मदत करा

मीनाक्षी देवरुखकर's picture
मीनाक्षी देवरुखकर in जनातलं, मनातलं
27 Apr 2011 - 9:57 am

नम्स्कार,
मी एथे नवीन अहे.
मी सध्या सिद्नी मधे Southern Cross University मधे शीक्तेय
मी खूप दिव्संपासून एकत फील करत होते
नेत वर browse कर्ता कर्ता, मला हि सीत दिस्ली.
एथे खूप वचाय्ला मिल्ट. (sorry i cant write marathi proper here )
मला अज, लिहावस वाटल, करण पर्वाच मझ्या एका मित्रावर इकडचे स्थानिक मित्र चोताश्या कार्णावरून भांड भांड भानडले, तोंडावर ठून्क्ले, मारल सुद्ध
मी एथे एकटी राहते, सारखी भीती वाट्त राहते ....
खूप कंटाळा येतो, शिकावस वाट्त नही .
पैसे भरलेले वया जातील अशीच परत आले तर
मी कय करू ?
पोलीस सुध मदत करत नाहीत
(i am helpless , cant manage this mental stress )

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

27 Apr 2011 - 10:05 am | मराठमोळा

घाबरून जाऊ नका. आलेल्या परिस्थितीवर शांत डोक्याने तोडगा काढा. तिथे रहाणे अगदीच अशक्य असल्यास परत येणे कधीही चांगलेच.

सिडनी - मेलबर्न मधे माझे काही मित्र आहेत. तुम्हाला काही मदत हवी असल्यास व्य. नि. करा. या साईटवर व्यक्तीगत निरोप (ईमेल) पाठवण्याची सुविधा आहे.

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2011 - 10:07 am | टवाळ कार्टा

तिथे महाराष्ट्र मंडळ आहे का?

तेजायला या ऑस्ट्रेलिया वाल्यांना जाम माज आलाय,
असो तुम्ही तिथल्या काही भारतीयांची मदत घेऊ शकता, किंवा कदाचित इंडिअन अम्बेसि मध्ये मदत मागू शकता, \
तुम्हाला सुद्धा धमक्या येत आहेत कि तुम्ही झाला प्रकार बघून घाबरल्या आहात?

आपण इथून कसे भैय्यांना हक्लावतो, तसेच ते वागत आहेत, यात त्याचं काही चुकलं का?

नरेशकुमार's picture

27 Apr 2011 - 11:13 am | नरेशकुमार

Don't worry, everything will be alright !

इंटरनेटस्नेही's picture

27 Apr 2011 - 12:02 pm | इंटरनेटस्नेही

कॉल 911

मराठी_माणूस's picture

27 Apr 2011 - 1:25 pm | मराठी_माणूस

परत आपल्या माणसात येणे केंव्हाही चांगले.
विपरीत मानसीक परीणाम , आयुष्यातील कीतीतरी चांगली वर्षे वाया घालवु शकतो.

वात्रट's picture

27 Apr 2011 - 5:15 pm | वात्रट

धीर धरा..
म्हणजे काय तर छान दिवस येतिल यावर वि श्वा स ठेवा..
परदेशात गेल्यावर एकतेपणामुळे येणारा हा अनुभव साहजिक आहे.
मन कशात तरि गुन्तवा..
मि स्वत या परिस्थितितुन गेलो आहे.
Positive Thinking वर भर द्या...

घरि परत येणे हा मार्ग आहेच.
पण तो शेवटचा option .

वपाडाव's picture

27 Apr 2011 - 6:37 pm | वपाडाव

http://www.misalpav.com/node/14079
बाई, हा धागा अन त्यावरील प्रतिक्रिया वाचा ...
तुमच्या मनातील अविचारांचे मळभ दुर होण्यास मदत होईल..
तसेच.. जरा स्वत:चे मन कशात तरी गुंतवुन ठेवा.
विरंगुळा, करमणुकीची साधने बघा......
एकटं राहु नका (शक्य असेल तित्के टाळा.)
पण असं शिक्षण मध्येच सोडुन देण्याचा विचारच नको मुळी...
खा-प्या-फुका-पडा-बागडा-आनंदी र्‍हावा.

सर्वात महत्वाचं मिपावर येत र्‍हावा, कशाचाच ताण म्हणुन राहणार नाही...

अनन्या वर्तक's picture

27 Apr 2011 - 7:39 pm | अनन्या वर्तक

सुरवातीला अस होत. घाबरुन जान्या सारख कहीच नाही आहे. एक प्रश्न वीचारुन बघा......पुन्हा परत जायच आहे की Australia मधे रहायच आहे? रहायच असेल तर As a International Student हे सर्व अनुभव येनारच. Not a big problem…..Just cool.

मीनाक्षी, जगात सगळ्या देशांत गडबड गोंधळ करणारी लोकं कमी अधीक प्रमाणात असतातच. घाबरु नका. आणि सुरवातीच्या काळात हा एकटेपणा जाणवणे स्वाभाविक आहे. थोडा वेळ द्या. काही दिवसांनी आपोआप कॉलेज मध्ये नवीन मित्रमैत्रिणी होतील. मग मजा येईल. स्वानुभवाने (कॉलेजचा नाही नोकरीचा) सांगतोय. बाकी परदेशात स्थानिक मित्र मैत्रिणी पण बनवा. फायदेशीर ठरेल. यासंदर्भात काही टिप्स हव्या असल्यास व्यनी करा.........

स्वतःला कशात तरी गुंतवून ठेव. उत्तम मनोरंजनाचा मार्ग म्हणजे मिपावर येत जा वरचेवर.
ऑस्ट्रेलियामध्ये काही मित्र मैत्रीणी आहेत, खूपसे मिपाकरही आहेत.
काळजी करू नकोस. मानसिक ताण येतो कधि कधी.. पण हळूहळू परिस्थिती सुधारेल. बी ब्रेव्ह!

मदत लागल्यास सांगा.माझा एक मित्र तिथे आहे फ्यामिलीसाहित राहतो.जास्तीची काळजी करू नका. मुख्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीत डोके शांत ठेवा म्हणजे झाले.