मिथुनदांचा 'जस्टीस चौधरी' - म्हणजेच ओरिजिनल सरकार

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
21 Aug 2011 - 11:22 am

दुर्जनांचे निर्दालन जितक्या सातत्याने मिथुनदा करत आले आहेत तितकं सातत्य पोलिसांना दाखवलं असतं तर आज गुन्हेगार स्वस्त साखर, मनमिळावू बायको आणि कामसू सरकारी कर्मचारी ह्यांचा इतकीच दुर्मीळ गोष्ट झाली असती. पण तसे होणे नाही. त्यामुळे आपल्या चित्रपटांतून, विविध अवतार घेऊन मिथुनदा त्यांच्या भक्तांना अन्याय निर्मुलनाचं मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांच्या सहस्त्रावतारांपैकी एक 'जस्टीस चौधरी' आज पुन्हा पाहिला आणि त्याचे परीक्षण करायचा इच्छा अनावर झाली. अर्थात मिथुनदांच्या कुठल्याही कॄतीचं परीक्षण करायची प्रत्यक्ष मिथुनदांशिवाय दुसर्‍या कुणाचीही लायकी नाही. अपवाद फक्त आद्य दुर्जन निर्दालक सुपरस्टार भगवान रजनीकांत ह्यांचा.

जस्टीस चौधरी सिनेमाची सुरुवात होते एका खुनापासून. एका सद्गुणी माणसाला संपवण्यासाठी काही गुंड पोलिसालाच सुपारी देऊन त्याचा काटा काढतात. त्याची बहीण वेगवेगळ्या पोज मधे खूप रडते. कानून के रखवालेच कानून से खिलवाड करत असल्याने तिला कुणी तरी खरा न्याय मिळवण्यासाठी जस्टीस चौधरी कडे जायचा सल्ला देतो.

मिथुनदांची एंट्री. मिथुनदा डोळ्यांतून अंगार ओकत भगवान शंकराची पूजा करतायत. केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज काढतायत. पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो. मिथुनदा तयार होऊन बाहेर येतात. एक माणूस त्याच्या भावाला वाचवायची विनंती त्यांना करतो. जजशी सेटींग करून त्याच्या भावाला शिक्षा द्यायची दुष्टांची योजना असते. मिथुनदा त्याच्या भावाला अभय देतात. माणूस निघून जातो. मिथुनदांचा सहकारी, छोटन, त्यांना विचारतो की त्याचा भाऊ खरंच निर्दोष आहे का ते चेक करूया का. ह्यावर मिथुनदा त्याला एक युनिव्हर्सल ट्रुथ ऐकवतात "माई के दूध और मजबूर इंसान के आंसुओंमें मिलावट नाही होत है". ऐकणारा धन्य होतो.

पुढे मिथुनदा त्या दुष्ट पोलिस अधिकार्‍याला यमसदनी धाडतात. त्यांच्या हाणामारीच्या दृष्यांच्या वेळी 'टर्मीनेटर' चे पार्श्वसंगीत वाजते हा योगायोग नाही. टर्मीनेटर मधे कोणकोणते गुण असावेत, तो नक्की किती ताकदवान असावा, त्याच्याकडे कोणत्या पॉवर असाव्यात ह्याची कल्पना जेम्स कॅमरूनने मिथुनदांवरूनच घेतली आहे.

तर मिथुनदा आपली अशी अनेक अवतारकार्य पार पाडत असतात. त्यांच्यामुळे बरंच नुकसान सोसावं लागल्याने त्यांचा दुश्मन 'अजगर ठकराल' दुबईहून परत येतो. येऊन मिथुनदांची भेट घेतो. म्हणतो दोस्ती करू, मिळून मिसळून राहू आणि वाटून खाऊ. अर्थातच मिथुनदा त्याला नकार देतात. त्यावर तो क्षुद्र किटक त्यांना म्हणतो 'मेरा नाम है अजगर ठकराल, मै दुश्मन को काटता नही, सीधा निगलता हूं'. त्या अजाण बालकाला मिथुनदांच्या पावरचा अंदाज नसल्याने तो असं बरळतो. त्यावर मिथुनदा त्याला शांतपणे सांगतात 'जस्टीस चौधरी अपने दुश्मनको निगलता नहीं, पालता है, खेलता है'.

अशा कठोर माणसाचा एक हळवा कोपराही असतो. मिथुनदांनी जिच्या पोटी अवतार घेतलेला असतो त्या आईला वाटतं की ते गुन्हेगार आहेत. म्हणून ती त्यांच्याशी एक शब्दही बोलत नसते. मिथुनदांना एक भाऊही असतो, तो मात्र त्यांचा भक्त असतो.

