मुलीस पत्र
लेखनप्रकार
प्रिय रिया,
हा हा म्हणता केवढी मोठी झालीस बाळा, तुला पंख फुटले. माझा अजूनही विश्वास बसत नाही की कालपरवा पर्यंत अंगणात खेळणारं माझं बछडं उद्या नोकरीनिमित्ताने दुसर्या देशात भुर्र उडून जाणार आहे. अशा वेळी तुझ्या या वेड्या आईचं मन सैरभैर होणं साहजिकच आहे. तुला मी देता येतील तितके चांगले संस्कार दिले, बाळकडू पाजलं, वेळोवेळी उपदेशाचे डोस दिले मग तुला आवडो अथवा न आवडो. पण काही गोष्टी तरीही राहूनच गेल्या.
मानापमान -रियु मी तुला कधी हे सांगीतलं का की गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो.
संस्कार -आपण नेहमी झाड पहातो. झाड कसं वाढतं सांग पाहू मला. वरवर, सूर्याच्या दिशेने वाढतं बरोबर? पण त्याच झाडाला खत पाणी कोण आणतं? मूळं, जी की मातीत खोलवर रुजतात. त्याचप्रमाणे तुझा खूप विकास होईल, चौफेर प्रगती होईल पण तू नेहमी हे लक्षात ठेव की तुझ्या ध्येयपूर्तीस आवश्यक असे विचार, खाद्य तुला तुझ्या संस्कारांच्या मातीतूनच मिळेल.
फेरविचार - तू मोहमयी जगात प्रवेश करणार आहेस. तुझ्या हातात पैसा खुळखुळणार आहे. तुला मोह होणं स्वाभाविकच असेल. मग तो मोह टाकाऊ, निकस खाद्यपदार्थांचा असो की अनावश्यक वस्तूंवर पैशाचा अपव्यय करण्याचा असो. या मोहावर एक रामबाण उपाय आहे - फेरविचार! एखादी गोष्ट खरेदी कराविशी वाटली की स्वतःला ३० मिनिटे दे. फक्त ३० मिनिटे आणि फेरविचार कर. त्या ३० मिनिटांनी तरी जर तुला ती वस्तू खरेदी कराविशी वाटली तर जरूर कर.
स्तुती - स्तुतीस भुरळू नकोस तसेच कटू बोलणारी व्यक्ती नेहमी वाईटच असते असेही गृहीत धरू नकोस्.साखरेचेच उदाहरण घे. साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.तेव्हा सदैव स्वतःचा सारासार विवेक जागृत ठेव.
कष्ट - गरीबांचे कष्ट कधीही विनामोल घेऊ नकोस तसेच तुझ्या स्वतःच्या कष्टाचे मोल नेहमी जाण. आपल्या मित्रमैत्रिणींना, स्नेह्यांना, नातलगांना आपण केवळ पैशानेच नव्हे तर कष्टरूपाने, वेळरूपाने मदत करू शकतो, दिलासा देऊ शकतो. पारखून मैत्री कर. मैत्रीसारखी सुंदर नाती फार कमी आहेत या जगात.
वाचा -शेवटचे पण महत्त्वाचे स्वतःची जीभ कधीच खराब करून घेऊ नकोस. समोरची व्यक्ती निंदा करत असेल, कटू बोलत असेल, तर तू तेथून निघून जा कारण ते तुझ्या हातात आहे पण त्या व्यक्तीच्या पातळीवर उतरू नकोस.
तुला वाटेल आई नेहमी प्रवचन देते. पण तू दूर , एकटी जाणार म्हणून या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. बाकी तू सुजाण आहेसच. मला खात्री आहे की तू यशस्वी होशील. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदोदीत आहेतच.
