मुलीस पत्र

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
9 May 2011 - 1:47 am

प्रिय रिया,

हा हा म्हणता केवढी मोठी झालीस बाळा, तुला पंख फुटले. माझा अजूनही विश्वास बसत नाही की कालपरवा पर्यंत अंगणात खेळणारं माझं बछडं उद्या नोकरीनिमित्ताने दुसर्‍या देशात भुर्र उडून जाणार आहे. अशा वेळी तुझ्या या वेड्या आईचं मन सैरभैर होणं साहजिकच आहे. तुला मी देता येतील तितके चांगले संस्कार दिले, बाळकडू पाजलं, वेळोवेळी उपदेशाचे डोस दिले मग तुला आवडो अथवा न आवडो. पण काही गोष्टी तरीही राहूनच गेल्या.

मानापमान -रियु मी तुला कधी हे सांगीतलं का की गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो.
संस्कार -आपण नेहमी झाड पहातो. झाड कसं वाढतं सांग पाहू मला. वरवर, सूर्याच्या दिशेने वाढतं बरोबर? पण त्याच झाडाला खत पाणी कोण आणतं? मूळं, जी की मातीत खोलवर रुजतात. त्याचप्रमाणे तुझा खूप विकास होईल, चौफेर प्रगती होईल पण तू नेहमी हे लक्षात ठेव की तुझ्या ध्येयपूर्तीस आवश्यक असे विचार, खाद्य तुला तुझ्या संस्कारांच्या मातीतूनच मिळेल.
फेरविचार - तू मोहमयी जगात प्रवेश करणार आहेस. तुझ्या हातात पैसा खुळखुळणार आहे. तुला मोह होणं स्वाभाविकच असेल. मग तो मोह टाकाऊ, निकस खाद्यपदार्थांचा असो की अनावश्यक वस्तूंवर पैशाचा अपव्यय करण्याचा असो. या मोहावर एक रामबाण उपाय आहे - फेरविचार! एखादी गोष्ट खरेदी कराविशी वाटली की स्वतःला ३० मिनिटे दे. फक्त ३० मिनिटे आणि फेरविचार कर. त्या ३० मिनिटांनी तरी जर तुला ती वस्तू खरेदी कराविशी वाटली तर जरूर कर.
स्तुती - स्तुतीस भुरळू नकोस तसेच कटू बोलणारी व्यक्ती नेहमी वाईटच असते असेही गृहीत धरू नकोस्.साखरेचेच उदाहरण घे. साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.तेव्हा सदैव स्वतःचा सारासार विवेक जागृत ठेव.
कष्ट - गरीबांचे कष्ट कधीही विनामोल घेऊ नकोस तसेच तुझ्या स्वतःच्या कष्टाचे मोल नेहमी जाण. आपल्या मित्रमैत्रिणींना, स्नेह्यांना, नातलगांना आपण केवळ पैशानेच नव्हे तर कष्टरूपाने, वेळरूपाने मदत करू शकतो, दिलासा देऊ शकतो. पारखून मैत्री कर. मैत्रीसारखी सुंदर नाती फार कमी आहेत या जगात.
वाचा -शेवटचे पण महत्त्वाचे स्वतःची जीभ कधीच खराब करून घेऊ नकोस. समोरची व्यक्ती निंदा करत असेल, कटू बोलत असेल, तर तू तेथून निघून जा कारण ते तुझ्या हातात आहे पण त्या व्यक्तीच्या पातळीवर उतरू नकोस.

तुला वाटेल आई नेहमी प्रवचन देते. पण तू दूर , एकटी जाणार म्हणून या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. बाकी तू सुजाण आहेसच. मला खात्री आहे की तू यशस्वी होशील. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदोदीत आहेतच.

तुझी आई

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

वाचकांनी जमल्यास/आवडल्यास यादीत भर घालावी. धन्यवाद.

स्तुती - स्तुतीस भुरळू नकोस तसेच कटू बोलणारी व्यक्ती नेहमी वाईटच असते असेही गृहीत धरू नकोस्.साखरेचेच उदाहरण घे. साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.तेव्हा सदैव स्वतःचा सारासार विवेक जागृत ठेव.

