नाही. श्रीकृष्णाने "संभवामि युगे युगे" म्हणणे त्याला ठिक होते. पण तसा हरी येण्याची वाट खाटल्यावर बघत बसणे मान्य होऊ शकत नाही. शिवाय अजून एक लक्षात ठेवा. (पुराणातील कथा जशीच्या तशी सत्य आहे असे गृहीत धरून) तो कितीही अवतारी पुरूष असला तरी त्याच्या बालसंगोपनापासून ते महाभारत युद्धापर्यंत त्याला मदत करणारे आणि त्याचे ऐकून अॅक्शन घेणारे असल्याने तो श्रीकृष्ण ठरला. गोवर्धन कसला उचलणार म्हणत ऐनवेळेस सगळ्यांनी काठ्या काढल्या असत्या तर काय झाले असते? "..भिकार दुबळी वृत्ति सोडूनी ऊठ तू कसा.." असे म्हणल्यावर संवाद करून अर्जूनाने गांडीव हातात घेतले युद्धात सक्रीय राहीला, नाहीतर कृष्ण काय करणार होता? आणि या उलट आपण सारे, केवळ गीता न ऐकलेले (अथवा, न ऐकणारे) अर्जून आहोत, "शस्त्रेची गळती माझी, होतसे तोंड कोरडे" म्हणत बसणारे...
असो,
16 Aug 2011 - 10:38 pm | सुधीर काळे
कदाचित मी दिवास्वप्ने पहात असेनही, पण असेच होईल असे अजूनही वाटते हे मात्र खरे. Accidental Hero म्हणून पंतप्रधान बनलेले मनमोहन सिंग इतके "पोचलेले" नाहीत असेच वाटते!
आपण सारे, केवळ गीता न ऐकलेले (अथवा, न ऐकणारे) अर्जून आहोत, "शस्त्रेची गळती माझी, होतसे तोंड कोरडे" म्हणत बसणारे... हे आपल्यासारख्या परदेशस्थ लोकांच्या बाबतीत खरे आहे, पण भारतातले लोक अर्जुन नसावेत असे वाटते. कारण याच आपल्या भारतीयांनी आणीबाणी उठवली होती हेही खरेच.
पाहू कुणाचे भाकित खरे ठरते ते!
17 Aug 2011 - 3:22 pm | रमताराम
गणपाशी सहमत. पण सारा लेखच भाबडा आशावाद आहे त्याचे काय?
17 Aug 2011 - 3:24 pm | रमताराम
दोआप्रकाटाआ
16 Aug 2011 - 11:58 pm | नितिन थत्ते
लेखाचे शीर्षक वाचल्यावर सायकोफन्सी काँग्रेसमध्येच असते हा समज गळून पडला.
17 Aug 2011 - 12:40 am | पंगा
मुळात असा समज कोणाचा होता?
17 Aug 2011 - 3:23 pm | रमताराम
सदर प्रतिसादाबद्दल जोरदार टाळ्या.
17 Aug 2011 - 12:39 pm | विसोबा खेचर
छोटेखानी परंतु सुंदर लेख..!
तात्या.
17 Aug 2011 - 12:39 pm | नगरीनिरंजन
भारतीय भ्रष्टाचारविरोधी लढ्याला आमच्या दुरुनच शुभेच्छा!
(आमच्या पूर्वजांनी केलेली चूक आम्ही करणार नाही.)
17 Aug 2011 - 12:48 pm | श्रावण मोडक
पंतप्रधान म्हणतात, "India is an emerging economy. We are now emerging as one of the important players on the world stage. There are many forces that would not like to see India realize its true place in the Comity of Nations. We must not play into their hands. We must not create an environment in which our economic progress is hijacked by internal dissension. We must keep our mind focused on the need to push ahead with economic progress for the upliftment of the 'aam aadmi'." हे त्यांनी अण्णांच्या आंदोलनासंदर्भात संसदेत केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आंदोलनाचा हा परिपाक माहितीच नव्हता बॉ. काय म्हणणं आहे मंडळी?
17 Aug 2011 - 3:28 pm | रमताराम
श्रामो, सगळंच कस उकलून सांगावं लागतं हो तुम्हाला. 'चष्मा' बदला, दृष्टी बदलेल. (कोण्या बाबाच्या 'विचार बदला नशीब बदलेल' च्या चालीवर वाचावे). डोळ्यावरचा काय लाल, हिरवा, भगवा(खातोय मार श्रामोंचा) झंटॅग रंगाचा चष्मा असेल तो काढा नि पन्नास चांदण्याचा लाल-निळा चष्मा लावून नीट वाचा बघू.
17 Aug 2011 - 6:51 pm | विकास
There are many forces that would not like to see India realize its true place in the Comity of Nations. We must not play into their hands.
हे वाक्य आज (आमच्या) सकाळीच वाचनात आले आणि का कोणास ठाऊक पण मला आणिबाणीच्या मागे-पुढे इंदिरा गांधींचे सारखे जे "परदेशी हाता"बद्दल भिती दाखवणे चालायचे ते आठवले.
17 Aug 2011 - 1:35 pm | सुधीर काळे
जितका प्रचंड भ्रष्टाचार तितकी उदंड प्रगती असे समीकरण त्यांच्या मनात रुजलेले असल्याने अण्णा प्रगतीच्या मधे येत आहेत असा त्यांचा पक्का ग्रह झाला असावा. चर्चा भरकटवायचा प्रयत्नही वाटला.
पण आज श्रीमती वृंदा करात झाशीच्या राणीसारख्या बोलल्या! सरकारचे अगदी वस्त्रहरणच केले त्यांनी. एकदम दिल़ खुष आणि पैसे वसूल!!
17 Aug 2011 - 3:31 pm | रमताराम
जितका प्रचंड भ्रष्टाचार तितकी उदंड प्रगती असे समीकरण त्यांच्या मनात रुजलेले असल्याने अण्णा प्रगतीच्या मधे येत आहेत असा त्यांचा पक्का ग्रह झाला असावा. चर्चा भरकटवायचा प्रयत्नही वाटला.
जे आमच्या विरोधी असतील ते दहशतवाद्यांच्या बाजूचे समजले जातील - जॉर्ज डब्ल्यू बुश (दुसरे)
या उक्तीची उगाचच आठवण झाली.
17 Aug 2011 - 5:11 pm | विनायक प्रभू
अगदी अगदी
17 Aug 2011 - 6:16 pm | ईश आपटे
काळेकाका
एकदा इंडिया अगेन्स्ट करप्श्न च्या साईटवर जाऊन जन लोक पालचा ड्राफ्ट वाचाल का ???
दिसते तस आलबेल नाहीये सगळ...
आणि हे म्हणजे " अण्णा" करत नाचणार्या टीव्हीवरील शाळेतल्या मुलांप्रमाणे झाल. कुणालाच माहिती नाही अण्णा कसली आंधी(हुकुमशाही) आणणार आहेत...............
17 Aug 2011 - 8:46 pm | सुधीर काळे
ईश,
जकार्तातील कांहीं भारतीयांनी सह्यांची मोहीम सुरू केली होती त्यात मीही सक्रीय भाग घेतला आहे व आम्ही ५०० सह्या गोळा केल्या आहेत. त्यात मी माझा खारोटीचा वाटा उचलला आहे. त्यामुळे सगळे साहित्य वाचले आहे.