सिनेमाच्या सुरुवातीला ज्या मुलीला मिथुनदांनी मदत केलेली असते तिला ते पुढेही सतत मदत करत राहतात. बेरहम जमाना आणि बस्तीवाले तिला मिथुनदांची रखेल समजून तिच्या चारित्र्यावर शक घेतात. मुलीचं चारीत्र्य म्हणजे एक काच असल्याने तिला असल्या दगडांपासून वाचवण्यासाठी आणि पुन्हा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी मिथुनदा तिथल्या तिथे तिला प्रपोज करतात 'मुझसे शादी करोगी?'. मुलगी पार गोंधळते, काहीच बोलत नाही. तिला कळलं नसावं म्हणून ते पुन्हा विचारतात. ह्या वेळी इंग्रजीत 'विल यु मॅरी मी?'. तिचा होकार बघून मिथुनदा तिच्या भांगेत सिंदुर भरून तिच्याशी लग्न केल्याचं घोषीत करतात. लग्नाच्या निमित्ताने एक बेली डांस सदृश सांस्कृतीक कार्यक्रम पार पडतो.

इथे अजगर ठकरालची पाचावर धारण बसल्याने तो त्याच्याहून मोठा भाई, डोग्रा - उर्फ शक्ती कपूर, ह्याला आवताण धाडतो. ह्या डोग्राला रक्ताचा वास आवडत असल्याने तो येता जाता स्वतःचीच नस कापून रक्ताचा वास घेत असतो. तो येतो त्या दिवशी त्याचा वाढदिवस असल्याने केक आणलेला असतो. तो केक कापणार इतक्यात ठकरालचा एक माणूस मोठ्या आवाजात बडबड करू लागतो. डोग्राला ऊंची आवाज से नफरत असल्याने तो केक वर डोकं आपटून आपटून आणि गळा कापून त्या माणसाला जीव घेतो.

डोग्रा व्यापाराच्या नावा खाली ड्रग्स आणि हत्यारांचे वितरण करायचा प्लॅन बनवत असतो. त्याला टिव्ही वर मुलाखत देताना बघून मिथुनदा टिव्ही फोडतात आणि भुतकाळात जातात. ते फ्लॅशबॅक मधून आपल्याला त्यांचे वडील, आई, भाऊ, बहीण आणि ओरिजिनल बायको ह्यांचे दर्शन घडवतात. एकच खटकतं ते म्हणजे त्यांच्या बायकोचा एक डायलॉग - 'दिनभर तो आप अदालत में रेहते हैं, और घर आने पर टिव्ही लगाके बैठ जाते हैं' अशी मर्त्य मानवांबद्दल करायची तक्रार मिथुनदांची बायको त्यांच्या बद्दल करते. मूर्ख, अजाण बाई.

त्यावेळी मिथुनदा खरोखरच न्यायालयात जस्टीस असतात. न्यायनिष्ठूर मिथूनदा डोग्राच्या भावाला त्याच्या गुन्ह्यांसाठी सजा ए मौत सुनावतात. बदला म्हणून डोग्रा त्यांची बायको, बहीण आणि वडिलांची हत्या करतो त्यांच्या डोळ्यादेखत करतो. घरासमोरच्या लॉनवरच तिघांच्या चिता पेटवण्यात येतात. मिथुनदांच्या भावाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहत असतात. पण त्याचा चेहरा पाहून हे कळत नाही की डोळ्यात पाणी दु:खामुळे आलंय की चितेच्या धूरामुळे.

सुडाने पेटून मिथुनदा आता डोग्राची माणसं मारू लागतात. तेव्हा त्यांना जहांगीर नावारा एक डॉन भेटतो आणि इथूनच मिथुनदांचा न्यायाधीश ते समांतर सरकार असा प्रवास सुरू होतो.

बॅक टू वर्तमान. मिथुनदा डोग्राला भेटून आधी त्याच्या दोन भावांना आणि मग त्याला मारणार असल्याचं सांगतात. त्यानुसार ते एका भावाला मारतात. डोग्रा त्यांची सुपारी एक शार्प शूटरला देतो, जो मिथुनदांवर गोळी झाडतो. मिथुनदा त्याच्या मेल्याचं नाटक करतात. मिथुनदा मरत नाहीत त्यांना लागून गोळीच मरते. आता ते डोग्राच्या दुसर्‍या भावाला मारतात.