हा हा .. हाहाहाहा. एक जालिय गोडबोला आठवला .. सॅक्रिन फिकी पडावी एवढा तो गोडबोला =))

इंदिरा मावशींना पत्र लिहीणार्‍या चाचा नेहरु ची आठवण झाली. सदर पत्रात पाठवणार्‍याचा आणि ज्याला पाठवायचे आहे त्याचा पत्ता नाही. मॅन्युअल पोस्टिंग असेल तर ठिक . बाकी छोट्या चिऊला पापा , आज्जिंना साष्टांग दंडवत, काकुंना सांगणे मजेत आहे . इकडची काळजी करु नये , पाऊसपाणी कसा आहे ? आमचे तब्बेतीची काळजी करु नये . कळावे , लोभ असावा वगैरे आपली परंपरा असणारी वाक्य न दिसल्यामुळे खेद झाला. तसेच कोणी चॉकलेट दिल्यास खाऊ नये ,अनोळखी लोकांशी बोलु नये , कोणाचा रुमाल वापरु नये , फालतु खर्च करु नये वगैरे डोन्ट्स ची यादी देखील नाही .
असो . पुढिल पत्रास शुभेच्छा .
पुढचे पत्र मुलाला लिहा . सेक्स डिस्क्रिमिनेशन वाढवु नका . पत्र अजुन सुरळीत होण्यासाठी अट्टल पत्रलेखक आका जकार्ता पत्र पोस्टिंग अँड कोचिंग सर्व्हिस मधुन मदत घ्या

धन्यवाद .

- मिशि

नरेशकुमार's picture

9 May 2011 - 9:46 am | नरेशकुमार

बायकोला विंग्रजितुन लौलेटर (म्हंजे ईमेल) लिहिन्यासाठि वरिल कोचिंग क्लासचा काय उपयोग होइल काय ?
मला थोडं थोडं ईग्लिश स्पिकता येते.

सुचलं होतं .. एक वॅलेंटाईनचं लौलेटर टेंप्लेट विडंबणपत्र सुचलं होतं .. पण पहिल्या लायनीतंच पत्राच्या ज्या चिंध्या झाल्या त्यावरनं ते थांबवायचा निर्णय घेतला

ज्युलीस पत्र ,

प्रिय ज्युली
हा हा म्हणता केवढे मोठे ......
< fatal error at line 2 : subject/object/writer.class crashed, Abort message sent. >

- पंछि

नरेशकुमार's picture

9 May 2011 - 10:32 am | नरेशकुमार

अक्च्युअल लौलेटर मध्ये हि एकच ओळ (हा हा म्हणता केवढे मोठे ......) काफी है !
ज्युलिने (आय मीन प्रेयसीने) हे वाचल्यावर तिचे लौ सुद्धा काय भराभरच वाढेल माहितिये !

प्रिय ज्युली
हा हा म्हणता केवढे मोठे ......
< fatal error at line 2 : subject/object/writer.class crashed, Abort message sent. >

'fatal'च्या ठिकाणी 'fetal' असे स्पेलिंग पाहिजे होते काय?

मातृदिनानिमित्त सुचलेलं दिसतय.
छान झालय.
साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.
हे समजले नाही. माझ्याकडचा साखरेचा डबा माझ्याच पाठीत सुरा खुपस्तोय असे डोळ्यासमोर येऊन दचकले.;)

पंगा's picture

9 May 2011 - 3:50 am | पंगा

साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.
हे समजले नाही.

बहुधा 'साखर तोंडाला गोड लागते, परंतु तिच्या अतिसेवनाने पुढेमागे मधुमेह होऊ शकतो' असे काही सुचवायचे असावे.

नरेशकुमार's picture

9 May 2011 - 6:26 am | नरेशकुमार

साखर तोंडाला गोड लागते, परंतु तिच्या अतिसेवनाने पुढेमागे मधुमेह होऊ शकतो

हे बरोबर आहे, पन खानार्‍याला याची जानिव असते, त्यामूळे

साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.

यात 'पाठीत' हा शब्द चुकिचा वाट्तो. कारन 'पाठीत' म्हनजे मागुन, दगा देउन, न सांगता, वगेरे वगेरे.
साखर अशि घात करत नाही.

लेखिकेला काहीतरी वेगळा अर्थ अपेक्शित असावा.

पंगा's picture

9 May 2011 - 3:47 am | पंगा

गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो.

??????????????????????

!

बोलणे खुंटले!

(बाकी, आईचे मुलीस पत्र हा आई आणि मुलगी यांच्यातला खाजगी मामला नसावा काय? म्हणजे, ठीकाय, Pandit Nehru could get away with it, and probably got paid for it, as well, वगैरे वगैरे, पण म्हणून सगळ्यांनीच आपापली खाजगी पत्रे जाहीरपणे चव्हाट्यावर आणायची? यह बात कुछ जँची नहीं|

उद्या 'व्हॅलेंटाइन्स डे'ला नवराबायकोंतली - किंवा सिग्निफिकंट अदरांतली / वुड-बी सिग्निफिकंट अदरांतली - जाहीर प्रेमपत्रेही प्रसिद्ध होऊ लागली, तर बहार यावी.)

