हिदूंनो! निष्क्रिय राहू नका - स्टीफन नैप

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
7 Apr 2011 - 2:40 pm

हिंदूंना ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करण्याच्या भरतातील अनेक घटनांबाबत आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. मात्र गेल्यावेळी मी भारतात जेव्हा गेलो तेव्हा भारतातल्या परिस्थीतीबाबत चे अधिक स्पष्ट चित्र समजले. भारतातील बहुसंख्य हिंदूंना हे माहितच नाही, की हिंदुत्वाच्या विरोधात एक युध्द पुकारले गेले आहे आणि त्याचे गांभीर्य किती भयानक आहे. हिंदुत्वाला अनेक ठिकाणी अनेक मार्गांनी विरोध केला जात आहे. त्यामुळे भारतातील काही ठिकाणांमध्ये हिंदूमधील उपासनेचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे.

२००१ मधील जून महिन्यात वैदिक संस्कृतीबाबात प्रवचनांच्या निमित्ताने मी भारतातील अनेक शहरांमध्ये प्रवास केला. मुंबई, नागपूर, वरंगळ, विशाखापट्टणम, विजयवाडा, हैद्राबाद, बंगलोर , त्रिवेंद्रम आणि चेन्नई येथे गेलो असताना तिथल्या काही आध्यात्मिक क्षेत्रातल्या श्रेष्ठ व्यक्तींशी माझी भेट झाली. त्यानंतर धर्मांतर हा किती भयंकर विषय आहे, हे मला समजले.

मी जन्माने ख्रिश्चन आहे. माझे शिक्षण , बालपण सर्व काही ख्रिश्चन संस्कृतीत झाले. पण आता माझा ख्रिश्चन परंपरेशी काहीही संबंध राहिलेला नाही. पण मला ख्रिश्चन धर्मांतरणाची पध्दत चांगली माहित आहे. जीजसने सांगितलेल्या प्रेम आणि मानवतेच्या संदेशाचे विकृत रुप जगाच्या समोर मांडले जाते. दुसर्‍या धर्माची कायम स्वरुपी निंदा नालस्ती करण्याची ख्रिश्चन धर्मोपदेशकाची सवय असते. ख्रिश्चन सोडून इतर धर्माबाबतच अशी निंदा केली जाते, असे नाहि. ख्रिश्चन धर्मातच कैथोलिक , प्रोटेस्टंट आणि अन्य संप्रदाय एकमेकांवर अशीच चिखलफेक करत असतात.

हिंदू चालीरीती, संस्कृती आणि वेशभुषा करुन भारतात खोलवर रुजलेल्या संस्कृतीमध्ये ख्रिश्चनीटी घुसवण्याचा प्रयत्न केला जातो. चर्चच्या चिन्हामध्ये कमळातुन उगवलेला क्रॉस , भगव्या वेशातील धर्मगुरु आणि काही चर्चचे बांधकाम एखाद्या मंदिराप्रमाणे असल्याचे, आपल्याला याच कारणामुळे पहावयास मिळते. हे जर असेच सुरु राहिले, तर एक दिवस भारतात हिंदूंपेक्षा ख्रिश्चन अधिक झालेले दिसतील . उत्तर भारतात प्रवास करताना ख्रिश्चन धर्मगुरु धर्मांतरासाठी करत असलेल्या अनेक युक्त्या मला समजल्या. ईशान्य भारतातील एखादा आदिवासी जर ख्रिश्चन व्हायला तयार झाला, तर त्याला पॉलिस्टरची स्वस्तातली पैंट दिली जाते. तर आपल्या भावाला ख्रिश्चन करायला मदत करणार्‍याला मोटरसायकल दिली जाते. मध्यप्रदेशात काही मिशनरी आदिवासींना व्याजाने कर्ज देतात. हे कर्ज आदिवासि परत फेडू शकत नाहीत. जर ते ख्रिश्चन झाले तर त्याचे कर्ज आणि त्यावरचे व्याज दोन्ही माफ केले जाते. मिशनर्‍यांकडून नेहमी वापरण्यात येणारी आणखी एक युक्ती म्हणजे आजारी आदिवासींना सर्वसाधारण औषध घ्यायला सांगितले जाते. त्या औषधामुळे अर्थातच काहीही गुण येत नाही. त्यानंतर योग्य औषध दिले जाते आणि जिजसच्या प्रार्थनेनंतर ते ऋंग्णाला दिले जाते. साहजिकच ऋग्णाला बरे वाटते. अर्थात त्याचे कारण औषध हे आहे. जिजसशी त्याचे काहीही घेणे देणे नाही.

धर्मसभेमध्ये ख्रिश्चनेतरांना सामुदायीक उपचार करणे ही आणखी एक महत्वाची युक्ती आहे. यावेळी 'आपण आजारी असल्याचे भासवण्यासाठी' काही जणांना पैसे देऊन तयार केले जाते. धर्मसभेमध्ये त्यांना समोर बोलावले जाते आणि त्यांचे आजारपण अचानक चमत्कारासारखे नाहीसे होते, यामुळे ख्रिश्चन झाल्यास आपल्यालाही काही लाभ होऊ शकतो , असे साध्या भोळ्या आदिवासींच्या मनात आले, तर त्यात त्यांची काहीच चूक नाही. सुशिक्षीतांवर या युक्त्यांचा काहीही परिणाम होत नाही. मात्र अशिक्षीत आणि भोळ्या आदिवासींवर याचा परिणाम होतोच आणि ते ख्रिश्चनांकडे आकृष्ट होतात. म्हणूनच ख्रिश्चन धर्मगुरु हे नागरी भागापेक्षा आदिवासि भागातच धर्मांतराचे काम करतात. फसवणुकीने त्यांना आपले धर्मांतराचे काम अव्याहतपणे सुरु ठेवता येते. हे धर्मांतर बायबलमध्ये कोठेही सांगण्यात आलेले नाही. केवळ धार्मीक कारणासाठी धर्मांतरण करणार्‍यांबद्दल हिंदूंचा काहीही आक्षेप नाही पण फसवणुकीनी केलेल्या धर्मांतरणाबाबत हिंदू ना आक्षेप आहे.

ख्रिश्चन झाल्यावर दलितांना कमी दर्जाच्या जातीसारखी वागणूक मिळणार नाही, असे आश्वासन नवख्रिश्चनांना दिले जाते. मात्र एकदा धर्मांतर झाल्यानंतर या आश्वासनात काहीही तथ्य नसल्याचे लक्षात येते. ख्रिश्चनांमध्ये जातीचे पडदे अधिक भक्कम असल्याचेच निदर्शनास आलेले आहे. जातीभेद ही तर ख्रिश्चनांची मानसिकता आहे. नीच जातीतल्या ख्रिश्चनांसाठी वेगळे प्रवेशद्वार , वेगळी बैठकव्यवस्था किवा अन्य व्यवस्था केल्या जातात. लहान जातीतल्या ख्रिश्चनांच्या दफनविधीसाठी सिमिट्रीही वेगळ्या असतात. याचे खरे स्वरुप समजल्यावर नव्याने ख्रिश्चन झालेले अनेक जण आपल्या मूळ हिंदू धर्मात परत येतात. त्यांना विश्व हींदू परिषद हिंदू धर्मात येण्याचा मार्ग उपलब्ध करुन देत आहे.