तुझी आई
वाचने
12991
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
वाचकांनी जमल्यास/आवडल्यास
In reply to वाचकांनी जमल्यास/आवडल्यास by शुचि
आंक्षी बराबर्हे !! ऑस्सम पत्र =))
In reply to आंक्षी बराबर्हे !! ऑस्सम पत्र =)) by टारझन
बायकोला विंग्रजितुन लौलेटर
In reply to बायकोला विंग्रजितुन लौलेटर by नरेशकुमार
सुचलं होतं .. एक वॅलेंटाईनचं
In reply to सुचलं होतं .. एक वॅलेंटाईनचं by टारझन
अक्च्युअल लौलेटर मध्ये हि एकच
In reply to सुचलं होतं .. एक वॅलेंटाईनचं by टारझन
स्पेलिंगमध्ये किंचित गडबड होत आहे काय?
मातृदिनानिमित्त सुचलेलं
In reply to मातृदिनानिमित्त सुचलेलं by रेवती
एक शक्यता
In reply to एक शक्यता by पंगा
साखर तोंडाला गोड लागते, परंतु
!
(बाकी, आईचे मुलीस पत्र हा आई आणि मुलगी यांच्यातला खाजगी मामला नसावा काय? म्हणजे, ठीकाय, Pandit Nehru could get away with it, and probably got paid for it, as well, वगैरे वगैरे, पण म्हणून सगळ्यांनीच आपापली खाजगी पत्रे जाहीरपणे चव्हाट्यावर आणायची? यह बात कुछ जँची नहीं| उद्या 'व्हॅलेंटाइन्स डे'ला नवराबायकोंतली - किंवा सिग्निफिकंट अदरांतली / वुड-बी सिग्निफिकंट अदरांतली - जाहीर प्रेमपत्रेही प्रसिद्ध होऊ लागली, तर बहार यावी.)
In reply to ! by पंगा
गंमत म्हणून वरील लेख लिहीला
In reply to गंमत म्हणून वरील लेख लिहीला by शुचि
गंमत??????
In reply to गंमत?????? by पंगा
तो साधा सरळ उपदेश आहे.
In reply to तो साधा सरळ उपदेश आहे. by शुचि
सीधी बात!
In reply to सीधी बात! by पंगा
वाद
In reply to वाद by शुचि
एक प्रयत्न
In reply to एक प्रयत्न by मुक्तसुनीत
पंगा
उपदेश
In reply to उपदेश by पिवळा डांबिस
साखरेचं तेच ..... पंगा यांचे
In reply to साखरेचं तेच ..... पंगा यांचे by शुचि
हम्म!
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
सुंदर!!!
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
अरे वा छान मुद्दे अॅड केलेत
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
अरे वा छान मुद्दे अॅड केलेत
In reply to अरे वा छान मुद्दे अॅड केलेत by मुलूखावेगळी
काका, एवढा गोग्गोड आग्रह मोडू
In reply to काका, एवढा गोग्गोड आग्रह मोडू by शिल्पा ब
पिडाकाकांचा विचार एकदम पटेश
रो़की बाल्बोआ शेवटचा भाग (हींदी डबींग)
In reply to रो़की बाल्बोआ शेवटचा भाग (हींदी डबींग) by आत्मशून्य
????
In reply to ???? by शुचि
आहो ताई
In reply to आहो ताई by आत्मशून्य
गॉट इट!
आत्मशुन्य लई भारी प्रतिसाद,
हे पत्र म्हणजे अगदीच
शुचि ताइंच्या मानपमानाच्या
शुचि ताईंनी लिहिलेले पत्र छान
In reply to शुचि ताईंनी लिहिलेले पत्र छान by इंटरनेटस्नेही
बाकी लवकरच मुलास पत्र देखील
In reply to बाकी लवकरच मुलास पत्र देखील by मुलूखावेगळी
या उपप्रतिसादाने एकदम
(पत्र) लेख वाचला नाही. आमच्या
शुचीताई छान पत्र आहे...
त्यामुळे ' कोणताही निर्णय
In reply to त्यामुळे ' कोणताही निर्णय by परिकथेतील राजकुमार
पण मग काही सदस्य 'एकोळी धागा'
यावरून अब्राहम लिंकनचं
In reply to यावरून अब्राहम लिंकनचं by आत्मशून्य
एकदम सही निरिक्षण व प्रतिसाद.
कॉलिंग १९१०
हे शक्य आहे का?