हिंदूंना ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करण्याच्या भरतातील अनेक घटनांबाबत आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. मात्र गेल्यावेळी मी भारतात जेव्हा गेलो तेव्हा भारतातल्या परिस्थीतीबाबत चे अधिक स्पष्ट चित्र समजले. भारतातील बहुसंख्य हिंदूंना हे माहितच नाही, की हिंदुत्वाच्या विरोधात एक युध्द पुकारले गेले आहे आणि त्याचे गांभीर्य किती भयानक आहे. हिंदुत्वाला अनेक ठिकाणी अनेक मार्गांनी विरोध केला जात आहे. त्यामुळे भारतातील काही ठिकाणांमध्ये हिंदूमधील उपासनेचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे.
२००१ मधील जून महिन्यात वैदिक संस्कृतीबाबात प्रवचनांच्या निमित्ताने मी भारतातील अनेक शहरांमध्ये प्रवास केला. मुंबई, नागपूर, वरंगळ, विशाखापट्टणम, विजयवाडा, हैद्राबाद, बंगलोर , त्रिवेंद्रम आणि चेन्नई येथे गेलो असताना तिथल्या काही आध्यात्मिक क्षेत्रातल्या श्रेष्ठ व्यक्तींशी माझी भेट झाली. त्यानंतर धर्मांतर हा किती भयंकर विषय आहे, हे मला समजले.
मी जन्माने ख्रिश्चन आहे. माझे शिक्षण , बालपण सर्व काही ख्रिश्चन संस्कृतीत झाले. पण आता माझा ख्रिश्चन परंपरेशी काहीही संबंध राहिलेला नाही. पण मला ख्रिश्चन धर्मांतरणाची पध्दत चांगली माहित आहे. जीजसने सांगितलेल्या प्रेम आणि मानवतेच्या संदेशाचे विकृत रुप जगाच्या समोर मांडले जाते. दुसर्या धर्माची कायम स्वरुपी निंदा नालस्ती करण्याची ख्रिश्चन धर्मोपदेशकाची सवय असते. ख्रिश्चन सोडून इतर धर्माबाबतच अशी निंदा केली जाते, असे नाहि. ख्रिश्चन धर्मातच कैथोलिक , प्रोटेस्टंट आणि अन्य संप्रदाय एकमेकांवर अशीच चिखलफेक करत असतात.
हिंदू चालीरीती, संस्कृती आणि वेशभुषा करुन भारतात खोलवर रुजलेल्या संस्कृतीमध्ये ख्रिश्चनीटी घुसवण्याचा प्रयत्न केला जातो. चर्चच्या चिन्हामध्ये कमळातुन उगवलेला क्रॉस , भगव्या वेशातील धर्मगुरु आणि काही चर्चचे बांधकाम एखाद्या मंदिराप्रमाणे असल्याचे, आपल्याला याच कारणामुळे पहावयास मिळते. हे जर असेच सुरु राहिले, तर एक दिवस भारतात हिंदूंपेक्षा ख्रिश्चन अधिक झालेले दिसतील . उत्तर भारतात प्रवास करताना ख्रिश्चन धर्मगुरु धर्मांतरासाठी करत असलेल्या अनेक युक्त्या मला समजल्या. ईशान्य भारतातील एखादा आदिवासी जर ख्रिश्चन व्हायला तयार झाला, तर त्याला पॉलिस्टरची स्वस्तातली पैंट दिली जाते. तर आपल्या भावाला ख्रिश्चन करायला मदत करणार्याला मोटरसायकल दिली जाते. मध्यप्रदेशात काही मिशनरी आदिवासींना व्याजाने कर्ज देतात. हे कर्ज आदिवासि परत फेडू शकत नाहीत. जर ते ख्रिश्चन झाले तर त्याचे कर्ज आणि त्यावरचे व्याज दोन्ही माफ केले जाते. मिशनर्यांकडून नेहमी वापरण्यात येणारी आणखी एक युक्ती म्हणजे आजारी आदिवासींना सर्वसाधारण औषध घ्यायला सांगितले जाते. त्या औषधामुळे अर्थातच काहीही गुण येत नाही. त्यानंतर योग्य औषध दिले जाते आणि जिजसच्या प्रार्थनेनंतर ते ऋंग्णाला दिले जाते. साहजिकच ऋग्णाला बरे वाटते. अर्थात त्याचे कारण औषध हे आहे. जिजसशी त्याचे काहीही घेणे देणे नाही.
धर्मसभेमध्ये ख्रिश्चनेतरांना सामुदायीक उपचार करणे ही आणखी एक महत्वाची युक्ती आहे. यावेळी 'आपण आजारी असल्याचे भासवण्यासाठी' काही जणांना पैसे देऊन तयार केले जाते. धर्मसभेमध्ये त्यांना समोर बोलावले जाते आणि त्यांचे आजारपण अचानक चमत्कारासारखे नाहीसे होते, यामुळे ख्रिश्चन झाल्यास आपल्यालाही काही लाभ होऊ शकतो , असे साध्या भोळ्या आदिवासींच्या मनात आले, तर त्यात त्यांची काहीच चूक नाही. सुशिक्षीतांवर या युक्त्यांचा काहीही परिणाम होत नाही. मात्र अशिक्षीत आणि भोळ्या आदिवासींवर याचा परिणाम होतोच आणि ते ख्रिश्चनांकडे आकृष्ट होतात. म्हणूनच ख्रिश्चन धर्मगुरु हे नागरी भागापेक्षा आदिवासि भागातच धर्मांतराचे काम करतात. फसवणुकीने त्यांना आपले धर्मांतराचे काम अव्याहतपणे सुरु ठेवता येते. हे धर्मांतर बायबलमध्ये कोठेही सांगण्यात आलेले नाही. केवळ धार्मीक कारणासाठी धर्मांतरण करणार्यांबद्दल हिंदूंचा काहीही आक्षेप नाही पण फसवणुकीनी केलेल्या धर्मांतरणाबाबत हिंदू ना आक्षेप आहे.
ख्रिश्चन झाल्यावर दलितांना कमी दर्जाच्या जातीसारखी वागणूक मिळणार नाही, असे आश्वासन नवख्रिश्चनांना दिले जाते. मात्र एकदा धर्मांतर झाल्यानंतर या आश्वासनात काहीही तथ्य नसल्याचे लक्षात येते. ख्रिश्चनांमध्ये जातीचे पडदे अधिक भक्कम असल्याचेच निदर्शनास आलेले आहे. जातीभेद ही तर ख्रिश्चनांची मानसिकता आहे. नीच जातीतल्या ख्रिश्चनांसाठी वेगळे प्रवेशद्वार , वेगळी बैठकव्यवस्था किवा अन्य व्यवस्था केल्या जातात. लहान जातीतल्या ख्रिश्चनांच्या दफनविधीसाठी सिमिट्रीही वेगळ्या असतात. याचे खरे स्वरुप समजल्यावर नव्याने ख्रिश्चन झालेले अनेक जण आपल्या मूळ हिंदू धर्मात परत येतात. त्यांना विश्व हींदू परिषद हिंदू धर्मात येण्याचा मार्ग उपलब्ध करुन देत आहे.
धर्मांतरासाठी असली फसवणूक आणि दुहेरी मापदंड ख्रिश्चन नेहमी वापरतात. विश्व हींदू परिषदेने सुरु केलेल्या या शुध्दीकरणाला ख्रिश्चन नेहमीच आक्षेप घेतात. त्यांनी बर्याच वेळा या शुध्दीकरणाच्य विरोधात आक्रमक भूमिकाही घेतली आहे. नागालैण्ड्च्या बाप्टिस्ट कन्वेन्शनचे सचिव रेव्हरंड व्ही के नूह यांनी तसे उघड म्हटले आहे. 'जर कोणी ख्रिश्चनांवर श्र्ध्दा लादण्याचा प्रयत्न केला तर ख्रिश्चन ते सहन करणार नाहीत. शुध्दीकरणाविरोधात ख्रिश्चन युध्द करायलाही तयार आहेत.'
हिंदूंच्या शुध्दीकरणाच्या चळवळीमुळे ख्रिश्चन धोक्यात आले आहेत, अशी ओरड सुरु केली गेली होती(महाराष्ट्र हेराल्ड ११/७/१९९८)
ख्रिश्चनांच्या धर्माबाबत हिंदू नेहमीच सहिष्णु असतात. कारण सर्व धर्म एकाच चिरंतन सत्याकडे घेऊन जातात, असे हिंदू धर्म मानतो . म्हणून अन्य कोणत्याही धर्माला हिंदू कधीच विरोध करत नाहीत. मात्र सर्व धर्माचे मत हिंदूंप्रमाणे नाही. हिंदू संस्कृती उखडून फेकून द्यायला हवी असे काहींना वाटते. पूर्वांचलातिल आसाम, नागालैंण्ड आणि मिझोरामसारख्या राज्यांमध्ये गेल्या २५ वर्षामध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या २०० टक्के वाढली आहे. काही भागात तर हिंदू उपासना पध्दतीवरच बंदी आहे. लोकशाहीने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य गेले कोठे? या भागात हिंदू उघडपणे आरतीही करु शकत नाहीत. दुर्गेच्या मूर्त्या चोरल्या गेल्या, फोडल्या गेल्या म्हणून या भागातला दुर्गापूजा उत्सव बंद झाला आहे. हा भाग भारतापासुन वेगळा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
प्रेमाचा खरा संदेश जर कैथोलीक चर्चला सर्वांना द्यायचा असेल आणि त्याद्वारे सर्व मानवांचे जीवन प्रेममय करायचे असेल तर दुसर्या धर्माच्या बाबतीतही तसेच प्रेम दाखवले गेले असते. पोपनी सर्व आशिया खंड ख्रिश्चन करण्याचा संदेश दिला आहे. त्यावरुन तरी सर्व धर्मामध्ये हा प्रेमाचा संदेश दिला जाणार नाही , असेच स्पष्ट होते. ख्रिश्चनांच्या सर्व संप्रदायामध्ये हीच शिकवण दिली जात आहे.
नवी दिल्लीमध्ये असताना मी 'नैशनल कमिटी फॉर वुमेन' च्या सदस्या , शांती रेड्डी यांना भेटलो होतो. भारतीयांच्या तरुण मुलांना ख्रिश्चन पळवुन नेतात असे त्यांनी मला सांगितले. गरिब आदिवासी दांपंत्याकडून त्यांची लहान मुलगी चक्क २ त ५ हजार रुपयांना विकत घेतली जात असे. हीच मुलगी नंतर परदेशात ३० तो ४० हजार डॉलरला विकली जाते. ख्रिश्चन मिशनर्यांच्या घरात सापडलेल्या नोंदीनुसार हा एक चांगला व्यवसाय आहे. आतापर्यंत मुलींच्या विक्रीच्या किमान २५ तरी घटना घडून गेल्या आहेत. भारतीय प्रशासनाने आतापर्यंत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ३०० मुलींना या नरकात जाण्यापासुन वाचवले आहे. ज्या कामासाठी मिशनरि जेथे काम करत असतात तेथे त्या व्यतिरीक्त असे नफा कमावण्याचे उद्योग सर्रास केले जातात. जेव्हा हिंदू अशा दुष्प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा त्यांना मुलतत्ववादी, संकुचित विचार करणारे आणि जातीयवादी असे ठरवले जाते. हिंदूंनी आक्रमक प्रतिक्रिया देऊ नये असे कां म्हटले जाते?
भारतातील वैदिक संस्कृती हळू हळू नष्ट होत जाण्याचे , शिक्षण क्षेत्र हे आणखी एक कारण आहे. भारतीय शिक्षणक्रमा मधुन वैदिक पाठ्यपुस्तके केव्हाच हद्दपार झाली आहेत. भारतीय मुलांना या वैदिक साहित्याचा काहीही अभ्यास मिळत नाही. मात्र ख्रिश्चन मिशनर्यांच्या शाळेत ख्रिश्चन संस्कृतीचेच शिक्षण सक्तीने दिले जाते. उर्दू शाळेत कुराणचे आणी ख्रिश्चनांच्या शाळांमध्ये बायबलचे शिक्षण तर दररोजच दिले जाते. तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकारने त्यांना याबाबत सूटच दिली आहे.मध्यम वर्गीय भारतीय याच शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. शैक्षणिक क्षेत्रात हिंदु संस्कृती अशाने लुप्त होईल अशि भीति यामुळे वाटायल लागली आहे. 'भगवत गीता', 'रामायण', 'पुराण' आणि अन्य वैदिक साहित्य हे केवळ पुराणकथा नाहीत. जगातल्या अतिपुरातन हिंदु संस्कृतीचा एक भाग म्हणजे हे साहित्य आहे. अन्य धर्म खोटे आणि राक्षसि आहेत , केवळ जिजसचा मार्ग अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातो असे ख्रिश्चन मानतात. नवी दिल्लीत 'ईस्कॉन' च्या मंदिरातले काही साधक शाळांमध्ये जाऊन मुलांना वैदिक शिक्षण देतात. 'तुमचा देव कोणता?' 'तो देव आमच्यासाठी काय करु शकतो?' असे प्रश्न तिथली मुले विचारत असतात. त्यांच्या मनात हे प्रश्न ख्रिश्चन मिशनर्यांनीच भरलेले असतात. धर्मांतर करण्याची ही चाल नाही का?
आपल्या धर्म, संस्कृती, इतिहास आणि परंपराबाबत अनादर दाखवण्याचे विष , मिशनरीच मुलांच्या मनात पेरत असतात. भारतात सगळीकडे 'सेंट झेवियर स्कूल' नावाच्या शाळा दिसतात. हा फ्रान्सिस झेवियर कोण होता हे लोकांना माहितही नाही. तो धर्मगुरु, संत होता असेच सर्व समजतात. 'धर्मांतर केल्यानंतर माणसांना त्यांची मंदिरे आणि मुर्त्या फोडून टाकण्याचे आदेश' या झेवियरने दिले होते. 'ज्या हातांनी मूर्त्यांची पूजा केली तेच हात त्या मूर्त्या फोडून टाकतांना मला अतिशय आनंद होतो' असे त्याचे वक्तव्य होते. भारतीय संस्कृती नष्ट करण्याचेच काम त्याने आयुष्यभर केले.
