साडीखरेदीला येताय नं?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
18 Jul 2011 - 9:44 am

कालच मी साडी खरेदीसाठी गेले होते. आताशा पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात कपडे, साड्या, चपला, कुकर आदींवर फ्लॅट डिस्कांउंट सेल निरनिराळ्या दुकांनात चालू होतात. कधी ५० टक्यांपर्यंत तर कधीकधी काही ठिकाणी पुर्ण ५०% डिस्कांउंट सेल लागतात. रस्त्याने जातांना मला तसल्या दुकानांवरील पाट्या पाहून ड्रायव्हरला 'गाडी तेथल्यातेथे उभी कर', असे सांगावे लागते. नाहीतरी आमच्या ह्यांना माझे 'सेल खरेदीचे' वेड माहीतच आहे. नविनच लग्न झाले त्यावेळी सुरूवातीला ते माझ्या बरोबर खरेदीला येत. पण नंतर नंतर त्यांचे माझ्याबरोबर येणे कमी झाले अन आमच्या भिशी क्लबातल्या एखाद्या मेंबरचे येणे माझ्याबरोबर वाढले. कधीकधी मीही आमच्या क्लबाच्या मैत्रीणींबरोबर उगाचच खरेदीला जाते. मला खरेदी करायची नसते पण त्यांच्याबरोबर असतांना एखादी साडी, एखादा ड्रेसमटेरीयल, एखादी कुकींग रेंज, बोनचायना सेट, एखादी चप्पल, एखादे बेडशीट आवडून जाते अन मग हात मागे घेववत. नाही. आता आपल्याला आवडलेली वस्तू खरेदी केली तर त्यात काय वावगं आहे का? घरचे मात्र कधीकधी उगाचच 'हे का आणलंस, ते का आणलंस' असं करत बसतात. मला बाई असलं काही बोललेलं आवडत नाही. मग राग घालवण्यासाठी पुन्हा एखाद्या साडीखरेदीसाठी मी बाहेर पडते.

आजकाला बाजारात कितीतरी नवनविन साड्या आल्यात नाही? बाई बाई बाई! माझे तर डोळेच आ वासतात असल्या साड्या पाहून! अहो तुम्हाला सांगते प्युअर जॉर्जेट, प्युअर शिफॉन, प्युअर क्रेप, प्युअर सिल्क, फ्लॉ जॉर्जेट, फ्लॉ शिफॉन, फ्लॉ क्रेप, फ्लॉ सिल्क, आर्ट सिल्क असले काय काय प्रकार पाहून मला आनंदाचे भरते येते. काय घेवू अन काय नको असे होवून जाते. त्यात पुन्हा कॉटन, ज्यूट, ब्रासो, सॅटीन, ब्रोकेड, टसर, लायका, शिमर, विस्कस सिल्क कॉटन, खादी, वेल्हेट, लिनेने आदी प्रकार तर आहेतच. आणि तुम्हाला म्हणून सांगते कुणाला सांगू नका. त्या सिरीयल्स मधल्या साड्याही जाम भारी असतात. अशा डिझायनर साड्या तर मला जाम आवडतात. गेल्याच आठवड्यात मी एक मेहेंदी साडी घेतली होती. आता मला वेडींग साडी, एखादी ब्रायडल साडी, टेंपल विअर, किटी पार्टी विअर, नवरात्री साडी असल्या प्रत्येकी एक अशा साड्या खरेदी करायच्या आहेत.

मागे मी जोधा अकबर साडी घेतली होती. मला तिचा रंग काही पसंत पडला नव्हता तरी आपल्याकडे असावी म्हणून घेतली होती. मला त्यातल्या त्यात देवदास व सावरीयां साडी आवडली होती. लव्ह आजकल चे मटेरीयल चांगले नव्हते तर रावण फारच गुळगुळीत होती. आजची नेसलेली साडी 'आय हेट लव्ह स्टोरीज' मात्र सुळसुळीत आहे. बघाना बाहेर इतका पाऊस पडतोय पण इच्यावर थोडेही शिंतोडे उडालेले नाहीत. मला असल्याच बॉलीवुड साड्या जास्त पसंत आहेत.

ड्रेस मटेरीयल म्हणाल तर मला डिझायनर सलवार कमीज जास्त आवडतात. कॉटन तसेच शिफॉन मटेरीयल मधल्या कुर्तीज मस्त असतात. कालच मी एक रेडीमेड अनारकली सुट घेतलाय. आता त्यावर दुपट्टा बदलायचा विचार करतेय.