लोकपाल बिलांच्या दोन्ही आवृत्यांच्या तूलनात्मक फरकाचा लेखही त्यात आहे. वाचलाही आहे. वाचले त्यातले कांहीं कळले, कांहीं नाहीं कळले, कांहीं पटले तर काहीं नाहीं पटले. पण एक गोष्ट् नक्की कळली आणि पटली कीं सरकारी लोकपाल बिल नक्कीच "जोकपाल" बिल आहे. दुसरी गोष्ट कळली आणि पटली कीं लोकपालांच्या़ अधिकारक्षेत्रात (jurisdiction) पंतप्रधान व सर्व न्यायाधीश आलेच पाहिजेत.
आज सर्वांबरोबर न्यायाधीशही भ्रष्ट झाले आहेत. कायद्यासमोर सारे सारखे या नात्याने न्यायाधीश आणि पंतप्रधानसुद्धा लोकपालाच्या अधिकारक्षेत्रात आले पाहिजेत. भ्रष्टाचाराने आता परिसीमा गाठली आहे.
मी कायदेपंडित नाहीं त्यामुळे कांहीं कांहीं बाबतीत मला clarity नक्कीच नाहींय. पण आज भ्रष्टाचाराला गाडलेच पाहिजे व ते काम अण्णा करत आहेत म्हणून मी आणि खूप जकार्ताकर त्यांच्यामागे उभे आहेत.
पण अण्णांनी राजकीय नेते, न्यायाधीश आणि 'बाबू लोग' इतकेच हे क्षेत्र मर्यादित न ठेवता Corporate leaders सुद्धा त्यांच्या क्षेत्रात आले पाहिजेत. कारण हे गडगंज श्रीमंत लोक पैसे चारतात तेंव्हांच ही 'जनावरे' तो खातात. त्यामुळे दात्याला सर्वात आधी सुळावर चढवायला हवे असे मला वाटते.
असो..... एका वेळी एक समस्या सोडवू या. आधी 'जोकपाल'ची, मग दुसरी लोकपाल बिलात आणखी सुधारणा करण्याची! मग तिसरी पैसे 'चारणार्यां'ना कसे जाळ्यात पकडायचे ती!
17 Aug 2011 - 8:25 pm | सुधीर काळे
आज माझा हा लेख’’ई-सकाळ’वर प्रसिद्ध झाला आहे. दुवा आहे:
http://www.esakal.com/esakal/20110817/5266424372071605546.htm
कांहीं बदल केले आहेत. वाचकांचे प्रतिसादही वाचनीय आहेत. रुची असेल तर जरूर वाचा.
काळे
18 Aug 2011 - 12:13 pm | सुधीर काळे
वाचकांच्या प्रतिसादांची संख्या आणि त्यातील मजकूर पहाता याच विषयावरच्या 'ई-सकाळ'वरील लेखाने वाचकांच्या मनाला स्पर्श केला आहे असे वाटते! (कांहीं बदल केले आहेत.)
http://72.78.249.107/esakal/20110817/5493565819294415798.htm
20 Aug 2011 - 4:12 pm | क्लिंटन
काळेकाका,
मी भ्रष्टाचाराला तुमच्याइतकाच विरोध करतो आणि शांततामय पध्दतीने आंदोलन करणाऱ्या अण्णांना काही मिनिटात तुरूंगात धाडणाऱ्या सरकारच्या कृतीचाही मी निषेधच करतो. तरीही तुमच्या या लेखातील मतांशी तरी मी सहमत नाही.
कोणत्याही माणसाला (आपल्या मते) तो चांगला असेल तर देव (किंवा देवाचा अवतार) करायलाच पाहिजे का? कारण कोणत्याही माणसाला तो एक माणूस या भूमिकेतून न बघता देव (किंवा दैत्य) या भूमिकेतून बघितले तर त्या माणसाच्या कृत्यांचे, विचारांचे वस्तूनिष्ठ मूल्यमापन करून आपली मते बनविणे कठीण होते.
१९७१ मध्ये बांगलादेश युध्द जिंकल्यानंतर इंदिरा गांधींनाही असेच दुर्गादेवीचा अवतार म्हटले गेले. पुढे चारच वर्षांनी त्याच लोकांनी इंदिरा गांधींनाच पूतना मावशी किंवा त्राटिका म्हणायलाही कमी केले नसेल! १९७१ च्या विजयाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींनी त्यापूर्वी केलेल्या अयोग्य कृतींकडे दुर्लक्ष झाले. १९७५ मधील आणीबाणीचे समर्थन करायचा प्रश्नच नाही पण आणीबाणी या प्रकरणात इंदिरा गांधींची बाजू तेवढी काळीकुट्ट आणि जेपी धुतल्या तांदळासारखे असे होते का?पण १९७५ मध्ये इंदिरा गांधींचे demonization झाल्यानंतर अशा गोष्टींचा विचार क्वचितच कोणी केला असेल. हे योग्य आहे का?
आजही अण्णा हजाऱ्यांच्या आंदोलनातून निर्माण झालेले काही प्रश्न महत्वाचे आहेत. माझ्या मते त्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे "म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो त्याचे काय".सध्याच्या प्रकारातून एक गोष्ट दिसते-- जर एखाद्या प्रश्नावरून कावलेले लोक आणि समाजात (सुरवातीपासूनची) थोडीशी तरी लोकप्रियता असेल आणि उपोषण केले तर सरकार नमते आणि आपली मागणी मान्य होते. भ्रष्टाचाराला विरोध हा सध्याच्या अब्जावधींच्या घोटाळ्यांच्या दिवसात तुम्हा-आम्हांसारख्या सर्वांच्या तारा छेडणारा विषय झाला. तो एका चांगल्या उद्देशाने अण्णांनी उचलून धरला आणि आंदोलन केले आणि सध्याची परिस्थिती बघता सरकारला झुकावे लागेल असे दिसत आहे.यातून भ्रष्टाचार कमी झाला तर अती-उत्तम पण यातून एक Pandora's box कशावरून उघडला जाणार नाही? सरकार असे झुकते हे लक्षात आल्यावर अण्णांचाच कित्ता इतरांनी गिरवला तर?माझा मुद्दा स्पष्ट करायला दोन उदाहरणे देतो:
१. तामिळनाडूत अनेकांचा एल.टी.टी.इ ला पाठिंबा होता/ आहे हे जगजाहीर आहे. समजा रजनीकांत किंवा तत्सम कोणी सरकारने एल.टी.टी.इ च्या उरलेल्या घटकांना पाठिंबा द्यावा असे म्हणत उपोषण सुरू केले तर अण्णांच्या समर्थनार्थ पूर्ण देशात जितके लोक रस्त्यावर उतरले आहेत त्यापेक्षा जास्त लोक तामिळनाडूत रस्त्यावर उतरतील असे म्हटले तर त्यात फार अतिशयोक्ती आहे असे वाटत नाही. (एम.जी. रामचंद्रन यांचे नैसर्गिक कारणांनी निधन झाल्यानंतरही तामिळनाडूत अनेक दिवस हिंसाचार चालू होता, अनेकांनी आत्मदहने केली. हे प्रकार करण्याइतके कट्टर लोक त्या राज्यात आहेत). इथे सगळ्यांचा पाठिंबा मिळणारा भ्रष्टाचार हा विषय आहे तर या काल्पनिक उदाहरणात श्रीलंकेतील तामिळ बांधवांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा! या परिस्थितीत सरकार झुकून एल.टी.टी.इ ला विरोध करायची २५ वर्षे जुनी भूमिका सोडणार का?
२. काश्मीरात हुरियतच्या नेत्यांना पाठिंबा आहे ही पण गोष्ट लपून राहिलेली नाही.एखादा गिलानी उपोषणाला बसला आणि काहीबाही मागण्या केल्या तर सरकार त्यापुढे झुकणार का?
म्हणूनच म्हातारी मेल्यापेक्षा काळ सोकावतो याची भिती जास्त वाटते.