गेल्या ६० वर्षात भारतातल्या राजकारण्यांनीही हिंदू विरोधी धोरण राबवण्याचेच काम केले आहे. शैक्षणिक आणि आर्थिक धोरण देशाच्या नशीबी मारले जाते, त्यात धार्मिक अल्पसंख्याकांसाठीच सुधारणा सुचवल्य जातात. केवळ मते मिळवण्यासाठी काँग्रेसने नेहमीच हिंदूंच्या विरोधात धोरण राबवले आहे. भारतातील १५ तो २५ वर्षातील पाश्चात्यांच्या परिणामामुळे लोकांनी वैदिक संस्कृतीकडे पाठ फिरवली आहे. चित्रपट, फैशन आणि तीच जिवन पध्दती स्वीकारायचे वेड या मुलांना लागले आहे. 'लिव्ह इन रिलेशनशीप' सारखी विकृती यामुळेच वाढीस लागलि. मंदिरामधील संस्कृत पंडीतही आता दिसेनासे होऊ लागले आहेत. 'रामायण' आणि 'महाभारत' केवळ टीव्ही वरच्या मालिकांमध्ये राहिले आहेत. आपण केवळ जमीन आणि प्रोपर्टिची काळजी करत आहोत, मात्र संस्कृती नष्ट होत आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही.
भारतावर आक्रमणकर्त्यांनी अनेक वेळा आक्रमण केले आणि भारत त्यातूनही अस्तित्वात राहीला. भारतातील ऐश्वर्य जरी लुटले गेले, तरी वैदिक संस्कृति अबाधित आहे. आजच्या पिढीने जर या वैदिक ज्ञानाकडे पाठ फिरवली, तर आणखी काही दशकांनी हे ज्ञान उपलब्धही असणार नाही. भारतात ८५ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. पण यामध्ये १५ टक्के बॉध्द, शिख आणि जैनही समविष्ट आहेत. म्हणजे हिंदूंची लोकसंख्या ७० टक्के आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या (मुस्लिम आणि ख्रिश्चन) शिक्षणापुअढे आणि ख्रिश्चनांच्या धर्मांतराच्या सध्याच्या वेगापुढे हे ७० टक्के आणखी किती दिवस शिल्लक राहू शकतील. आणखी काही पिढ्यांनंतर भारतात हिंदू बहुसंख्य राहणार नाहीत. सरकारकडे केल्या जाणार्या मागण्या आणि निवडणुकीत मतदान करणारे सगळे, बदलण्याच्या वाटेवर आहे. याशिवाय हिंदूंची संख्या घटल्यामुले कायदेही वाढणार्या अल्पसंख्याकांच्या हिताचे असतील. आणि एखाद्या धर्मक्षेत्राच्या ठिकाणीच हिंदू बघायला मिळतील.
या सर्व माहितीचा हेतू हा, की हिंदू सनातन धर्मियांनी सत्य परिस्थिती ध्यानात घ्यायला हवी. प्रतिक्रिया न देण्याचे त्यांचे धोरण अस्तित्वावरच घाला घालू शकते. निष्क्रिय राहण्याचा फायदा अनेकजण घ्यायला टपून बसले आहेत. आपल्या वैदिक संस्कृतीचे आपल्यालाच रक्षण करायल हवे आहे. त्यासाठी एक्त्रितपणे प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. काही काळापुर्वीच १ टक्क रशियन नागरिकांनी आपण हिंदू असल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. 'ईस्कॉन' च्या शिकवणुकीमुळेच हे शक्य झाले. याचा एक मोठा सामाजिक परिणाम झाल. 'वैश्विक वैदिक समाज' म्हणुन आपण जगभरातल्या हिंदूंना एकत्र केले पाहिजे. सनातन वैदिक परंपरेचे केंन्द्र म्हणुनच भारताचे रक्षण व्हायला पाहिजे ऐनी बेझंट यांनी या परंपरेचे अगदी यथार्थ शब्दात वर्णन केले आहे. डॉ. जगतियानी यांनी त्यांच्या 'हिंदू लाईफ लाईन ऑफ इंडिया' या पुस्तकात या वैदिक परंपरेची महती वर्णन केली आहे. हिंदू धर्मापेक्षा अधिक शास्त्रशुध्द, सनातन, तत्वज्ञानी आणि आध्यात्मिक विचार अन्य कोणत्याही धर्मात सापडत नाहीत. याबद्दल जेवढे अधिक जाणून घेतले जाईल. तेवढेच ते आवडू लागतील. हिंदुत्वाच्या पायातच भारताचि मुळे रुजलेली आहेत. त्यामुळे येथे असलेल्या सर्व संप्रदाय आणि उपासना पध्दतीचा पायाही, हिंदुत्व हाच आहे. जर हिंदूनीच हा पाया ऑळखला नाही तर हिंदूंना वाचवण्यासही कोणी येणार नाही. निष्क्रिय राहून वाद विवाद करत बसणे चुकीचे आहे. आपली संस्कृती जिवंत राहिली तरच भविष्यात आपल्या पिढ्या हिंदू म्हणुन जिवंत राहतील . समाजातल्या हिंदुविरोधी आव्हानांना ऑळखुन आजच त्यांचा सामना करायला तयार व्हायला हवे.
स्टिफन नैपयांच्या लेखाचा श्री संदीप कुलकर्णी द्वारे केलेला अनुवाद साभार वाचकांसाठी :-
प्रतिक्रिया
7 Apr 2011 - 3:10 pm | तर्री
वास्तव. ऊत्तम अनुवाद.
हिंदूचे संघटन हा चिंतेचा विषय.
हिंदूची सहिष्णुता निंदेचा विषय.
7 Apr 2011 - 3:23 pm | टारझन
असेच म्हणतो .
-(बदाम) तिर्री
7 Apr 2011 - 3:22 pm | योगप्रभू
(हा प्रतिसाद कल्याणकरांना किंवा कुणा व्यक्तीला उद्देशून नाही. लेख वाचून मनात आले ते पुढे मांडले इतकेच.)
जे आजवर सक्तीने बाटवले गेले आहेत त्यांचे पुन्हा शुद्धीकरण करण्यासाठी हिंदू धर्म आणि त्याचे सनातनी रक्षक किती व्यापक प्रयत्न करत आहेत? मुंबईत पूर्वी मसुराश्रमातच शुद्धीकरण विधी होई. अशा संस्था गावोगावी का नाही स्थापन झाल्या?
बरं हिंदू धर्मात सोपेपणा कधी येणार? पूर्वी वसई भागात पोर्तुगिज मिशनर्यांनी एक साधी युक्ती वापरली. लोक ज्या विहिरीचे पाणी पितात त्यात आम्ही काल पाव टाकला होता, एवढे नुसते जाहीर केले तरी भोळ्याभाबड्या आणि मनाशी प्रामाणिक लोकांनी आपण धर्मांतरित झाल्याची समजूत करुन घेतली. अशावेळी गावच्या धर्मपंडितानेही त्याचा प्रतिकार तेवढ्याच सोप्या मार्गाने करायला हवा होता. पळीभर गोमूत्र/गंगाजल किंवा ग्रामदेवतेचा प्रसाद देऊन ते लोक पुन्हा शुद्ध झाले, असे का नाही जाहीर केले? म्हणजे हिंदूला धर्मांतरित करण्यासाठी एक थापही पुरेशी असते, पण त्याला पुन्हा हिंदू होण्यासाठी मात्र चार चार दिवसांचे होमहवन आणि शुद्धीक्रिया.
आधी हिंदू धर्माचा समानतेचा पाया मजबूत करा, संघटित व्हा आणि मग प्रतिकार करा. अन्यथा 'त्याने मला मारले, मला त्याने मारले' ही ओरड हिंदू अल्पसंख्य होईपर्यंत सुरुच राहील.
7 Apr 2011 - 8:45 pm | पंगा
त्याची तरी काय गरज होती? पाद्र्यांनी विहिरीत पाव टाकला असो वा नसो, त्याने कोणीही बाटतबिटत नसते, हिंदुधर्माबाहेर वगैरे जात नसते असा स्टँड मुळात घ्यायला कोणी अडवले होते? जो बाहेरच गेला नाही (किंवा 'अशुद्ध'च झाला नाही) म्हटले, त्याला 'परत आत घेण्या'ची (त्याच्या 'शुद्धी'ची) गरज ती काय?
पण नाही. आमच्याच लोकांना आपल्याच लोकांना 'बाहेर' ढकलण्याची खाज अधिक घाई. पाद्र्याच्या पावाचे केवळ निमित्त.
आजवर, आणि विशेष करून पिढ्यानपिढ्यांपूर्वी, जे लोक (सक्तीने किंवा कसेही) बाटवले गेले आहेत, ते हिंदू धर्मात परत यायला तडफडताहेत हे मुळात कोणी सांगितले? म्हणजे हे पुन्हा उलटे बाटवणेच झाले ना? आणि ही उलट्या बाटवाबाटवीची गरज नेमकी कोणाची आहे? जे काही पिढ्यांपूर्वी बाटले होते त्यांची, की त्यांना उलटे बाटवू पाहणार्यांची?
हे जे कोणी काही पिढ्यांपूर्वी बाटलेले लोक आहेत, त्यांचे जर ठीक चालले असेल, पोटापाण्याला व्यवस्थित मिळत असेल, तर त्यांना मुद्दाम उलटे बाटवून घेण्याची गरज किंवा त्यात हशील ते काय? राहू देत की त्यांना आहेत तसेच सुखाने. (मुळात पोटापाण्याला जर व्यवस्थित मिळत असेल, तर आपण होवून किती लोक आणि कशासाठी बाटवून घेतील? उलट किंवा सुलट?)
7 Apr 2011 - 8:51 pm | धमाल मुलगा
तात्विकदृष्ट्या पंगांचे मुद्दे अगदी बरोबर आहेत.
पण सध्याची वस्तुस्थिती काय आहे, किती वाईट आहे ह्याच्या थोऽड्याशा शोधाची आणि माहिती गरज आहे असं प्रामाणिकपणे नमुद करावंसं वाटतं इतकंच म्हणेन.
त्यावेळच्या जात-धर्मभावनांच्या पगड्याचा विचार करता हे फारच दुरापास्त नव्हतं काय?
आज बदललेल्या काळानुसार बदललेल्या समाजात आपण फिरतो, त्या पगड्याखाली हे म्हणणं आजच्या काळात अशी घटना घडता योग्य ठरु शकतंच.
पण काळ जुना आणि विचार नव्या बदललेल्या काळातले ह्यांची मोट कशी जुळावी?
7 Apr 2011 - 9:12 pm | पंगा
होते ना! पण ही आपलीच चूक नव्हती काय?
आम्हीच आमची वाट लावून घ्यायला जर इतके इच्छुक होतो, तर पाद्र्यांना दोष का द्यायचा? ते आपला धंदा करत होते, आणि आपला धंदा चालावा म्हणून जो काही बरावाईट मार्ग सुचेल (आणि चालेल) तो अवलंबत होते. कोणताही व्यापारी हे करेल. आम्हाला जर त्यांच्या खेळात सामील व्हायला (आणि आपल्याच लोकांना दुरावून आपल्याच पायावर धोंडा पाडून घ्यायला) अडचण नव्हती, तर पाद्र्यांना का दोष द्या? ते तर आपला माल विकायला बसले होते!
7 Apr 2011 - 9:47 pm | धमाल मुलगा
आज 'होय, ही चूकच होती.' हे कुणीही बिनशर्त मान्य करेल असं मला वाटतं.
पण परत तेच होतंय, ती चूक होती हे आज कळतं, तेव्हा ती जीवनशैलीचा भागच होती म्हणा, किंवा त्याद्वारे जीवनशैली ठरत होती म्हणावं लागेल.
7 Apr 2011 - 9:59 pm | पंगा
तसे म्हटले तर मग आज त्याबद्दल रडत बसायचे काहीच कारण नाही, नाही का? ज्यांचे धर्मांतर झाले ते झाले, ज्यांचे नाही झाले ते हिंदू राहिले. मामला खतम. दु:ख कशाचे?
7 Apr 2011 - 10:06 pm | धमाल मुलगा
खरं तर म्हणूनच पहिल्या प्रतिसादातलं वाक्य 'सध्याची वस्तुस्थिती काय आहे आणि किती वाईट' ह्याच्या योग्य माहितीच्या शोधाची गरज आहे' असं जे सर्वसामान्यतः म्हणलं ते त्यासाठीच.
7 Apr 2011 - 10:09 pm | पंगा
.
7 Apr 2011 - 10:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ती म्हण काय आहे, 'पाद्र्याला पावाचे निमित्त' का 'पाद्र्याला पावट्याचे निमित्त'?
7 Apr 2011 - 10:15 pm | पंगा
... आपल्याला उपयोगास आल्याशी मतलब.
8 Apr 2011 - 11:07 am | पियुशा
@ कल्यान्कर साहेब,
छोटा मुह बडी बात .........
एक सांगावेसे वाटते ज्यावेळेस भारतावर इंग्रज /.पोर्तुगीजांचे राज्य होते,
तेव्हा आपले (काही) पूर्वज कि ज्यांचा डोळ्यावर जातीयतेचा पगडा होता त्यांनी दलितांना कशी वागणूक दिलीये हे सर्वश्रुत आहे
गावकुसाबाहेरचा दलित समाज ज्याला कधी आपल्याच बांधवांनी मिसळू दिले नाही ,
अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी तर त्यांच्यासाठी स्वप्नवत होत्या ,
गावातील घाण काढणे ,शिळ्या भाकरीच्या मोबदल्यात मनभर लाकडे फोडून घेणे ,हातात गाडगे आणि पाठीला झाडू का? कशासाठी ?
आपण बाटले जाऊ म्हणून? गाव अपवित्र होईल ,एखाद्या हरीजानाचा स्पर्श झाला तरी घाटावर जाऊन १० वेळा आंघोळ?का ?
