रस्त्यानं रेतीवाला तो आला
रस्त्यावर उभी मी उन्हातान्हाची
टमटम येत नाही कधीची
येईल का कोनी गाडीवाला
नेईल का मला कोनी घरला
प्रश्न मला पडला, पडला, पडला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||धृ||
मी गोरी पोरी कोल्याची
हाय देखणी लई सुंदर
रंगानं काळी मी पडल
उन्हात उभी राहील्यावर
वेळेवर मदतीला धावला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||१||
गाडी रेतीनं हाय भरलेली
लाल रंगानं हाय सजवलेली
मला भुरळ तीची पडली
सार्या गाड्यांमधून आवडली
तिच्यामधे घेवून जायला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||२||
रेवदांड्याच्या गणपाचा मैतर तो
आज आला माझ्या भेटीला
लई दिसानं ह्यो दिसला
नाही सोडणार मी त्याला
जावू लवकर कोलीगीतावर नाचायला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०४/२०११
प्रतिक्रिया
8 Apr 2011 - 5:18 am | आनंदयात्री
वाह वाह मस्त !!
आमचा गणपा रेवदांड्याचा माहिती नव्हते.
-
आंद्या रेतीवाला
8 Apr 2011 - 8:10 am | मदनबाण
दफोराव (पाषाणभेद=दगडफोड्या=दफोराव) हल्ली लयं जोरात हायसा... ;)
बाकी मला रेतीवाला नवरा कराव पाहिजे गाणं ऐकलं का ?
http://www.youtube.com/watch?v=KB2Ve0y3ys0
जाता जाता :--- महाराष्ट्रात रेतीवाला म्हंटले की लोक घाबरतात, कारण अवैद्य रेतीउपस्याला विरोध म्हणजे अंगावर ट्रक्टर/ट्रक चढवुन घेणे हे समिकरणच आहे.