अण्णांच्या आंदोलनाविषयी आणखी एक प्रश्न: तीन दिवसांपूर्वी टीव्हीवर एका चर्चेत प्रशांत भूषण यांनी असे वक्तव्य केले की त्यांच्या आंदोलनाला कोणाचा विरोध आहे? ज्यांना भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा होत आहे त्यांचा! म्हणजे एका फटक्यात मी पण "भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा होत असलेल्यांपैकी" झालो! हे म्हणजे बुशबाबाच्या "एक तर तुम्ही आमच्या बाजूने आहात किंवा विरोधात आहात" या वक्तव्याप्रमाणेच झाले. हे कितपत योग्य आहे?
तिसरा प्रश्न म्हणजे कालचे किरण बेदींचे "Anna is India and India is Anna" हे वक्तव्य! (http://www.thehindu.com/opinion/editorial/article2373667.ece) ३५-३६ वर्षांपूर्वी तत्कालीन Congress अध्यक्ष देवकांत बरूआ यांनी "Indira is India and India is Indira" हे वक्तव्य केले होते. त्याबद्दल बरूआंवर सर्वांनी टिका केली होती आणि आजही केली जाते. पण अशी टिका करणारे लोक या व्यक्तीपूजेविषयी काही का बोलत नाहीत्?स्वतः अण्णांनी यावर काही वक्तव्य केल्याचे वाचनात आलेले नाही. म्हणजे Congress मधली गांधी घराण्याची व्यक्तिपूजा घालवून अशी नवीन व्यक्तिपूजा आणली जाणार का?
अण्णांच्या आंदोलनाविषयी असे काही प्रश्न आहेत. त्यांच्या कार्याविषयी आणि उद्देशांविषयी पूर्ण आदर बाळगत मी म्हणतो की या प्रश्नांचे काय? पण एकदा त्यांना देवत्व बहाल केले की मग प्रत्यक्ष भगवंताच्या अवताराला कोण प्रश्न विचारणार?
आणि त्याहूनही मूलभूत प्रश्नः आम्हा भारतीयांना असा कोणीतरी तारणहार येईल/ देवच अवतार घेऊन येईल आणि आपले आयुष्य सुधरवेल याची वाट का बघावी लागते? मी तर म्हणतो की लोकांनी इतकी वर्षे मते देताना योग्य त्या उमेदवारांना निवडून दिले असते तर आज ही चर्चा करायची वेळच आली नसती. बरं झाले ते झाले यापुढेही लोकांनी (म्हणजे आपणच) ठरविले तर चांगला बदल नक्कीच घडविता येईल. १२० कोटींच्या भारतात लोकसभेत ५५०, राज्यसभेत २५० आणि विविध राज्यांच्या विधानसभेत मिळून २५०० असे ३३०० कर्तबगार आणि सज्जन लोकप्रतिनिधी मिळणार नाहीत का? आपल्या सगळ्यांच्या मतांमध्ये इतकी ताकद आहे. पण ते लक्षात न घेता आपण आपले प्रश्न सोडवायला तयार नसू आणि इतर कोणीतरी (देवाचा अवतार) येऊन आपले प्रश्न सोडवेल अशी अपेक्षा का? (अवांतरः देशातील दहशतवादाचा प्रश्न आपण सोडविणार नाही पण अमेरिकेने काहीतरी आपल्यासाठी करावे ही अपेक्षा ठेवणे हा पण याचाच एक भाग)
तेव्हा काळेकाका, तुमच्या अभ्यासू वृत्तीविषयी, मुद्दे मांडायच्या कौशल्याविषयी पूर्ण आदर ठेवत म्हणतो की अण्णा हजारे म्हणजे भगवंताचे अवतार हे तुमचे मत मला मान्य नाही. (चर्चा वैयक्तिक पातळीवर तुम्ही नेणार नाही याची खात्री आहेच म्हणूनच हे सगळे लिहिले)
क्लिंटन
20 Aug 2011 - 5:27 pm | तिमा
नेहमीप्रमाणेच क्लिंटन यांचा समतोल प्रतिसाद. शीर्षक खटकले कारण आम्ही कोणत्याही व्यक्तिला देवत्व बहाल करण्याच्या विरुध्द आहोत.
21 Aug 2011 - 10:15 pm | सुधीर काळे
क्लिंटन,
(१) तुझ्या ई-मेलवर मी सरकारी लोकपाल वि. जन लोकपाल यांच्यातल्या तौलनिक अभ्यासावरचे एक पीडीएफ डॉक्यूमेंट पाठविले आहे, ते आधी जरूर वाच. इथे अण्णांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सह्या गोळा करताना ते मला वाचायला मिळाले व आवडलेही.
(२) आज तू श्री प्रशांत भूषण यांनी रामलीला मैदानावर केलेले भाषण ऐकलेस काय? फारच सोप्या शब्दांत त्यांनी सरकारी आणि जन लोकपाल बिलातील फरक 'जनसागरा'समोर मांडला. त्यातल्या कांहीं ठळक गोष्टी.
सरकारी लोकपालात जर एकाद्याने एकाद्या सरकारी अधिकार्याविरुद्ध तक्रार नोंदविली तर तो अधिकारी तक्रार करणार्यावरच उलट खटला घालू शकतो. अधिकार्याला सरकार 'चकटफू' वकील देते तर तक्रार करणार्याला मात्र स्वखर्चाने तो खटला चालवावा लागतो. म्हणजे "भीक नको पण कुत्रा आवर" अशीच गत व्हायची! काल केजरीवाल म्हणाले ते खरे आहे कीं सरकारी लोकपाल बिल म्हणजे जनतेचे तोंड बंद करण्याचा प्रकार आहे.
तसेच जनतेला नाडणार्या अधिकार्यांविरुद्ध तक्रार करायची जास्त गरज आहे उदा. पासपोर्ट ऑफीस, रेशन कार्ड ऑफीस इ. पण या पातळीवरचा नोकरवर्ग लोकपाल/लोकायुक्तच्या क्षेत्रात येतच नाहीं.
केजरीवाल यांनी काल सांगितल्याप्रमाणे सर्व खासदारांच्या, आमदारांच्या, ग्रामपंचायतीतील निवडून आलेले सदस्यांच्या लोकसभेत केलेल्या, विधानसभेत केलेल्या व ग्रामपंचायतीच्या बैठकीत केलेल्या "लीला" यात येत नाहींत. म्हणजे मते विकत घेण्याचे लोकसभेत बसून केलेले कारस्थान सरकारी लोकपालाच्या कक्षेत येत नाहीं! पंतप्रधान, मुख्यमंत्री, सरपंच हे सारे धुतल्या तांदळासारखे असल्याने तेही यात येत नाहींत. न्यायाधीश येत नाहींत. आज माझ्या माहितीतील एक अगदी पापभीरू कुटुंबाविरुद्ध जो खोट्या खटल्याचा सपाटा लावला आहे त्यात तर न्यायाधीश किती स्वच्छ आहेत ते आम्हाला आता First Hand कळले आहे. पण बोलायचीही चोरी कारण "न्यायालयाचा अवमान"!
(३) देवाचा अवतार हे मी एक उदाहरण म्हणून दिले होते. "अगदी देवासारखा माझ्या पाठीशी तो उभा आहे" असे आपण एकाद्या उपकारकर्त्याला म्हणतो म्हणजे आपण त्याला देव्हार्यात ठेवून त्याची पंचामृताने पूजा नाहीं करत! अण्णा हजारेत आज सार्या राष्ट्राला देवदर्शन होत आहे यात शंका नाहीं. पण हा प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यापुढे तो मुद्दा नगण्य आहे.