त्यांना माणूस म्हणून आपणच जगू दिले नाही , त्यांची उपासमार (मी तर कुठे तरी वाचलेलं कि हा समाज कधी कधी इतका अगतिक झालेला कि मेलेली गुरे - ढोरे सुधा खायची वेळ आलेली ) काय बोलणार ?काय हे ?सवर्ण आणि हरिजन हा भेद पुरातन काळापासून चालत आलेला .
मी तर म्हणेन इंग्रजांनी याचाच फायदा घेतलाय आपण ज्यांना वाळीत टाकले अशांना जवळ त्यांनी केले ,त्यांना सामाजात सामावान्यासाठी धर्मानंतर केले खरे पण ते बळेबळे नाही
आपला सामाज आपल्याकडून मिळालेल्या उपेक्षेमुळे स्वतः धर्म बदलण्यास प्रवृत्त झाला हे सांगणे न लागे .....
"आपण जर आपल्या घटकांना आतापर्यंत न्याय देऊ शकलो नाही तर धर्मातारचे काय घेऊन बसलात ?"
ज्याचा त्याचा इच्छिक मामला आहे ,आणि भारतीय कायदा समती देतो ,खरेच बळे-बळे धर्मातर होतेय का ? (स्वत त्यासाठी तयार आहेत ) ?हे पण पाहायला पाहिजे ना !
8 Apr 2011 - 12:06 pm | llपुण्याचे पेशवेll
असो तुम्ही "ल्हान तोंडी मोठा घास" असे लिहीलेच आहे म्हणून प्रतिसाद देण्यात वेळ घालवत नाही.
7 Apr 2011 - 3:30 pm | विनीत संखे
माझ्या वडिलांनी सांगितलेली, ते लहान होते, तेव्हाची ही गोष्ट...
आमच्या गावात बर्याच वर्षांपूर्वी एक मिशनरी आला होता. फियाट मध्ये बसून आल्याने गावातल्या लोकांना त्याचे अप्रुप होते. त्याने अर्धातास वेशीवरच्या शाळेत त्याचा उपदेश केला आणि ख्रिशचन धर्म का चांगला हे पटवण्याचा प्रयत्न केला.
निघताना त्याने त्याची फियाट सुरू केली. पण ती सुरू होईना. त्याने काही तरूण मुलांना गाडीस धक्का मारायला सांगितले. सुरूवातीच्या काही असफल प्रयत्नांनंतर त्याने देवाचे नाव घेऊन गाडीस धक्का मारायला सांगितले. ग्रामदेवीचे नाव घेऊन सगळे धक्का मारू लागले पण गाडी सुरू होईना.
मग त्याने जिजसचे नाव घेऊन धक्का मारायला सांगितले आणि काय आश्चर्य इतका वेळ ढिम्म बसून राहिलेली ती गाडी झटक्यात सुरू झाली.
गावक्र्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही आणि तो मिशनरी "ही जिजसची कृपा" असं जोरात आरोळी ठोकत निघून गेला.
नशीबाने आमच्या गावात कुणीच ख्रिश्चन झाले नाही कारण गावचे शाळेचे हेडमास्तर हिंदू विशारद होते. त्यांनी सर्वांना त्या फसव्या मिशनरीविषयी वेळीच सावधान केले होते.
7 Apr 2011 - 8:51 pm | विकास
अशीच अजून एक सत्य आहे असे म्हणतात पण माझ्यासाठी ऐकीव कथा:
काही मिशनरी वनवासी भागात गेले आणि त्यांनी स्थानिकांची देवाची दगडी मुर्ती आणि लाकडी क्रूस तळ्यात टाकला. अर्थातच मुर्ती बुडाली आणि क्रूस तरंगला. मग ते मिशनरी म्हणाले, बघा, तुमचा देव बुडाला पण आमचा देव तरंगू शकला म्हणजे तुम्हाला तो वाचवू शकेल. सर्व विचार करायला लागले. तेव्हढ्यात एक शहाणी व्यक्ती म्हणाली, की पण आमच्यात देवाला पण अग्नीपरीक्षेतून जावे लागते, तेंव्हा आमचा देव आणि तुमचा (लाकडी) क्रूस यांना देखील अग्नीपरीक्षेतून जाउंदेत... ;) अर्थात प्रकरण तिथेच मिटले.
असो. मात्र केवळ मिशनर्यांना नावे ठेवण्याऐवजी, ते भले त्यांच्या स्वार्थासाठी काम करतात, धर्मात सांगितलेली सेवा करतात, तशी आपण किती करू शकतो/करतो? ह्या मुद्याचा विचार होणे महत्वाचे आहे.
अतिअवांतरः (हा केवळ विनोद आहे, अमेरिकेत अमेरिकन्स कडून कधीकाळी ऐकलेला):
8 Apr 2011 - 12:21 pm | विश्वास कल्याणकर
आसाममध्ये ख्रिस्ती धर्मांच्या प्रसाराचे काम करणारे फादर क्रुझ दादींजींच्या घरि गेले. दादीजींच्या हातात पेढा ठेवून ते म्हणाले, 'हा घ्या प्रसाद!' दादीजी दिलेला प्रसाद खातील की नाही? अशि शंका फादरना होती. पण दादीजींनी प्रसाद ताबडतोब खाऊन टाकला. फादर क्रुझ प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले 'दादीजी!, आपण चर्चचा प्रसाद खाल्ला आहे. आपण ख्रिश्चन झाला आहात. आता आपल्याला बाप्तिस्मा घ्यायला यावे लागेल.'
'कमाल आहे!' असे होणे कधी शक्य आहे का?'
'दादीजि लक्षात ठेव , आपण चर्चचा प्रसाद खाल्ला आहे.'
'अरे खाल्ला ! पूर्ण खाल्ला! त्याने काय बिघडले? तुम्ही दिलेला पेढा इथला आहे. हिंदुस्थानच्या गायिंच्या दुधापासून बनलेला पेढा, साखर येथिल मातितून उगवलेल्या उसापासुन बनलेली. सरपण येथील झाडांच्या फांद्यांचे, केवळ तुम्ही हात लावला, तर सगळे काही बिघडले. आमचा स्वधर्म निकालात निघतो अगदी साफ धुऊन निघतो! खरं म्हणजे मामला उल्टा आहे. आपण वर्षानुवर्षे येथे राहत आहात. आपण येथे खाता, येथे पिता, आपल्या फेफड्यातील वायुदेखील इथलाच. विचार करा. येथील पदार्थापासून बनलेला प्रसाद खाऊन आपली काय अवस्था झाली पाहिजे?'
फादर क्रुझ निरुत्तर झाले. फादरना चोख उत्तर देऊन निरुत्तर करणार्या दादीजी म्हणजे आसाम मधील सुप्रसिध्द क्रांतिकारी महिला कमलादेवी हजारिका, गुवाहाटीत त्यांचे स्मारक दिमाखात उभे आहे.
9 Apr 2011 - 6:55 pm | पंगा
... एखाद्याला जर बाटवून घ्यायचे नसेल, तर पाद्रीच काय, पण खुद्द आकाशातला बाप जरी बाटवायला आला, आणि त्याने (बाटवण्याच्या दृष्टीने) काहीही युक्तिवाद केला, तरी अशी व्यक्ती बाटणे शक्य नाही, हेच यातून सिद्ध होत नाही काय?
मग दु:ख कशाचे? लोक बाटवून न घेण्यास पुरेसे उत्सुक नाहीत याचे?
7 Apr 2011 - 3:45 pm | क्राईममास्तर गोगो
मलाही आठवतोय एक प्रसंग...
एकदा माझ्या काकांनी (ते जर्नलिस्ट आहे आणि पक्के हिंदुत्ववादीसुद्धा) एका पाद्रीला विचारलं की हिंदू धर्माने आर्यभट्टाला वाळीत टाकले नाही जेव्हा त्याने पृथ्वी गोल आहे किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे विधान केले, पण मग गॅलिलिओला चर्चने का मारलं?
तेव्हा त्या पाद्रीने निरूत्तर होऊन संतापून काकांना त्याच्या सभेतून हाकललं. ह्याचा फायदा हा झाला की काकांच्या प्रश्नाला उत्तर देता न आल्यानं कितीतरी श्रोते स्वत:ची विवेकबुद्धी वापरून निघून गेले होते.
7 Apr 2011 - 8:11 pm | आनंदयात्री
>>पण मग गॅलिलिओला चर्चने का मारलं?
हाण्ण तिचायला !! लै भारी रे. काकांना रामराम सांग !!
7 Apr 2011 - 8:35 pm | क्राईममास्तर गोगो
काका आजकल अण्णा हजारेंना कवर करतायत...
:)
6 Dec 2011 - 8:27 am | पुण्याचे वटवाघूळ
अहो याचं कारण म्हणजे आर्यभट हा उच्चवर्णीय होता. हिंदू धर्म सहिष्णू की काय म्हनतात तो उच्चवर्णीयांसाठीच. इतरांनी राहायचे गावाबाहेर आणि अमक्या एका जातीत जन्मला म्हनून झाडू मारायचे किंवा मेलेली गुरे ओढून न्यायची.
दुसरे म्हणजे हिंदू धर्माने आर्यभट्टाला वाळीत टाकले नाही म्हनजे नक्की कोणी वाळीत टाकले नाही? जे आपल्याच माणसांवर अमक्या एका जातीत जन्मला म्हणून अन्याय करतात त्यांनी सहिष्णूतेचे गोडवे गाऊ नयेत. हे म्हणजे स्वतःच्या घरच्यांना लाथा घालून बाहेर जाऊन समाजसेवा करून स्वतःला फार मोठा समाजसेवक म्हटल्याप्रमाणे झाले. बरं आर्यभट्टाला वाळीत टाकले नाही पण नंतर काही शतकांनी द्यानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकलेच ना? तुकाराम महाराजांची गाथा नदीत टाकलीच ना? फुले-आंबेडकरांना पण कधी आपले म्ह्टले का?
पुण्याचे वटवाघूळ
7 Apr 2011 - 6:03 pm | स्वछंदी-पाखरु
असाच एक डोके फिरवणारा लेख वाचला होता. त्यात तर चक्क केरळ राज्य सरकारने च अशी योजना केली कि
जो पण ख्रिश्चन धर्मांतर करेल त्याला कर्ज माफ केले आहे .इथे बघा
स्व. पा.
उगाच हं
10 Apr 2011 - 8:54 pm | चिंतामणी
केरळ राज्य सरकारने च अशी योजना केली कि
जो पण ख्रिश्चन धर्मांतर करेल त्याला कर्ज माफ केले आहे .
याबद्दलचा आपला प्रतीसाद वाचायला आवडेल.
10 Apr 2011 - 10:49 pm | पंगा
बातमी अत्यंत त्रोटक आहे, त्यावरून अनेक बाबींसंबंधी नीटसा अर्थबोध होत नाही. अधिक अधिकृत तपशील कोठे मिळू शकेल याचा शोध घ्यावा लागेल.
जे काही त्या बातमीत वाचावयास मिळाले, त्यावरून काही महत्त्वाच्या शंका उद्भवतात.
- ही कर्जमाफी ते केवळ ख्रिस्ती धर्मांतरित आहेत म्हणून आहे, की ते समाजातील सर्वात आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील आहेत (आणि समाजातील सर्वात मोठा आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक दुर्बल गट हा योगायोगाने अनुसूचित जातींतील ख्रिस्ती धर्मांतरितांचा आहे - केरळाचे डेमोग्राफिक्स नेमके कसे आहे ते तपासावे लागेल) म्हणून आहे, हे बातमीतून स्पष्ट होत नाही.
- ही योजना अधिकृतरीत्या धर्मांतरास सरकारी प्रोत्साहन देण्यासाठी आहे असेही प्रथमदर्शनी आढळून येत नाही. ही सवलत लागू झाल्याच्या दुसर्या दिवशी किंवा एका महिन्यानंतर धर्मांतर करणाराससुद्धा ही सवलत मिळेल किंवा कसे हे यातून सूचित केल्याचे दिसत नाही. बहुधा अगोदरपासूनच ख्रिस्ती धर्मांतरित असणार्या एका अत्यंत मोठ्या (आणि बहुधा गरजू) गटाकरिता ही सवलत असावी, आणि ('देवीचा रोगी कळवा, हजार रुपये मिळवा'च्या धर्तीवर) 'धर्मांतर करा, कर्जमाफी मिळवा' छापाचा हा प्रकार नसावा, हीदेखील शक्यता लक्षात घेण्यास जागा आहे.
अर्थात, बातमी ज्या पद्धतीने लिहिलेली आहे त्यावरून (आधी म्हटल्याप्रमाणे) नेमके काय ते काहीच स्पष्ट होत नाही. हा वाईट वृत्तपत्रीय शैलीचा उत्कृष्ट नमुना समजावा, की जाणूनबुजून केलेली दिशाभूल मानावी, हे कळण्यास मार्ग नाही. 'हिंदू'सारख्या आदरणीय दैनिकात ही बातमी छापून आलेली असल्याने पहिली शक्यता असावी अशी आशा आहे. अर्थात, अर्धवट बातमीवरून आपापल्या मगदुराप्रमाणे उचित वाटेल तो ग्रह करून घेण्याची (आणि तो पसरविण्याची) सर्वपक्षीय मुभा आहेच.
आभारी आहे.
11 Apr 2011 - 1:33 am | चिंतामणी
- ही कर्जमाफी ते केवळ ख्रिस्ती धर्मांतरित आहेत म्हणून आहे, की ते समाजातील सर्वात आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील आहेत
तीथे स्वच्छ शब्दात लिहीले आहे की
He was speaking after inaugurating a loan waiver scheme offered by the Kerala State Development Corporation for Christian converts from Scheduled Castes.
11 Apr 2011 - 9:07 am | पंगा
... हा जर योगायोगाने बहुसंख्येने अनुसूचित जातींमधून झालेल्या ख्रिस्ती धर्मांतरितांचा असेल (पक्षी: 'अनुसूचित जातींमधील ख्रिस्ती धर्मांतरित' हे जर केवळ एक factual label असेल), आणि या स्तरातील हिंदूंचे (हिंदू राहिलेल्यांचे) आजचे प्रमाण जर नगण्य असेल (तसे आहे काय, केरळाचे डेमोग्राफिक्स नेमके कसे आहे, या सर्व बाबी अर्थातच पडताळून पहाव्या लागतील), तर अशा योजनेचे वर्णन हे 'ख्रिस्ती धर्मांतरितांकरिता योजना' असे करणे हे केवळ त्याचा राजकीयदृष्ट्या वाकडा अर्थ काढला जाऊ शकतो म्हणून करू नये, असा आपला दावा आहे काय? (तसा दावा असल्यास सहमत आहे.)
