पाऊस

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
15 Jun 2011 - 2:01 pm

काळ्याभोर मेघांची नभात दाटी असावी
तुझ्या डोळ्यात मी भिजावे अन् तू माझ्या नसानसात भिनावी

गडगडते ढग तुटून एकच सर अशी बरसावी
त्यांनी माझ्या मनाची दशकांची तहान शांतवावी

माझ्या देहाच्या वृक्षावरील अवघी पाने चिंब होऊन ओघळावी
त्याच वृक्षाला लिपटलेल्या लाजाळूप्रमाणे तू मोहरून मिटावी

कृष्णरंगी मेघांमागून सूर्याने सप्तरंगी किरणांची जाळी पसरवावी
सांजेमागून येणारी अवनीही त्यावर लुब्ध होऊन थबकावी

आता जरा पाऊस रिमझिम व्हावा अन् कडाडती विजही थकावी
तुझे हात माझ्या हातात असावे अन् नजरेत नजर गुंतावी

रिमझिम झालेल्या पावसात चिंब होऊन तू गोडगोड व्हावी
माझ्या उबदार मिठीत येताच हलके हलके विरघळावी

झरझरणार्‍या घनांच्या छिडकाव्याने अवघ्या रानातील माती ओलावी
तशीच डबडबलेली तुझी देहकुपी माझ्या हृदयात अलगद लवंडावी

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१५/०६/२०११)

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

अरे वा. एकाच नावाच्या आणि दोन वेगवेगळ्या मूडच्या पाऊसकविता एकत्र वाचायला मिळाल्या.

तू आणि सोनल मिपावरचे उभरते काव्यसितारे आहात.

लगे रहो.

विदेश's picture

15 Jun 2011 - 3:58 pm | विदेश

आवडली.

रुमानी's picture

15 Jun 2011 - 5:08 pm | रुमानी

आवडली.

गणेशा's picture

15 Jun 2011 - 5:30 pm | गणेशा

मस्तच एकदम

नगरीनिरंजन's picture

15 Jun 2011 - 5:38 pm | नगरीनिरंजन

छान कविता!

ajay wankhede's picture

18 Jun 2011 - 4:11 pm | ajay wankhede

एकदम झक्कास ...पाऊस