धर्मांतरासाठी असली फसवणूक आणि दुहेरी मापदंड ख्रिश्चन नेहमी वापरतात. विश्व हींदू परिषदेने सुरु केलेल्या या शुध्दीकरणाला ख्रिश्चन नेहमीच आक्षेप घेतात. त्यांनी बर्‍याच वेळा या शुध्दीकरणाच्य विरोधात आक्रमक भूमिकाही घेतली आहे. नागालैण्ड्च्या बाप्टिस्ट कन्वेन्शनचे सचिव रेव्हरंड व्ही के नूह यांनी तसे उघड म्हटले आहे. 'जर कोणी ख्रिश्चनांवर श्र्ध्दा लादण्याचा प्रयत्न केला तर ख्रिश्चन ते सहन करणार नाहीत. शुध्दीकरणाविरोधात ख्रिश्चन युध्द करायलाही तयार आहेत.'
हिंदूंच्या शुध्दीकरणाच्या चळवळीमुळे ख्रिश्चन धोक्यात आले आहेत, अशी ओरड सुरु केली गेली होती(महाराष्ट्र हेराल्ड ११/७/१९९८)

ख्रिश्चनांच्या धर्माबाबत हिंदू नेहमीच सहिष्णु असतात. कारण सर्व धर्म एकाच चिरंतन सत्याकडे घेऊन जातात, असे हिंदू धर्म मानतो . म्हणून अन्य कोणत्याही धर्माला हिंदू कधीच विरोध करत नाहीत. मात्र सर्व धर्माचे मत हिंदूंप्रमाणे नाही. हिंदू संस्कृती उखडून फेकून द्यायला हवी असे काहींना वाटते. पूर्वांचलातिल आसाम, नागालैंण्ड आणि मिझोरामसारख्या राज्यांमध्ये गेल्या २५ वर्षामध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या २०० टक्के वाढली आहे. काही भागात तर हिंदू उपासना पध्दतीवरच बंदी आहे. लोकशाहीने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य गेले कोठे? या भागात हिंदू उघडपणे आरतीही करु शकत नाहीत. दुर्गेच्या मूर्त्या चोरल्या गेल्या, फोडल्या गेल्या म्हणून या भागातला दुर्गापूजा उत्सव बंद झाला आहे. हा भाग भारतापासुन वेगळा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

प्रेमाचा खरा संदेश जर कैथोलीक चर्चला सर्वांना द्यायचा असेल आणि त्याद्वारे सर्व मानवांचे जीवन प्रेममय करायचे असेल तर दुसर्‍या धर्माच्या बाबतीतही तसेच प्रेम दाखवले गेले असते. पोपनी सर्व आशिया खंड ख्रिश्चन करण्याचा संदेश दिला आहे. त्यावरुन तरी सर्व धर्मामध्ये हा प्रेमाचा संदेश दिला जाणार नाही , असेच स्पष्ट होते. ख्रिश्चनांच्या सर्व संप्रदायामध्ये हीच शिकवण दिली जात आहे.

नवी दिल्लीमध्ये असताना मी 'नैशनल कमिटी फॉर वुमेन' च्या सदस्या , शांती रेड्डी यांना भेटलो होतो. भारतीयांच्या तरुण मुलांना ख्रिश्चन पळवुन नेतात असे त्यांनी मला सांगितले. गरिब आदिवासी दांपंत्याकडून त्यांची लहान मुलगी चक्क २ त ५ हजार रुपयांना विकत घेतली जात असे. हीच मुलगी नंतर परदेशात ३० तो ४० हजार डॉलरला विकली जाते. ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या घरात सापडलेल्या नोंदीनुसार हा एक चांगला व्यवसाय आहे. आतापर्यंत मुलींच्या विक्रीच्या किमान २५ तरी घटना घडून गेल्या आहेत. भारतीय प्रशासनाने आतापर्यंत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ३०० मुलींना या नरकात जाण्यापासुन वाचवले आहे. ज्या कामासाठी मिशनरि जेथे काम करत असतात तेथे त्या व्यतिरीक्त असे नफा कमावण्याचे उद्योग सर्रास केले जातात. जेव्हा हिंदू अशा दुष्प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा त्यांना मुलतत्ववादी, संकुचित विचार करणारे आणि जातीयवादी असे ठरवले जाते. हिंदूंनी आक्रमक प्रतिक्रिया देऊ नये असे कां म्हटले जाते?

भारतातील वैदिक संस्कृती हळू हळू नष्ट होत जाण्याचे , शिक्षण क्षेत्र हे आणखी एक कारण आहे. भारतीय शिक्षणक्रमा मधुन वैदिक पाठ्यपुस्तके केव्हाच हद्दपार झाली आहेत. भारतीय मुलांना या वैदिक साहित्याचा काहीही अभ्यास मिळत नाही. मात्र ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या शाळेत ख्रिश्चन संस्कृतीचेच शिक्षण सक्तीने दिले जाते. उर्दू शाळेत कुराणचे आणी ख्रिश्चनांच्या शाळांमध्ये बायबलचे शिक्षण तर दररोजच दिले जाते. तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकारने त्यांना याबाबत सूटच दिली आहे.मध्यम वर्गीय भारतीय याच शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. शैक्षणिक क्षेत्रात हिंदु संस्कृती अशाने लुप्त होईल अशि भीति यामुळे वाटायल लागली आहे. 'भगवत गीता', 'रामायण', 'पुराण' आणि अन्य वैदिक साहित्य हे केवळ पुराणकथा नाहीत. जगातल्या अतिपुरातन हिंदु संस्कृतीचा एक भाग म्हणजे हे साहित्य आहे. अन्य धर्म खोटे आणि राक्षसि आहेत , केवळ जिजसचा मार्ग अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातो असे ख्रिश्चन मानतात. नवी दिल्लीत 'ईस्कॉन' च्या मंदिरातले काही साधक शाळांमध्ये जाऊन मुलांना वैदिक शिक्षण देतात. 'तुमचा देव कोणता?' 'तो देव आमच्यासाठी काय करु शकतो?' असे प्रश्न तिथली मुले विचारत असतात. त्यांच्या मनात हे प्रश्न ख्रिश्चन मिशनर्‍यांनीच भरलेले असतात. धर्मांतर करण्याची ही चाल नाही का?
आपल्या धर्म, संस्कृती, इतिहास आणि परंपराबाबत अनादर दाखवण्याचे विष , मिशनरीच मुलांच्या मनात पेरत असतात. भारतात सगळीकडे 'सेंट झेवियर स्कूल' नावाच्या शाळा दिसतात. हा फ्रान्सिस झेवियर कोण होता हे लोकांना माहितही नाही. तो धर्मगुरु, संत होता असेच सर्व समजतात. 'धर्मांतर केल्यानंतर माणसांना त्यांची मंदिरे आणि मुर्त्या फोडून टाकण्याचे आदेश' या झेवियरने दिले होते. 'ज्या हातांनी मूर्त्यांची पूजा केली तेच हात त्या मूर्त्या फोडून टाकतांना मला अतिशय आनंद होतो' असे त्याचे वक्तव्य होते. भारतीय संस्कृती नष्ट करण्याचेच काम त्याने आयुष्यभर केले.

