दोन चारोळ्या -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
19 Jul 2011 - 11:41 am

"प्रेम"
मी डाफरता तू शांत रहावे
तू ओरडता मी गप्प बसावे-
मौनातच नजरांनी हसावे
बहुधा हेच ते 'प्रेम' असावे !

"बदला"

काल कावळा दारी 'काव'ला
तरी पाहुणा नाही टपकला !
कावळ्या घरी पाहुणे वाढता-
त्याने राग मम दारी काढला ?

चारोळ्यामुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Jul 2011 - 12:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छान आहेत.

मूकवाचक's picture

19 Jul 2011 - 6:44 pm | मूकवाचक

चारोळ्या छान आहेत. माझाही एक प्रयत्न -

"सात्विक(?) सन्ताप!"

तिथे फिरूनी बॉम्बस्फोट जाहला
इथे पुन्हा शब्दपूर लोटला
भावोत्कट काव्य प्रतिक्रिया वाढता -
कुणी सन्ताप "उपक्रमी" काढला?

(सन्दर्भः http://mr.upakram.org/node/3378)

स्वानन्द's picture

19 Jul 2011 - 7:32 pm | स्वानन्द

हा हा.. मस्त....तिन्ही चारोळ्या :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jul 2011 - 6:05 pm | परिकथेतील राजकुमार

मी डाफरता तू शांत रहावे
तू ओरडता मी गप्प बसावे-
मौनातच नजरांनी हसावे
बहुधा हेच ते 'प्रेम' असावे !

खरच सांगतो आमच्या नाना आणि पाध्येंची आठवण झाली.

आमचा नान्या कुठल्या आयडीने दिवस काढत असेल आजकाल देवाला माहिती.

बाकी वरती एका प्रतिक्रियेत पल्याडच्या मनोरुग्णालयाचा दूवा पाहून अंमळ मौज वाटली.

पाषाणभेद's picture

21 Jul 2011 - 10:04 am | पाषाणभेद

संसारातील यशाचे हे गमक आहे का?