इथे डोग्राची माणसं मिथुनदांच्या भावाला जखमी करून त्याच्या प्रेयसीला पळवून नेतातत. अजगरचा भाउ तिच्याशी पाट मांडणार इतक्यात मिथुनदा तिथे पोचतात. आपल्या अक्षय बंदुकीने दुष्टांना नाश करतात आणि डोग्राला पकडून भाऊ ऍडमीट असलेल्या हॉस्पिटल मधे पोचतात. इथे ते त्यांची आई, बायको आणि भावाची प्रेयसी ह्यांना सांगतात की मी गुंड झालो कारण डोग्रापर्यंत पोचायचा तो एकच मार्ग होता. आता त्याला मारून ते स्वतःला कानूनच्या हवाले करणार असतात.

शेवटी ते डोग्राला गोळी घालतात आणि आईच्या हातात पिस्तुल देऊन आपण गुन्हेगारी सोडल्याचं घोषीत करतात. सिनेमा संपतो.

सिनेमाभर आपल्याला मिथुनदांच्या अनेक लीला पहायला मिळतात. सिनेमा संपला तरी मिथुनदांचे काही मौलीक विचार मोती मात्र मनात घर करून राहतातः
१. माई के हाथ का खाना हर बेटे को नसीब नहीं होता.
२. जस्टीस चौधरी सिर्फ एक ही बार माफ करता है, दुसरी बार माफी नहीं मौत मिलेगी.
३. आग और बारूद एक दुसरे से हाथ मिला ही नहीं सकते.
४. मेरे सामने तेरी औकात इतनी भी नहीं के मै तुझे अपना दुश्मन समझुं.
५. मै जिसे रेकमेंड करता हुं उसे इंटरव्ह्यु देने की जरूरत नहीं पडती.
६. जस्टीस चौधरी जुर्म के भयानक जंगल का शेर है. और जो एक बार शेर की पनाह में आ जाता है, भेडिये उसकी तरफ आंख उठाकर भी नहीं देखतें.

माणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे दर्शवणारी, अन्यायाविरुद्ध लढायची प्रेरणा देणारी, मनोरंजन करणारी, राग लोभ माया मत्सर काम क्रोध ह्यांचा उत्कट आविष्कार असणारी कलाकॄती म्हणजे जस्टीस चौधरी. आपण नक्की बघा आणि अभिप्राय कळवा. सिडी नाही मिळाली तर पूर्ण सिनेमा आंतरजालावर उपलब्ध आहेच. लवकरच भेटू मिथुनदांच्या अजून एका अवताराची माहिती घेऊन.

आपला,
(मिथुनभक्त) आदि जोशी

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

जाई.'s picture

21 Aug 2011 - 11:28 am | जाई.

सिनेमा पाहायला हवा आता.

सोत्रि's picture

21 Aug 2011 - 11:42 am | सोत्रि

आदि,

मजा आली. मालिका काढा मिठुन्दाच्या चित्रपटांची.
मिठुन्दाचे सर्व चित्रपट भक्तीभावाने पाहिले आहेत. मिठुन्दा माझे एकेकाळी दैवत होते. :)

इलाका नावाच्या एका चित्रपटात एक मस्त डायलॉग होता माझ्या आवडीचा 'तेरे नाम का कुत्ता पालु...' आठवीत असताना शाळॆत तो माझ्यामुळे फेमस झालेला ही मस्त आठवण जागी झाली ह्या निमित्ताने.

मस्त, पुढच्या चित्रपटाच्या परिक्षणाच्या प्रतिक्षेत.

- (परम मिथुनभक्त) सोकजी

आत्ताच मिथुनचे इतरही काही चित्रपट पाहिले.
मस्त परिक्षणाबद्दल थ्यांकु.

नमस्कार.
आपल्या सारख्या मिथुनभक्तांनी त्याचा all time great "गुंडा" बघितला नसावा हे शक्य वाटत नाही.
त्याबद्दल आपण चार्-दोन ओळी लिहिल्यात तरी पुरे.
निदान त्या चित्रपटाचे काही संवाद जशाला तशे छापले तरी उत्कृष्ट लेखमाला होइलच.
तरीही आपण बघितला नसल्यास ही लिंक देतोय.:- http://www.youtube.com/watch?v=kHto0h3WmwY.