(४) इंदिरा गांधी या अतीशय उच्च प्रतीच्या नेत्या होत्या पण भारताला भ्रष्टाचाराच्या कुमार्गाला त्यांनीच लावले. त्याआधी हा आसुर छोटा होता पण इंदिराजींनी त्याला बाटलीतून बाहेर काढला व तो आजपर्यंत वाढतोच आहे. पण इंदिरा गांधींचे वैयक्तिक (आणि 'इतर') ऐश्वर्य कुठे व अण्णांचे देवळातली एक ८x१०ची खोली, जेवायचे एक ताट आणि झोपायला एक गादी हे ऐश्वर्य कुठे? आज या माणसाला जे अलौकिक डेमी-देवत्व प्राप्त झालेले आहे त्यात याचाही भाग आहे.
(५) LTTE ला प्रत्येक तामिळी सरकारने छुपी मदत केली होती असेही कुजबुजले जाते. पण श्रीलंकेतील तामिळींचा प्रश्न देशाबाहेरचा आहे त्याची या आंदोलनाशी तूलना होऊ शकत नाहीं.
(६) तसेच उद्या जर अण्णा देशाचे तुकडे करायला सांगू लागले तर त्यांना असा पाठिंबा मिळणार नाहीं. ते तर प्रत्येक भाषणात भगत सिंग, सुखदेव व राजगुरूंचे नाव घेतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आग्रह करतात. थोडक्यात कोण सांगतो याला जितके महत्व आहे तितकेच तो काय सांगतो यालाही आहे. त्यामुळे गिलानी जर देशद्रोही कारवाया करू लागले तर त्याचा 'समाचार' घेणे ही वेगळी गोष्ट आहे आणि अण्णांच्या आंदोलनाशी त्याची तूलना होऊ शकत नाहीं. अण्णांनी असे केले तर कुणीही त्यांना पाठिंबा देणार नाहीं.
(७) "Anna is India and India is Anna" या उत्साहाच्या भरात म्हटलेल्या वाक्याची आज किरण बेदींनाही चुटपूट लागली असेल. पण तो व्यक्तिपूजनाचा किंवा चमचेगिरीचा प्रयत्न अजीबात नव्हता. याउलट देवकांत बरूआ यांचे उद्गार व्यक्तिपूजनाचा किंवा चमचेगिरीचा उच्च नमुना होता. हे काँग्रेसच्या लोकांना पटणार नाहीं पण हे सत्य आहे. आजही राहुल गांधींची अशीच चमचेगिरी चालू आहे!
(८) भारतीय लोकांना आपला देश उभारण्यात देवाची गरज नाहीं हे तर खरे पण आज अण्णांच्या रूपाने एक देवासामन व्यक्ती आपल्यात वावरत आहे तिचा उपयोग करून घ्यायला काय हरकत आहे?
(९) माझ्या मते केजरीवालांच्या रूपात एक उत्कृष्ठ तरुण नेतृत्व देशाला लाभले आहे. त्यांनी परवा सांगितले कीं जन लोकपाल बिलाच्या प्रश्नावर विजय मिळविल्यानंतर त्यांचा मोहरा निवडणुक पद्धतींकडे वळणार असून निवडणुकांना कसे योग्य व पारदर्शक करायचे इकडे ते वळणार आहेत. आजची निवडणूक पद्धती इतकी भ्रष्ट झाली आहे कीं त्यात कुठलाही सज्जन माणूस पडणार नाहीं. मग "३३००" कर्तबगार आणि सज्जन लोकप्रतिनिधी सोडच पण "३३" सुद्धा मिळणार नाहींत. या शोकांतिकेचे यशगाथेत रूपांतर करायला असलीच "टीम अण्णा" हवी असे मला वाटते!
(१०) मी अभ्यासू असेन पण बराच भावनाप्रधानही आहे आणि माझ्यातले हे काँबिनेशन मला आवडते.
आज अण्णा देव आहेत कीं महामानव आहेत कीं साधे मर्त्य मानव आहेत, कुठले लोकपाल बिल चांगले (व म्हणून हवे) यापेक्षा भ्रष्टाचार निर्मूलन हे प्रोजेक्ट महत्वाचे आहे. जन लोकपाल बिल पास करवणे हा त्यातला दर्शनी भाग (मुखवटा) आहे. हे साध्य करायला अण्णांसारख्या सचोटीच्या चारित्र्याच्या ऋषितुल्य देवमाणासाची गरज आहे. अण्णांच्या हातून हे कार्य व्हावे असे मला अतीशय मनापासून वाटते.
22 Aug 2011 - 11:21 pm | क्लिंटन
काळेकाका,
भ्रष्टाचारविरोधी कडक कायदा व्हावा (आणि नुसताच कायदाच नव्हे तर भ्रष्टाचार मुळापासून संपावा) असे मलाही मनापासून वाटते. केवळ मला त्यासाठी अण्णांचा मार्ग मान्य नाही. अण्णांना कृष्णाचा अवतार म्हणण्यात शब्द वापरताना थोडी गफलत झाली हे माझ्याही लक्षात आलेच.पण तरीही मी प्रतिसाद लिहिला कारण त्यातून मला माझे या आंदोलनाविषयीचे इतर मुद्दे मांडता येतील.
श्रीलंकेतील तमिळांचा प्रश्न देशाबाहेरचा आहे पण श्रीलंकेतील तमिळांना (इतकेच काय तर एल.टी.टी.इ ला) समर्थन देणारा वर्ग आजही तमिळनाडू मध्ये आहे हे आपण कसे नाकारू शकू? तीच गोष्ट काश्मीरबाबत. समजा गिलानी उपोषणाला बसला तर काश्मीर खोऱ्याबाहेर त्याला अजिबात समर्थन मिळणार नाही हे अगदी १००% मान्य.पण काश्मीर खोऱ्याविषयी असेच बोलता येईल का?कारण सध्याच्या वातावरणात आपल्या मनासारखे घडवून आणायला लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हवा (आजादी किंवा १९५३ पूर्वीची स्थिती हा काश्मीर खोऱ्यात आणि श्रीलंकेतील तमिळ लोकांचा प्रश्न तमिळनाडूत) आणि उपोषणाला बसल्यावर मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर आणता यायला हवेत.म्हणजे सरकार झुकते! अण्णांविषयी, त्यांच्या तळमळीविषयी अजिबात शंका नाही पण सरकारला आपण पाहिजे तसे झुकवू शकतो आणि आपल्याला पाहिजेत त्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो फक्त रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर लोक उतरवता आले पाहिजेत असा (माझ्या मते चुकीचा) संदेश या आंदोलनातून दिला जात आहे. म्हणूनच म्हातारी मेल्यापेक्षा काळ सोकावण्याची भिती मला वाटते.
दुसरे म्हणजे अण्णा सिव्हिल सोसायटीला कायदे बनवायच्या प्रक्रियेत सहभागी करा अशी मागणी करतात. आता सिव्हिल सोसायटी म्हणजे नक्की कोणाला या प्रक्रीयेत सामील करायचे? नक्की ’eminent' कोणाला म्हणावे? डाव्या विचारसरणीचे लोक रोमिला थापरना eminent म्हणतील पण उजव्या गटाचे लोक त्यांना ताबडतोब विरोध करतील!प्रशांत भूषणना समितीत घ्यावे पण आमचे प्राध्यापक अनुराग अगरवाल यांना घेऊ नये याबद्दलचा नक्की मापदंड कोणता आणि तो कोण ठरविणार? प्रशांत भूषण कायदेपंडित असतीलही पण आमचे प्राध्यापकही हावर्ड विद्यापीठाचे एल.एल.एम आणि लखनौ विद्यापीठाचे पी.एच.डी आहेत.मग त्यांना का घेऊ नये? की ते टिम अण्णामध्ये सामील नाहीत हे त्यांना न घेण्यामागचे कारण आहे? तेव्हा "मी म्हणतो तीच मंडळी सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधित्व करतात आणि तीच मंडळी समितीमध्ये हवीत", "मी म्हणतो तसाच लोकपाल कायदा सर्वात चांगला (म्हणजे त्यांच्या व्हर्जनमध्येही सुधारणेला अजिबात वाव नाही) आणि १० दिवसांत तोच कायदा संसदेने पास करायला हवा नाहीतर सरकारची खैर नाही" हा अट्टाहास का?