गंमत म्हणून वरील लेख लिहीला आहे. टीकेसाठी टीका करायची ठरवलत तर निरुपाय आहे. असो. आपल्याला "विरंगुळा" लेख समजू शकत नसेल तर माझी मर्यादा समजते. हा शेवटचा प्रतिसाद.

पंगा's picture

9 May 2011 - 4:26 am | पंगा

गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो.

यात कोणतीही 'गंमत' आढळली नाही. ही तर उघडउघड टिपिकल आर्थिक उच्च/उच्चमध्यमवर्गीयांची 'त्यांच्या'प्रति (पक्षी: 'गरीबां'प्रति) condescending attitude आहे. 'आपण' वेगळे, 'ते' वेगळे, 'आपण' 'त्यांच्या'पेक्षा आर्थिकदृष्ट्या 'वरच्या पातळी'वर आहोत, 'सुदैवी' आहोत, पण तरीही काय आहे ना, 'त्यांना' अभिमान वगैरे असतो, मानापमानाच्या कल्पना वगैरे असतात, आणि काय करणार, पण जरा जास्तच असतात, तरी 'त्यांना' सांभाळून घ्यायचे असते, काय आहे, उगीच नसते पंगे कशाला, नाही का? आता ही जर 'गमती'ची संकल्पना असेल, तर माझ्या 'गमती'च्या संकल्पनेपेक्षा खूपच वेगळी आहे, एवढेच म्हणू शकतो. आणि हा जर पुढील पिढीला गंभीर उपदेश म्हणून देण्याचा मामला असेल, तर आपले तरी बोलणे खुंटले.

(अन्यथा, 'माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे' किंवा 'माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे', एवढा उपदेश पुरेसा आणि योग्य ठरता. फार फार तर, 'त्यांची' आर्थिक स्थिती 'आपल्या'पेक्षा वेगळी असली, तरी 'आपण'ही 'त्यांच्या'सारखी माणसेच आहोत, माणूस म्हणून 'आपण' 'त्यांच्या'पेक्षा 'वरच्या पातळी'वरचे किंवा 'ते' 'आपल्या'पेक्षा 'खालच्या पातळी'वरचे असे काहीही नाही, हेही बिंबवता आले असते. पण असोच.)

बाकी चालू द्या.

तो साधा सरळ उपदेश आहे. आर्थिक विषमतेमधून कोणाचा अपमान न करण्याबद्दल. त्यात मी त्या आईवर उच्च मध्यमवर्गीय वगैरे काहीही आरोपण स्वतःवर केलेले नाही. तुम्हाला काय माहीत हो ती आई उच्च मध्यमवर्गीय आहे की कनिष्ठ? की अन्य काही जसे करोडपती वगैरे?
तुमचा चष्मा उतरवा आणि निखळ दृष्टीने तो लेख वाचा.

पंगा's picture

9 May 2011 - 5:01 am | पंगा

तुम्हाला काय माहीत हो ती आई उच्च मध्यमवर्गीय आहे की कनिष्ठ?

साधी गोष्ट आहे. आई आर्थिकदृष्ट्या कनिष्ठवर्गीय असेल, तर तिला 'गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात' किंवा 'त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो' असा उपदेश करण्याची गरज ती काय, हे कळत नाही.

असे करावे लागण्याच्या दोनच शक्यता दिसतात.

(१) आई गरिबीतून वर आलेली आहे, परंतु मुलीची आर्थिक स्थिती उत्तम आहे. (पक्षी, मुलगी 'नवश्रीमंत' आहे.)

किंवा,

(२) आई गरीब आहे, मुलगीही गरीबच आहे, परंतु पुढेमागे आपली मुलगी यदाकदाचित श्रीमंत होऊन न जाणो, परंतु उद्दामपणे वागू नये, म्हणून काँटिंजेन्सी बेसिसवर हा सल्ला आतापासूनच देऊन ठेवत आहे.