पहिली१०-१२ मिनिटेतरी बघाच. प्रचंड content आणि material मिळेल. एका लयीत असणारे संवाद जणु एखाद्या काव्यमय संगितिकेची आठवण करुन देतात. आख्ख्या चित्रपटात एक गेयता आहे. ऑर्कुटवर सचिन तेंडुलकर पेक्षा ह्याचे फ्यान एकेकाळी दुप्पट झाले होते. सहसा टेपिकल हॉस्टेलवर आणि कट्ट्यावर जमणार्‍या मंडळींपैकी हा पिक्चर पाहिला नाही असा माणुस मिळणे विरळाच. बघितला असल्यास लेख टाकाच. नसल्यास बघाच.
There are only two types of people :-
One who have seen Gunda, and rest who shall see it.

गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा.. गुंडा" बद्दल लिहा..

अतिशय सुंदर चित्रपटाचंतितकंच सुंदर परिक्षण. "अक्षय बंदूक", "बेली डान्स सद्रुश्य सांस्क्रुतिक कार्यक्रम", " केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज", .... मजा आली वाचताना.
याच पठडीतील इतरपरबोधनपर चित्रपट रेकमेंड करतोय. अवश्य पहा.

* तेहेलका (तांत्रिकद्रुष्ट्या अतिशय अद्ययावत, उच्च निर्मितीमूल्ये असलेला सर्वांगसुंदर देशभक्तीपर चित्रपट.)
* ऐलान-ए-जंग (ठाकुर अर्जुन सिंग अर्थात धरम पापाजींची तूफान अ‍ॅक्शन.)
* मॅडम एक्स (हृदय पिळवटून टाकणारी पटकथा. रेखाचा अभिनय तर थेट ऑस्कर दर्जाचा.)
* फरिश्ते ( हीथ लेजर का कोण तो, त्यानी धडे घ्यावेत असा अमरापुरकरांनी रंगवलेला खलनायक. धर्मेंद्र आणी विनोद खन्ना यांची जुगलबंदी. रजनीकांत ला मात्र वाया घालवलाय.)
* सुरक्षा (असले बाँडपट आजही हॉलीवूडमध्ये बनत नाहीत. शाहरुख च्या जी-१ च्या २ दशकं आधी जी-९ चे पात्र रंगवून आपण त्य तुच्छ शाहरुखपेक्षा ८ पावलं पुढे असल्याचं दाखवून दिलंय.)

टीपः ( कांती शाह ची अजरामर कलाक्रुती "गुंडा", व "लोहा" सर्वांनी पाहिलाच असेल असे ग्रुहीत धरून ही नावं वर टाकली नाहियेत.)

इंटरनेटस्नेही's picture

21 Aug 2011 - 12:20 pm | इंटरनेटस्नेही

मिथुनदांचा 'जस्टीस चौधरी' - म्हणजेच ओरिजिनल सरकार

लेखकाला या प्रतिसादाद्वारे नोटिस बजावण्यात येत आहे की त्यांनी त्वरित ओरिजिनल हा अशुद्ध शब्द बदलुन तिथे ओरिगिनल असा सुयोग्य बदल करावा. ;)

=)) =))

-
ओरोगिनल पाठलाग.

आदिजोशी's picture

21 Aug 2011 - 12:50 pm | आदिजोशी

मिथुनदांचे अनेक चित्रपट अनेकदा पहायचं भाग्य लाभलेला मी एक भाग्यवान माणूस आहे. लेखाच्या शेवटी लिहिल्याप्रमाणे लवकरच त्याच्या अजून काही चित्रपटांची परिक्षणं मी टाकणार आहे.

ह्या मालिकेचा शेवट अर्थातच गुंडा ने होईल. आय एम किपींग द बेस्ट फॉर लास्ट.

श्रीरंग's picture

21 Aug 2011 - 2:31 pm | श्रीरंग

ज्जे ब्बात!!

सहज's picture

21 Aug 2011 - 1:28 pm | सहज

मिठून्दा = ओरिगिनल जनलोकपाल!!

मेणबत्ती ओवळल्या गेली आहे!

स्पा's picture

21 Aug 2011 - 1:40 pm | स्पा

मेणबत्ती ओवळल्या गेली आहे!

चुकून मेणबत्ती आवळल्या गेली आहे असे वाचले :D

बाकी परीक्षण...
हा हा हा

आदी भाऊ. मान गये.
एक एक वाक्य वाचून फुटत होतो. धमाल आली...
" गुंडा" नामक अतिभयंकर शिनेमा पाहून आमचा ग्रुप एक आठवडा कोमात गेल्याचे स्मर्तेय :D

रमताराम's picture

21 Aug 2011 - 11:32 pm | रमताराम

मिठून्दा = ओरिगिनल जनलोकपाल!!
आमी म्हंतोच सहजराव लै डाम्बिस मानूस. यका फटक्यात दोन-चारांची उतरुन ठिवत्यात. आता हा परतिसाद म्हजी कोनाला टोमना हाय समजायचं, मिटूनजा... आपलं ह्ये मिठूनदा, का अन्नास्नी का येऊ घातल्याल्या लोकपालास्नी. जल्ला लै क्रिप्टिक बोलू र्‍हायलेन.
आवांतरः आन्लय चिक्कू मानूस बी. मेनबत्तीच्या परीस उदबत्तीवर भागवल्यान्, ती बी देवळात्न आणल्यान् का काय ठावं.

