उदारीकरणाच्या प्रक्रियेत
मनं उदार दिसत नाहीत
जग आकुंचित झाले मात्र
माणसे उदार भासत नाहीत.
जगाबरोबर दृष्टीही
ह्रस्व फक्त होत आहे
तहानलेल्याला पाजताना
पाण्याचाही व्यापार होत आहे.
पैसा आता देव झालाय
देवही श्रीमंत (?) झालाय
पैशावरील श्रद्धेचाच
वेदनादायक विजय झालाय.
देवळात आता देवाशिवाय
सारे काही मिळते
बडवे आणि पुजाय्रांना
मुजोरीही फळते.
प्रतिक्रिया
21 Jun 2008 - 3:25 pm | अमोल केळकर
जगाबरोबर दृष्टीही
ह्रस्व फक्त होत आहे
तहानलेल्याला पाजताना
पाण्याचाही व्यापार होत आहे.
खुप छान
21 Jun 2008 - 3:35 pm | संजीव नाईक
देवळात आता देवाशिवाय
सारे काही मिळते
अति सुदंर लिहत जा.......
संजीव
21 Jun 2008 - 4:40 pm | सखाराम_गटणे™
उदारीकरणाच्या प्रक्रियेत
मनं उदार दिसत नाहीत
जग आकुंचित झाले मात्र
माणसे उदार भासत नाहीत.
ह्या ओळी आवडल्या.
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
22 Jun 2008 - 1:37 am | श्रीमंतपेशवे
तहानलेल्याला पाजताना
पाण्याचाही व्यापार होत आहे.
पैसा आता देव झालाय
देवही श्रीमंत (?) झालाय
पैशावरील श्रद्धेचाच
वेदनादायक विजय झालाय
विचार खुपच छान आहे. पण त्यातील कठोर सत्याने मन व्याकुळ सैरभैर होते.
22 Jun 2008 - 3:28 am | विकास
संपूर्ण कविताच छान आहे.
देवळात आता देवाशिवाय
सारे काही मिळते
बडवे आणि पुजाय्रांना
मुजोरीही फळते.
अगदी खरे आहे!
22 Jun 2008 - 5:56 am | चतुरंग
चतुरंग
22 Jun 2008 - 9:15 am | विसोबा खेचर
काळाशेठ,
विकासराव म्हणातात त्याप्रमाणे मीही म्हणतो. संपूर्ण कविताच आवडली!
औरभी आने दो.
तात्या.
22 Jun 2008 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता, और भी आने दो !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
23 Jun 2008 - 5:06 pm | काळा_पहाड
अमोल केळकर,संजीव नाईक , सखाराम गटणे,
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, तात्या, चतुरंग , विकास, व श्रीमंतपेशवे
सर्वांचे मनःपुर्वक आभार.
आपला नम्र काळा पहाड