गेल्या ६० वर्षात भारतातल्या राजकारण्यांनीही हिंदू विरोधी धोरण राबवण्याचेच काम केले आहे. शैक्षणिक आणि आर्थिक धोरण देशाच्या नशीबी मारले जाते, त्यात धार्मिक अल्पसंख्याकांसाठीच सुधारणा सुचवल्य जातात. केवळ मते मिळवण्यासाठी काँग्रेसने नेहमीच हिंदूंच्या विरोधात धोरण राबवले आहे. भारतातील १५ तो २५ वर्षातील पाश्चात्यांच्या परिणामामुळे लोकांनी वैदिक संस्कृतीकडे पाठ फिरवली आहे. चित्रपट, फैशन आणि तीच जिवन पध्दती स्वीकारायचे वेड या मुलांना लागले आहे. 'लिव्ह इन रिलेशनशीप' सारखी विकृती यामुळेच वाढीस लागलि. मंदिरामधील संस्कृत पंडीतही आता दिसेनासे होऊ लागले आहेत. 'रामायण' आणि 'महाभारत' केवळ टीव्ही वरच्या मालिकांमध्ये राहिले आहेत. आपण केवळ जमीन आणि प्रोपर्टिची काळजी करत आहोत, मात्र संस्कृती नष्ट होत आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही.

भारतावर आक्रमणकर्त्यांनी अनेक वेळा आक्रमण केले आणि भारत त्यातूनही अस्तित्वात राहीला. भारतातील ऐश्वर्य जरी लुटले गेले, तरी वैदिक संस्कृति अबाधित आहे. आजच्या पिढीने जर या वैदिक ज्ञानाकडे पाठ फिरवली, तर आणखी काही दशकांनी हे ज्ञान उपलब्धही असणार नाही. भारतात ८५ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. पण यामध्ये १५ टक्के बॉध्द, शिख आणि जैनही समविष्ट आहेत. म्हणजे हिंदूंची लोकसंख्या ७० टक्के आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या (मुस्लिम आणि ख्रिश्चन) शिक्षणापुअढे आणि ख्रिश्चनांच्या धर्मांतराच्या सध्याच्या वेगापुढे हे ७० टक्के आणखी किती दिवस शिल्लक राहू शकतील. आणखी काही पिढ्यांनंतर भारतात हिंदू बहुसंख्य राहणार नाहीत. सरकारकडे केल्या जाणार्‍या मागण्या आणि निवडणुकीत मतदान करणारे सगळे, बदलण्याच्या वाटेवर आहे. याशिवाय हिंदूंची संख्या घटल्यामुले कायदेही वाढणार्‍या अल्पसंख्याकांच्या हिताचे असतील. आणि एखाद्या धर्मक्षेत्राच्या ठिकाणीच हिंदू बघायला मिळतील.

या सर्व माहितीचा हेतू हा, की हिंदू सनातन धर्मियांनी सत्य परिस्थिती ध्यानात घ्यायला हवी. प्रतिक्रिया न देण्याचे त्यांचे धोरण अस्तित्वावरच घाला घालू शकते. निष्क्रिय राहण्याचा फायदा अनेकजण घ्यायला टपून बसले आहेत. आपल्या वैदिक संस्कृतीचे आपल्यालाच रक्षण करायल हवे आहे. त्यासाठी एक्त्रितपणे प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. काही काळापुर्वीच १ टक्क रशियन नागरिकांनी आपण हिंदू असल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. 'ईस्कॉन' च्या शिकवणुकीमुळेच हे शक्य झाले. याचा एक मोठा सामाजिक परिणाम झाल. 'वैश्विक वैदिक समाज' म्हणुन आपण जगभरातल्या हिंदूंना एकत्र केले पाहिजे. सनातन वैदिक परंपरेचे केंन्द्र म्हणुनच भारताचे रक्षण व्हायला पाहिजे ऐनी बेझंट यांनी या परंपरेचे अगदी यथार्थ शब्दात वर्णन केले आहे. डॉ. जगतियानी यांनी त्यांच्या 'हिंदू लाईफ लाईन ऑफ इंडिया' या पुस्तकात या वैदिक परंपरेची महती वर्णन केली आहे. हिंदू धर्मापेक्षा अधिक शास्त्रशुध्द, सनातन, तत्वज्ञानी आणि आध्यात्मिक विचार अन्य कोणत्याही धर्मात सापडत नाहीत. याबद्दल जेवढे अधिक जाणून घेतले जाईल. तेवढेच ते आवडू लागतील. हिंदुत्वाच्या पायातच भारताचि मुळे रुजलेली आहेत. त्यामुळे येथे असलेल्या सर्व संप्रदाय आणि उपासना पध्दतीचा पायाही, हिंदुत्व हाच आहे. जर हिंदूनीच हा पाया ऑळखला नाही तर हिंदूंना वाचवण्यासही कोणी येणार नाही. निष्क्रिय राहून वाद विवाद करत बसणे चुकीचे आहे. आपली संस्कृती जिवंत राहिली तरच भविष्यात आपल्या पिढ्या हिंदू म्हणुन जिवंत राहतील . समाजातल्या हिंदुविरोधी आव्हानांना ऑळखुन आजच त्यांचा सामना करायला तयार व्हायला हवे.

स्टिफन नैपयांच्या लेखाचा श्री संदीप कुलकर्णी द्वारे केलेला अनुवाद साभार वाचकांसाठी :-

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

11 Apr 2011 - 8:46 am | चिंतामणी

संघाची तुलना अ‍ॅम्वेशी केल्याने किंबहुना संघाला अ‍ॅम्वेच्या बरोबरीला आणून ठेवल्याचे वाचून ड्वॉले पाणाव्ले.

प्रश्नांचा उद्देश खरंच माहिती करुन घ्यायचा आहे की उगाच प्रत्यारोप करायचा?

आज चर्च जर (आरोप केल्याप्रमाणे) ईशान्येत धुमाकूळ घालत नसते, तर एरवी तिथे झक मारायला समाजकार्य करायला कोण गेले असते? चर्च तिथे इतके प्रबळ होईपर्यंत तिथल्या समाजाला काय गरजा नव्हत्या?