सहज's picture

22 Aug 2011 - 6:08 am | सहज

तुमच्या संगे करार करायची वेळ झाली आहे.

"आ.का.ठ? तु.मा.खो.का. ना. आ. मी तु. खो. का. ना." करार हो.

श्रावण मोडक's picture

22 Aug 2011 - 9:43 am | श्रावण मोडक

या भेटीचा एक साक्षीदार होऊ इच्छितो. दोघांही ज्येष्ठ-श्रेष्ठांनी परवानगी द्यावी ही नम्र विनंती. ;)
न दिल्यास माहितीच्या अधिकाराखाली या भेटीचे इतिवृत्त मागवावे लागेल, याची नोंद घ्यावी. ;)

कानडाऊ योगेशु's picture

21 Aug 2011 - 1:30 pm | कानडाऊ योगेशु

खतरा परिक्षण लिहिले आहे आदिसाहेब.
मध्ये मध्ये लिहिलेले डायलॉग वाचताना दस्तुरखुद्द मिथुनदाच कर्णपिशाच्चाप्रमाणे माझ्या कानात डाय्लॉग्ग ओतताहेत असा भास झाला.!
अगदी डॉल्बी स्टीरिओफोनिक परिक्षाण.

(मिथुन्चे चित्रपट पाहुन धन्य झालेला) योगेश

आत्मशून्य's picture

21 Aug 2011 - 2:25 pm | आत्मशून्य

आजच बघितल्या जाइल.

केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज काढतायत.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =))=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =))=)) =)) =)) =)) =)) =))

आद्या.. आद्या लेका.. कुठं असतोस तु मर्दा.. अरे असे छप्परफाडू लेख लिहीत जा राव..
अख्खा लेख वाचत असताना हसत होतो नुसता.. मिथूनदा खरंच महनीय माणूस आहे !

अर्धवट's picture

21 Aug 2011 - 2:42 pm | अर्धवट

लै भारी रे..

स्वाती दिनेश's picture

21 Aug 2011 - 3:56 pm | स्वाती दिनेश

फूल टू फटाक!
क्या बात,क्या बात, क्या बात!
स्वाती

कच्ची कैरी's picture

21 Aug 2011 - 4:33 pm | कच्ची कैरी

तस मी मिथुनदांचे चित्रपट सहसा पाहत नाही पण आता पहावे लागतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2011 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लय भारी........! :)

-दिलीप बिरुटे

मिसळपाव's picture

21 Aug 2011 - 5:45 pm | मिसळपाव

आदिजोशी ने लिहिलेलं हे सुंदर परिक्षण वाचता आलं असतं का?

-.......मिथुनदा डोळ्यांतून अंगार ओकत भगवान शंकराची पूजा करतायत. केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज काढतायत. पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो.

- ........लग्नाच्या निमित्ताने एक बेली डांस सदृश सांस्कृतीक कार्यक्रम पार पडतो.

हे झकासच :-))))

पैसा's picture

21 Aug 2011 - 6:39 pm | पैसा

मिथुनदा म्हणजे आमचा जीव की प्राण. त्याचे "घर एक मंदिर', 'डान्स डान्स' इ. पिक्चर कॉलेजात असताना पाहिले होते. भारतीय सिनेमातला हा ओरिगिनल "टॉल डार्क अ‍ॅण्ड हॅण्डसम' हीरो. या लेखामुळे त्याच्या आठवणी जाग्या झाल्या! आणखी लेख लवकर लवकर येऊ द्या.

लगे हाथ नंतर जीतु आणि श्रीदेवीच्या पिक्चरांची पण अशीच खतरनाक परीक्षणं येऊ द्यात!