तिसरे म्हणजे लोकपाल नियुक्त करायची पध्दत मी पण त्यांच्या वेबसाईटवर एक पॉवरपॉइन्ट प्रेझेन्टेशन आहे त्यातून वाचली आहे. त्या पध्दतीप्रमाणे मुख्य लोकपालाची निवड कोण करणार? तर पंतप्रधान, लोकसभेतील विरोधीपक्ष नेते, सर्वोच्च न्यायालयाचे दोन सर्वात तरूण न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे दोन सर्वात तरूण मुख्य न्यायाधीश, मुख्य निवडणुक आयुक्त आणि कॅग (Comptroller and Auditor General). यात पंतप्रधान तर सरकारचे प्रमुख असतात. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा पंतप्रधान होऊ शकतो. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या आणि मुख्य निवडणुक आयुक्तांच्या नेमणुका राष्ट्रपती (अर्थातच म्हणजे केंद्रिय मंत्रीमंडळ) करतात. कॅगची नेमणूक कोण करते याची मला तरी कल्पना नाही. तेव्हा एका अर्थी लोकपालाच्या नेमणुकीवरही सरकारचाच अंकुश नसेल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरूण असणे हा मुद्दा का वापरला जात आहे? ९६ वर्षांचे न्यायमूर्ती कृष्ण अय्यर त्या समितीत केवळ वय जास्त म्हणून पात्र नाहीत का?
चौथा मुद्दा मी यापूर्वीच मांडला आहे पण तो महत्वाचा आहे म्हणून परत मांडतो. टिम अण्णांशी किंवा त्यांच्या आंदोलनाविषयी काही आक्षेप असतील तर अशा मंडळींवर "भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा होत असलेले" असे लेबल कोणत्या अधिकारात लावले जात आहे? आता या प्रकाराला हुकुमशाही म्हटले तर? याचे कारण एक तर मी म्हणतो तोच कायदा पास व्हायला हवा, दुसरे म्हणजे मी सांगेन तेच लोक सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचाच समावेश समितीत व्हावा आणि तिसरे म्हणजे आमच्याशी मतभेद असतील तर असे मतभेद असलेले लोक भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा होणारे!! मोठा अजब मनसुबा झाला.
पाचवा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे किरण बेदींना त्यांच्या वक्तव्याची चुटपूट लागली आहे याची चिन्हे माझ्या तरी वाचनात/ बघण्यात आलेली नाहीत. तुमच्या वाचनात/बघण्य़ात अशी चिन्हे आली आहेत का?
तेव्हा या कारणांमुळे माझा तरी या आंदोलनाला पाठिंबा नाही. आणि भ्रष्टाचारास मिपावरील इतर कोणाही सभासदा इतकाच किंवा झेंडे आणि मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सामान्य भारतीय नागरिकाइतकाच विरोध आहे.
क्लिंटन
23 Aug 2011 - 4:22 pm | सुधीर काळे
क्लिंटन,
गिलानींनी 'मतदानावर बहिष्कार घाला' या हाकेला अजीबात 'ओ' न देता पंचायतीच्या निवडणुकीत ८० टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी मतदान केले तिथे या गिलानींना काय किंमत द्यायची ते दिसतेच आहे.
असो. माझ्या खरडवहीत जा तिथे मी Chatham House Report चा दुवा दिला आहे तो उघडून तो रिपोर्ट वाच मग कळेल परिस्थिती काय आहे?
पण देशद्रोह्यांशी आपण आजही असेच कडकपणे वागतो असेच वागले पाहिजे.
23 Aug 2011 - 7:19 pm | क्लिंटन
काळेकाका,
तुम्ही म्हणता म्हणून मी मान्य करतो की काश्मीरातील जनता पूर्णपणे पूर्णपणे भारताशी निष्ठा ठेऊन आहे. अगदी तमिळनाडूबद्दलही मी काही बोलत नाही. तेव्हा माझ्या पहिल्या मुद्द्याला तुम्ही उत्तर दिलेत आणि तो मुद्दा चुकीचा ठरवून रद्दबादल मी स्वतःच करत आहे. पण इतर मुद्द्यांचे काय? तुमच्या सोयीसाठी परत एकदा हे मुद्दे लिहितो.
१. सिव्हिल सोसायटी म्हणजे नक्की कोण? कोणाला समित्यांमध्ये घ्यायचे याचा मापदंड कोणता? की टीम अण्णांशी जवळीक हाच मापदंड? असा कोणताही मापदंड कोण ठरविणार? तो योग्य आहे की नाही हे तपासायचे कसे?
२. प्रस्तावित पध्दतीप्रमाणेसुद्धा लोकपाल नियुक्त करायच्या पध्दतीत सरकारचेच वर्चस्व नसेल का?
३. टिम अण्णांच्या मार्गाविषयी मतभेद असतील किंवा तो मार्ग मान्य नसेल तरी सरसकट "भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा होणारा" हे लेबल माझ्यासारख्यांवर कोणत्या अधिकारात लावले जात आहे?
४. किरण बेदींनी त्यांच्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे किंवा टिम अण्णामधील इतर कोणी त्याविषयी काही बोलले आहे याविषयी माझ्या तरी वाचनात/ बातम्या ऐकण्यात आलेले नाही.
23 Aug 2011 - 10:57 pm | सुधीर काळे
क्लिंटन,
भ्रष्टाचाराविरुद्ध सगळ्यांनाच संताप येतो कारण आपण दिलेल्या कराचे पैसे हे चोर लोक लंपास करतात (मी NRI असलो तरी माझ्या भारतातल्या मिळकतीवर कर देतो!) पण चडफडण्यापलीकडे बहुतेक कुणीही कांहींच करत नाहीं. मग कुणी करत असेल व प्रथमदर्शनी (prima facie) जर तो चमू बरा वाटला तर जास्त कीस काढण्याच्या मी विरुद्ध आहे. सध्या सत्तेवर असलेले नेतृत्व भ्रष्ट आहे यात शंका नाहीं (विरोधी पक्षही मागे नाहींत!) व त्या नेतृत्वावर कुठल्या तरी मार्गाने अंकुश ठेवला पाहिजे हेच मी महत्वाचे मानतो. सरकारी लोकपालापेक्षा जन लोकपाल जास्त आवडला इतकेच.
सिव्हिल सोसायटी म्हणजे नक्की कोण? मला सध्याचे सभासद बरे वाटतात. म्हणजे याहून चांगले मिळणार नाहींत असे नव्हे पण "हाय ते बरं हाय"! पण खपून काम करताहेत तर त्यात खुसपट काढायला मी तरी जाणार नाहीं.
खरे तर एरवी मी लोकपाल या संस्थेविषयी तसा साशंकच आहे कारण त्याने दिलेल्या निर्णयावर जर अपील करण्याची सोय असेल तर १५ वर्षे सहज जातील! पण योग्य दिशेने पाऊल पडत आहे असे वाटल्याने मी सध्या त्याचे समर्थन करतो. शेशनसारखा नेता मिळाल्यास याची गरज कदाचित् भासणार नाहीं पण तो तर नाहींय् मग काय करणार?