बाकी, ही सवलत लागू झाल्यानंतर (बहुधा तिचा लाभ घेण्याच्या उद्देशाने) धर्मांतर करणार्या केरळीय अनुसूचित ज्ञातिबांधवांनासुद्धा हा लाभ मिळेल किंवा कसे, हे अजूनही स्पष्ट होत नाही. ही सवलत धर्मांतरास सरळसरळ सरकारी उत्तेजन देण्याकरिता आहे किंवा कसे, हे ठरवण्याच्या दृष्टीने, मला वाटते, अशी माहिती असणे अत्यावश्यक आहे.
(शिवाय, अनुसूचित जातींतील ख्रिस्ती धर्मांतरितांव्यतिरिक्त इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता इतर कोणत्या योजना कार्यरत आहेत किंवा नाहीत, याचीही माहिती उपलब्ध नाही. कदाचित अशी माहिती पुरवणे हे या विशिष्ट बातमीच्या कक्षेत येतही नसावे, आणि ते समजण्यासारखेही आहे. परंतु तो मुद्दा तूर्तास सोडून देऊ.)
बाकी, अपुर्या माहितीच्या आधारावर, ही 'योजनेच्या वर्णनातील राजकीय घोडचूक' आहे, की हे 'सरकारचे धर्मांतरवादी शक्तींशी उघडउघड संगनमत' आहे, याबद्दल काय वाटेल त्या निष्कर्षाप्रत यायला आणि त्याचा हवा तसा आणि हवा तितका प्रचार करायला, मला वाटते, उभयपक्षी भरपूर वाव आहे. So, have fun! 'भारत सरकार आणि भारतातील तमाम राज्यसरकारे ही दुष्ट, दुष्ट, राष्ट्रद्रोही आहेत, परकीय आणि हिंद्वेतर शक्तींच्या घशात राष्ट्र सारायला टपून बसलेली आहेत; अशा परिस्थितीत या अंधःकारात एकाच संघटनेला काय ती राष्ट्रहिताची तमा आहे, ती धुरा एकाच संघटनेच्या खांद्यावर काय ती येऊन पडलेली आहे, सबब या संघटनेवाचून राष्ट्राचे कसे होणार!' असे मत बाळगण्यास आणि त्याचा प्रचार करण्यास भारतीय घटना कितपत आड येत असावी याबद्दल साशंक आहे, किंबहुना आड येत नसावी, तेवढे मतस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य भारतीय घटना निश्चितच देत असावी, याची जवळपास खात्री आहे. त्यामुळे खुशाल आपणास हवे तसे मत बाळगावे आणि त्याचा प्रचार-प्रसार करावा. आम्हांस त्या मतात काहीही तथ्य वाटत नाही, इतकेच.
बाकी चालू द्या.
11 Apr 2011 - 9:51 am | चिंतामणी
Mr. Balan said loans amounting to Rs.159 crore would be waived under the scheme, benefiting nearly 1 lakh people, mostly belonging to the poorest sections of society.
रू.१५९/-कोटी हा आकडा लहान आहे काय?
हा दावा कोठे आणि कोणी केला आहे?????????
अशा परिस्थितीत या अंधःकारात एकाच संघटनेला काय ती राष्ट्रहिताची तमा आहे, ती धुरा एकाच संघटनेच्या खांद्यावर काय ती येऊन पडलेली आहे,
बाकी, अपुर्या माहितीच्या आधारावर,..............
अजून माहितीसाठी गुगलू शकता.
7 Apr 2011 - 6:08 pm | वेताळ
एका ख्रिस्ती माणसाला हिंदु खतरे मैं अशी बांग मारावी लागत आहे.
मला देखिल एक प्रसंग आठवतो.. आम्ही लहान असताना ख्रिस्ती मिशनरी आमच्या गावात जिजसच्या कथेची पुस्तके घरोघरी फुकट वाटत असत. त्यात काही पॉकेट बुक्स तर काही लांबपुस्तके असत.आम्ही मुले ती लांब पुस्तके वेगवेगळ्या ठिकाणाहुन त्या मिशनरीज कडुन मागुन घेत असु.व एकत्र करुन रद्दीवाल्याल विकत असु. त्यातुन आम्हाला पॉकेटमनी मिळत असे.
आजकाल अशी पुस्तके माझ्या बघण्यात आली नाहीत.
7 Apr 2011 - 8:40 pm | विकास
त्यात काही पॉकेट बुक्स तर काही लांबपुस्तके असत.आम्ही मुले ती लांब पुस्तके वेगवेगळ्या ठिकाणाहुन त्या मिशनरीज कडुन मागुन घेत असु.व एकत्र करुन रद्दीवाल्याल विकत असु.
या वरून आठवले. आम्ही कॉलेजात असताना (सोव्हीएट पडायच्या थोडा आधीचा काळ), गॅदरींगच्या वेळेस "सोव्हीएट देश" या त्यांच्या चकाचक आणि कम्युनिझमची लाल करणार्या मॅग्झीनला खूप मागणी असायची. कारण त्याचे कागदी बाण चांगले होत असत. ;)
7 Apr 2011 - 8:47 pm | पंगा
शिवाय (बहुधा) फुकटातही मिळत असे, असे आठवते. :)
7 Apr 2011 - 9:19 pm | मन१
२.विकास रावांशी सहमत.
३.अवांतर :- शिवाजी महाराज सुरतेवरील हल्ल्यात मिशनर्यांना म्हणतात :- "तुम्ही किरिस्ताव लोक फार चांगले आहात.रयतेच्या भल्याची कामे करता."
संदर्भः- राजा शिवछत्रपती,लेखक बाबासाहेब पुरंदरे.
--मनोबा
7 Apr 2011 - 9:22 pm | पंगा
रोचक.
अधिक तपशील हवा.
7 Apr 2011 - 9:24 pm | विकास
मला वाटते किरीस्ताव* लोकं भारतात त्यांच्या (माहीती-तंत्रज्ञान) सर्व्हिसेस आउटसोअर्स करतात आणि आपण त्यांना "सेवा" आउट्सोअर्स करतो. अर्थातच दोघे त्याची किंमत मोजत असतात. कुणाची जास्त हा चर्चेचा विषय होऊ शकतो. :-)
*हे मी पाश्चात्यांना जनरलाईझ्ड करून म्हणले आहे
7 Apr 2011 - 9:34 pm | पंगा
शिवाजीमहाराजांना एकविसाव्या शतकातले औटसोर्सिंग अभिप्रेत होते?
नाही म्हणजे, शिवाजीमहाराजांना प्रचंड दूरदृष्टी असल्याबद्दल ऐकलेले आहे, पण ही म्हणजे जरा जास्त दूरदृष्टी होत नाही काय?
अतिअवांतर: शिवाजीमहाराजांना एकविसाव्या शतकातल्या औटसोर्सिंगबद्दल कल्पना होती हे जर खरे असेल, तर मग मी नाडीपट्टीवरही विश्वास ठेवावा किंवा कसे, याबद्दल विचार करावा लागेल.
7 Apr 2011 - 9:39 pm | विकास
शिवाजीमहाराजांना एकविसाव्या शतकातले औटसोर्सिंग अभिप्रेत होते?
मी शिवाजीमहाराजांबद्दल बोललो नव्हतो!
अतिअवांतर: शिवाजीमहाराजांना एकविसाव्या शतकातल्या औटसोर्सिंगबद्दल कल्पना होती हे जर खरे असेल, तर मग मी नाडीपट्टीवरही विश्वास ठेवावा किंवा कसे, याबद्दल विचार करावा लागेल.
माझा नाडी अथवा पट्टी कशाचाच धंदा नाही! तेंव्हा तो देखील उद्देश नव्हता. :-)
7 Apr 2011 - 10:46 pm | मन१
सुरतेवरच्या पहिल्या हल्ल्यात जेव्हा महाराजांनी हाजी कासम बोहरा का कुणातरी डांबिस धनाढ्य व्यापार्याला धरुन आणलं, तेव्हा त्याचा बराचसा पैका घेतला. काही हिंदु व्यापारी गच्च पिंपभरुन सोने-नाणे नेत होते,त्यांनाही पकडलं.
(लूटपाट सुरु असलेल्या)त्या श्रीमंत इलाख्याच्या आसपासच्या इतर इलाख्यातही सैन्य पाठवलं. पण त्यात काही ख्रिस्ती लोक (बहुतांश मिशनरी आणि समाजसेवा करणारे) स्वतःहून महाराजांना भेटायला आले, त्यांना अत्यल्प दरात सोडलं. कित्येकांकडे तर काहिच मागणी केली नाही! वर त्यांचं कौतुक केलं.
अति अवांतरः- सूरत लूटिमध्ये महाराजांनी दणक्यात लुटले नाहित असे दोनच गट---
१ ख्रिस्ती मिशनरी(वर सांगितलेले)
२ जॉर्ज ओक्झिंडेन ह्या सेनानीच्या हाताखालची ब्रिटिश वखार. केवळ दोनेकशे माणसे हाताशी असताना ह्यानं वखारीवर चालुन आलेल्या मराठी सैन्याला कडवा आणि मराठ्यांना अनपेक्षित प्रतिकार केला. बर्यापैकी लूट आधिच(अगदि आरामात ) हाताशी लागलेली असताना उगीच आणखी मनुष्यहानी नको, असा विचार करुन महाराजांनीही प्रतिकार दिसताच वखारीला तसच सोडुन, न लुटता जाणं पसंद केलं.
जवळ काही हजारांच्यावर सैन्य असणारा सुरतेचा भेकड मुघल सेनापती मात्र अजिबात प्रतिकार न करता किल्ल्यात दडुन बसला होता.
अति अति अवांतरः- जॉर्ज ओक्झिंडेनही ख्रिश्चनच!
8 Apr 2011 - 9:25 am | विनायक बेलापुरे
जॉर्ज ओक्झिंडेन ख्रिस्ती होते म्हणून त्यांना सोडले हे पटत नाही. महाराज झपाटा मारून मुघली मुलखात गेले होते ते भाग जिंकून तिथे कब्जा बसवायला नव्हे तर स्वराज्यासाठी मुघली मुलुख मारून पैसा जमवायला. जिथे सहजासहजी मिळते आहे तिथे उगाचच ताकद आणि मुख्य म्हणजे वेळ वाया घालवायला महाराज वेडे नव्हते. जिथे मोडायचे तिथे ख्रिष्चनांचे ही कंबरडे त्यानी मोडून काढलेले आहे.
तोच मुद्दा मिशनरींना लागू होतो. ते ही कफल्लक होते. धर्मविस्तार करत होते पण ज्यावेळी त्यांच्या धर्मविस्ताराला पायबंध घालण्यासाठी ते गेले तेंव्हा त्यांनी ठोकून काढले, कुडाळ प्रांतात मधे. सुरत लूटणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते आणि प्रचंड लूट घेउन मुघली सैन्य येण्याच्या आत परत माघारी स्वतःच्या मुलुखात येणे हीच त्यांची प्राथमिकता होती.
त्याचप्रमाणे सुरतेतही त्यांनी सामान्य माणसाला तोषीश दिली नाही.
8 Apr 2011 - 1:09 pm | मन१
विनायकराव, आपल्याशी सहमत.
म्हणुनच तर मी वाक्ये वापरलीत ती अशी :-
"....बर्यापैकी लूट आधिच(अगदि आरामात ) हाताशी लागलेली असताना उगीच आणखी मनुष्यहानी नको, असा विचार करुन महाराजांनीही प्रतिकार दिसताच वखारीला तसच सोडुन, न लुटता जाणं पसंद केलं"
आपण बहुतेक एकच गोष्ट म्हणतोय.
त्यामुळं
"महाराज झपाटा मारून मुघली मुलखात गेले होते ते भाग जिंकून तिथे कब्जा बसवायला नव्हे तर स्वराज्यासाठी मुघली मुलुख मारून पैसा जमवायला. जिथे सहजासहजी मिळते आहे तिथे उगाचच ताकद आणि मुख्य म्हणजे वेळ वाया घालवायला महाराज वेडे नव्हते. जिथे मोडायचे तिथे ख्रिष्चनांचे ही कंबरडे त्यानी मोडून काढलेले आहे. "
ह्याच्याशी सहमत. ख्रिश्चनच काय हरेक शतॄला त्यांनी योग्य त्या वेळेस धडा शिकवलाय त्यात मुघल, आदिलशाही सत्ता आल्या, त्या सत्तेच्या आश्रयाने राजकारण करणारे महाराजांचे काही स्वकीयही आले.
कुडाळ मधला किस्सा माहिती नाही. इथे अवांतर होत असेल खरडीतुन वगैरे दिलत तर बरं होइल. कुठल्यातरी ब्रिटिश वखारीच्या ड्यांबिस अधिकार्यांना त्यांनी शासन केल्याचं माहिती होतं बुवा.
जॉर्ज ऑक्झिंडेन ख्रिस्ती होता म्हणुन त्याला सोडलं असं मला म्हणायचं नव्हतं. तेव्हढं वाक्य सोडुन दिलत तरी चालेल.
--मनोबा.
7 Apr 2011 - 10:09 pm | सुनील
भारतात ८५ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. पण यामध्ये १५ टक्के बॉध्द, शिख आणि जैनही समविष्ट आहेत. म्हणजे हिंदूंची लोकसंख्या ७० टक्के आहे.
हे वाक्य सिद्ध करणारा विश्वासार्ह पुरावा दिलात तर उत्तम.
२००१ च्या जनगणनेप्रमाणे (ज्याचे निष्कर्ष जालावर उपलब्ध आहेत) भारताची धर्मनिहाय स्थिती अशी आहे -
हिंदू - ८०.५%
मुस्लिम - १३.४%
ख्रिश्चन - २.३%
शिख - १.९%
बौद्ध - ०.८%
जैन - ०.४%
इतर - ०.६%
7 Apr 2011 - 10:35 pm | विनायक बेलापुरे
वाचनीय आहे.