शुचि's picture

21 Aug 2011 - 8:17 pm | शुचि

>> पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो.>>
हाहा

नितिन थत्ते's picture

21 Aug 2011 - 8:39 pm | नितिन थत्ते

कसम पैदा करनेवालेली, तकदीर का बादशाह आणि उन्नीस बीस हे चित्रपट पाहिलेले कोणी आहेत का जिवंत?
(मी आहे अजून). :)

>> हे चित्रपट पाहिलेले कोणी आहेत का जिवंत? >>

=)) =)) =))
पोटावर लॅपटॉप घेऊन लोळत मिपा वाचत होते इतकी हसायला लागले हो लॅपटॉप गदागदा हलायला लागला =)) =))

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 6:44 pm | प्रियाली

कसम पैदा करनेवालेली, तकदीर का बादशाह आणि उन्नीस बीस हे चित्रपट पाहिलेले कोणी आहेत का जिवंत?

हेहेहे

मी आहे अजून

हे वाचून मात्र खपले! ;)

वरचं परीक्षण झक्कास असून संपूर्ण वाचवलं नाही. आदि जोशींची क्षमा मागते. त्यांचं मिथुनप्रेम, असे चित्रपट अख्खे पाहणे आणि वर इतके लाजवाब परीक्षण लिहिणे याबद्दल जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

रेवती's picture

21 Aug 2011 - 8:50 pm | रेवती

पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो
मस्तच!
सगळे लेखन आवडले.
दुश्मनांची नावं अजगर, रॉकी, रॉक्सी अश्या टाइपच असतात.
अजगर हे नाव कोणत्या मातेनं (किंवा आत्यानं) निवडलं असतं बरं!;)
बारसं झाल्यावर पाळण्यातल्या बाळाचं नाव अजगर ठेवलय असं सांगताना काय वाटेल?;)

खेडूत's picture

21 Aug 2011 - 9:06 pm | खेडूत

| अजगर हे नाव कोणत्या मातेनं (किंवा आत्यानं) निवडलं असतं बरं!

तो असगर चा अपभ्रंश असावा असे वाटते.

रमताराम's picture

21 Aug 2011 - 11:36 pm | रमताराम

किंवा 'अजागळ' चा. इंग्रजीत स्पेलिंग करताता ळ अथवा ड अंत्यवर्ण असलेल्या शब्दांचा 'र' होतो म्हणे.

मस्त कलंदर's picture

22 Aug 2011 - 12:01 am | मस्त कलंदर

एक 'जस्टीस चौधरी' जीतूअंकलचाही होता. आता फारसं आठवत नसलं तरी तोही असाच एंटरटेनिंग होता हे नमूद करू इच्छिते.

मी पण जिटुभायचा 'जस्टीस चौधरी' पाहिला होता... त्यामुळे बराच वेळ डोकं खाजवत होतो की यात मिठूणडा कुठुन आला बरं?

सेम हिअर!

जितुंद्र (हे आमच्या आईनं त्याला बहाल केलेलं एक नाव आहे) चा हा चित्रपट थेटरात जाऊन पाहिला होता... श्रीदेवी आणि जितुंद्रचे कित्ती छान छान डॅन्स होते त्यात.. 'मामा मिया पाँप पाँप' ... अगदी स्वर्गीय स्वर्गीय म्हणतात तसलं संगीत होतं!

राजेश घासकडवी's picture

22 Aug 2011 - 5:47 am | राजेश घासकडवी

...त्याची बहीण वेगवेगळ्या पोज मधे खूप रडते.
...केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज काढतायत.
...पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो.
...तो केक वर डोकं आपटून आपटून आणि गळा कापून त्या माणसाला जीव घेतो.
...आपल्या अक्षय बंदुकीने दुष्टांना नाश करतात

अशा वाक्यांनी बहार आली. एखादा मिपाकट्टा असला काहीतरी भन्नाट पिक्चर बघत साजरा व्हावा अशी आयडिया सुचली.

अजून येऊ द्यात..

५० फक्त's picture

22 Aug 2011 - 7:36 am | ५० फक्त

''एखादा मिपाकट्टा असला काहीतरी भन्नाट पिक्चर बघत साजरा व्हावा अशी आयडिया सुचली''

आपल्या सुचनेवर काम चालु आहे, काही तांत्रिक बाबी उरल्या आहेत त्या झाल्या की लगेच अनाउन्स करत आहोत.

चतुरंग's picture

22 Aug 2011 - 7:02 pm | चतुरंग

हा हा हा! खल्लास परीक्षण रे अ‍ॅड्या!! ;)
वर उल्लेखलेली वाक्ये वाचून हसून वेडा झालो.

मला वाटते बॉलीवुडमधे कराटे (अमेरिकन उच्चर खराऽऽटि) आधारित मारामारी आणण्याचे श्रेय मिठुन्दांना जाते.