वरीलपैकी दोन्ही परिस्थितींत आई 'गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात' असले वाक्य उच्चारेल, असे वाटत नाही. म्हणजे, तिला जर काही स्वाभिमान असेल, आणि (पहिल्या शक्यतेत) 'आपण गरिबीतून वर जरी आलेलो असलो, तरी आता श्रीमंत आहोत, आपण आता "पोचलो"', असली काही भावना जर तिच्या ठायी निर्माण होऊ लागलेली नसेल, तर. तशी भावना निर्माण झालेली असेल (किंवा होऊ घातली असेल), तर मात्र काही सांगवत नाही.

बाकी चालू द्या.

शुचि's picture

9 May 2011 - 5:13 am | शुचि

मला हा वाद वाढवायचा नाही पण एक मुद्दा स्पष्ट करू इच्छिते - हा सल्ला कितीही गरीब अथवा श्रीमंत आई आपल्या मुलीला देऊ शकते कारण आपल्यापेक्षा कोणीना कोणी गरीब असतेच आणि आपल्यापेक्षा कोणी ना कोणी श्रीमंत असतेच.

मुक्तसुनीत's picture

9 May 2011 - 9:38 am | मुक्तसुनीत

एक प्रयत्न करतो म्हणजे मुद्दा लक्षांत यायला मदत कदाचित होईल. तुमच्या पत्रातल्या "उपदेशा"चा अर्थ कुणी असा घेऊ शकेल. आणि तसा घेतला तर तो फारसा श्रेयास्पद ठरणार नाही.

गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो. गरिबांच्या बद्दल तुझ्यामनात कितीही तुच्छतापूर्ण विचार आले तरी चालतील तरी त्यांना बोलून दाखवणे मात्र गैरसोयीचे किंवा धोक्याचे आहे बरे ! म्हणून काही झाले तरी त्यांचा अपमान त्यांना कळेल अशा पद्धतीने करू नये.

वरील विवेचनाने , "तुम्हाला बहुदा अध्याहृत नसलेला विपरित अर्थ तुमच्या शब्दांतून व्यक्त होत आहे " हा मुद्दा समजायला मदत होईल अशी आशा आहे.

गवि's picture

9 May 2011 - 9:59 am | गवि

पंगा यांना खटकलेला अगदी तोच गरीबांविषयीचा पॅरा खटकला होता.

आणि आता मुक्तसुनीत यांनी अधिक स्पष्ट केलेला मुद्दाही फार सुंदर मांडला आहे.

"गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते" अशा विशिष्ट प्रकारे सांगितलेला उपदेश खचितच सांगणार्‍या व्यक्तीचा वर्ग श्रीमंत आहे आणी तो काही भेदभाव दाखवतो आहे हे स्पष्ट करतो.

हे म्हणजे "झोपडपट्टीतल्या किंवा मुस्लिम मुलासोबत पळून जाऊ नको हो. तो तुला फसवेल.." असे सांगण्यापैकी आहे.

कोणत्याही धर्मातला किंवा स्तरातला असेना का, एकूण समोरचा व्यक्ती तुला फसवत नाही ना याची काळजी घे आणि एकूणच पळून जाऊ नको हे सांगताना अशा उपरिनिर्दिष्ट रितीने सांगायला हवे का? नाही ना? तसेच काहीसे.

बाकी मुद्द्यांशी सहमत. (इतर अनेकांने म्हटल्यानुसार मुलीच्या वयानुसार प्रायमरी यत्तेतले वाटत असले तरी.. शेवटी आईसाठी मुलगी लहानच.. :) )..

पिवळा डांबिस's picture

9 May 2011 - 5:40 am | पिवळा डांबिस

नाही, उपदेश चांगलाच आहे...
पण काही गोष्टी तरीही राहूनच गेल्या.
हे जरा विचित्र वाटलं. अरे? मुलगी नोकरी करायच्या वयाची झाली तरी या गोष्टी शिकवायच्या राहून गेल्या? मग इतकी वर्षे शिकवलं तरी काय?
आपल्या विशीतल्या अपत्यांना या गोष्टी ठाऊक नसतील असं जर कोणा पालकांना खात्रीने वाटत असेल तर ते अपत्य अलरेडी वाया गेलेलं आहे निश्चित...

बाकी ते साखरेचं लफडं मलाही समजलं नाही....:)
खुलासा होईल का?

साखरेचं तेच ..... पंगा यांचे मधुमेहाचे स्पष्टीकरण किंचित बरोबर आहे. साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेह होत नाही पण मेदवृद्धी होऊन अन्य आजार लागू शकतात. सर्वच गोड गोष्टी चांगल्या नसतात असे सुचवायचे आहे.
>> अरे? मुलगी नोकरी करायच्या वयाची झाली तरी या गोष्टी शिकवायच्या राहून गेल्या? >>
=)) मान्य! अनुभव नसल्याने हा लेख थोडा अनरिअ‍ॅलिस्टीक झाला असेल.