चर्च ईशान्येत धुमाकूळ घालत आहे हे मान्य कराता तर. हेही नसे थोडके. :)
कोणत्याही समाजाला गरजा ह्या असतातच. गरजा नसलेला समाज शोधून दाखवता? चर्च काय तेथे समाजकार्य करायला गेले होते काय? चर्चने केवळ तेथे त्यांच्या धर्मप्रसारार्थ पाय रोवले, त्या अनुषंगाने जे करायला हवे ते केले - तेथील समाजाच्या गरजांच्या कळवळ्याने नव्हे. तुम्ही म्हणता तसे चर्चच्या निमित्ताने का होईन जर संघ, रामकृष्ण मिशन व इतर संघटनांचे कार्यकर्ते तिथे जात असेल, तेथील समाजाबरोबर मिसळत असले व तिथे काम करु लागले तर काय बिघडले सांगता का? चर्चचे लोक धर्मप्रसाराचे ल़क्ष्य ठेवून समाजसेवा करतात ती समाजसेवा स्तुत्य आणि हिंदू कार्यकर्त्यांनी ते केले की प्रचारकार्य का? ती सेवा नाही का?

आज जे काही तिथे 'समाजकार्य' चालते, त्याचा उद्देश तरी तिथल्या लोकांच्या गरजा पुरवणे हा आहे, की 'हिंदुत्वा'ला निर्माण झालेल्या 'शहा'चा मुकाबला करणे हा आहे? आणि मग हा दोन अजेंडाधारींमधला गेमच जर आहे, तर मग दोघांनाही तिथे यथेच्छ धुमाकूळ घालू दे की! एकाच्याच नावाने खडे का फोडायचेहं, आता पैशाचे पाठबळ मिळत नाही हीच जर तक्रार असेल तर गोष्ट वेगळी

दोन्ही उद्देश्य असले असे तुमच्या म्हणण्यानुसार मानून चाललो तरी, गरीब, अडाणी जनतेला फसवून किरिस्ताव करण्यापेक्षा फार बरे आहे. तुमच्या मते हा गेमच असेल तर फक्त हिंदू संघटनांच्या नावाने का ओरडता? ती तक्रार नाही, वस्तुस्थिती आहे - तुटपुंज्या आर्थिक बळावर काम करणे फार कठीण असते. कधीतरी एका कार्यकर्त्यांची ओळख करुन देईन. त्यांच्या हालअपेष्टा जमल्यास अनबायस्ड मनाने वाचा म्हणजे पैशाची गरज का असते ते समजेल. इथे मिपावरच लिहीन. असो.

पंगा's picture

8 Apr 2011 - 9:52 pm | पंगा

चर्च ईशान्येत धुमाकूळ घालत आहे हे मान्य कराता तर.

ते मान्य आहेच.

चर्चचे लोक धर्मप्रसाराचे ल़क्ष्य ठेवून समाजसेवा करतात ती समाजसेवा स्तुत्य आणि हिंदू कार्यकर्त्यांनी ते केले की प्रचारकार्य का?

(१) चर्च समाजसेवा करते, आणि/किंवा (२) चर्च करते ती समाजसेवा स्तुत्य आहे, यांपैकी कोणता दावा नेमका कधी केला होता, याची कृपया आठवण करून द्यावी.

मात्र, चर्चच्या कार्याची माहिती देणारे / महतीचे वर्णन करणारे / प्रचार करणारे लेख चर्चच्या प्रसारकांकडून या संकेतस्थळावर आलेले ईश्वरकृपेने* आजवर तरी पाहिलेले नाहीत**. आणि याचे कारण चर्चकडे मराठीतून लिहू शकणार्‍या लोकांची कमतरता आहे हे असावे, असेही वाटत नाही.

आभारी आहे.

* हा ईश्वर नेमका कोणता, ते (गरज असल्यास) आपणच तपासावे. आम्हास तशी गरज भासत नाही.

** दिसल्यास त्यांचा प्रतिकार करूच.

यांपैकी कोणता दावा नेमका कधी केला होता, याची कृपया आठवण करून द्यावी.

त्याआधी, तुम्ही असे म्हटले असे वाक्य मी कुठे लिहिले आहे हे दाखवता का? माझे जनरल विधान स्वतःवर का ओढवून घ्यायची काय गरज आहे कळले नाही. एवढे काय तुमचे प्रतिसाद मन लावून वाचण्यासारखे असतात अशी गैरसमजूत आहे की काय तुमची? :)

आम्हास तशी गरज भासत नाही.

विचारलेय कोणी?

पंगा's picture

8 Apr 2011 - 10:00 pm | पंगा

(किंवा, माझ्या परवानगीशिवायसुद्धा चालू राहण्यास प्रत्यवाय नसेल, तर अत्युत्तम.)

दुसरा धागा शोधण्यास शुभेच्छा :)

पंगा's picture

8 Apr 2011 - 10:03 pm | पंगा

माझेही (आणि याच धाग्यावर) चालू राहणार नाही, असे मी कधी म्हटले?

यशोधरा's picture

8 Apr 2011 - 10:05 pm | यशोधरा

नाही , तुम्ही म्हटले नाही. तुमचा नाईलाज आहे ह्याची कल्पना आहे. :)

पंगा's picture

8 Apr 2011 - 10:07 pm | पंगा
शेखर's picture

8 Apr 2011 - 10:25 pm | शेखर

शब्दाशब्दाशी सहमत

परिकथेतील राजकुमार's picture

9 Apr 2011 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार

छान लेख.

खुर्चीला टेकुन 'कोणाचे कार्य तुच्छ आणि कोणाचे महान' किंवा 'कोण राष्ट्रहिताचे कार्य करतो आणि कोण राष्ट्र तोडण्याचे' अशा वांझोट्या चर्चा करणार्‍यांपेक्षा तुमचे कार्य निश्चितच थोर आहे हो कल्याणकर :)

आजकाल हिंदू, हिंदूसाठी, हिंदुराष्ट्र असे काही शब्द आले की काही लोकांना ते शिव्यांसारखे बोचतात.

असो...

विकास's picture

9 Apr 2011 - 6:12 pm | विकास

खुर्चीला टेकुन 'कोणाचे कार्य तुच्छ आणि कोणाचे महान' किंवा 'कोण राष्ट्रहिताचे कार्य करतो आणि कोण राष्ट्र तोडण्याचे' अशा वांझोट्या चर्चा करणार्‍यांपेक्षा तुमचे कार्य निश्चितच थोर आहे हो कल्याणकर

सहमत!

(खुर्चीला टेकुन ...= आर्मचेअर अ‍ॅक्टीव्हिस्ट ;) )

बबलु's picture

10 Apr 2011 - 11:38 am | बबलु

>>>खुर्चीला टेकुन 'कोणाचे कार्य तुच्छ आणि कोणाचे महान' किंवा 'कोण राष्ट्रहिताचे कार्य करतो आणि कोण राष्ट्र तोडण्याचे' अशा वांझोट्या चर्चा करणार्‍यांपेक्षा तुमचे कार्य निश्चितच थोर आहे हो कल्याणकर.

१००% सहमत

तिमा's picture

7 Dec 2011 - 4:46 pm | तिमा

जो कोणी चांगलं काम करत असेल त्याचा तेजोभंग करायचा. सदैव इतरांवर टीका करायची पण स्वतः मात्र कुठलेही भरीव काम न करता एकमेकांचे पाय ओढायचे, ही सर्व लक्षणे 'समाजवाद्यांची ' आहेत. आणि असे अनेक जण मला प्रतिसादात जाणवत आहेत.