जन लोकपाल बिलात लोकपालाच्या निवडीवर बर्यापैकी स्वतंत्र नियंत्रण आहे. त्यामानाने सरकारी बिलात नाहीं.
मुख्य म्हणजे सध्या सत्तेवर असलेले जे भ्रष्ट नेतृत्व आहे त्याची मगरमिठी सोडविणे हे पहिले काम आहे. ती सुटली तर मग पुढचे काम योग्य दिशेला लावणे सोपे आहे असे मला वाटते.
लोकपाल नियुक्त करायच्या पध्दतीत सरकारचेच वर्चस्व नसेल का? जन लोकपाल बिलात ते तसे नाहीं.
"भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा होणारा" हे लेबल माझ्यासारख्यांवर कोणत्या अधिकारात लावले जात आहे? कुणी लावलेले मी तरी वाचले नाहीं. पण विरोध करणारे भ्रष्टाचारी आहेत असे मी तरी मानत नाहीं. पण फाटे फोडत बसल्यास सध्याचे "सुभेदार" गालातल्या गालात हसत आपली "लूटमार" चालू ठेवतील! म्हणून फाटे फोडण्याचे मी टाळतो आहे.
किरण बेदींनी त्यांच्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे किंवा टिम अण्णामधील इतर कोणी त्याविषयी काही बोलले आहे याविषयी माझ्या तरी वाचनात/ बातम्या ऐकण्यात आलेले नाही. हे उत्तर बर्याच जणांना पटणार नाहीं पण तिने हे उद्गार पुन्हा काढले नाहींत त्यावरून तिने जीभ चावून घेतली असावी असे वाटते. याच्या समांतर उदाहरणात 'ते' विधान बर्याच वेळा करण्यात आलेले होते असे मला आठवते!
पहा पटते का!
22 Aug 2011 - 3:42 am | हुप्प्या
भ्रष्टाचार हा कॅन्सरप्रमाणे वाढत आहे. पकडले गेलेले आरोपी ज्या रकमांचा अपहार केल्याचे ऐकतो ते नुसते आकडे ऐकून सामान्य लोकांचे डोळे पांढरे होत आहेत. अशावेळी ह्या कॅन्सरवर काही तरी जालीम उपाय केलाच पाहिजे. धारदार शस्त्राने हा कॅन्सर कापण्याचे मनसुबे व्यक्त होत असतील तर अशावेळी ह्याच हत्याराने पुढे मुंडके कापले तर काय वगैरे अनाठायी प्रश्न उकरुन काढण्यापैकी हा प्रकार आहे.
आज भ्रष्टाचाराचा प्रश्न आवाक्याबाहेर जात आलेला आहे आणि त्यावर उपाय केलाच पाहिजे.आपल्याला परम आदरणीय आणि परमपूजनीय वाटणारी दैवते आज सत्तेवर आहेत ह्यावर काही इलाज नाही. त्याना ह्या शस्त्रक्रियेला सामोरे जावेच लागेल.
उद्या तमिळ वा कश्मिरींनी हेच हत्यार वापरले तर वेगवेगळे उपाय करुन त्याला तोंड देता येईल. ते करायला सरकारकडे योग्य त्या यंत्रणा आहेतच.
ह्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत विरोधक म्हणून उतरायला सत्ताधारी आणि विरोधक कचरत आहेत कारण त्यांचे हितसंबंध त्यात आहेत. त्यांचा मलिदा कमी होईल म्हणून.
बहुधा काश्मीर आणि तमिळ प्रश्नावर असा थेट हितसंबंध नसल्यामुळे बहुधा सगळे त्याला जास्त खुलेपणाने तोंड देतील अशी आशा करु. पण तेव्हा काय होईल ह्या भयावह शंकेने आजचे आंदोलन चुकीचे ठरवणे हे मूर्खपणाचे आहे.
कदाचित कश्मीर तोडायला एकाने उपोषण केले तर त्याला विरोध करणारे आणखी शेकडो उपोषणाला बसतील आणि काट्याने काटा काढला जाईल असेही समजू या क्षणभर.
20 Aug 2011 - 4:46 pm | मराठी_माणूस
जेपी धुतल्या तांदळासारखे असे होते का
म्हणजे ते तसे नव्हते असे म्हणायचे आहे का ?
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो
हीच म्हण वेगळ्या अर्थाने : आंदोलन अयोग्य वाटत असेल तर दडपा , सत्ता तुमच्याच हातात आहे.भ्रष्टाचार चालु आहे तसा चालु द्या. पण काळ सोकावतो आहे . इथे काळ म्हणजे सत्तेचा गैर वापर करणारे सर्व.
सरकार असे झुकते हे लक्षात आल्यावर अण्णांचाच कित्ता इतरांनी गिरवला तर
इतरही कित्ता गिरवु शकतात, पण त्या मागे अण्णां सारखी तपस्या लागेल. जनता कोण्याही येर्या गैर्याच्या मागे जाते असे म्हणायचे आहे का ?
"Indira is India and India is Indira
हे वक्तव्य , राहुलचे जोडे, मंत्र्याने स्वतःच्या हाताने उचलणे ह्या दर्जाचे आहे. चमचेगीरीचाच तो एक प्रकार.
Anna is India and India is Anna"
हे वाक्य सुध्दा पुर्णपणे बरोबर नाही, पण त्याची वरील घोषणेशी तुलना होउ शकत नाही.
बाकी अण्णांना देवत्व बहाल करणे चुकीचे , ह्या मुद्द्याशी सहमत . त्यांच्या माणुसपणातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे.
21 Aug 2011 - 2:40 pm | आत्मशून्य
अण्णानी चमत्कार (अकल्पित, अद्भूत व मानवी कूवती बाहेरच्या गोश्टी) केलेले नाहीत म्हनूनच अण्णाना देवत्व बहाल केलं जाणारं नाही. त्यांची तूलना फक्त देवांच्या अवतार कार्याशी होत आहे इतकचं. कालच एका मित्राल मी देवासारखा धावून आला बाबा म्हटले म्हणजे तो देव झाला नाही. इंदिरांना दूर्गा अवतार म्हटले म्हणजे त्या अवतार मानल्या गेल्या नाहीत तर त्यांच्या कार्याशी फक्त तशी तूलना झाली इतकेच होय. राहिला प्रश्न व्यक्तिपूजेचा. तर तेंडूलकर, रेहमान, मायकेल वगैरेंना गॉड म्हणनार्यांनी या मूद्यांवर आपलं तोंड एकदमं बंद ठेवावे व जे इतर आहेत त्यांनी हा अण्णांना मार्गदर्शक मानायचा हा एक प्रयत्न आहे इतकेच या गोश्टीला महत्व द्यावे.
24 Aug 2011 - 12:47 am | आशु जोग
तूला लेखकाचे म्हणणे भावना कळल्या ना
मग
बास झालं तर
फार टेन्शन घेता ब्वा तूम्ही
24 Aug 2011 - 1:15 am | आत्मशून्य
हे तू मला सांगू नकोस.
का ,
तूम्हालाही
टेंशन आलंय ?
20 Aug 2011 - 5:59 pm | सुधीर काळे
क्लिंटन,
तुझा प्रतिसाद माझ्या या लेखाला आलेल्या प्रतिसादांतला सर्वोत्कृष्ठ प्रतिसाद आहे. लेख लिहिल्याचे सार्थक झाले असेच वाटले. धन्यवाद.