पिवळा डांबिस's picture

9 May 2011 - 6:20 am | पिवळा डांबिस

साखरेचं तेच ..... मधुमेहाचे स्पष्टीकरण बरोबर आहे.
अहो, नुसतं गोड खालं म्हणुन मधुमेह होत नाही.
अती गोड पदार्थ खूप काळापर्यंत खाल्ले की मधुमेह होतो!!!
त्याचप्रमाणे...
अती खारट मीठ खाल्लं की हायपरटेन्शन होतं...
अती तिखट खाल्लं की अल्सर्स आणि मूळव्याध होते...
अती कडू खाल्लं की हायपोग्लायसेमिया होतो...
अती आंबट खाल्लं की अ‍ॅसिडिटी होते...
इतकंच काय पण अती पाणी प्यालं तरी किडनी फेल होतात!!!
म्हणून साखर न वर्जयेत, अती सर्वत्र वर्जयेत!!:)

मान्य! अनुभव नसल्याने हा लेख थोडा अनरिअ‍ॅलिस्टीक झाला असेल.
इटस ऑलराईट, इट हॅपन्स!!
म्हणुन तर म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा...
सो नेव्हर माईन्ड!!:)

तुम्ही वरती वाचकांना अ‍ॅडिशन करण्याविषयी सुचवलं आहे. तेंव्हा मी खालील अ‍ॅडिशन्स सुचवतो. कशा वाटतात ते सांगा...

१. मुली, तू नोकरीसाठी जाते आहेस. आर्थिकदृष्या स्वावलंबी होते आहेस. तशीच आयुष्यभर रहा. नवरा कितीही श्रीमंत मिळाला तरी तुझं आर्थिक स्वावलंबन गमावू नकोस. उद्या नवर्‍याशी पटलं नाही किंवा अचानक नवरा पांगळा/ दिवंगत झाला तरी स्वतःच्या हिंमतीवर उर्वरित संसाराचा गाडा ओढण्याची तुझी सदैव क्षमता असू देत...

२. मुली, तू विशीत असून घराबाहेर जाते आहेस. सेक्सबद्दल तुझ्या मनात औत्सुक्य आणि ओढ असणार हे स्वाभाविक आहे. परंतु सेक्स करण्याअगोदर त्या अनुषंगाने येणार्‍या इतर गोष्टी (प्रेग्नंसी, एडस, वगैरे) यांचाही विचार करून पूर्ण खबरदारी घे.

३. "ठेविले अनंते, तैसेचि रहावे", किंवा "अंथरूण पाहून पाय पसरावे" यासारख्या सेल्फ डिफीटींग तत्वज्ञानाला तुझ्या मनात थारा देऊ नकोस. तू तरूण आहेस. तुझ्या बुद्धिमत्तेच्या, साहसाच्या, आणि परिश्रमाच्या बलावर तुझं अंथरूण इतकं मोठं करायची महत्वाकांक्षा बाळग की तू आणि तुझा संसारच काय पण इतरांनाही तुझा आधार वाटावा.

४. आयुष्यात कुठल्याही एकातरी खेळामध्ये रस घे. स्वतः खेळलीस तर उत्तमच पण नसेल तर तो खेळ निदान पहात तरी जा. खेळ हा तुझ्यामध्ये जिंकण्याची ईर्षा निर्माण तर करेलच पण अपयश कसं हॅन्डल करावं हेही शिकवेल. अपयशातून वेळीच सावरणं हे यश मिळवण्याइकंच महत्वाचं स्किल आहे...

अजून बरेच मुद्दे आहेत, पण टंकण्याचा कंटाळा आल्याने आता इतकेच पुरे...
:)

शुचि's picture

9 May 2011 - 6:32 am | शुचि

किती सुंदर प्रतिसाद दिलात आपण. आपणास अनेकानेक धन्यवाद.

मुलूखावेगळी's picture

9 May 2011 - 11:08 am | मुलूखावेगळी

अरे वा छान मुद्दे अ‍ॅड केलेत हो तुम्ही

अजून बरेच मुद्दे आहेत, पण टंकण्याचा कंटाळा आल्याने आता इतकेच पुरे...

काय हे लिहा ना

मुलूखावेगळी's picture

9 May 2011 - 11:09 am | मुलूखावेगळी

अरे वा छान मुद्दे अ‍ॅड केलेत हो तुम्ही

अजून बरेच मुद्दे आहेत, पण टंकण्याचा कंटाळा आल्याने आता इतकेच पुरे...