हुप्प्या's picture

9 Apr 2011 - 7:41 pm | हुप्प्या

जो धर्म शांततेचे दुसरे नाव समजला जातो त्या धर्मात धर्मत्याग केलेल्या व्यक्तीला मृत्युदंड ठोठावला जातो. तशी वचने त्यांच्या धर्मग्रंथात आहेत.
भारतातील एक इस्लामचे अभ्यासू, विचारवंत झाकीर नाईक यांचे बहुमोल विचार इथे ऐका

अशी "छानशी", "शांतताप्रेमी" तरतूद हिंदू धर्मात असती तर इतके बेलगाम धर्मांतर होऊ शकले नसते बहुधा!

माननिय हुप्प्या,

तुम्ही तुमच्या घाणेरड्या सवयी प्रमाणे नेहमी सारखाच चुकीचा अपप्रचार करत आहात .. जरा व्हिडीयो नीट पहा अन त्यातील कुराणातील कोणते वचन सांगीतले आहे ते पहा . जो पर्यंत तुम्हाला इतर धर्माची पूर्ण माहीती नाही तोपर्यंत असे मुर्ख विधान करु नयेत कारण Little Knowledge is always Dangerous Mr.

तुम्ही दिलेल्या व्हिडियोत झाकिर नाईक यांनी कुराणातील एक वचन सांगितले आहे

सुरे बकरा २:२५६ "ला इकरा फिद्दिन" म्हणजे (इस्लाम मध्ये) कोणाला ही धर्माची जोर जबरदस्ती नाही
La ikraha fid-din means we must not compel anyone for faith is not something that can be forced upon someone. Death For Apostasy (धर्मांतरण करणार्‍याला मृत्यूदंड) Is Un-Islamic and NOT in the Qur'an!

"...There is no compulsion in religion. The right direction is here forth distinct from error..." [2:256]

In the light of the above verse, a person has to be totally irrational to believe that Islam prescribes execution for apostasy. Having the punishment of being killed for leaving the religion of Islam is severe compulsion. The Qur'an is clearly against any compulsion in religion.

The Qur'an further states:
"Say (Muhammad it is) truth from the Lord of all. Whosoever will, let him believe, and whosoever will, LET him disbelieve." [18:29]

In no uncertain terms, Allah commands the Prophet (saaw) to allow people to exercise full liberty regarding believing and disbelieving in Islam. If someone claims are made that the Shari'a recommends killing apostates, this is wrong , cannot be Islamic because it contradicts the above two verses.

अशी मृत्युदंड तरतूद हिंदू धर्मात असती तर इतके बेलगाम धर्मांतर होऊ शकले नसते बहुधा
असे तुमचे मुर्ख म्हणणे आहे, तुमच्या मते नारायण वामनराव टिळकांना ही मृत्यूदंड व्हायला हवा होता अन थोमस रामबान यांना ही .. Thomas Rambaan the first Brahmin convert to Christianity . ज्यांनी धर्मांतर केले त्यांना मृत्युदंड ठोठावणाचे विधान करणारे आपण कोण ? कोणी दिला तुम्हाला हा अधिकार ? आपण काही कोणाला जन्माला घातले नाही त्यांना मृत्युदंड ठोठावण्याचे विधान करणारे आपण कोण ? परमेश्वराने जन्माला घातले आहे , तो घेईल की काळजी.. आपण कोण ? ??

असो,
पण कल्याणकर यांचे कार्य खरोखरेच थोर अन वाखणण्याजोगत आहे

हुप्प्या's picture

10 Apr 2011 - 11:48 pm | हुप्प्या

आपणही आपल्या सवयीप्रमाणे गलिच्छ भाषेत माझ्यावर चिखलफेक करत आहात. चालायचेच. प्रत्येकाचे काही आवडीचे विषय असतात. असू द्यात.

आक्षेपार्ह भाग संपादीत. कृपया एकमेकांशी चर्चा/वाद करत असताना, संयमीत शब्दांचा वापर करावात.

एकमेकांना छेद देणारी, विपर्यस्त विधाने आपल्या सोयीप्रमाणे उद्धृत करून टीकाकारांना शिवीगाळ करणे हे आपल्यासारख्या स्युडो इंटलेक्चुयलच करू जाणे.

जर हे चूक आहे तर झाकीर नाईक उच्चरवाने त्याचे समर्थन का करत आहे बरे? एखाद्याने धर्म बदलल्यानंतर इस्लामविरोधी बोलल्यास त्याला मृत्युदंड आहे असे हा इसम म्हणतो. हे आपणास मान्य आहे का? असल्यास हे न्याय्य आहे का? कुणी काही म्हटले तर त्याचा विपर्यास करून ते इस्लामविरोधी ठरवून त्याला मृत्यूदंड ठोठावायचे प्रकार अफगाणिस्तान वगैरे देशात होतात. जिथे इस्लाम धर्म सोडणार्‍याला मृत्युदंड कायद्याने नेमलेला आहे त्या देशातील धर्ममार्तंडांना इस्लाम कळलेलाच नाही असे आपण म्हणता का?
उलट मी म्हणेन की आपण धूळफेक करण्याकरता हा ठरलेला युक्तीवाद योजला आहे. सौदी अरेबिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथले लोक इस्लामला बदनाम करत आहेत आणि तुम्ही सांगितलेले अर्थ हेच तेवढे खरे हे ढोंगीपणाचे बोलणे आहे.
खरी सुधारणा हवी असेल तर कुराणातील त्रुटी मान्य करणे आणि आधुनिक विचार स्वीकारणे हाच मार्ग आहे.
आपले मराठी बरेच कच्चे दिसते आहे. नारायण टिळक जे आता मयत आहेत त्यांना मी मृत्युदंड कसा देणार? मुळात मी अमक्याला मृत्युदंड द्यावा असे कुठे म्हटले?
मुस्लिमांप्रमाणे हिंदु धर्मात तशी तरतूद असती तर हिंदूंचे धर्मांतर फोफावू शकले नसते. एवढेच म्हणणे आहे. आपल्या सुमार आकलनशक्तीला ते कळत नसल्यास एखाद्या जाणकाराकडून समजून घ्या.
कुराणावर इतके मोठे प्रवचन द्यायची गरज नाही. तो विषयही नाही. असो.
जाता जाता: मी परमेश्वर वगैरे मानत नाही. त्यामुळे ती वाक्ये ही व्यर्थ आहेत.