8 Apr 2011 - 9:21 am | पंगा
काका,
तुम्ही रा. स्व. संघाचे नाही म्हणता. मग विहिंपचे म्हणायचे, की इस्कॉनचे, की सनातन प्रभातचे?
नाही म्हणजे, आजकाल गाडी ईशान्येकडून भलतीकडेच वळू लागली आहे, म्हणून विचारले. बाकी काही नाही.
एरवी चालू द्या. निवांत होऊ द्या.
कळावे, लोभ असावा.
आपलाच लाडका पुतण्या,
पंगा.
8 Apr 2011 - 9:37 am | मन१
कल्याणकरांच्याच "माझी समाजसेवा व ईशान्य भारत." (http://www.misalpav.com/node/17187) मध्ये त्यांनी संघाशी कसा परिचय झाला ते इथं मिपावर, जाहीर सांगितलय.
तुम्हाला त्यांनी खरड/व्य नि/पार्सल्/पोष्ट्/फॅक्स /sms/फोन कॉल किंवा प्रत्यक्ष भेट किंवा इतर एखाद्या माध्यमाद्वारे खाजगीत काही वेगळं सांगितलय काय ?
त्यांच्या सारखे काका आपल्यासारख्या पुतण्याची दिशाभूल करणार नाहित असे वाटते.
--मनोबा.
8 Apr 2011 - 9:41 am | पंगा
संघाच्या (ईशान्येत कार्य करणार्या) लोकांशी परिचय आहे, पण स्वतः संघाचे कार्यकर्ते नाहीत असे त्यांनी जाहीर आणि स्पष्टपणे सांगितलेले आहे.
8 Apr 2011 - 12:28 pm | विश्वास कल्याणकर
परिचय होणे म्हणजे त्यात सम्मीलीत होणे नाही. त्यांचे इशान्य भारतातील कार्य हे प्रशंसनीय आहे यात शंका नसावी त्यांच्या तेथील कार्यात खारिचा वाटा आपला असावा हा प्रामाणिक उद्देश. पुण्यात मी फारसा संपर्कात नसतो.
8 Apr 2011 - 11:54 am | विश्वास कल्याणकर
३३ वर्षे १०-५ नोकरित नोकरि करण्याशिवाय कुठेच पहावयास वेळ मिळाला नाही. प्रथमच इशान्य भारतात गेलो . ३ वर्षात तिथली भिषण परिस्थीति ला कारणीभुत ३ गोष्टी आहेत हे प्रामुख्याने लक्षात आले. १) सरकारची कमालीची उदासीनता २) ख्रिस्तीकरणाचा तुफान वेग व ३) बांगलादेशातील घुसखोरी. ख्रिस्तीकरणामुळे तिथे जाणवत असलेला त्रयस्थपणा हा सर्वात का़ळजीचा भाग आहे. नागालैण्ड ला " इंडियन डोग्ज गो बैक" असे फलक हे मिशनरींच्या शिकवणुकीचा परिणाम आहे. आधी म्हटल्या प्रमाणे कुणी कुठल्या धर्मात जावयाचे तो त्याचा त्याचा प्रश्न असतो. पण त्याचे दुरगामी परिणाम जर आपल्याच देशाच्या एखाद्या राज्यात आपल्याकडे परकिय म्हणुन पाहिल्या जात असेल तर कुठे तरी ते खटकते. ख्रिश्चनिटी चे इशान्य भारतात झालेले आक्रमण, पुढे काय वाढून ठेवले आहे याची नांदी तर नाही. हे तिथे गेल्यावर जाणवले आणि त्या दृष्टीने जे काही वाचायला मिळाले आणि त्यासंबंधात जे कुणी प्रयत्न करित आहेत त्यांचे कडुन ऐकतो ते इथे मांडणे एवढाच उद्देश. वस्तुस्थीती मी सांगीतली तितकी भयानक नसेल किंवा काही आशेचे किरण असतील जे मला माहित नाहीत तर ते जाणुन घ्यावयास मला नक्कीच आवडेल. पण मला वाटते. की हींदु हा विषय कुणी ही काढला की त्याला, संघ, वि.ही.प., किवा अन्य तत्सम संबधित असल्याचा जो आरोप होतो तो योग्य आहे काय.
लहान पणी आईने रामरक्षा , अथर्व शिर्ष, शिकवले, संध्याकाळी तिन्हीसांजेला देवाल नमस्काराची सवय लावली. मग ती तर संघाची नव्हती मग आजच या विषयावर बोलले की लेबल कां लागते? हा प्रश्न मला नेहमी पडतो.
8 Apr 2011 - 1:02 pm | नितिन थत्ते
आपला हा प्रवासच आश्चर्यकारक आहे.
३३ वर्षे नोकरी करताना आपण इकडेच राहिलात. त्या काळात आपल्याला इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत हे पाहण्यास वेळच मिळाला नाही. त्यानंतर आपल्या मनात काही समाजकार्य करावे असे आले. त्यावेळीही आपल्याला इथले आसपासचे प्रश्न दिसले नाहीत/पहावेसे वाटले नाहीत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काही करावे असे वाटले नाही.
(नॉर्मल माणसास आजूबाजूचे प्रश्न दिसत राहिलेच असते आणि आत्ता नोकरीमुळे वेळ नसला तरी वेळ मिळाल्यावर समाजकार्य म्हणून "मी हे करीन" असे त्याने मनातून ठरवून ठेवले असते).
एकदम कोणाचे तरी व्याख्यान ऐकून आपल्याला ईशान्य भारतातला प्रश्न खूप महत्त्वाचा वाटला आणि त्यातही महत्त्वाचे काय वाटले? तर तिथे हिंदूंची संख्या घटत आहे.
सगळंच गंमतीदार आहे.
8 Apr 2011 - 2:13 pm | स्वानन्द
>>(नॉर्मल माणसास आजूबाजूचे प्रश्न दिसत राहिलेच असते आणि आत्ता नोकरीमुळे वेळ नसला तरी वेळ मिळाल्यावर समाजकार्य म्हणून "मी हे करीन" असे त्याने मनातून ठरवून ठेवले असते)
नशीब तुम्ही कोणी मानसशास्त्र तज्ञ नाही. नाहीतर कल्याणकर साहेब अॅबनॉर्मल आहेत अस सर्टीफिकेट देऊन मो़कळे झाला असता.
>>एकदम कोणाचे तरी व्याख्यान ऐकून आपल्याला ईशान्य भारतातला प्रश्न खूप महत्त्वाचा वाटला
त्यांना काहीतरी महत्वाचं वाटलं तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे पावलं उचलली हे महत्वाचं.
>> आणि त्यातही महत्त्वाचे काय वाटले? तर तिथे हिंदूंची संख्या घटत आहे.
चालायचंच.. तसं ही काही लोक कम्युनिझम मागे पडतोय याची काळजी लागून राहिलेली असतेच की... त्यापेक्शा हे बरं!
8 Apr 2011 - 2:57 pm | नितिन थत्ते
>>नशीब तुम्ही कोणी मानसशास्त्र तज्ञ नाही. नाहीतर कल्याणकर साहेब अॅबनॉर्मल आहेत अस सर्टीफिकेट देऊन मो़कळे झाला असता.
बरोबर.
>>त्यांना काहीतरी महत्वाचं वाटलं तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे पावलं उचलली हे महत्वाचं.
मी फक्त आश्चर्यकारक आहे असे म्हटले. समाजकार्य करावे असे वाटल्यावरदेखील स्वतःच्या जवळपासच्या समाजात करण्यासारखे काही दिसले नाही याचे आश्चर्य वाटले.
>>चालायचंच.. तसं ही काही लोक कम्युनिझम मागे पडतोय याची काळजी लागून राहिलेली असतेच की... त्यापेक्शा हे बरं!
ज्यांना कम्युनिझमची काळजी वाटते ते सहसा लहानपणापासून / जाणत्या वयापासून 'त्यां'च्या संपर्कात असतात. अचानक हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही.
8 Apr 2011 - 4:49 pm | विकास
त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काही करावे असे वाटले नाही.
बर्याचदा ते प्रश्न परत परत पाहून बधीरता आलेली असते. ते प्रश्न वाटत नाहीत. रस्त्यावर भिकारी अपंग अथवा सुदृढ मूल दिसले तर निर्विकार झालेली माणसे स्लमडॉग बघून मुंबईतील भिकार्यांबद्दल कळवळा व्यक्त करताना पाहीली आहेत. त्यातील काहींनी तात्कालीन मदतही केली आहे...
एकदम कोणाचे तरी व्याख्यान ऐकून आपल्याला ईशान्य भारतातला प्रश्न खूप महत्त्वाचा वाटला आणि त्यातही महत्त्वाचे काय वाटले? तर तिथे हिंदूंची संख्या घटत आहे.
तसे वाटणे बरोबर का चूक, तसेच त्यातील इतर मुद्यांवर ह्यावर चर्चा करू शकतात. धर्मांतरामुळे नागालँड व इतरत्र जर फुटीरतावाद येत असेल तर त्याबद्दल काय म्हणणे आहे? कदाचीत श्री. कल्याणकरांना त्यामुळे त्या प्रश्नाचे गांभिर्य जास्त वाटले असेल तर त्यात नवल काय? भारताबद्दलच बोलत आहेत ना? का भारत हा एकसंघ राष्ट्र असायची काही गरज नाही असे आपले म्हणणे आहे?
8 Apr 2011 - 6:22 pm | धमाल मुलगा
चीप...व्हेरी चीप सर!
थत्तेकाकांची मतं जरी आमच्या मतांच्या पुर्णतः विरोधी असली, आमच्या त्यावरुन शाब्दिक चकमकी उडत असल्या तरी त्यांच्याबद्दल, त्यांच्या अभ्यासू मतांबद्दल एकप्रकारचा आदर होता आजवर.
थत्तेकाका,
क्षमस्व! तुमच्याकडून ही अपेक्षा बिलकुल नव्हती. एखादी व्यक्ती चांगलं काम करत आहे, तर त्यावर अशा पध्दतीनं संशय घेतल्याप्रमाणे खेळी केली असं वाटलं.
वैयक्तिकरित्या मला हे अत्यंत अयोग्य वाटलं हे खेदानं नमुद करावंसं वाटतं.
मला ठाऊक आहे, त्यानं कुणाला काही फरक पडण्याचा संबंध नाही. माझा हा खेद काही फार मोठा परिणामकारक आहे अशातलाही भाग नाही. पण......
सॉरी बॉस!
लय ब्येकार वाटलं तुमचा हा स्टान्स पाहून. यू टू वन ऑफ देम? क्रॅप! :(
8 Apr 2011 - 9:13 pm | आनंदयात्री
सहमत.
वाईट वाटले.
10 Apr 2011 - 11:31 am | बबलु
धमु शी सहमत.
थत्ते स्वतःचा अजेंडा दामटवत आहेत जबरदस्ती.
कुणी काही चांगलं करत असलं की थत्तेंसारख्या लोकांचं हे असं सुरु होतं. टिपिकल अॅटिट्युड.
10 Apr 2011 - 12:13 pm | नितिन थत्ते
मी पुन्हा एकदा सांगतो की मी फक्त कल्याणकरांच्या प्रवासाचे आश्चर्य वाटले एवढेच म्हणतो आहे.
आता मी टीका केली असे सगळे म्हणतच आहेत तर मग आता करतोच (न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यापेक्षा गुन्हा करून भोगावी).
कल्याणकर ईशान्येचा प्रश्न साधारण भारतीयांच्या उदासीनतेतून आला आहे असे म्हणतात. परंतु ते आता (हिंदुत्व एक्सप्रेसच्या छपरावर बसून) त्या फुटीरतेचा धोका भारताला आहे असेही म्हणत आहेत. त्यावरून त्यांनाही ईशान्येचा आलेला कळवळा हा ईशान्येबद्दल नसून त्याने मुख्यभूमीला असलेल्या धोक्यामुळे आहे असा निष्कर्ष काढावा का?
पंगा यांनी म्हटल्याप्रमाणे या गोष्टीला 'समाजकार्य' म्हणू नये.
10 Apr 2011 - 12:28 pm | शिल्पा ब
<<<ईशान्येचा आलेला कळवळा हा ईशान्येबद्दल नसून त्याने मुख्यभूमीला असलेल्या धोक्यामुळे आहे असा निष्कर्ष काढावा का?
काढा कि..नाही कोण म्हणतंय. पण त्यात चुकीचं काय आहे ते सांगितलं तर बरं होईल. आणि हिंदुत्वाबद्दल कळवळा येण्यात काय वाईट आहे ?
10 Apr 2011 - 12:41 pm | नितिन थत्ते
हो ना. पण मग इतर देशबांधवांच्या उदासीनतेचा उल्लेख कशाला?
10 Apr 2011 - 5:40 pm | विकास
आता आपण म्हणत असला की तुम्ही टिका केली नाहीत अथवा (मला वाटते तसे) तिरकस लिहीले नाही, तर तसे गृहीत धरूया....
मात्र जेंव्हा, "(नॉर्मल माणसास आजूबाजूचे प्रश्न दिसत राहिलेच असते आणि आत्ता नोकरीमुळे वेळ नसला तरी वेळ मिळाल्यावर समाजकार्य म्हणून "मी हे करीन" असे त्याने मनातून ठरवून ठेवले असते)." असे म्हणत एखाद्याच्या कृतीचे आश्चर्य वाटते तेंव्हा त्याचा अर्थ त्या आपण म्हणत असल्याप्रमाणे न वागणार्या व्यक्तीस आपण "अॅब्नॉर्मल" म्हणत आहात असेच वाटते.
ईशान्येचा आलेला कळवळा हा ईशान्येबद्दल नसून त्याने मुख्यभूमीला असलेल्या धोक्यामुळे आहे असा निष्कर्ष काढावा का?
म्हणजे? आपल्या दृष्टीने ईशान्य ही मुख्यभूमी नाही? हे वाचून मात्र खरेच आश्चर्य वाटले! एकवेळ अंदमान-निकोबार ही बेटे असल्याकारणाने त्यांच्यासंदर्भात मुख्यभूमी हा शब्द समजू शकलो असतो. पण इथल्या एकजिनसी तुकड्यात देखील आपण असे भेदभाव कसे करत?