काय हे लिहा ना

काका, एवढा गोग्गोड आग्रह मोडू नकाच...मग कधी लिहिणार गडे तुम्ही !!

पाषाणभेद's picture

11 May 2011 - 12:55 am | पाषाणभेद

पिडाकाकांचा विचार एकदम पटेश

प्रसंग : एक अपयशी, चीडलेला, गोंधळलेला नवयूवक ( अर्थातच रॉकीचा मूलगा) आपले वडील म्हातारपणी एका तरूण बॉक्सींग वीश्ववीजेत्याशी लढायचा हट्ट धरत आहेत पाहून अजूनच खचलाय व आपल्या वडीलांच्या पराभावामूळे जगात आपलीही छी:थू होणार असा होरा आहे म्हणून तक्रार करायला आलाय...

रॉकी : इतनेसे थे तूम जब तूम पैदा हूए (हाताकडे बोट दाखवतो). तूम्हे बढते हूए देखना मानो एक हसीन सपनेका साकार होने जैसा था. फीर एक वक्त आया के तूम अपने फैसले खूद लो और दूनीयाका मूकाबला करो, जो तूमने कीया. लेकीन इस खेल मे तूम बदल गये. तूम तूम नही रहे, तूमने दूसरोंको तूम्हे बूरा कहनेका मौका दीया. और जब हालात और बत्तर हूए तो तूमने कीसीको इसका दोशी बनाना चाहा.

मानापमान -रियु मी तुला कधी हे सांगीतलं का की गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो.

आणी श्रींमंतांचा अपमान करायचे अर्थातच आपल्यात गट्स नसतात :)

रॉकीचा मूलगा : (अजूनही वडीलांशी असहम व नाराज)

रॉकी : मै तो हमेशा यही कहता हूं यह दूनीया सूरज की चमक या इंद्रधनूष के रंगो जैसी नही है. यह बहोत जालीम और पथ्तर दील है. अगर तूम इसे तूम्हे दबानेका मौका दोगे तो यह तूम्हे दबाएगी और तूम्हे अपने घूटनोंपर लाकर छोड देगी.

रॉकीचा मूलगा : (स्थीर व थोडासा लेक्चरमूळे संभ्रमीत)

रॉकी : मै तूम या कोइ और, हम चाहे कीतने भी वार करते रहे, लेकीन हमारा वार करना मायने नही रखता. मायने रखता है वार को सहना और आगे बढ्ते रहना. बस वार को सहो और आगे बढो. जीत ऐसे हासील की जाती है.

रॉकी : अगर तूम काबील हो तो वो हासील करो जीसके तूम हक्कदार हो, लेकीन कीसीपे ऊंगली ऊठाके ये मत कहो के मै ये नही कर सका, वो नही बन सका, इसकी.. इसकी या ऊसकी वजह से. सीर्फ कायर लोक ऐसा करते है. और तूम कायर नही हो... तूम ऊनसे बेहतर हो......

हेच आपलं तत्वज्ञान, मूलगा असो वा मूलगी सगळ्यांनाच समान :)

शुचि's picture

9 May 2011 - 7:13 am | शुचि

हे काय आहे? या धाग्यावर या क्लिपचे काय प्रयोजन?

आत्मशून्य's picture

9 May 2011 - 7:18 am | आत्मशून्य

यात संदेश फक्त इतकाच आहे की कधीही हार मानू नका, व स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वतःवर घ्या. बाकी मेसेज पोस्ट करताना थोडा गोंधळ झालाय. रॉकीच्या संवादात तूमचे एक वाक्य व त्यावरील माझी मीश्कील प्रतीक्रीया चूकून मीसळली गेलीय तेव्हंड जरा सांभाळून घ्या :)

शुचि's picture

9 May 2011 - 7:20 am | शुचि

गॉट इट!

आत्मशुन्य लई भारी प्रतिसाद, आवडला प्रतिसाद पण आणि तुमचा अभ्यास पण.

बाकी शुचितै, लेख बरा आहे पण गरिबी आणि स्वाभिमान वैग्रे जे लिहिलं आहे त्याबद्दल श्री.पंगा बरोबर सहमत.

