गातेस घरी तू जेव्हां

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
16 May 2011 - 11:07 am

( चाल: नसतेस घरी तू जेव्हां -)

गातेस घरी तू जेव्हां
जीव सुटका-सुटका म्हणतो
शांतीचे विणता धागे
संसार नेटका होतो !

छत भंगुन वीट पडावी
हल्लाच तसा ओढवतो
ही पाठ कणाहिन होते
अन् चेहरा बारका होतो !

ये घरमालक दाराशी
हळु गाण्या , तो खडसावे
खिडकीच्या उघडुन दारा
तो बोंबा मारून जातो !

वळ पाठी उमटवणाऱ्या
मज स्मरती मास्तर शाळा
वेताने मज बडवावे
मी तसाच बघ थरथरतो !

तू सांग बये मज , काय
मी सांगू घरमालकाला ?
गाण्याचा तव जल्लोष
माझ्यासह किरकिर ठरतो !

ना अजून झाला तंटा
ना ताळतंत्रही सुटले
तुज ' गाऊ नको ' म्हणताना
गाण्यातच सामील होतो !!

कवितामुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

16 May 2011 - 10:09 pm | मेघवेडा

हा हा हा!! एक नंबर झालंय विडंबन! झकास!

इंटरनेटस्नेही's picture

17 May 2011 - 3:07 am | इंटरनेटस्नेही

चान चान.

गणेशा's picture

17 May 2011 - 5:17 pm | गणेशा

मस्त जमले आहे ...

चिमी's picture

18 May 2011 - 7:43 am | चिमी

ही माझी मिपा वर पहिली प्रतिक्रिया आहे. सही सही अ ही कविता . मी सर्वान्ना फोरवर्ड केली. :-)