नारायण टिळक जे आता मयत आहेत त्यांना मी मृत्युदंड कसा देणार? मुळात मी अमक्याला मृत्युदंड द्यावा असे कुठे म्हटले?
तुम्ही काय सांगीतले आहे ते नीट पहा , तुम्ही मृत्यूदंडाचे कळत न कळत समर्थन करीत आहात

मी म्हंटले त्यावर मी कायम आहे तुमच्या मते नारायण वामनराव टिळकांना ही मृत्यूदंड व्हायला हवा होता अन थोमस रामबान यांना ही ..
ते आता हयात नाहीत हे मान्य पण त्यावेळेला मृत्युदंड द्यायला हवा होत असे तुमचे म्हणणे आहे का ?? मृत्यूदंडाचा विषय तुम्ही या धाग्यावर काढला आहे मी नाही .
उलट मी म्हणेन की आपण धूळफेक करण्याकरता हा ठरलेला युक्तीवाद योजला आहे.
मला युक्तीवाद योजण्याचे कारणच नाही. मी तुम्हाला तुम्ही दिलेल्या व्हिडियोतील कुराणातील वाक्याचा अर्थ सांगीतला पण ते तुमच्या सारख्या माणसाला, परमेश्वर न मानणार्याच्या व्यक्तीच्या आकलना पलिकडचे आहे. तुम्ही स्वत:च ते एखाद्या जाणकाराकडून समजून घेणे हो पण मन मात्र स्वच्छ ठेवणे (कारण जात्याच मन स्वच्छ ठेवायला तुम्ही काही मनोबा नाहीत )
तुम्ही स्वत: परमेश्वर देव, धर्म मानत नाहीत ना तर मग दुसर्यांच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचे आपल्याला अधिकार नाही त्यामुळे तुमची मतेच मुळात व्यर्थ आहेत .
तुम्ही स्वत: परमेश्वर मानत नाहीत तर तुम्ही हिंदू आहात की नाहित यावर ही शंका आहे मग त्याप्रमाणे कोणी धर्मांतर करावे अन समाजाने त्याला मृत्युदंड कायद्याने द्यावा असे सांगण्याचे आपल्याला अधिकार नाहीत कारण मुळात जो परमेश्वर,देव, धर्म मानत नाही त्याला हा अधिकारच नाही
प्रत्येकाचे काही आवडीचे विषय असतात
तुमचे ही आवडीचे विषय आम्ही हेरले आहेत अन माझ्याप्रमाणे काहींचे ही त्यावर बारिक लक्ष आहे
जाता जाता : तुमच्या सारख्या महंता साठी मुर्ख हि शिवी नाही तुमच्या सुमार आकलन शक्तीला दिलेली ती एक उपाधी आहे

>>तुम्ही स्वत: परमेश्वर मानत नाहीत तर तुम्ही हिंदू आहात की नाहित यावर ही शंका आहे

वाहिदा, तुमचे बाकीचे वादविवाद चालूदेत, पण हिंदू असण्याचा आणि परमेश्वर मानण्या वा न मानण्याचा संबंध नाही . :)
एखाद्याचे आस्तिक वा नास्तिक असणे ह्यावर हिंदू असणे अवलंबून नाही. जर तुमची अशी समजूत असेल, तर ती चुकीची आहे.

वाहीदा's picture

11 Apr 2011 - 12:48 pm | वाहीदा

हिंदू धर्मात देव मानतात अशी माझी समजूत आहे .
पण जर कोणी स्वतच : परमेश्वर मानत नाहीत, धर्म मानत नाही त्यांने धर्मांतरासाठी मृत्युदंडावर भाष्य करणे चुकीचे वाटते. अर्थात तो अधिकार कोणालाच नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.

वाहिदा, हिंदू हा देव मानणारा वा न मानणाराही असू शकतो इतकेच मला सांगायचे आहे. हिंदू विचारसरणी मानणार्‍या प्रत्येकाला ही मुभा आहे. अमक्याच देवाला मानायला हवे वा तमक्याला मानले तर ढमक्याला मानू नये इ बंधने नाहीत.

वाहीदा's picture

11 Apr 2011 - 1:10 pm | वाहीदा

समजले, पण मुळात देव / परमेश्वर हा मानला जातो हे महत्वाचे व काही जणं तो न मानणार्‍यापैकी ही असू शकतात,
ज्याची त्याची मर्जी मान्य ! :-)

यशोधराने दिलेल्या उत्तरानंतर

<<<पण जर कोणी स्वतच : परमेश्वर मानत नाहीत, धर्म मानत नाही त्यांने धर्मांतरासाठी मृत्युदंडावर भाष्य करणे चुकीचे वाटते. अर्थात तो अधिकार कोणालाच नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.

ज्याची त्याची मर्जी मान्य ! Smile

हे जर समजतेय तर वरील भाषेतील प्रतिवादाची काही गरज नव्हती...किंबहुना वादासाठी वाद घालायचा म्हणुन दिल्यासारखा मला वाटतोय.

बाकी झाकीरसाहेबांची महती सगळ्यांनाच माहीती आहे.

नारायण टिळक जे आता मयत आहेत त्यांना मी मृत्युदंड कसा देणार? मुळात मी अमक्याला मृत्युदंड द्यावा असे कुठे म्हटले?
तुम्ही काय सांगीतले आहे ते नीट पहा , तुम्ही मृत्यूदंडाचे कळत न कळत समर्थन करीत आहात

मी म्हंटले त्यावर मी कायम आहे तुमच्या मते नारायण वामनराव टिळकांना ही मृत्यूदंड व्हायला हवा होता अन थोमस रामबान यांना ही ..
ते आता हयात नाहीत हे मान्य पण त्यावेळेला मृत्युदंड द्यायला हवा होत असे तुमचे म्हणणे आहे का ?? मृत्यूदंडाचा विषय तुम्ही या धाग्यावर काढला आहे मी नाही .
उलट मी म्हणेन की आपण धूळफेक करण्याकरता हा ठरलेला युक्तीवाद योजला आहे.
मला युक्तीवाद योजण्याचे कारणच नाही. मी तुम्हाला तुम्ही दिलेल्या व्हिडियोतील कुराणातील वाक्याचा अर्थ सांगीतला पण ते तुमच्या सारख्या माणसाला, परमेश्वर न मानणार्याच्या व्यक्तीच्या आकलना पलिकडचे आहे. तुम्ही स्वत:च ते एखाद्या जाणकाराकडून समजून घेणे हो पण मन मात्र स्वच्छ ठेवणे (कारण जात्याच मन स्वच्छ ठेवायला तुम्ही काही मनोबा नाहीत )
तुम्ही स्वत: परमेश्वर देव, धर्म मानत नाहीत ना तर मग दुसर्यांच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचे आपल्याला अधिकार नाही त्यामुळे तुमची मतेच मुळात व्यर्थ आहेत .
तुम्ही स्वत: परमेश्वर मानत नाहीत तर तुम्ही हिंदू आहात की नाहित यावर ही शंका आहे मग त्याप्रमाणे कोणी धर्मांतर करावे अन समाजाने त्याला मृत्युदंड कायद्याने द्यावा असे सांगण्याचे आपल्याला अधिकार नाहीत कारण मुळात जो परमेश्वर,देव, धर्म मानत नाही त्याला हा अधिकारच नाही
प्रत्येकाचे काही आवडीचे विषय असतात
तुमचे ही आवडीचे विषय आम्ही हेरले आहेत अन माझ्याप्रमाणे काहींचे ही त्यावर बारिक लक्ष आहे
जाता जाता : तुमच्या सारख्या महंता साठी मुर्ख हि शिवी नाही तुमच्या सुमार आकलन शक्तीला दिलेली ती एक उपाधी आहे

राजेश घासकडवी's picture

9 Apr 2011 - 7:52 pm | राजेश घासकडवी

हे जर असेच सुरु राहिले, तर एक दिवस भारतात हिंदूंपेक्षा ख्रिश्चन अधिक झालेले दिसतील .

