खालील कविता माझी नाहीं पण प्रत्येकाने वाचावी अशी आहे. मिपाच्या कायद्यात बसत नाहीं. म्हणून संपादकांना असे करणे रुचले नाहीं तर अवश्य उडवावी!
सुधीर काळे
सुनीला गोंधळेकर यांची ही अप्रतिम कविता प्रत्येकाने वाचायलाच हवी!
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय?
यांना तुरुंगात घालायचं नाय, यांना बाहेर ठेवायचं नाय
यांना बोलू द्यायचं नाय, मग गप्प करायचं काय?
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II१II
जमली अवघड प्रश्नांची साय, खाली उकळत दुध हाय
तोंड भाजून घ्यायचं का काय, जीभ दातात अडकली हाय
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II2II
टी. व्ही. सारखाच वरडत हाय, कापडं अंगावर ठेवली न्हाय
माझा अडला ह्यो गाढव आता, हरीचे धरतोया पाय
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II३II
उपवास यांना करायचा हाय, पाणी आमच्या तोंडचं जाय
अन्न गोड लागना माय, घास घशात अडकून रहाय
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II4II
पब्लिक त्याच्याच माग माग जाय, त्याला अडवाव कसा नि काय ?
बाहेर जायला दारच न्हाय, पब्लिक हसून म्हणतंय बाय
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II5II
-सुनीला गोंधळेकर
प्रतिक्रिया
18 Aug 2011 - 3:13 pm | चिंतामणी
:bigsmile:
18 Aug 2011 - 3:25 pm | अर्धवट
:)
18 Aug 2011 - 3:47 pm | नितिन थत्ते
रीडिफवरील लाइव्ह अपडेट
15:26 PM On Twitter: Dear Anna supporters - Gandhi would have cleaned the Ram Lila Grounds himself ... and that is the difference ... thank you
18 Aug 2011 - 4:15 pm | मराठी_माणूस
ह्या लाइव्ह अपडेट चा कवितेशी काय संबंध ?
18 Aug 2011 - 4:19 pm | नितिन थत्ते
संबंध असायलाच हवा का?
18 Aug 2011 - 6:47 pm | यकु
श्रीयुत थत्ते,
गांधी जाऊन ६३ वर्षे उलटल्यानंतरही गांधीवाद्यांनी देशातील कचरापट्टीच स्वच्छ करावी, तरच ते गांधीवादी असं काही आहे का?
इव्होल्यूशन कायसं म्हणतात ते काही आहे की नाही?
आता थोड्या वेगळ्या रुपातील घाण स्वच्छ करणं सुरु आहे, एवढंच.
18 Aug 2011 - 8:26 pm | सौप्र
याची काय गरज होती.. उगीचच काहीतरी
19 Aug 2011 - 3:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे
समजून घ्या हो. त्यांचा पाय पण फाटक्यात अडकला आहे ना ;-)
19 Aug 2011 - 5:43 pm | आत्मशून्य
अण्णा को याद करो, अभि के अभि.
अण्णा को जेल से निकालो अभि के अभि.
अण्णा के साथ कूछ भि होगा तो देश का इगो हर्ट होगा.
आली रे आली आता सरकारची पाळी आली. आता लोकांची सटकली रे.........
20 Aug 2011 - 8:36 am | अप्पा जोगळेकर
हीच बाब काँग्रेस परिवारातल्या प्रत्येकालासुद्धा लागू होते. कारण आम्ही गांधीजींना मानतो असे काँग्रेस परिवार नेहमीच म्हणत असतो. गांधी जयंतीच्या वेळी फोटोला हारतुरे घालण्यासाठी सोनिया किंवा मनमोहन सिंग येतात तेंव्हा समारंभाआधी ते लोक समारंभस्थळ स्वहस्ते स्वच्छ करतात काय ?
22 Aug 2011 - 7:26 am | सुधीर काळे
माझ्या कॉलेजच्या दिवसातल्या एका लोकप्रिय गाण्याची आठवण झाली (चित्रपट: ससुराल)
"इक सवाल मैं करूँ, एक सवाल तुम करो
हर सवालका सवालही जवाब हो!"
जय हो!
18 Aug 2011 - 4:48 pm | सुधीर काळे
This cartoon from "New Yorker" magazine says it better!
19 Aug 2011 - 11:01 am | इरसाल
कधी कधी ब्रम्हानंदी टाळी लागलेली असताना "हे" लोक नक्की विचार करत असतील कि, गांधीजी जन्माला नसते आले तर बरे झाले असते.त्यांनी इंग्रजांविरुद्ध वापरलेले शस्त्र कधीकाळी ह्यांच्याच विरोधात कोणी वापरेल असे वाटले नसेल.
दिवा विझता विझता मोठा होतो असे म्हणतात, हेच कारण कि काय म्हणून सत्तेपासून दूर जाता जाता मोठे मोठे खड्डे पाडून जातायेत.
19 Aug 2011 - 4:56 pm | अमोल केळकर
भ्रष्ट नेते, सुस्त सरकार !
नित्य घोटाळे चव्हाट्यावर !
इतिहास नवा रचू आता !
रामलिलेच्या मैदानावर !!
अमोल केळकर
19 Aug 2011 - 11:16 pm | इरसाल
कुणाच्या धोतराला हात घातला गेला असल्यास (आणि सुटल्यास) स्वतःच बांधून घ्यावे
ह्यांची बरीच फाटलेली हाय , ह्या ******चा करावा काय
बोलायला ऱ्हायला नाकच नाय, ह्या ******चा करावा काय
तीन इडीयेटांची चव चव काय, ह्या ****** चा करावा काय
लोकांचा संताप वाढत जाय, ह्या ******चा करावा काय
आण्णा देताय पोटावर पाय, ह्या ******चा करावा काय
मिपावर वतन दिलेला हाय, ह्या ******चा करावा काय
ह्या ******चा करावा काय , कॉंग्रेसद्वेष्टे आले काय ?