(मिठुन्कराटेप्रेमी) रंग ली

कुळाचा_दीप's picture

22 Aug 2011 - 6:42 am | कुळाचा_दीप

गुंडा सारखी अजरामर कलाकृती आता बॉलीवुड मध्ये होणे शक्य नाही...

मालक ...एक नंबर

नंदन's picture

22 Aug 2011 - 7:16 am | नंदन

धम्माल परीक्षण!

छोटा डॉन's picture

22 Aug 2011 - 9:50 am | छोटा डॉन

अ‍ॅड्या, एकदम कड्डक्क परिक्षण रे भौ.
वाचताना फुल्टु मज्जा आली. फुडचा लेख पटापट लिही.

- छोटा डॉन

असुर's picture

22 Aug 2011 - 10:24 am | असुर

आदिभौ,
कल्ला परिक्षण!! आणि तुमच्या हिमतीची दाद दिली पाहीजे. डायरेक मिथूनदा?? ज्जे बात!!! आताशा पट्टकन एक मेडीक्लेम काढून घ्या, किंवा हृदयाला बुस्टर लावून घ्या... ;-)

आम्ही शाळेत असताना लोकांना मिथूनदांचे चित्रपट पाहण्यास लायसन्स द्यायचो. म्हणजे प्रत्येकाची मानसिक सहनशक्ती किती आहे आणि हार्ट अ‍ॅटॅक आल्यास दवादारुच्या खर्चाची ऐपत आहे काय याचा सर्वांगीण विचार करुन मगच लायसन्स इश्यू व्हायचे. कारण मिथूनदांचे चित्रपट पाहणे हे कुणा येर्‍यागबाळ्याचे कामच नाय ना बाप्पा! तिते ष्ट्रांग मानूशच पायजे.

-- ('अक्षय बंदूक' फ्यान) असुर

फारएन्ड's picture

22 Aug 2011 - 10:33 am | फारएन्ड

मजा आली वाचायला. वरती राजेश घासकडवी यांनी निवडलेली वाक्ये मलाही आवडली. एकूणच खूप धमाल जमले आहे :)

आता पुढच्या मिथुनपटांवरच्या लेखांची वाट पाहतोय :)

लोहा आणि गुंडा बास्स !!!

धमाल मुलगा's picture

22 Aug 2011 - 6:17 pm | धमाल मुलगा

मिथुनदाचं आख्ख्या उटीमधलं वर्ल्डफेमस डायलॉग न दिल्याबद्दल निषेध!

तिरकं उभं रहात, डावा खांदा उचलून, उजवा खांदा पाडून हात एकदम लुळा सोडून, "अबे ओ...भिगी हुई सिग्रेट कभी जल नहीं सकती, और मैने तय की हुई तेरी मौत कभी टल नहीं सकती" सारखा सुप्परडुप्पर हिट्ट डायलॉग नाय दिला? :D

बाकी मिथूनदास्तुती सवडीनं :)

मूळ संवाद : "भीगी हुई सिग्रेट कभी जलेगी नही.....और ये तय है, तेरे मौतकी तारीक अब टलेगी नही."

सदर डायलॉग "गुंडा" मध्ये असल्यामुळे या परिक्षणात आला नसावा.

धमाल मुलगा's picture

22 Aug 2011 - 9:21 pm | धमाल मुलगा

मंडळ मनापासून दिलगीर आहे.
बर्‍याच काळानंतर हा डायलॉग कसाबसा आठवल्यामुळं त्यात घोडचुका झाल्या असाव्यात.
ह्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून आम्ही आता सलग ७ दिवस 'चीता'हा सिनेमा पहायची शिक्षा स्वतःला फर्मावत आहोत. ;)

सलग ७ दिवस 'चीता'हा सिनेमा पहायची शिक्षा स्वतःला
नको नको!
इतका काही वाईट नाहीस तू!;)

धमाल मुलगा's picture

22 Aug 2011 - 10:01 pm | धमाल मुलगा

आपलेपणा दाखवल्याबद्दल मनापासून आभारी आहे. नाहीतर हल्ली कोण कुणासाठी करतो एव्हढं?

आदिजोशी's picture

22 Aug 2011 - 9:41 pm | आदिजोशी

मेल्या चिता पाहणं ही शिक्षा कशी असू शकतेस? असं म्हणून तू लोकांना फसवू शकशील, आम्हाला नाही. तुला वर्षभर मिथुनचे सिनेमे न पाहण्याची शिक्षा देण्यात येत आहे. ही खरी शिक्षा.