२००१ च्या आकडेवारीनुसार भारतात ८०.५% हिंदू आहेत, व २.३% ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चन लोकसंख्येचा वार्षिक वाढीचा दर हा हिंदूंपेक्षा सुमारे ०.१% ने अधिक आहे. असं असताना अशी विधानं करताना तारतम्य बाळगावं. झुरळाइतक्या छोट्या प्रश्नाला प्रचंड मोठ्या बागुलबोव्याचं रूप देऊ नये.

धर्मांतर करवण्यासाठी खोटं बोलणं, पैसे देणं या युक्त्यांपेक्षा आपला विषय पटवून देण्यासाठी भंपक विधानं करणं हे वेगळं कसं?

त्यांना तो नक्कीच तितका लहान वाटत नाही.
कोणे एके काळी शून्यापासुन सुरुवात करुन ख्रिस्तधर्म आख्ख्या मध्य्पूर्वेत(हो.चक्क अरबस्थानातही) , आख्ख्या युरोपमध्ये सुसाट पसरला. जर त्याच्या प्रसाराला वेळिच शह दिला नाही. तर इथही तो ती critical value/वाढीचा वेग ओलांडायच्या प्रयत्नात आहे.त्यासाठीचं भक्कम इन्फ्रास्ट्रक्चर आणि अफाट नेटवर्क त्यांचं बरचसं उभारुन झालय. आता ते जे करणार आहेत ते ह्या दोहोंच्या सहय्याने भारताचं(विशेषतः ईशान्य भागाचं) ख्रिस्तिक्रण, तेही विद्युत वेगात. कुणाला काही कळेपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.

शाखेवर दिसलेल्या वातावरणातल्या ह्या भावना आहेत.
मागील हजार वर्षात ख्रिश्चन लोकसंख्येत ह्या देशात अत्यल्प वाढ झालेली असली तरी ह्या शतकात भयावह वाढ करण्याचं कारस्थान सुरु आहे, टिपेला पोहोचलय, असं काहिसं ते म्हणतात. तुम्ही म्हणताय ती "सध्याची" आकडेवारी आहे. भविष्यात ती शतपटीनं बदलेल(आळा घातला नाही तर) असं त्यांचं म्हणणं आहे.
प्रश्न झुरळाइतका लहान त्यांच्यासाठी नक्कीच नाही.

धर्मांतर करवण्यासाठी खोटं बोलणं, पैसे देणं या युक्त्यांपेक्षा आपला विषय पटवून देण्यासाठी भंपक विधानं करणं हे वेगळं कसं?
नसेलही फारसं वेगळं. पण ते भंपक विधान करतात हे त्यांना मान्य नाही.

--मनोबा.

राजेश घासकडवी's picture

10 Apr 2011 - 10:56 am | राजेश घासकडवी

नजीकच्या भविष्यकाळात ख्रिस्तीकरणातून भारतात हिंदूंपेक्षा ख्रिश्चनांची संख्या वाढवण्यासाठी किती हिंदूंचं ख्रिस्तीकरण करावं लागेल? (वीस वर्षांत हे व्हायचं असेल तर वर्षाला किमान दोन कोटी तरी धर्मांतरं व्हायला हवी. ख्रिश्चनांची सध्याची लोकसंख्या तीन कोटीच्या आसपास आहे हे लक्षात घ्या.) सध्या ईशान्य भारतात ख्रिस्तीकरणाचा जो दर आहे, तो या दराशी कितपत मिळताजुळता आहे?

जोपर्यंत हे आकडे न देता 'एक वेळ अशी येईल की भारतात हिंदूंपेक्षा ख्रिश्चन अधिक असतील' अशी विधानं होतात तेव्हा त्याला भंपकपणाच म्हणावं लागतं. म्हणजे खुनाच्या काही बातम्या वाचून 'असेच खून पडत राहिले तर भारतातले सगळे लोक मरून जातील' असं विधान करण्यासारखंच आहे.

आकडे द्या मग बोला. अचूक नसतील तरी चालतील. धर्मांतराचा आकडा हजारांत आहे? लाखांत आहे? दशलक्षात आहे? काहीतरी तपासून बघता येण्यासारखं सांगा.

हे विचारण्याचं कारण असं की ९० च्या सुमाराला मी अशीच विधानं, इतक्याच तळमळीने केलेली ऐकलेली आहेत. गेल्या वीस वर्षांत ढिम्म फरक पडलेला नाही. कशातच.

मन१'s picture

10 Apr 2011 - 12:00 pm | मन१

आकडे माझ्याकडे नाहित. त्यांच्याकडुन ऐकलेल्या भावना मी इथं मांडल्या.
स्वतः जे त्याविषयाबद्दल लिहितात त्यांच्यकडे अशी आकडेवारी असेलच.
फक्त आपल्या प्रतिसादाच्या अनुषंगाने त्यांची भूमिका पुसटशी सांगाविशी वाटली.

शाखेवर दिसलेल्या वातावरणातल्या ह्या भावना आहेत.
मागील हजार वर्षात ख्रिश्चन लोकसंख्येत ह्या देशात अत्यल्प वाढ झालेली असली तरी ह्या शतकात भयावह वाढ करण्याचं कारस्थान सुरु आहे, टिपेला पोहोचलय, असं काहिसं ते म्हणतात. तुम्ही म्हणताय ती "सध्याची" आकडेवारी आहे. भविष्यात ती शतपटीनं बदलेल(आळा घातला नाही तर) असं त्यांचं म्हणणं आहे.
प्रश्न झुरळाइतका लहान त्यांच्यासाठी नक्कीच नाही.

भावनांच्या खेळात आणि भविष्यातील धोक्यांच्या तथाकथित नांदिमध्ये निव्वळ आकडेवारीचा अभ्यासु युक्तिवाद पुरेसा ठरेल असं वाटत नाही. आणि काहीही आकडे मांडलेत तरी मतं बदलतील असं वाटत नाही.
बाकी, त्या विचारसरणीचे अभ्यासक आणि समर्थक हा धागा वाचत असतीलच, त्यांनीच अधिक भर घातली तर उत्तम.
मी ह्यापैकी काहीही नाही. चर्चेवर वाचनमात्र लक्ष ठेउन असताना चर्चा पुढं न्यायला दोन ओळी टंकल्या इतकच.

--मनोबा.