आज जरा बाहेर जायचे असल्याने, मी उद्या सविस्तरपणे माझे मुद्दे मांडेन. व्यक्तिगत हल्ला मी केल्याचे मला तरी आठवत नाहीं कारण "Attack the message, not the messenger" हे तत्व मी पाळण्याचा शक्यतो प्रयत्न करत असतो. तरी काळजी नसावी.
21 Aug 2011 - 12:35 pm | सुधीर काळे
अण्णांना "तुम-तुम" करणार्या मनिष तिवारीना चिरंजीव होऊ दे!
NEW DELHI/ LUCKNOW: An RTI response has called Congress spokesman Manish Tiwari's bluff against anti-graft crusader Anna Hazare.
The RTI reply from Dakshin ASC records (South) dated August 3 puts the record straight that Anna "never deserted" the Army, and that he was "honourably" discharged from the armed forces on completion of the 12 years of his service.
The response following a Delhi-based RTI activist Subhash Chandra Agrawal's plea came a week after Tiwari had made several serious allegations of corruption against Anna. It states that five medals were notified to Anna - Sainya Seva Medal, Nine Years Long Service Medal, Sangram Medal, 25th Independent Anniversary Medal and Paschimi Star - during his tenure with the Army.
Tiwari had said, "Annaji keeps saying that the Indian Army is investigating into his records. A few days ago, the Army received an RTI seeking past records of Anna. The Army wrote to Anna to find if he has any objection against it giving those records to the RTI applicant. Anna has not replied to the Army's query to date." He had also challenged Anna's right to lead the fight against graft, citing "corruption" charges against him. The Congress spokesperson had also claimed that Anna had refused to come clean on his Army record.
Army's principal information officer (ASC records, South, Bangalore) Lt Col Arun Kumar had dispatched the replies to Agrawal on August 3. The response says Anna had enrolled with the Army on April 14, 1963. He had completed his training at Aurangabad in Maharashtra. He had joined the service as a recruit. "He was attested as a soldier on November 16, 1963. He was holding the rank of sepoy at the time of leaving the service," the letter says.
The RTI reply states that no punishment was accorded to Anna Hazare as per service records.
अण्णांना "तुम-तुम" करणारा मनिष तिवारीना चिरंजीव होऊ दे!
22 Aug 2011 - 8:09 am | सुधीर काळे
क्लिंटनच्या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरात एक मुद्दा लिहायचा राहिलाच. लोकपालाची निवड करायची 'सरकारी' पद्धत म्हणजे १० लोकांच्या समितीत ५ लोक सत्ताधारी पक्षाचे याविरुद्ध जन लोकपाल प्रस्तवानुसार त्यात पंतप्रधान व विरोधी पक्षाचा नेता (किंवा विरोधी पक्षाच्या नेत्या) हे दोनच राजकारणी असून दोन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, दोन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि दोन संविधानावरील स्वतंत्र तज्ञ (two independent constitutional authorities). इथेच केवढा फरक आहे?
मी सध्या माझ्याकडे असलेल्या पीडीएफ फाईलची वर्ड व्हर्जन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मिळाल्यास माझ्या खरडवहीत आणि खरडफळ्यावर चढवेन.
मी ट्रिब्यून या पाकिस्तानी वृत्तपत्रात लिहिले होते:
Pakistan badly needs its own Anna (‘elder brother’ in many Indian languages) Hazare, a selfless man with no assets. He has motivated all Indians irrespective of their individual religion, language or region. The uninterrupted rise of such responsible civil leadership since our independence has kept our army in its barracks.
Pakistan will be better off if when Anna Hazares replace their religious leadership.
पण अण्णांनी केवळ भारतीयांतच चैतन्य आणले असे नाहीं, तर पाकिस्तानसारख्या लोकशाही फारशी न रुजलेल्या देशांतही त्यांनी अशीच सत्याग्रहाजी ज्योत पटवली आहे. माझ्या वरील लिखाणाला कराचीतील एका पाकिस्तानी (निनावी) व्यक्तीने खालील उत्तर लिहिले:
Pakistan has its share of hungerstrikes.
Businessman, Jehangir Akhtar, has fasted before,
and is mulling of doing the same, as Anna Hazare.
But the more important thing is, how many ordinary and elite Pakistanis,
will show up in Karachi, Quetta, Pindi, Islamabad, Lahore, Faisalabad,
Hyderabad, Peshawar and every single geographic spot inbetween,
to pressure the government and bureaucracy on corruption?
Here, in Pakistan, we not too long ago, made fun of a concerned
young Pakistani, Zohair Toru, for actually taking the trouble,
of showing up at a rally. See for yourself. The elite, would rather sit
in cafes and drawing rooms on their laptops and update Facebook.
Not very different, than in India, except, that in India, the middle class
has decided to call corruption’s bluff. In Pakistan, the middle class is
seething but doesn’t have blood-shot eyes.
या उत्तरात दोन दुवे होते. ते उघडून मी खाली कॉपी-पेस्ट केले आहेत:
Islamabad, August 18 (TruthDive:) A veteran Pakistan citizen who fasted before for social issues is to start an indefinite fast from September 12 demanding that his country bring forth a Lok Pal bill to weed out corruption.
68-year-old Pakistani businessman, Jehangeeer Akhtar who runs a photographic studio sat on a hunger strike for 22 days for the sake of traders in Islamabad. He has earlier been involved in employing the Gandhian way for a social cause when tenants were forcibly evacuated that saw him going on a hunger strike for eight days. Akhtar has been quoted as saying, “Corruption in Pakistan is more than in India… bahut zyada (much more).
Akhtar wants to highlight through his protest is Pakistan’s increasing defense budget. He comments that this was due to “the mindset that the stability of Pakistan is endangered due to India. A group of politicians propagate such mindset. The politicians are answerable … on which front are we in danger?”Apart from all the above issues, Akhtar also wants every district in Pakistan to be provided with infrastructure for education from primary to the intermediate levels with hostels.
Akhtar hopes that his campaign would elicit the same response Anna Hazare received in India. He commented that the Indian government should listen to people’s voices. He said, “Indian public kah rahi hai tho hona chahiye (Indians are asking, so it should happen).” Pakistan ministry and the military are known to have zero tolerance towards protest especially inspired by a Gandhian.
Pakistan media has criticized India Government from not allowing Anna to fast. The media felt that Indian PM image has been sullied by the non cooperation towards Anna’s Lok Pal bill agitation.
Post Tags: Anna Hazare, fast, Pakistani
शिवाय खालील चित्रफितही पहा. एक कायदेपंडित होऊ पहाणारा पाकिस्तानी तरुण विद्यार्थीसुद्धा भूकहडताल करू पहात आहे.
http://www.youtube.com/watch?v=Sd-PSTH-npI
22 Aug 2011 - 9:27 am | ऋषिकेश
समांतर अवांतरः
सरकारच्या लोकपाल विधेयक, २०११ च्या स्थायी समितीने जनतेकडून आपली मते, सुचवण्या, आक्षेप वगैरे नोंदवण्यासाठि १५ दिवसांची मुदत दिली आहे. या समितिला तुमची मते यापत्त्यावर पाठवायची आहेतः
Shri. K. P. Singh
Director, Rajya sabha secretariat,
201, second floor, Parliament house annex,
New Delhi-110001
नियमः
माझ्यामते संसदीय स्थायी समितीला आपली मते कळविणे गरजेचे आहे. स्थायी समिती ही विविध पक्षांच्या खासदारांनी बनलेली असते. या समितीपुढे आपली मते ठेवल्यानंतर समिती मसुद्यात योग्य वाटतील ते बदल घडवून आणु सहते. जर सर्व सुचना, आक्षेप वगैरे वाचुन समितीला मुळ मसुद्याच्या ढाच्यामधेच तृटी आढळल्यास ती मसुदा रद्द (रिजेक्ट) करू शकते. मात्र या सार्यासाठी तुमच्या सुचना समितीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
मी माझ्या सुचना कालच पोस्टाने पाठवल्या आहेत. असे विनंतीवजा आवाहन करतो की ज्यांना लोकपाल विधेयक २०११ मधे तृटी वाटत असतील किंवा जे काहि मत असेल त्यांनी त्यांच्या सुचना/ आक्षेप/सुचवण्या वगैरे समितीला जरूर पाठवून (निदान) आपले कर्तव्य पार पाडावे.