माझीही शॅम्पेन's picture

9 May 2011 - 8:12 am | माझीही शॅम्पेन

हे पत्र म्हणजे अगदीच ओल्ड-फॅशन वाटताय हल्ली चेपु (फसेबूक) , टिव-टिव (ट्विटर) , ३जी , ४जी आणि ईमेल च्या युगात अंम्मळ नव-वारीत मल्लिका शेरवतल तुळशी वृंदावनाला फेर्‍या मारताना बघतोय की काय अस वाटल.
(कृ ह घ्या)

संदेश खूप चांगला आहे त्या बद्दल तुमच अभिनंदन करतो

स्व-वार्ता- मला अस छान छान लिहिता येईल तो सुदिन असो

विनायक बेलापुरे's picture

9 May 2011 - 10:28 am | विनायक बेलापुरे

शुचि ताइंच्या मानपमानाच्या मुद्द्याशी जरासा सहमत आहे.
कारण बरेचदा अपमानाला कारण आर्थिक तफावत होत असते. उदा. घरात तुम्ही ठेवलेले पैसे गायब झाले तर अगदी पोलिसांपासून पहिला आळ घरातील नोकरमाणसावर घेतला जातो. पण कधी कधी घरातलाच मुलगा किंवा अन्य कोणी व्यक्तीनेही ते पैसे गायब केलेले असू शकतात किंवा स्वतःच दागिने किंवा अन्य चीजवस्तू उचलून अन्यत्र ठेवलेले असतात आणि ते आता आठवत नसते. असा काही प्रसंग आला तर केवळ गरीब आहे म्हणून एखाद्या व्यक्तीवर उगाचच आळ घेउ नकोस, त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याचा अपमान करायचा प्रयत्न करु नकोस हे तिच्या आईचे सांगणे अगदीच चूक वाटत नाही. नीरक्षीर विवेक ठेव असेच आईचे सांगणे असावे असे वाटते.

स्तुती - स्तुतीस भुरळू नकोस तसेच कटू बोलणारी व्यक्ती नेहमी वाईटच असते असेही गृहीत धरू नकोस्.साखरेचेच उदाहरण घे. साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.तेव्हा सदैव स्वतःचा सारासार विवेक जागृत ठेव.

स्तुतीस भुरळू नकोस तसेच कटू बोलणारी व्यक्ती नेहमी वाईटच असते असेही गृहीत धरू नकोस्.
हे पटले पण यातला साखरेचा भाग मात्र नीटसा कळला नाही.

इंटरनेटस्नेही's picture

9 May 2011 - 12:16 pm | इंटरनेटस्नेही

शुचि ताईंनी लिहिलेले पत्र छान आहे. सर्व सल्ले मनापासुन पटले. आणि त्या मानापमानाच्या बाबतीतल्या सल्याबाबत बोलायचं झालं तर तो ही बरोबरच आहे. कितीही झालं तरी सत्य कटु असते पण सत्य ते सत्यच.

बाकी लवकरच मुलास पत्र देखील येऊदे..आतुरतेने वाट बघत आहे.

-

(वाचक) इंट्या.

मुलूखावेगळी's picture

9 May 2011 - 7:42 pm | मुलूखावेगळी

बाकी लवकरच मुलास पत्र देखील येऊदे..आतुरतेने वाट बघत आहे.

पत्र आल्यावर फरक पडनारे का तुझ्यात?
मला माहित आहे, तुला ते भवितष्यात फोर्वर्ड करायला हवेय ;)

इंटरनेटस्नेही's picture

10 May 2011 - 4:01 am | इंटरनेटस्नेही

या उपप्रतिसादाने एकदम निरुत्तर झालो आहे!
-
(निरागस बालक) इंट्या.

परिकथेतील राजकुमार's picture

9 May 2011 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार

(पत्र) लेख वाचला नाही.

आमच्या कोदानी चेतन भगत ह्यांना लिहिलेल्या पत्राची सर कोणीही कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या पत्रलेखनाला येणार नाही हे नमूद करु इच्छीतो.

कोदाच्या पत्रासमोर इतर पत्रे म्हणजे नागमण्यासमोर दगडं.

धन्यवाद.

योगप्रभू's picture

9 May 2011 - 1:56 pm | योगप्रभू

शुचीताई,
आईने मुलीस लिहिलेले हे पत्र वाचायला छान आहे.

पण या वयातील आणि सध्याच्या पिढीतील मुलामुलींना असले उपदेश नको असतात. पुढच्या पिढीला परिस्थितीचे आकलन फार लवकर होत असते आणि चांगले-वाईट ठरवण्याच्या तारतम्याचा त्यांचा अधिकार/स्वातंत्र्य आपण मानले पाहिजे.