चला, मी काय बोलत बसलेय तुमच्याबरोबर. नाहीतर असं करा ना, माझी मैत्रीण आज माझ्याबरोबर येत नाहीये. मग तुम्हीच चला ना माझ्याबरोबर साडी खरेदीसाठी. आपल्या गप्पाही होतील अन खरेदीही! काय?

राहणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

18 Jul 2011 - 10:30 am | इंटरनेटस्नेही

चान चान.

ह्म्म्म परकाया प्रवेश अरुन आलेला दिसताय. ;)

नरेशकुमार's picture

18 Jul 2011 - 1:31 pm | नरेशकुमार

हे हे हे हे हे हे हे हे
कित्ति कत्ति हसु आनि कित्ति कत्ति नको असे झालंय.
हसुन हसुन पार मुरंकडी वळाली.
आम्ही आपले सुखी आहोत. साडि वगेरे काय नको असते इथे.
इथे सगळं वेस्ट्रन पाहीजे असते. आनी एक डेबिट कार्ड सोबत असते. त्यामुळे बरोबर जान्याचा काही प्रश्नच येत नाही.
आनि मला आनि मिसेस ला साडि मधील काय पन कळत नाय.
तिच्या आई ने म्हनजे माझ्या सासु-आईने मागे कधितरी ४-५ साड्या खरेदी केल्या होत्या , त्याच पड्ल्या आहेत. त्यातल्या दोन तर घरातील बाईला देउन पन टाकल्या. ते साडि खुप अन्कंफर्टेबल होत असे म्हनने आहे.
कधि तरी पुजा अर्चा. दिवळि, आनि कुठे लग्न असेल तरच तास-दोन तासासाठि साडि घालयचि. ढिघभर फोटो काढायचे. ब्बस. एवढाच काय तो साडिचा उपयेग.
दमलो बुवा टायपिंग क्रुन करुन

I hate sadi.

>>मग राग घालवण्यासाठी पुन्हा एखाद्या साडीखरेदीसाठी मी बाहेर पडते.<<<

चमत्कारीक राग आहे हो तुमचा........... ;)

अणखी एक साडी अणलेली पाहुन तुमच्या ह्यांना आलेला राग घालवायला ते काय करतात.......... ;)

योगप्रभू's picture

18 Jul 2011 - 4:19 pm | योगप्रभू

सेलचा जरुर आनंद घ्या.
शहाण्याने दिवाळीच्या कपड्यांची खरेदी मान्सून सेलमध्येच करावी.
नवर्‍यांना बरोबर नेऊ नये. (जुना सूड उगवायचा असल्यास मुद्दाम न्यावे) एका पायावरुन दुसर्‍या पायावर कसरत करत राहातात बिचारे. गुडघेदुखीचे कारण
पोरांना पण त्याच वेळी खाण्याची अन जाण्याची घाई लागते. (दमलेल्या बाबाची कहाणी)

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. मला बायकोबरोबर साडीखरेदीला जाण्याची सक्तमजुरी भोगावी लागत होती. पण मी एक अत्यंत चतुर पुरुष असल्याने त्यावर मार्ग काढला. भडक, घाणेरड्या, रेडियम कलरच्या किंवा विटक्या रंगाच्या साड्यांवर हात ठेऊन 'ही मस्त दिसेल तुला' असे म्हणायला सुरवात केली. पुढच्या वेळपासून मला घरी बसण्याची शिक्षा मिळाली. तेवढंच पथ्यावर पडलं. आता सुखात आहे. डेबिट कार्ड गेलं हातातून, पण त्याला नाईलाज. :)

विदेश's picture

18 Jul 2011 - 4:26 pm | विदेश

पुन्हा साडी खरेदी!!
पा.भे. ; वाचली नाही का आमची खरेदी?

http://misalpav.com/node/17941

कच्ची कैरी's picture

18 Jul 2011 - 5:45 pm | कच्ची कैरी

पाषाणभेद तुम्ही जेन्ट्स आहात अस आजपर्यंत वाटत होते पण तुम्ही लेडीज असल्याचे आजच कळले :०

आनंदयात्री's picture

19 Jul 2011 - 2:22 am | आनंदयात्री

हॅ हॅ हॅ .. लै भारी हो पाभे साहेब !!