22 Aug 2011 - 1:37 pm | सुधीर काळे
ऋषिकेश-जी,
यांना ई-मेलने सूचना पाठवू शकतो का?
22 Aug 2011 - 3:27 pm | ऋषिकेश
त्यांनी जाहिरातीत केपी सिंग यांचा इमेल अॅड्रेस दिला आहे: kpsingh@sansad.nic.in
मात्र जाहिरातीत इमेलवर सुचना पाठवता येतील की नाहि याचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यापेक्षा तुमची इच्छा असेल तर येथे श्री इरसाल यांनी मदतीचा हात पुढे केला आहे त्यांना काँटॅक्ट करून बघा.
किंवा तुमचे पत्र मलाही १-२ दिवसांत इमेलने पाठवलेत तर मीही ते पोस्ट करू शकतो. त्यानंतर पुण्याहुन ते (मधल्या सुट्ट्या लक्षात घेता) वेळेत पोहोचेल की नाही याची हमी देता येणार नाही.
संपूर्ण जाहिरात इथे पाहता येईलः
22 Aug 2011 - 10:12 pm | विकास
कलम ५ मध्ये इमेल आणि फॅक्स दिले आहेत. ते चालू शकतील असे दिसते.
दुसरीकडील प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, ह्या जाहीरातीत ती कधी जाहीर केली ही तारीख दिसत नाही. पण ३ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे असे वाटते.
(अवांतरः तारखेवरून आठवले. मधे एका अमेरीकेतील सरकारी कार्यालयातील एका वरीष्ठ व्यक्तीला कामानिमित्त फोन केला होता. ती कामाला हजर नसल्याने फोनवर व्हॉईस मेसेज ठेवलेला होता: "अमुक अमुक, हेड ऑफ अमुक, आज आजारी असल्याने कचेरीत आलेली नाही, ती उद्या येईल, वगैरे वगैरे." हाच मेसेज मी चार दिवस ऐकत होतो. ;) )
22 Aug 2011 - 4:19 pm | नितिन थत्ते
आज जन्माष्टमी.... श्रीकृष्णाच्या रूपातील अण्णांना (की अण्णांच्या रूपातील श्रीकृष्णाला?) वाढदिवसाच्या शुभेच्छा.
22 Aug 2011 - 4:21 pm | कुंदन
केक कुठे कापणार ?
मात्र केक संध्याकाळ नंतरच कापा, काय आहे सध्या रमजान चालु आहे ना , उगाच कोणाच्या केक खाण्यावर मर्यादा / बंधन येउ नये.
22 Aug 2011 - 4:45 pm | गणपा
केक आणणारच असाल तर (अनेकांचा)श्रावण* चालु असल्याने असल्याने बिन अंड्याचा केक मागवावा. ;)
*हा शब्द मास्/महिना या संदर्भात घ्यावा. कुण्या आयडीशी घोळ घालु नये.
22 Aug 2011 - 5:12 pm | सुधीर काळे
(जकार्ताच्या "अण्णा हजारे टीम"चे सभासद)
(आमचे बॅनर)
(राजदूताची पोच)
22 Aug 2011 - 5:24 pm | ऋषिकेश
बराच मोठा चमु आहे तुमचा :) त्यांनाही वरील जाहिरातीबद्दल माहिती देऊन अधिक योग्य प्रकारे तुमचे म्हणणे स्थायी समितीपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा करतो
23 Aug 2011 - 11:29 am | सुधीर काळे
नक्कीच आहे, पण राजदूताकडे जायचे म्हणजे अगदीच एकट्या-दुकट्याने जाणे बरे दिसले नसते. मीही जाणार होतो पण नेमकी एक महत्वाची बैठक असल्याने नाइलाज झाला!
मी सर्वांना याबद्दल नक्कीच सांगेन.
आज प्रिया दत्तने सरकारी लोकपाल बिलाची 'नक्कीच कमकुवत' अशी संभावना करून आपल्या पिताजींची (सुनिल दत्त यांची) आठवण करून दिली! शाबास मुली!
मला वाटते कीं मनमोहन सिंग यांनी वेळेवर कृती केली नाहीं तर एक-एक करून काँग्रेसमधून खासदार बाहेर पडू लागतील.
23 Aug 2011 - 4:57 pm | कुंदन
सरकारी लोकपाल बिल कमकुवत आहे हे एव्हाना सगळ्यांनाच कळले आहे , प्रिया दत्तने त्याची संभावना केली म्हणजे फार मोठा तीर मारलेला नाही. संसदेत जेंव्हा ते सादर होईल तेंव्हा ती काय भुमिका घेणार हे महत्वाचे आहे.
बाकी दत्त कुटुंब महान आहे याबद्दल दुमत नाही. ;-)
संजयला तर भारत रत्न च द्यायला हवे.
24 Aug 2011 - 9:17 pm | सुनील
मला वाटते कीं मनमोहन सिंग यांनी वेळेवर कृती केली नाहीं तर एक-एक करून काँग्रेसमधून खासदार बाहेर पडू लागतील.
काँग्रेसऐवजी भाजपलाच गळती लागलेली दिसतेय!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9722037.cms
25 Aug 2011 - 9:17 pm | सुधीर काळे
जे होत आहे ते बरोबरच होत आहे. भाजपाही अद्यापही कुंपणावरच उभा आहे. हळू-हळू सर्व भली-बुरी नेते मंडळी सज्जन माणसामागे येत आहेत असा रंग दिसत आहे! आज तर "सरसे पाँवतक भ्रष्टाचारमे लिपटे हुए" मनीषभैय्यानेही नक्राश्रू ढाळून षट्कार मारला!
28 Aug 2011 - 5:58 pm | सुधीर काळे
अण्णांचे उपोषण चांगल्या तर्हेने संपले. माझ्या मतें अण्णांच्या टीमला जे साधायचे होते त्यातले बहुतेक सारे साध्य झाले, सरकारलाही समजूतदारपणा दाखविल्याचे श्रेय मिळाले. अगदी 'Win-Win' अखेर.
आता पुढे?
सर्वात आधी "तत्वतः" मान्य असलेले विधेयक आता रीतसर मंजूर करवून घ्यावे लागेल. ते काम वाटते तितके सोपे दिसत नाहीं. नक्कीच अडचणी येतील. त्या व्यवस्थितपणे सोडवल्या जातील हे पहाताना अण्णांच्या टीमला अनेक बाजूने खूप परिश्रम करावे लागतील. त्यामुळे "उपोषण संपले नसून स्थगित केले आहे" हे अण्णांचे निवेदन बोलके आहे.
स्वच्छ नेतृत्वाचा शोध, आमदारांना-खासदारांना परत बोलवायचा अधिकार यासारख्य पुढच्या मोहिमाही मला खूप योग्य वाटतात व त्या कशा सुरू होतात व कशा हाताळल्या जातात ते पहाणे मनोरंजक ठरेल. माझ्यासह सार्यांचे लक्ष नक्कीच तिकडे लागलेले आहे.....
अण्णांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या जन-आंदोलनाला शुभेच्छा!