त्यामुळे ' कोणताही निर्णय विचारपूर्वक घे आणि त्याच्या परिणांमांची जबाबदारीही स्वीकार' एवढ्या एका वाक्यात मुलाला-मुलीला सांगितले तरी चालेल.

परिकथेतील राजकुमार's picture

9 May 2011 - 2:56 pm | परिकथेतील राजकुमार

त्यामुळे ' कोणताही निर्णय विचारपूर्वक घे आणि त्याच्या परिणांमांची जबाबदारीही स्वीकार' एवढ्या एका वाक्यात मुलाला-मुलीला सांगितले तरी चालेल.

पण मग काही सदस्य 'एकोळी धागा' म्हणुन शिमगा करतील ना?

कानडाऊ योगेशु's picture

9 May 2011 - 7:55 pm | कानडाऊ योगेशु

पण मग काही सदस्य 'एकोळी धागा' म्हणुन शिमगा करतील ना?

हा!हा!!हा!!!
पत्रात अजुन दोन मुद्दे टाकावे लागतील.
१.मिपावर कधी एकोळी धागे टाकु नकोस आणि जर कधी चुकुन माखुन टाकलेसच तर
२.येणार्या प्रतिसादांना फाट्यावर मार.!
बाकि शुचितैंच्या पत्रातली आई जुन्या पिढीतली निरागस स्त्री वाटतेय.

काही दिवसांपूर्वी शारुखबाबाचा इंटर्व्यु वाचला होता.त्यात त्याने असे म्हटले होते कि त्याची मुलगी कारमध्ये मागच्या सीटवर तिच्या बॉयफ्रेंडशी फ्लर्ट करत असताना त्याला ती गाडी चालवताना ड्रायव्हर समोरच्या आरश्यातुन मागच्या सीटवर काय चालले आहे हे पाहणे आवडेल.
वरवर त्याचे विधान उथळ वाटले पण नंतर लक्षात आले कि मुलीच्या पाय घसरण्याच्या नाजुक टप्प्यावरही तिच्यावर देखरेख करण्यासाठी बाप म्हणुन तो तिच्यासोबत असेल !

आत्मशून्य's picture

9 May 2011 - 7:13 pm | आत्मशून्य

यावरून अब्राहम लिंकनचं मूलाच्या शाळेच्या हेडमास्तरास पत्र एका शालेय मीत्राच्या घरात त्याच्या वडीलांनी टांगून ठेवल्याचे स्मरते. काय बावळटपणा होता तो ? पत्र न्हवे तर असल काही भींतीवर टांगून लहानग्यांच्या गळी ऊतरवणे... मूळात लिंकनन जे पत्रात लीहलय ते त्याच्या अनूभवाचे सार आहे आणी ते म्हणजेच जणू अंतीम सत्य असल्याप्रमाणे घोकवणे म्हणजे कीव करण्याचा कळसच. ज्या गोश्टी प्रत्येकाने अनूभवातून व्यक्तीगत पातळीवर ऊमजून वीकसीत करायच्या आहेत व मग समवय्स्कांशी शेअर करायच्या आहेत त्याची अशी घोकंपटी कोवळ्या जीवांना करायला लावणे नक्कीच नींदनीय होय. त्या मीत्राचा महामूर्ख बाप हे सूध्दा वीसरला होता की हे पत्र मूलाला न्हवे तर हेडमास्तरांना आहे आणी त्यात सूध्दा "जमलं तर शीकवा" हा सल्ला आहे. हे सगळ शीकवाच असा आदेश न्हवे. :(

पाषाणभेद's picture

11 May 2011 - 12:57 am | पाषाणभेद

एकदम सही निरिक्षण व प्रतिसाद. मित्राचे वडिल महामुर्ख तरी असतील किंवा शामा तरी असतील. (शाळेतून ते पत्र ढापून घरी आणले असेल.)

गोगोल's picture

9 May 2011 - 9:58 pm | गोगोल

कॉलिंग १९१० .. कॉलिंग १९१०
वुई हॅव अ डिलिव्हरी फॉर यु.

वेताळ's picture

10 May 2011 - 10:08 pm | वेताळ

फेरविचार! एखादी गोष्ट खरेदी कराविशी वाटली की स्वतःला ३० मिनिटे दे. फक्त ३० मिनिटे आणि फेरविचार कर. त्या ३० मिनिटांनी तरी जर तुला ती वस्तू खरेदी कराविशी वाटली तर जरूर कर.

असे जर ती पोरगी विचार करित बसली तर तिचे आयुष्य विचार करण्यातच निघुन जाईल.