राजेश घासकडवी's picture

10 Apr 2011 - 12:12 pm | राजेश घासकडवी

मी जे लिहिलं ते शूटिंग द मेसेंजर वाटलं असल्यास क्षमस्व. ते मूळ लेखनासाठी/लेखकासाठीच होतं.

भावनांच्या खेळात आणि भविष्यातील धोक्यांच्या तथाकथित नांदिमध्ये निव्वळ आकडेवारीचा युक्तिवाद पुरेसा ठरेल असं वाटत नाही.

मुख्य मुद्दा असा आहे की प्रश्न नक्की काय आहे, व तो किती मोठा आहे याबाबत जर भंपक, प्रक्षोभक विधानं केली तर मग एकंदरीतच लेखकाच्या सत्यनिष्ठेबद्दल शंका येते. चांगल्या कामासाठी थोडीशी अतिशयोक्ती केली तरी हरकत नाही, या भावनेने तसं लिहिलं आहे का? दुर्दैवाने या अशा विधानांतूनच हे चांगलं, गरजेचं, आवश्यक काम आहे हे सिद्ध केलं जातं. मग आणखीनच घोळ निर्माण होतो. धर्मांतर हे एक मोठ्या प्रमाणावर विचारांतर आहे. तेव्हा लेखकाने वाचकाचं विचारांतर करताना लेखात ज्यावर टीका केली आहे ती धर्मांतराची तंत्रं वापरू नयेत, इतकंच.

असो. लेखकाला याबद्दल काही सद्सदविवेकाची टोचणी असेल तर तो खुलासा करेलच.

विश्वास कल्याणकर's picture

10 Apr 2011 - 10:54 am | विश्वास कल्याणकर

या जालावरील सुबुध्द व जाणकार वाचकांना येथील माहिती वाचनिय ठरावी.

नितिन थत्ते's picture

10 Apr 2011 - 12:24 pm | नितिन थत्ते

पाश्चात्यांचे ऐकून स्वदेशी लोकांवर टीका करण्याची पद्धत 'राष्ट्रीय' नागरिकांमध्येही आहेच.

१. हिन्दू धर्मातील "जाती व्यवस्था" ही तिरस्कार आणणारीच आहे / तिचा नषेधच.
२. इतर धर्मात "सन्मान " / समानता खरच आहे का ?
३. तसे असेल आणि कुणी धरमाम्तर केल्यास काहीच आक्शेप नाही .
४. आक्शेप हा " प्रलोभनाने / अज्ञानाचा फायदा घेवून / करवून " केलेल्या धर्मांतरा ला आहे .

नितिन थत्ते's picture

10 Apr 2011 - 12:26 pm | नितिन थत्ते

आक्शेप हा शब्द वाचून एका जालमित्राची आठवण झाली आणि डोळे पाणावले.

आक्शेप ला आक्षेप असेल तर क्ष(क्श)मा...
विचारांना आक्षेप असेल तर तसा नोंदवावा ही वि.

कवितानागेश's picture

10 Apr 2011 - 2:09 pm | कवितानागेश

१०० पूर्ण करायला आले.
बाकी चालू द्या!
;)

-धर्मांतर विरोधी,
(तथाकथित)धर्म विरोधी,
संघटना विरोधी,
अज्ञान विरोधी,
वादविवाद विरोधी,
माउ

पक्का इडियट's picture

10 Apr 2011 - 2:13 pm | पक्का इडियट

झालं का बुद्धिवाद्यांचं "फॉक्कन" करुन... ;)

मागे एकदा चर्चप्रणित शाळेतुन हिंदू देवदेवतांच्या चालवलेल्या बदनामीला आमच्या मित्रमंडळाने घेतलेल्या आक्षेपाला अनेक बुद्धिवाद्यांनी विरोध केला होता त्यावेळेस आम्ही तयार केलेली घोषणा "खाल्ल्या ताटात हागतंय कोण? बुद्धिवादी ! बुद्धिवादी !! " अचानक आठवली. :)

शिल्पा ब's picture

11 Apr 2011 - 12:49 am | शिल्पा ब

ही ही ही...बाकी बुद्धीवादी म्हणजे नेमकं काय असतं ते मला अजुनही समजलेलं नाही...सर्वज्ञ लोक इथे मिपावर आहेत ते खुलासा करतील अशी अपेक्षा आहे. (ते हा धागा वाचत असतील अशी शक्यता गृहीत धरली आहे.)

चिंतामणी's picture

11 Apr 2011 - 8:58 am | चिंतामणी

म्हणजे काय?

मिपावरून हद्दपार केलेल्या शब्दाच्या जागी हा शब्द वापरायचा आहे काय????

तज्ञांनी मार्गदर्शन करावे.

;)

आनंदी गोपाळ's picture

6 Dec 2011 - 11:48 pm | आनंदी गोपाळ

त्याच्या पुढची घोषणा ऐकली होती मी.
"त्या ताटात खातंय कोण?" असं बुद्धीवादी म्हणत म्हणे..
आय्तं ताट दिस्तंय. घ्या खाउन. ताटात काय वाढलंय त्याची चिकित्सा करायला आपण बुद्धीवादी थोडेच आहोत??

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Apr 2011 - 2:09 pm | पुण्याचे वटवाघूळ

कल्याणकर सहेब,

http://www.jsk.gov.in/articles/politics_of_population_mehar_singh_gill.pdf या लिंकेवर २४६ पनवर १९६१ पसूनची २००१ पर्यंत ख्रिस्चन लोकसंख्या किती होती याचा तक्ता दिला आहे. त्यात त्यांची लोकसंख्या १९८१ ते २००१ मध्ये २.५% वरून २.३% पर्यंत कमी झली असे म्हटले आहे.आणि हा लेख 'इकोनोमिक आणि पोलिटिकल विकली' सारख्या मासिकात चापून आला आहे तेव्हा त्यची क्रिडिबिलिटी जास्त आहे.

जर ख्रिस्चन लोक इतके मोठे प्रमानावर धर्मांतरे करत असतील तर त्यांची लोकसंख्येतील टक्केवारी कमी कशी झली? का हा लेखच खोटा आहे की धर्मंतरे मोठ्या प्रमानावर चालतात हा दावा खोटा आहे?

(झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

ता.कः मला मराठी अजूनही निट लिह्ता येत नाही त्याबद्दल दिलगिर आहे.

नितिन थत्ते's picture

11 Apr 2011 - 3:16 pm | नितिन थत्ते

ईपीडब्लू हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे. त्यापेक्षा सरकारी साईटवरील माहिती पहावी.

कल्याणकर

चांगला मुद्दा मांडला आहे .सहमत आहे. खालील लेख ही ह्याच संबंधी आहे. प्रसिध्द कन्नड लेखक भैरप्प ह्यांचा.

http://medsyn.blogspot.com/2008/11/it-happens-only-in-india.html

हा लेख इतर ही विरोधकांनी वाचावा. ख्रिश्चन व इस्लाम ह्यांच्या आक्रमकते संबंधी बोलताना ज्यांची तोंडे आपोआप बंद होतात अशा भ्याड लोकांनी ही वाचून थोडे धैर्य मिळवावे.