>>प्युअर जॉर्जेट, प्युअर शिफॉन, प्युअर क्रेप, प्युअर सिल्क, फ्लॉ जॉर्जेट, फ्लॉ शिफॉन, फ्लॉ क्रेप, फ्लॉ

चिकन चिकन !! र्‍हायलं की ..

चिकन चिकन !! र्‍हायलं की ..

हॅ हॅ हॅ थोड्याच काळात बरीच माहिती गोळा केलेली दिसतेय आंद्याशेट ;)

आनंदयात्री's picture

19 Jul 2011 - 8:14 am | आनंदयात्री

काळ थोडा आहे की जास्त ते काळ'सापेक्ष' आहे :)

सूड's picture

19 Jul 2011 - 7:10 pm | सूड

चिकन आठवलं आणि डब्बलघोडाऽऽ...तो विसरलातच !!

आनंदयात्री's picture

19 Jul 2011 - 7:58 pm | आनंदयात्री

एय्य सुध्या !! काहीही द्वयर्थी बोलु नकोस रे ;)

सूड's picture

19 Jul 2011 - 8:13 pm | सूड

:D माझ्या मनात काही नव्हतं हो, मी आपलं रेशमी कापडाबद्दल बोललो. ;)

पंगा's picture

19 Jul 2011 - 9:05 am | पंगा

प्युअर जॉर्जेट, प्युअर शिफॉन, प्युअर क्रेप

कुंदन's picture

19 Jul 2011 - 9:21 am | कुंदन

आधी साड्या घ्याल अन मग पोवाडा टाकाल "सगळ साडीत गमावलं" ;-)

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Jul 2011 - 9:51 am | चेतन सुभाष गुगळे

माझी आई मला नेहमी बोलून दाखविते की माझा मामा (म्हणजे तिचा धाकटा भाऊ) काही कामानिमित्त एखाद्या शहरात गेला की तिथून किती छान छान साड्या घेऊन येतो. याचं तात्पर्य समजून घेत मी देखील ठरवलं आता कुठे जाणं झालं तर तिथून आईसाठी साड्या घेऊन यायचं.

लवकरच बेळगावात तीन महिने काम करण्याचा योग आला. परतताना तिथून साड्या घ्यायच्या ठरविले. सोबत कार्यालयातील एकाला घेतले आणि जिथे किंमती स्थिर (Fixed Rates) असतील अशा एखाद्या चांगल्या दुकानाचे नाव सूचविण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही तशा एका दुकानात गेलो. साडी दाखवायला आलेल्या कर्मचार्‍यास सांगितले की मला अतिशय कमी सजावट असलेल्या, स्पर्शाला मऊ व जराशा जाड कापडाच्या चारशे ते पाचशे रुपये दरम्यान किंमती असलेल्या साड्या दाखव. त्याप्रमाणे त्याने लगेच केवळ काठावरच सोनेरी / चंदेरी रंग असलेल्या व मध्ये अतिशय कमी सजावट असलेल्या दहा बारा साड्या समोर ठेवल्या. त्यातील एक गडद तपकीरी (हा माझा आवडता रंग) आणि फिकट निळा (हा माझ्या आईचा आवडता रंग) असलेल्या दोन साड्या मी निवडल्या. दर स्थिर असल्याने घासाघीस करण्यात वेळ घालविण्याचा प्रश्नच नव्हता. प्रत्येकी चारशे तीस रूपये किंमत असलेल्या दोन साड्यांचे मिळून काऊंटरवर आठशे साठ रूपये दिले. दुकानात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत केवळ चार मिनीटे खर्च झाली. इतक्या कमी वेळात साडी खरेदी होऊ शकते यावर सोबत आलेल्या व्यक्तिचा विश्वासच बसत नव्हता.

आजही माझी आईजवळ असलेल्या त्या साड्या ती तर आवडीने परिधान करतेच पण त्याशिवाय तिच्या समस्त महिला नातेवाईक मंडळी (माम्या, मावश्या, भाचेसुना, पुतण्या, इत्यादी) आणि मैत्रिणींनाही त्या अतिशय आवडल्या. आई जिथून नेहमी खरेदी करते त्या तिच्या माहेरच्या शहरातील (अहमदनगर) दुकानदाराला या साड्या दाखविल्या असता या प्रत्येकी हजार रूपयांच्या आत मिळणे अशक्य असल्याचे त्याने बोलून दाखविले. त्यामुळे आपल्या मुलाने केलेला सौदा चांगलाच फायद्यात असल्याचे आईला पटले.