बाकी ते कशा पद्धतीने करावे, हिंदूत्व का ख्रिश्चन का निधर्मी का माओवादी का मिलीटरी का राजकीय लाच वगैरे मुद्दे जरा बाजूस ठेवूया. त्या अगोदर, आपले मत तरी एकदा स्पष्ट सांगावे: म्हणजे ईशान्येकडील वेगळाच आहे म्हणून तो भाग भारतात नसलेला बरा, त्याची गरज नाही वगैरे म्हणायचे आहे का?
10 Apr 2011 - 10:30 pm | बबलु
विकास, उत्तम प्रतिसाद.
थत्त्यांच्या दृष्टीने ईशान्य ही मुख्यभूमीच नाही असे त्यांच्या प्रतिसादावरून वाटते. आणि हिच ती उदासिनता.
11 Apr 2011 - 8:32 am | चिंतामणी
आणि बबलुशी सुध्दा.
9 Apr 2011 - 6:47 pm | पंगा
चर्चचे मिशनरीदेखील आपापल्या देशातील लोकांचे प्रश्न पाहण्याऐवजी भलत्याच कोठल्यातरी देशातल्या लोकांच्या मागे धावतात, अशीही एक रोचक तुलना येथे होऊ शकते.
चर्चच्या मिशनर्यांनादेखील आशियातल्या "न वाचवल्या गेलेल्या आत्म्यां"चा प्रश्न महत्त्वाचा वाटतो, आणि त्यातही महत्त्व काय वाटते, तर तेथे ख्रिस्तींची संख्या पुरेशी नाही, अशीही एक रोचक तुलना येथे होऊ शकते.
अर्थात, चर्चच्या "कार्या"ची भलावण करण्याचा उद्देश नाहीच. फक्त, दोन्हींच्या "कार्यकर्त्यां"च्या भूमिकेतील, विचारसरणीतील साम्य रोचक आहे, एवढेच मांडायचे आहे.
11 Apr 2011 - 1:37 am | चिंतामणी
काम चांगले वाटले तर तसे सांगा.
8 Apr 2011 - 3:24 pm | कवितानागेश
स्वतःच्या जवळपासच्या समाजात करण्यासारखे काही दिसले नाही याचे आश्चर्य वाटले.>>
मदर तेरेसा देखिल, त्यांच्या आजुबाजुचे प्रश्न सोडून समाजकार्य करायला लांब आल्या,
चुकलंच म्हणायचे त्यांचे!
लहानपणापासून / जाणत्या वयापासून>>
गांधीजींना 'अचानक'च जाणीव झाली 'गुलामगिरीची'!
ती खोटी म्हणायची का?
सावरकरांनी मात्र लाहान वयातच स्वातंत्र्यलढ्याची शपथ घेतली, याचा अर्थ फक्त त्यांचीच देशभक्ती , समाजाबद्दलची आस्था खरी होती.
बाकीच्यांच्या 'अचानक' वाटण्याला काही किंमत नाही.
असे आश्चर्यकारक निष्कर्ष वरील चर्चेतून निघत आहेत.
असो.
कल्याणकरांनी कुठल्या वयात काय करायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे माझी वैयक्तिक मत आहे. ;)
8 Apr 2011 - 8:57 pm | पंगा
हो चुकलेच. अगदी जाणूनबुजून चुकले. काय म्हणणे आहे?
गांधीजींना जी 'अचानक' गुलामगिरीची जाणीव झाली, ती त्यांना (ब्रिटिश साम्राज्यातील एक भारतीय वंशाची व्यक्ती म्हणून) 'अचानक' स्वतः आलेल्या (आणि येत गेलेल्या) वाईट अनुभवांतून झाली, असे मानायला जागा आहे. त्यांचा त्यापुढील सर्व लढा हा त्या वैयक्तिक लढ्याचे एक्स्ट्रापोलेशन होते, या दृष्टिकोनातून त्याकडे पाहता येणे शक्य आहे. त्या परिस्थितीत, ती जाणीव खोटी होती असे जर कोणाला म्हणावेसे वाटत असेल, तर त्यांना ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य निश्चितच आहे, पण तसे मानण्याचे मला तरी काही कारण दिसत नाही.
असो. कल्याणकरांना कोठेही जाऊन काहीही करण्याचे स्वातंत्र्य आहेच; तो मुद्दा नाही. (अवांतरात शिरायचे झाल्यास, तसे ते चर्चलाही असावेच, पण येथे तोही मुद्दा नाही.) परंतु ईशान्येतील समाजकार्याच्या माहितीच्या नावाखाली गाडी हळूहळू अखिल भारतीय पातळीवरच्या विहिंप-रास्वसं-सनातन प्रभात छापाच्या प्रचारकार्याकडे (ख्रिस्ती धर्मप्रसारकांची वळते म्हणतात अगदी तश्शा थाटात) वळू लागलेली आहे, एवढे निरीक्षण नोंदवले इतकेच.
बाकी चालू द्या.
8 Apr 2011 - 9:19 pm | आनंदयात्री
>>अखिल भारतीय पातळीवरच्या विहिंप-रास्वसं-सनातन प्रभात छापाच्या प्रचारकार्याकडे (ख्रिस्ती धर्मप्रसारकांची वळते म्हणतात अगदी तश्शा थाटात) वळू लागलेली आहे, एवढे निरीक्षण नोंदवले इतकेच.
छापाच्या म्हणजे काय ? आपले हे विधान तुच्छतादर्शक आहे का ? थोडक्यात विश्व हिंदु परिषद किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्यालेखी तुच्छ आहेत असा डिराईव्ड अर्थ वाचकाला काढु द्यायला आपल्याला हवे आहे का ? किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इशान्येतील कार्य तुच्छ आहे असे आपल्याला वाटते का ?
माझा गैरसमज होउ नये म्हणुन हे विचारण्याचे धारिष्ट्य करित आहे.
8 Apr 2011 - 9:35 pm | पंगा
हो.
जरूर. माझी हरकत नाही.
सविस्तर पुनरुक्ती करू इच्छीत नाही, म्हणून कृपया खाली (बहुतेक) यशोधरातैंना दिलेला प्रतिसाद पहावा. संघाचे ईशान्येतील कार्य मला अजेंडा-ड्रिवन वाटते. तसे ते असण्यासही माझा आक्षेप नाही (कोणाचे नसते?), फक्त ते 'राष्ट्राकरिता', 'राष्ट्रहितार्थ' आहे या दाव्यास माझा आक्षेप आहे. आणि प्रामाणिकपणे, अजेंड्याच्या बाबतीत मी चर्च आणि संघ यांच्यात काहीही फरक करत नाही.
बाकी, (कायद्याच्या कक्षेत राहून) कोणीही कोठेही काहीही धुमाकूळ घालावा - भारत हे एक मोकळे राष्ट्र आहे असे मी समजतो. फक्त, त्या धुमाकुळास 'राष्ट्रकार्य' वगैरे संबोधले जाऊ लागले की आपला मतभेद सुरू होतो.
8 Apr 2011 - 10:03 pm | आनंदयात्री
धन्यवाद, याचाच अर्थ कल्याणकरांचे या लेखात उल्लेखलेले कार्य तुच्छ आहे असे तुम्ही म्हणताय असे समजतोय.
जर याच्याशीही तुम्ही सहमत असाल तर तर तुम्ही त्यांचा अपमान करत आहात असे वाटते, कारण माणुस या प्राण्यात अ या माणसाने ब या माणसाबद्दल तुच्छतादर्शक विधान केले तर ते अपमानास्पदच ठरते.
मला त्यांच्या कार्याबद्दल आदर आहे त्यामुळे आपण त्यांचा असा अवमान करणे मला आवडलेले नाही असे नमुद करतो.
असो, आपल्या प्रतिक्रिया यापुढे योग्य चष्म्यातुन वाचत जाईन.
8 Apr 2011 - 10:17 pm | पंगा
त्या कार्याच्या महतीबद्दल माझे मतभेद आहेत हे तर स्पष्ट आहे. याचा अर्थ कसाही घेण्याचे स्वातंत्र आपल्याला आहेच; तो अर्थ आपण कसा घ्यावा हे मी आपल्याला सुचवू शकत नाही आणि सुचवू इच्छीतही नाही. क्षमस्व.
आपण कोणता चष्मा लावावा हा आपण आणि आपले ऑप्टॉमेट्रिस्ट यांच्यातला प्रश्न आहे. याबाबत मी आपल्याला काहीच मदत करू शकत नाही. क्षमस्व.
8 Apr 2011 - 10:23 pm | धमाल मुलगा
धागा पुरेसा हायजॅक करुन झालेला आहे असं एकुण दिसते आहे.
संपादक मंडळ आता लक्ष घालून अनावश्यक भरकटवणारे प्रतिसाद संपादीत करुन सदर चर्चा योग्य त्याच मार्गावर ठेवण्याचे उपकार करु शकेल काय?
धन्यवाद.
8 Apr 2011 - 10:43 pm | आनंदयात्री
>>याचा अर्थ कसाही घेण्याचे स्वातंत्र आपल्याला आहेच; तो अर्थ आपण कसा घ्यावा हे मी आपल्याला सुचवू शकत नाही आणि सुचवू इच्छीतही नाही. क्षमस्व.
नाही, आपण सुचवताय. मी कसा अर्थ घेतोय हे तुम्हाला वर विचारले आहे. आपण त्याला 'हो' म्हणुन मान्यता दिलीये. आता पुन्हा आपण नामानिराळी राहण्याची भाषा करणे हे कॉन्ट्रॅडिक्टरी वाटते.
तुच्छतादर्शक विधाने करुन आपण कल्याणकरांचा अपमान केलाय हे तुम्ही मान्य केलेले सत्य आहे. (डेरिवेशनला तुम्हीच होकार दिलेला आहे.)
यासाठी पुन्हा एकदा निषेध नोंदवतो.
8 Apr 2011 - 10:57 pm | पंगा
मी संघ-विहिंपादींबद्दल तुच्छता दर्शवलेली आहे हे तर मी मान्य केलेलेच आहे. त्यापुढे, संघाचे ईशान्येतील कार्य हे मला अजेंडाड्रिवन वाटते असे म्हटलेले आहे. (त्याची महती मला वाटत नाही हे तर स्पष्ट आहे.) याचा अर्थ तुच्छतादर्शक होतो किंवा नाही यावर मी विचार केलेला नाही; तसा तो होत असल्यास (आणि तसे दाखवून दिल्यास) तेही मान्य करण्यास मला प्रत्यवाय नाही.
त्यापुढे, श्री. कल्याणकर यांचेबद्दल मी वैयक्तिक तुच्छता दर्शवलेली आहे किंवा कसे (किंवा वैयक्तिक आदर किंवा तुच्छता यांपैकी काहीही वाटण्याइतके ते माझ्या खिजगणतीतही आहेत किंवा कसे) यावरही मी विचार केलेला नाही. तरीही, या बाबीचा आपल्याला योग्य वाटेल तसा अर्थ लावण्याचे - आणि गरज भासल्यास त्याबद्दल निषेधही नोंदवण्याचे - स्वातंत्र्य आपल्याला आहेच. त्याच्या आड मी येऊ इच्छीत नाही.
आभारी आहे.
9 Apr 2011 - 1:33 pm | llपुण्याचे पेशवेll
संघाचे ईशान्येतील कार्य हे मला अजेंडाड्रिवन वाटते असे म्हटलेले आहे
म्हणजे जगात चाललेली सगळी चांगली (किंवा तुच्छ नसलेली) कार्य अजेंडा ड्रीवन नसतात का? वा वा मग त्या कार्यकर्त्याना कृष्णाच्या गीतेतल्या प्रमाणे स्थितप्रज्ञ म्हटले पाहीजे.
बाकी अजेंडालेस कार्य म्हणजे नाक्यावर भंकस करणे असा असतो असे एका जालटग्याचे वाक्य आठवून गेले.
9 Apr 2011 - 6:35 pm | पंगा
जगात चाललेल्या सर्व बर्यावाईट कार्यांचा मी आढावा घेतलेला नाही. ते माझ्या आवाक्याबाहेरचे काम आहे, आणि त्यात मला रसही नाही.
त्यामुळे, या बाबतीत मी आपल्याला काही मदत करू शकत नाही. क्षमस्व.
कृपया योग्य तो संदर्भ देऊ शकाल काय?
या वाक्यातून 'नाक्यावरच्या भंकसमागे अजेंडा नसतो' असा काही दावा आहे काय? असल्यास, त्यातील तथ्याबाबत अॅट बेस्ट (मराठी?) साशंक आहे.
9 Apr 2011 - 6:37 pm | आनंदयात्री
>>यापुढे, श्री. कल्याणकर यांचेबद्दल मी वैयक्तिक तुच्छता दर्शवलेली आहे किंवा कसे (किंवा वैयक्तिक आदर किंवा तुच्छता यांपैकी काहीही वाटण्याइतके ते माझ्या खिजगणतीतही आहेत किंवा कसे) यावरही मी विचार केलेला नाही.
आपली भाषा सभ्य संवादाला पुरक वाटत नाही, उत्तरोत्तर संवादात श्री. कल्याणकरांबाबत ती जास्तच अपमानास्पद होत चाललेली आहे. त्यांच्या अपमानाला माझा हातभार लागू नये म्हणुन माझ्यापुरता मी हा संवाद थांबवतोय.
कल्याणकर, तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे.
10 Apr 2011 - 12:00 pm | अन्या दातार
पंगाजी,
संघाचे कार्य अजेंडा ड्रिवन आहे यात शंकाच नाही. १००% सहमत. पण नक्की कशामुळे धर्मांतराचा मुद्दा अजेंड्यावर घ्यावा लागला याकडेही थोडे लक्ष द्या. नागालँडमध्ये आज जर "इंडीयन डॉग्स गो अवे" अश्या पाट्या ख्रिस्ती धर्मप्रचारामुळे लागत असतील तर हा देश तोडण्याचा प्रकार झाला हे नीट लक्षात घ्या.