धमाल मुलगा's picture

22 Aug 2011 - 10:00 pm | धमाल मुलगा

>>तुला वर्षभर मिथुनचे सिनेमे न पाहण्याची शिक्षा देण्यात येत आहे. ही खरी शिक्षा.

कह दो के यह झूठ है...झूऽऽठ है...झूऽऽऽठ हैऽऽऽ....................
ठाकूरसाब, रहम करो। एक छोटीसी गलती की इतनी बडी सजा मत दो. चाहो तो मै ये मेरा जानवं सामने वाली चिता मे (चिता=लाकडं फिकडं रचून पेटवलेली शेकोटी. प्राणी नव्हे.) फेकून देता हूं।

प्रभो's picture

22 Aug 2011 - 10:08 pm | प्रभो

त्यापेक्षा यमराज पहा बे...मिथुनदा सोबत जॅकी पण आहे. :)

धमाल मुलगा's picture

22 Aug 2011 - 10:41 pm | धमाल मुलगा

तसं म्हणलं तर :
दलाल,
जल्लाद,
तडीपार,
रावणराज
यमराज,
आग ही आग.....

बक्कळ आहेत की. ;)

या शिनेमांच्या वाटेला मी कधीही न गेल्याचं दु:ख नाही झाले तरच नवल!
त्यावेळी माझा बहुमुल्य वेळ कुठं बरं वाया घालवला?
मिथून साहेब तसेच ज्याकी यांचे सरस अभिनय पहायलाच हवेत.
मिथूनची फ्यान,
इथून
तर ज्याकीची फ्यान,
तिथून

मृत्युन्जय's picture

23 Aug 2011 - 5:55 pm | मृत्युन्जय

सर्व चित्रपट पाहुन जिवंत राहिलेला

इथुन तिथुन कुथुन कुथुन मिथुन (भक्त)

प्रभो's picture

22 Aug 2011 - 6:56 pm | प्रभो

कडक......

मिथुनचा फ्यान - प्रभो

प्रीत-मोहर's picture

23 Aug 2011 - 9:37 am | प्रीत-मोहर

मस्त परिक्षण आदि :)

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Aug 2011 - 1:33 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

दिपक's picture

23 Aug 2011 - 4:49 pm | दिपक

केवळ घंटा हलवून त्यातून डमरू, तबला, झांजा, ड्रम, घंटा इत्यादी अनेक वाद्यांचे आवाज काढतायत. पूजा संपते, देव सुटकेचा निश्वास टाकतो.

घरासमोरच्या लॉनवरच तिघांच्या चिता पेटवण्यात येतात.

=)) =))

___/\___

मिथुनभक्त

बापरे....
आपली जवानी दासबोध वाचण्यात आणि जंगलात फिरण्यात घालवण्याच्या पापाचं प्रयश्चित्त आता मिथुन्दादांचे सिनेमे बघुनच घेतलं पाहिजे ....

मृत्युन्जय's picture

22 Mar 2016 - 3:01 pm | मृत्युन्जय

चित्रपट चिरफाड कशी करावी याचा धडा म्हणुन फारएण्ड काकांचे फरिश्तेचे परीक्षण किंवा हे परीक्षण वाचावे. फरिश्ते चा धागा काही दिवसांपुर्वीच वर येउन गेला. म्हणुन मग आता हे काढतो आहे. एक एक करत सगळे महान परिक्षणे काढतो वरती.

'...गोळीच मरते' हे खल्लास वाक्य आहे!

गुंडा म्हणजे काशी आणि जस्टीस चौधरी म्हणजे बद्रीकेदार. जल्लाद म्हणजे प्रयागतीर्थ आणि चीता म्हणजे वृंदावन.
जाणकारांनी अजून अॅडवावेत!

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2016 - 6:24 pm | टवाळ कार्टा

खिक्क....पण गुंडाला जमिनीवर नका आणू...गुंडा = स्वर्ग = अंतिम सत्य =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Mar 2016 - 6:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दुर्जनांचे निर्दालन जितक्या सातत्याने मिथुनदा करत आले आहेत तितकं सातत्य पोलिसांना दाखवलं असतं तर आज गुन्हेगार स्वस्त साखर, मनमिळावू बायको आणि कामसू सरकारी कर्मचारी ह्यांचा इतकीच दुर्मीळ गोष्ट झाली असती.

_/\_

सायकल मागे लपून गोळीबार झेलनारे महान मिथुन दादा यांना नमन.

सायकल मागे लपून गोळीबार झेलनारे महान मिथुन दादा यांना नमन.