तात्पर्य: साडी खरेदी ही वाटते तितकी अवघड बाब नाही. कापडाचा प्रकार, रंग, किंमत या सगळ्यांबाबत मनाशी एक निश्चित योजना हवी म्हणजे चुटकीसरशी हे प्रकरण उरकले जाते.

स्मिता.'s picture

19 Jul 2011 - 7:44 pm | स्मिता.

चार मिनीटात २ साड्यांची खरेदी!! काहितरीच काय सांगता राव? अहो साड्यांच्या दुकानात जावून बसायलाच ४ मिनीटाहून अधीक वेळ लागतो.

आनंदयात्री's picture

19 Jul 2011 - 7:57 pm | आनंदयात्री

खरयं !! हे म्हणजे पिक्चरचे तिकीट काढुन, आत जायच्या रांगेत उभे राहुन .. दारातुन परत येण्यासारखे आहे.

गणपा's picture

19 Jul 2011 - 9:05 pm | गणपा

नाय तर काय. नक्कीच या गुगळ्याच लग्न झालेलं नाहिये.
आधी लग्न कर आणि बायकोला घेउन जा म्हणाव साडी खरेदी करायला. आणि मग ४ मिनिटात बाहेर पडुन दाखव. ;)

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Jul 2011 - 10:20 pm | चेतन सुभाष गुगळे

ठाकर्‍या,

माझी खरेदीची पद्धत ही एकट्याने जाऊन अंमलात आणण्यास योग्य आहे. तरीही तूला सोबत महिलावर्गाला घेऊन जायचे असल्यास पूर्वतयारी म्हणून त्यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरे आधीच वदवून घेणे.

  • किती साड्या खरेदी करायच्यात?

त्यानंतर प्रत्येक साडीबाबत

  1. रंग कोणता हवा?
  2. किंमत कितीपर्यंत हवी?
  3. कापडाचा प्रकार कोणता हवा?
  4. डिजाईन कसं हवं?

या सर्व प्रश्नांची उत्तरे कागदावर लिहून ठेवावीत. एकदा मनात रूपरेषा पक्की झाली म्हणजे त्याप्रमाणेच साड्या दाखविण्यास दुकानातील कर्मचार्‍यांना सांगावे.

ही प्रमाणित पद्धत आहे. प्रमाणित पद्धतीत ज्यांना वागायचे नसते त्यांना कुठल्याही कामाला कितीही वेळ लागू शकतो. सबब त्यांनी तक्रार करण्यात अर्थ नाही.

शिल्पा ब's picture

19 Jul 2011 - 11:35 pm | शिल्पा ब

भारीच विनोदी बुवा तुम्ही!!! भले कितीही उत्तरे मिळोत पण तिथल्या व्हरायटी पाहिल्यावर तुमचा कागद कचर्‍यातच जाणार...

मुलूखावेगळी's picture

20 Jul 2011 - 11:16 am | मुलूखावेगळी

भारीच विनोदी बुवा तुम्ही!!! भले कितीही उत्तरे मिळोत पण तिथल्या व्हरायटी पाहिल्यावर तुमचा कागद कचर्‍यातच जाणार...

+१००

गणपा's picture

20 Jul 2011 - 12:06 am | गणपा

एक वेळ १-२ आणि ३ समजु शकतो....पण

४ ) डिजाईन कसं हवं?

हा लुप न संपणारा आहे भाऊ.
पहिल्या प्रश्नात पण अनंत शेड्स येतात.

जौद्या तुम्ही अजुन त्या गल्लीत शिरलाच नाही आहत हे स्पष्ट झाल. :)

स्मिता.'s picture

19 Jul 2011 - 7:45 pm | स्मिता.

प्र का टा आ

काय हो दफोराव चक्क बायडीच्या रोलमधे ??? ;)
-
--
--- सगळं ठीक ठाक हाय नव्हं ?
असो...
साडी मधे स्त्री जितकी सुंदर दिसते तितकी ती इतर कुठल्या पोशाखात दिसत नाही, हे माझं ठाम मत आहे. ;)

बाकी चालु द्या... खी खी खी ;)

नाव वाचुन आधी वाटलं की कविताच आहे की काय!!!