एक नेहमीसारखाच कंटाळवाणा नोकरीचा दिवस.....
मी रोजच्याप्रमाणे ऑफिसात येऊन दाखल झालो होतो...
नेहमीचीच कामं!
काही सहकार्यांवर सोपवली, जी फक्त माझ्यासाठीच होती ती करून संपवली.....
आता दिवस मोकळा....
पण नशीब नेहमीच साथ देत नाही!!!
"ट्रिंग, ट्रिंग...", फोन वाजला....
"हॅलो:....", मी
"हॅलो, सर, धिस इस जेनिफर स्मिथ, फ्रॉम डॅलस, टेक्सास.....", जेनिफर ही माझी एक सीआरए, क्लिनिकल रीसर्च असोसिएट....
"हाय जेनिफर, नाईस टू हिअर फ्रॉम यू आफ्टर अ लॉन्ग टाईम! हाउ कॅन आय हेल्प यू?"
"सर, आय अॅम अल्सो प्लीज्ड टू टॉक टू यू बट अंडर अन्फोर्चुनेट सरकमस्टान्सेस!!!!"
"व्हाय, व्हॉट इस द मॅटर?"
"सर आय हॅव अ पेशंन्ट हियर! शी इज नॉट रिस्पॉन्डिंग टू अवर मेडिकेशन!!! यू नीड टू कम हियर एएसएपी, सर!!!!"
"व्हाय? आरन्ट द लोकल डॉक्टर्स देअर? हाऊ ओल्ड इज शी?
"शी इज जस्ट सिक्स, डॉक!!!"
"........", मी.
"दॅट इस व्हाय आय गेव्ह यू अ कॉल!!!! यू नीड टू कम हियर पर्सनली......"
"बट व्हाय मी? इजंट ग्रेग अॅव्हेलेबल?", मी...
ग्रेगजॉन्सन हा आमचा क्लिनिकल ट्रायल अटेन्डिन्ङ डॉक्टर!!
आणि मला माझ्या वीकांताची काळजी!!!
"ग्रेग मे नॉट बी एबल टु हॅन्डल इट सर! नो ऑफेन्स टू हिम, बट धिस इज माय हंबल ओपिनियन!!!!", फील्डमध्ये वर्षानुवर्षे काम करून सरावलेली जेनिफर हे बोलत होती!!! मला झक मारत सिरियस व्हावंच लागलं....
".... ओके, ओके!!! आय विल बी ऑन द नेक्स्ट पॉसिबल फ्लाईट"
"थॅन्क्यू सर!!!", जेनिफरच्या आवाजात एक अनोखं गहिवरलेपण...,"सॉरी सर, आय नो आय अॅम स्पॉयलिंग युवर वीकेंन्ड!!!!"
"फक द वीकेन्ड!!! आय विल बी देअर बाय टूनाईट!!", आयची ** या वीकांताच्या!!!
" आय हॅव फक्ड माय वीकेन्ड टू, सर!!!! सी यू देन! यू विल नॉट बी डिसअपॉईंटेड!!!", जेनिफर इज अ गुड गर्ल....
क्लिक......
चिल्ड्रन्स मेडिकल सेन्टर इन डॅलस......
खास लहान मुलांसाठी निघालेलं हॉस्पिटल......
बालवयातच आयुष्याच्या अखेरच्या प्रवासाला निघालेले ते निष्पाप जीव.....
मला इथे यायला अजिबात आवडत नाही...
कारण हॄदय कळवळतं त्या इवल्याल्या जीवांचे हाल बघून!!!!
आणि संतापतंही!!!!
मनावर दगड ठेवूनच मी त्या हॉस्पिटलच्या सरकत्या दारातून प्रवेश केला.....
जेनिफर होतीच स्वागताला....
"प्लीज फॉलो मी सर, हियर शी इज..."
(क्रमशः)
प्रतिक्रिया
6 Apr 2011 - 11:28 am | नि३
वाचतोय.......
6 Apr 2011 - 11:30 am | स्पंदना
पिडा काका, विषय शिर्ष हलवणारा दिसतोय. पुढचा भाग वाचावा की नको हा विचार चाललाय. मला लहान मुलांबद्दल अस काही वाचताना फार त्रास होतो.