जर हा धर्मप्रभाव पुसुन टाकून नागालँड मधील लोकांना मनाने भारतात आणायचे असेल तर त्यांचे पुनर्धर्मांतर करणे ही निकड आहे.
देश तोडण्यापासून परावृत्त करणारी केलेली कुठलीही कृती हे राष्ट्रकार्यच नव्हे काय?
11 Apr 2011 - 8:37 am | चिंतामणी
संघाचे ईशान्येतील कार्य मला अजेंडा-ड्रिवन वाटते..
मिशन-यांचे काय ? (ते धुतल्या तांदळा सारखे सारखे स्वच्छ आहेत आणि निष्पाप आहेत असे तुमचे म्हणणे आहे काय?)
11 Apr 2011 - 9:13 am | पंगा
http://www.misalpav.com/node/17563#comment-305191
11 Apr 2011 - 9:36 am | सहज
'यु आर विथ अस ऑर अगेन्स्ट अस' असे पवित्रे कशाला?
जर संघावर टिका केली म्हणजे आपसूक मिशनर्यांचे कौतुक आहे असे अजिबात नाही. उलट वर पंगा यांनी लिहल्याप्रमाणे (बहुदा थत्ते देखील सहमत असतीलच) संघ, मिशनरी दोघांच्या प्रचारकी, विचारसरणीवर आक्षेप घेतला आहे.
पुन्हा एकदा कल्याणकरसाहेब जे काही सामाजीक कार्य, ज्यातुन कोण्या गरजवंताला उपयोग होतो त्याबद्दल आदर आहेच पण विनाकारण अन्य धर्मांना नावे ठेवत, विनाकारण भिती घालत (संदर्भ - अश्याने हिंदूंची लोकसंख्या..घासकडवी यांनी लिहलेला मुद्दा पहा)सार्वजनीक ठिकाणी असे लेख येणे चुकीचे वाटते. अश्यातुनच एक कोण दारासिंग निष्क्रियचा सक्रिय होतो, हिंदूधर्माच्या प्रति कर्तव्यापोटी तो कोण्या फादर ग्राहम स्टेन्सला त्याच्या दोन लहान मुलांसकट जिवंत जाळतो! असे माथेफिरु असताना निदान हुशार लोकांनी विनाकारण धार्मीक तेढ वाढवणारे लेखन करु नये ही अपेक्षा अवाजवी आहे का? हा आता असे विषय आपल्या माहीत आहे अश्या लोकांच्यात (खाजगीत)जरुर काढा पण असे सार्वजनीक जागी प्रक्षोभक लिहणे, तेढ वाढवण्यास कारणीभूत कृत्य भारतीय कायद्याने गुन्हा आहे. त्याचे कौतुक करणे योग्य नाही उलट निषेध केलाच पाहीजे. सामाजीक कार्याच्या आडून धार्मीक वाद घालणे अयोग्य आहे.
ईशान्य भारत किंवा अन्यत्र नेमक्या सामाजीक कार्य, योगदानावर अजुन विस्तारीत लेख अवश्य येउ दे!
10 Apr 2011 - 9:05 am | शिल्पा ब
समजा आर्थिक, सामाजिक किंवा इतर काही कारणाने एखाद्याला दुसर्याची मदत करता येत असेल (मदत घेणारा अतिशय अडचणीत आहे असे समजून ) तर ती चूकच म्हणायची हे आपले मत खूपच रोचक आहे.
बाकी मदर तेरेसांच्या कर्मभूमिविषयीच्या निवडीबद्दल असे बोलणारे आपण पहिलेच पाहिलेत मी. असो. ज्याची त्याची समज, जाण वगैरे वगैरे.
8 Apr 2011 - 3:37 pm | नितिन थत्ते
>>मदर तेरेसा देखिल, त्यांच्या आजुबाजुचे प्रश्न सोडून समाजकार्य करायला लांब आल्या,
चुकलंच म्हणायचे त्यांचे!
हो. चुकलेच. तरीही त्यांनी बर्याच लवकर सुरुवात केली. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी ख्रिश्चनिटीची सेवा (मानवतेची नव्हे) हे जीवितकार्य होते. चला आता काहीतरी समाजकार्य करू असे म्हणून केलेले कार्य नाही.
>>गांधीजींना 'अचानक'च जाणीव झाली 'गुलामगिरीची'!
ती खोटी म्हणायची का?
नाही. ती जाणीव त्यांच्या आसपासच्या लोकांवरील अन्यायाची होती.
कल्याणकरांनी कुठल्यावयात काय करावे याचे स्वातंत्र्य त्यांना आहेच. मला फक्त त्यांच्या प्रवासाचे आश्चर्य वाटले आहे.
8 Apr 2011 - 4:57 pm | विकास
>>मदर तेरेसा देखिल, त्यांच्या आजुबाजुचे प्रश्न सोडून समाजकार्य करायला लांब आल्या,
चुकलंच म्हणायचे त्यांचे!
अर्थातच चुकलं! बरं काय गंमत आहे तसे काम उद्या (मला काय करतात ते माहीत नाही उ.दा म्हणून नाव) रामदेवबाबा, सत्य श्री साईबाबांनी वगैरे केले असे म्हणले तर त्यातील दोष काढायला पुढे पण मदर तेरेसांबद्दल बोलायचे म्हणजे शांतंपापं... आणि हो, ते बोलणे धर्माधारीत नाही तर त्यांच्या आचरण आणि अॅरोगन्सवरून...
>>गांधीजींना 'अचानक'च जाणीव झाली 'गुलामगिरीची'!<<<
ती खोटी म्हणायची का? नाही. ती जाणीव त्यांच्या आसपासच्या लोकांवरील अन्यायाची होती.
खोटी कोणी म्हणणार नाही. पण अफ्रिकेतील त्यांच्या दृष्टीने स्थानिक अन्यायाविरुद्ध लढा देताना त्यांना संपूर्ण भारताची आठवण झाली. आज श्री. कल्याणकरांना त्यांच्या पुरती का होईना सगळ्या भारताची आठवण झालेली आहे तर त्यात खोटेपणा का वाटावा अथावा तिरकस पणा कशाला. स्वतः गांधी पण वयाच्या ऑलमोस्ट पन्नाशीपर्यंत स्वातंत्र्ययुद्धात नव्हते तर त्यांचे काही कमी होते का? म्ह्णून जर कोणी रीटायर्ड झालेल्या व्यक्तीचे कमी व्हावे?
परत: त्यांचे (कल्याणकरांचे) मुद्दे बरोबर चूक अवश्य बोला, पण हे इतर मुद्दे मला तिरकसपणचे वाटले म्हणून इतके लिहीत आहे. आणि हो, कल्याणकर अगदी कम्युनिस्ट म्हणून पण असे (धर्मांतर सोडून अर्थात ;) ) लिहीते झाले असते आणि त्यांच्यावर जर असे कोणी म्हणाले असते तरी देखील मी हेच म्हणले असते...
8 Apr 2011 - 10:32 pm | नितिन थत्ते
>>बरं काय गंमत आहे तसे काम उद्या (मला काय करतात ते माहीत नाही उ.दा म्हणून नाव) रामदेवबाबा, सत्य श्री साईबाबांनी वगैरे केले असे म्हणले तर त्यातील दोष काढायला पुढे पण मदर तेरेसांबद्दल बोलायचे म्हणजे शांतंपापं...
"मदरतेरेसांचे चुकले" असं मी लिहून सुद्धा हे वाक्य (माझ्या प्रतिसादावर उत्तर म्हणून) लिहिण्याचे कारण?
मी धमाल मुलगा यांच्या मला उद्देशून लिहिलेल्या प्रतिसादावर "सॉरी बॉस, मी कल्याणकरांवर संशय घेतला नाही. फक्त आश्चर्य व्यक्त केले" असा प्रतिसाद दिला होता तो उडाला/उडवला आहे का? कारण मला तो दिसत नाही.
8 Apr 2011 - 10:45 pm | विकास
"मदरतेरेसांचे चुकले" असं मी लिहून सुद्धा हे वाक्य (माझ्या प्रतिसादावर उत्तर म्हणून) लिहिण्याचे कारण?
"मदर तेरेसांचे चुकले" हे आपण उपरोधीकपणे बोलला आहात असे वाटले. आणि कल्याणकरांबद्दल* तिरकस बोललात हे ध्यानात घेऊन मी म्हणले.
मी धमाल मुलगा यांच्या मला उद्देशून लिहिलेल्या प्रतिसादावर "सॉरी बॉस, मी कल्याणकरांवर संशय घेतला नाही. फक्त आश्चर्य व्यक्त केले" असा प्रतिसाद दिला होता तो उडाला/उडवला आहे का? कारण मला तो दिसत नाही.
मला वाटते आपण तो प्रतिसाद मनातल्या मनात लिहीला असावात. कारण तो उडवला गेलेला दिसला नाही.
*कल्याणकरांच्या ऐवजी हेच जर कोणी उदाहरणादाखल थत्ते अथवा मेथंबा / विकी यांच्या बाबत केले तरी मी तेच म्हणालो असतो.
8 Apr 2011 - 6:53 pm | यशोधरा
वाचते आहे. तुमचे सगळे लिखाण वाचत असते.
ईशान्य भारतात तुम्हांला जावेसे वाटले, तिथे राहून काही काम स्वतःला करावेसे वाटले आणि तसे तुम्ही करत आहात, ह्याचेच अतिशय कौतुक वाटते.
अरुण शौरी ह्यांचे एक पुस्तक (अनुवादित - सुधा नरवणे, पुस्तकाचे नाव - आपल्या आत्म्यांची लूटालूट ) वाचले होते. त्यात मिशनरी लोकांचे काम किती पद्धतशीर रीत्या चालते हे खूप विस्तृत रीत्या उलगडून दाखवले आहे. लोकसत्तामध्ये आलेले त्या पुस्तकाचे परीक्षण इथे पाहता येईल. एकूणातच ख्रिश्चन धर्मप्रसारकांना त्यांचे काम करण्यासाठी भक्कम पाठबळ असते - पैशाचे आणि त्या जोरावर मनुष्यबळाचेही. वरुन लोकसेवेचा बुरखा.
वरची एक कमेंट,
अगदी पटली. दूर दुर्गम खेड्यापाड्यात राहून तुटपुंज्या मनुष्य आणि आर्थिक बळावर हिंदूसाठी कार्य करणार्या कार्यकर्त्यांबद्दल अतिशय आदर वाटतो.
8 Apr 2011 - 7:00 pm | पक्का इडियट
अगदी हेच आणि असेच.
8 Apr 2011 - 9:41 pm | पंगा
बुरखा कोण घालत नाही? (बाकी, हिंदुत्वप्रसारक आणि बुरखा यांची जोडी गमतीदार वाटते.)
आज चर्च जर (आरोप केल्याप्रमाणे) ईशान्येत धुमाकूळ घालत नसते, तर एरवी तिथे झक मारायला समाजकार्य करायला कोण गेले असते? चर्च तिथे इतके प्रबळ होईपर्यंत तिथल्या समाजाला काय गरजा नव्हत्या?
आज जे काही तिथे 'समाजकार्य' चालते, त्याचा उद्देश तरी तिथल्या लोकांच्या गरजा पुरवणे हा आहे, की 'हिंदुत्वा'ला निर्माण झालेल्या 'शहा'चा मुकाबला करणे हा आहे? उगाच आपली आपापल्या गेममध्ये तिथल्या लोकांची प्यादी बनवायची ती - चर्चने काय किंवा संघाने काय!
आणि मग हा दोन अजेंडाधारींमधला गेमच जर आहे, तर मग दोघांनाही तिथे यथेच्छ धुमाकूळ घालू दे की! एकाच्याच नावाने खडे का फोडायचे? चर्च आणि संघ, दोघांनीही धुमाकूळ घालायला ईशान्य मोकळी आहे आणि भरपूर जागा आहे - मे द स्ट्राँगेस्ट अजेंडा विन! स्थानिक लोक त्यांच्या गरजा घेऊन जाऊ देत डोक्याला तेल थापत. त्यांची तशीही कोणाला पडलेली आहे?
बाकी, काहींना पैशाचे आणि त्या जोरावर मनुष्यबळाचे पाठबळ असते, तर काहींना संघटनेचे आणि त्या जोरावर मनुष्यबळाचे. फरक काय? हं, आता पैशाचे पाठबळ मिळत नाही हीच जर तक्रार असेल तर गोष्ट वेगळी.
10 Apr 2011 - 9:11 am | शिल्पा ब
भारतीय सरकार साधारणपणे सगळीचकडे दुर्लक्ष करतेय...पण आता या ना त्या कारणाने जर हिंदू लोक आपल्याच लोकांसाठी तिथे काम करत असतील तर त्याला तुमचा आक्षेप का? घेऊ देत कि काय घ्यायचा तो बुरखा...आणि तुम्हीच लिहिलंय ना कि "बुरखा कोण घालत नाही? " म्हणून...अगदी जालावर, वैयक्तिक आयुष्यात, ऑफिसात सगळीचकडे वेगवेगळे बुरखे घालावे लागतात.
बाकी विहींप, संघ वगैरेंबद्द्ल आपले मत भलतेच सॉलीड आहे. आणि तेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांविषयी मात्र हॅ हॅ हॅ..
10 Apr 2011 - 12:51 pm | पंगा
ख्रिस्ती धर्मप्रसारकांविषयीचे मतही तितकेच सॉलिड आहे, काळजी नसावी. किंबहुना हिंदुत्वप्रसारक आणि ख्रिस्ती धर्मप्रसारक यांच्यात काहीच फरक आम्हांस जाणवत नाही.
पण उलटपक्षी, ख्रिस्ती धर्मप्रसारक येथे मिसळपावावर किंवा अन्य मराठी संकेतस्थळांवर आपले प्रचारकार्य करण्यास अजूनपर्यंत तरी कडमडलेले नाहीत, त्यामुळे त्यांचा प्रतिवाद करण्याची गरज भासलेली नाही. अन्यथा, त्यांचाही तितक्याच खरपूसपणे समाचार घेतला जाईल, काळजी नसावी.