6 Apr 2011 - 11:57 am | विनायक बेलापुरे
+ १
पण पुढचा भाग वाचायची ओढ लागली आहे. पुस्तकासारखा शेवट आधी पाहता आला असता तर बरं, असं वाटतयं.
6 Apr 2011 - 11:31 am | छोटा डॉन
पिडांकाका, वाचतो आहे.
पुढच्या भाग पटकन टाका ...
- छोटा डॉन
6 Apr 2011 - 11:33 am | सहज
पुढे वाचायचे की नाही वाचायचे हा मोठा प्रश्न आहे!!
6 Apr 2011 - 11:41 am | पैसा
वाचून डोक्याला त्रास होणार हे नक्की. पण पिडां लिहितायत आणि वाचायचं नाही हे कसं शक्य आहे?
6 Apr 2011 - 11:58 am | छोटा डॉन
सहजरावांना +१
>>पण पिडां लिहितायत आणि वाचायचं नाही हे कसं शक्य आहे?
पैसाताईंना +२
- छोटा डॉन
6 Apr 2011 - 5:37 pm | वपाडाव
+१ टु सहजराव...
+२ टु पैसातै...
+३ टु डाण्राव...
6 Apr 2011 - 11:32 am | यशोधरा
सत्यकथेची सुरुवात मनाची पकड घेणारी झालेली आहे. लहान मुलांविषयी दु:खद वाचायला लागणारे का? :(
अवांतर : एक विनंती आहे की कथेतले संभाषण मराठीकरण करुन नाही का देता येणार? एखाद दुसरा शब्द, वाक्य इंग्लिशमध्ये ठीकच आहे, पण वाक्येच्या वाक्ये वाचायला नको वाटते.
6 Apr 2011 - 11:44 am | पिवळा डांबिस
कथेतले संभाषण मराठीकरण करुन नाही का देता येणार?
सॉरी, मला नाही देता येणार....
कारण मग ती कथा ज्या वातावरणात फुलली आहे ते वातावरण नाही मला उभं करता येणार!!!!
कथा पूर्ण झाल्यावर जर तुम्ही ती पुन्हा सर्वस्वी सं पूर्ण मराठीतच उभी करणार असाल तर तुमचे स्वागत आहे...
पण तोवर क्षमस्व!!!!
(अधिक चर्चा हवी असल्यास ती खवमध्ये करू)
6 Apr 2011 - 11:56 am | यशोधरा
ओके :) पुढील कथेची वाट पहात आहे.
अवांतर: चर्चा वगैरे काय हो काका? आणि सॉरी/ क्षमस्व? :( काका ष्टोरी सांगतत म्हणून विचारुचा धाडस केलय आणि तितकी मोकळीक घेतलय... तुमका आवडूक नाय तर सॉरी.
6 Apr 2011 - 11:57 am | पिवळा डांबिस
जेंव्हा तुझं व्यक्तिचित्र लिहीन तेंव्हा ते संपूर्ण मराठीतूनच लिहीन!!!
आय प्रॉमिस, ओके?
आता हास बघू!!!!
:)
6 Apr 2011 - 12:00 pm | यशोधरा
>जेंव्हा तुझं व्यक्तिचित्र लिहीन >> बाप्रे! जाहीर शिव्यो घालतल्यात तर! :D नको हां! :)
6 Apr 2011 - 12:41 pm | नंदन
नक्की लिहा हो काका - तेही मालवणीतून.
काकांक काळजी!! ;)
6 Apr 2011 - 12:52 pm | यशोधरा
तुका संपादित करुक देवचे आसत :P
7 Apr 2011 - 2:32 am | पंगा
मराठी कथेत इंग्रजीतील वाक्येच्या वाक्ये वाचायला नको वाटते हे खरेच आहे, परंतु लेखकाची अडचण समजू शकतो.