आणि हो, ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे कार्य (किंबहुना कोणाचेही कसलेही प्रचारकी कार्य) आम्हास तुच्छ वाटते. बाकी, ख्रिस्ती धर्मप्रसारकांबद्दल वैयक्तिक आदर किंवा तुच्छता वाटण्याइतके व्यक्तिशः तेही आमच्या खिजगणतीत नाहीत. एखाद्या मोठ्या यंत्रणेतील एखाद्या निव्वळ दांत्यास - संघटनेच्या निव्वळ प्याद्यास अथवा पाइकास अखिल संघटनेसम तोलून त्याबद्दल वैयक्तिक प्रेम किंवा द्वेष बाळगण्याचे काही कारण आम्हांस दिसत नाही.
बाकी, बाटवाबाटवीकार्यार्थ हिंडणार्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा स्वल्प अनुभव आम्हांसही आहे. सुरुवातीस त्यांचा थोडा त्रास वाटे, परंतु नंतर मग असे लक्षात येऊ लागले, की पूर्वी पुणे ४११०३० नामक स्थळी लहानाचा मोठा होत असताना 'संघास तुझ्यासारख्या बुद्धिमंतांची(!) गरज आहे*' म्हणत हळूच हातात गंडा (अथवा राखी) बांधू पाहणार्या संघिष्ठांस कटविण्याकरिता जी टेक्निके वापरली, जवळपास तीच सर्व टेक्निके याही मंडळींना (आणि अॅम्वेवाल्यांनासुद्धा) कटविण्याकरिता अतिशय उपयुक्त ठरतात. हे लक्षात आल्यापासून आम्ही निर्धास्त आहोत.
आणि तसेही, ज्याची मुळात बाटण्याची मनापासून इच्छा नाही, त्यास पाद्रीच काय, पण साक्षात आकाशातील बापदेखील जरी बाटविण्यासाठी आला, तरी असा माणूस बाटणे शक्य नाही, या आमच्या श्रद्धेप्रत आम्ही ठाम आहोत. एकवेळ आमच्याजवळ आमच्या धर्माबद्दल काहीबाही बोलून आमचा कोणी अपमान करण्याचा प्रयत्न करू शकेल - ज्यास आम्ही तसेही फाट्यावर मारतो - पण अशा रीतीने (किंवा इतर कोणत्या धर्माची भलावण केल्याने) आमचे धर्मांतर करणे त्यास शक्य होणे नाही. (हं, आता आमच्या धर्मबांधवांनीच जर का काही कारणास्तव आम्हास धर्मबहिष्कृत केले, तर शक्य आहे. पण आजकाल तेवढे करंटेपण त्यांच्यातही उरले असावे असे वाटत नाही.)
शेवटी भित्यापाठी चर्चराक्षस असतो, अशी आमची धारणा आहे. मुळात भ्यायचे किती, आणि (चर्चच्या) भीतीला (आणि पर्यायाने चर्चला) किती महत्त्व द्यायचे, हे मात्र ज्याचे त्याने ठरवावे.
कोणतेही दुकान हे ग्राहकांशिवाय चालणे नाही. ग्राहक जर "आपल्याला हा माल नकोच" यावर ठाम असेल, तर अशा ग्राहकाच्या गळ्यात त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही मारणे दुकानदारास अशक्य आहे. उलटपक्षी, जर ग्राहकच आपल्याला काय हवे/नको यावर ठाम नसेल, आणि दुकानदाराने गळ्यात मारलेले गरज नसतानाही विकत घेत असेल, तर मग "दुकानदाराने फसवले" म्हणून त्याने का रडावे? याचा साधा अर्थ ग्राहकही हा माल वापरून पाहण्याच्या विरोधात नव्हता असाच होत नाही काय?
दुसरी गोष्ट. चर्चने आपल्या धर्मप्रसाराचा, किंवा विहिरीत पाव टाकून 'सगळे बाटले' म्हणून हाकाटी पिटण्याच्या (किंवा तत्सम) स्टूपिड कांगाव्याचा, प्रयोग आजमितीस सदाशिव पेठेत नाहीतर भेंडीबाजारात करून दाखवावाच. काय परिणाम होईल? प्रयोग कितपत सफल होईल? की उलट असा प्रयोग करू पाहणार्याच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात अडकवल्या जातील? मग ईशान्येतलेच लोक इतके दूधखुळे आहेत काय, की अशी वाटेल ती सक्ती खपवून घेतील? की त्यांना इतर काही कारणांमुळे (योग्य की अयोग्य हा भाग अलाहिदा) चर्चचे आकर्षण वाटत असावे? आणि आकर्षणापोटी होत असेल (मग भले ते आकर्षण चुकीच्या कारणांपोटी असो), तर ती सक्ती कशी?
आणि सक्तीने किंवा स्टूपिड कांगाव्याने धर्मांतर वगैरे पंधराव्या-सोळाव्या-सतराव्या-अठराव्या-एकोणिसाव्या-अगदी-विसाव्या शतकांत खपून जात होते; आजकाल इतके दूधखुळे कोणी राहिले असावे असे वाटत नाही. मध्यंतरी अशाच एका विमानप्रवासात एका चर्चवाल्या सहप्रवाशिणीने असलेच काही चर्चवाङ्मय देऊ केले. (निखळ करमणुकीचा अभाव असण्याच्या काळात आम्ही असले वाङ्मय सहजी स्वीकारतो. टाइमपाससाठी काहीही.) त्या वाङ्मयात "या तिसर्या जगातील गोरगरीब लोकांना आपण तांदूळ देऊन बाटवू पाहतो, तर हे धूर्त लोक आपला तांदूळ घेतात तो घेतात, वर स्वतःला हवे तेच करतात नि आपला बाटवाबाटवीचा प्रयत्न व्यर्थ जातो; सबब या लोकांना तांदूळ देणे बंद केले पाहिजे" अशी रड होती. (तांदूळसुद्धा दिले नाहीत, तर बाटण्याकरिता तर सोडाच, पण आपल्या चर्चकडे ढुंकूनदेखील पहायला कोण कशाला कडमडेल, हा साधा विचार हे लिहिणार्या महात्म्याच्या मनास शिवला कसा नाही, हे कळले नाही.) तर सांगण्याचा मुद्दा, तथाकथित तिसर्या जगात लोक आजसुद्धा इतके दूधखुळे असावेत, हे पटत नाही. लोक चर्चकडे जर खरोखरच आकृष्ट होत असतील, तर यापेक्षा वेगळे काही कारण निश्चितच असले पाहिजे.
* 'संघास तुझ्यासारख्या बुद्धिमंतांची गरज आहे' हे वाक्य ऐकल्याला आजमितीस किमान तीसएक वर्षे तरी उलटली असावीत, परंतु या वाक्याचा अर्थ नेमका कसा लावावा याबाबत आम्ही आजतागायत बुचकळ्यात आहोत. एकतर सदर व्यक्ती आमची गणना बुद्धिमंतांत करून आम्हास (संघात आणण्यासाठी) मस्का लावण्याचा प्रयत्न करीत होती, की केवळ आमच्या बौद्धिक पातळीबद्दलच्या आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत होती, हे नीटसे कळलेले नाही. (आम्ही मठ्ठ आहोत हे आमचा चेहरा पाहून जन्मांधासही कळावे.) दुसरे म्हणजे, आमच्यासारख्याही 'बुद्धिमंतां'(!)ची ज्या संघटनेस आत्यंतिक निकड भासू शकते, त्या संघटनेच्या सरासरी बौद्धिक पातळीबद्दल आम्ही नेमक्या कोणत्या निष्कर्षाप्रत यावे, हेही समजलेले नाही. (अरे, आमची नाही तरी निदान स्वतःची तरी लाज काढू नका ना लेको!) शेवटी, ग्राउचो मार्क्सने म्हटल्याप्रमाणे, I don't want to belong to any organization that will accept people like me as a member!
10 Apr 2011 - 7:35 pm | आनंदयात्री
>>अन्यथा, त्यांचाही तितक्याच खरपूसपणे समाचार घेतला जाईल, काळजी नसावी.
तुम्ही खरपूस वैगेरे समाचार घेताय अशात स्वतःला ग्रेट म्हणवणार्या भ्रामक आनंदात असाल, तर जरुर रहा, आनंदी रहाणे तब्येतीस हितकारकच असते. वाईट वाटुन घेउ नका पण वस्तुस्थितीत तशी नाहीये. तुम्ही सभ्यपणे बोलणार असाल तर तुमच्याशी अजूनही चर्चा करण्यास हरकत नाहीच. तुम्ही उत्तम प्रतिवाद करुन समोरच्याला गप्प बसवताय अश्या गोड गैरसमजात राहु नका, तुमचा प्रतिवाद अत्यंत सामान्य दर्जाचा आहे, वादविवादात समोरच्याला अनस्टेबल करुन चर्चा भरकटवणे अश्या रोखाचाच वाटतो.
अवांतरः आज १० एप्रिल, पुलित्झर साहेबांचा वाढदिवस, जोसेफ पुलित्झर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
11 Apr 2011 - 11:07 am | पंगा
उत्तम वगैरे सोडा, मी प्रतिवाद वगैरे करीत आहे असाही माझा दावा नाही.
तूर्तास मी केवळ 'शिल्पा ब' या सदस्याने मला व्यक्तिशः विचारलेल्या प्रश्नाला थेट उत्तर देत आहे, बस इतकेच.
आपण माझ्याशी चर्चा करावी असा आग्रह मी आपणास केल्याचे आठवत नाही. हं, आपण मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अत्यंत प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, इतकेच.
सर्वप्रथम, 'विहिंप-रास्वसं-सनातन प्रभात छापाचे प्रचारकार्य' या शब्दसमूहातून, अशा प्रचारकार्याबद्दलच्या माझ्या भावना कमीत कमी (आणि प्राप्त परिस्थितीत शक्य तितक्या सौम्य) शब्दांतून मांडल्या होत्या. थेट 'तुच्छ' असे कोणालाही (त्या क्षणापर्यंत तरी) म्हटलेले नव्हते. अशा भावना बाळगण्यापूर्वी किंवा त्या व्यक्त करण्यापूर्वी मी आपणाशी कोणतीही सल्लामसलत अथवा संगनमत केलेले नव्हते. अशा भावना बाळगण्याचे आणि त्या इतपत सौम्य शब्दांत मांडण्याचे स्वातंत्र्य, मला वाटते, मला असावे. किंबहुना, अशा भावनाही (परवानगीविना) बाळगण्याचे स्वातंत्र्य जर मला नसेल, आणि एखाद्या गोष्टीबद्दल कोणतीही भावना बाळगण्यापूर्वी मी आपली वैयक्तिक परवानगी घेणे जर अपेक्षित असेल, तर दुर्दैवाने हा हुकूमशाहीचा परिपाक मानावा लागेल. तशी परिस्थिती नसावी अशी आशा आहे.
मात्र त्यानंतर आपण (आपल्या समजुतीच्या सोयीसाठी), मला या संघटनांच्या कार्याविषयी तुच्छता वाटते किंवा कसे, असा थेट प्रतिप्रश्न केलात. अशा परिस्थितीत, मी खोटे उत्तर देणे तर अपेक्षित नसावे? सबब खरे उत्तर - आणि तेही शक्य तितक्या स्पष्टपणे - देणे मला प्राप्त होते. हे उत्तर जर आपणास अपमानास्पद वाटले, तर आपल्या समाधानासाठी आपल्या प्रश्नाचे खोटे, अप्रामाणिक उत्तर तर मी देऊ शकत नाही?
त्याहीपुढे जाऊन, त्यायोगे मी श्री. कल्याणकरांनाही तुच्छ मानतो, अशा समजुतीप्रत आपण पोहोचलात, किंबहुना तसा माझ्यावर आरोप केलात. अशा परिस्थितीत, श्री. कल्याणकर यांच्याप्रति माझ्या वैयक्तिक भूमिकेचे खरेखुरे आणि प्रामाणिक प्रतिपादन करणे यावाचून नेमका कोणता पर्याय माझ्यासमोर उपलब्ध होता, हे कळू शकले नाही. आता हेही असभ्य आहे असा जर निष्कर्ष असेल, तर त्याला माझा नाइलाज आहे. आपण केलेल्या प्रश्नांची खरीखुरी आणि प्रामाणिक उत्तरे देणे मला भाग आहे, आणि केवळ आपण प्रश्न केल्यामुळे ती देणे मला भाग आहे. अशी उत्तरे जर आपल्या निकषांप्रमाणे असभ्य किंवा अपमानास्पद ठरत असतील, तर त्याबाबत मी काहीही करू शकत नाही, परंतु विचारलेल्या प्रश्नांची खोटी किंवा अप्रामाणिक उत्तरे देणे मला जमेल असे वाटत नाही. क्षमस्व.
यदाकदाचित हे मान्य होण्यासारखे नसल्यास, प्रश्न न करण्याची कृपा करावी, ही विनंती, जेणेकरून मला उत्तर देण्याची गरज भासू नये. आभारी आहे.
बाकी, आपणाशी संवाद मी चालू केलेला नाही, सबब आपण तो चालू ठेवावाच, असा माझा आग्रह नाही. पुन्हा आभारी आहे.
11 Apr 2011 - 8:47 pm | आनंदयात्री
पुन्हा एकदा सामान्य. उगाच स्वतःच्या मनाने हुकुमशाही वैगेरे शब्द घुसाडल्याने वाचकांची दिशाभुल होणार नाही, तुमचे चालू द्या.
तुम्ही चर्चेला आमंत्रण दिले नव्हते हे मान्य, पण तुम्ही कल्याणकरांचा अपमान करताय म्हणुन म्हणुन चर्चेला सुरुवात केली, आणि याही पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विश्व हिंदु परिषदेबद्दल वावगे उल्लेख दिसल्यास बोलणार.
अर्थातच आमच्यावरच्या संस्कारांना जागुन आम्ही सभ्य भाषेतच बोलणार.
बाकी वैयक्तिक अपमानाचे मुद्दे वर पृव केले आहेत, पुन्हा त्यावर भाष्य करण्याची इच्छा नाही.
तुम्हाला त्रास होणार असल्यास यापुढे वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रतिसादात देणार नाही, त्याबद्दल क्षमस्व.