"कथा ज्या वातावरणात फुलली आहे ते वातावरण उभे करता येणार नाही" हा एक मुद्दा आहेच, शिवाय अनेकदा संवाद मराठीत जसेच्या तसे आणि आशयाला धक्का न पोहोचता आणण्यात एका प्रकारची कृत्रिमता येण्याचा धोका असतो, तो टाळावासा वाटणे साहजिक आहे.
विशेषतः,
यांसारखे संवाद मराठमोळ्या वातावरणात आणल्यास फारच विचित्र वाटू शकतील असे वाटते. "माझ्या वीकांताची ऐशीतैशी!" *, "माझ्या वीकांताची ऐशीतैशी तर मी अगोदरच करून ठेवलेली आहे साहेब!" * असे काहीसे भाषांतर करून वेळ मारून नेता येईल खरी **, पण तसे ते केल्यास मग ती नेमकी अर्थच्छटा येणार नाही, आणि ते नेमके वातावरण - आणि विशेष करून संवादकर्त्यांची एकमेकांशी अनौपचारिकता - मनश्चक्षूंसमोर नेमकी उभी राहणार नाही, या लेखकाच्या म्हणण्याची प्रचीती यावी, असे वाटते. आणि ही अडचण समजण्यासारखी आहे.
अशा अडचणीत लेखकाला न टाकलेलेच बरे.
(* अतिरिक्त उद्गारचिन्हे गाळलेली आहेत.)
(** याहून थेट अशी शतप्रतिशत मराठमोळी भाषांतरे अर्थातच शक्य आहेत, परंतु मग ती मूळ तर्जुम्यातील वाक्यांपेक्षा खूपच अधिक अनौपचारिक होतील; आणि किती वाचक ती पचवू शकतील याबद्दल साशंक आहे.)
बाकी,
याच्याशी सोळा आणे सहमत. अत्यंत प्रभावी सुरुवात!
7 Apr 2011 - 2:39 am | शिल्पा ब
प्रत्येकवेळेस एवढी चिरफाड केलीच पाहिजे का?
7 Apr 2011 - 2:51 am | पंगा
त्यांनी प्रश्न विचारला. मला त्यात अडचण नेमकी काय असू शकेल ती दिसते आहे असे वाटले. मी सांगितले.
मामला खतम.
आता यावर अधिक चर्चा (आणि तीही इथे) झालीच पाहिजे का?
7 Apr 2011 - 3:46 pm | यशोधरा
काकांना विचारले हो.
7 Apr 2011 - 5:44 pm | पंगा
त्याने काय फरक पडतो?
7 Apr 2011 - 5:47 pm | यशोधरा
काकांनी आधीच उत्तर दिले, संपला विषय. असो.
6 Apr 2011 - 11:34 am | इरसाल
ओ साहेब हुरहूर लावून ठेवलीय .....आता जास्त वेळ न लावता पुढचा भाग टाका पाहू लवकर
आतुरतेने वाट पाहतोय म्हटलं..........................
6 Apr 2011 - 11:42 am | नन्दादीप
वाचतोय....
.
.
.
.
.
.
.
.
स्तब्ध....!!!
6 Apr 2011 - 11:44 am | आनंद
या वर्षाची सुरवात चांगली होतेय, एका पेक्षा एक महारथी लिहते होतायेत.
6 Apr 2011 - 12:42 pm | नंदन
सहमत आहे. पहिला भाग अगदी पकड घेणारा, वाचतो आहे.
6 Apr 2011 - 6:15 pm | सखी
या वर्षाची सुरवात चांगली होतेय, एका पेक्षा एक महारथी लिहते होतायेत.
हेच टंकणार होते - मिपाला साडेतीन मुहर्तातील एकाची गरज होती असे दिसतेय. सुरवात नेहमीसारखीच उत्सुकता वाढवणारी, पकड घेणारी झाली आहे, भाग अजुन थोडेसे मोठे टाकता येतील का?
6 Apr 2011 - 8:35 pm | आनंदयात्री
मिपा वर छान आधीसारखे भरभरुन लेखन येतेय म्हणुन आनंद वाटतो.
पिडाकाकांचे लेखन म्हटले की पहिले अॅलिसनचे आणि काकांच्या गॉडपॅरेंट होण्याची गोष्ट आठवते, यापुढे आता ही लेखमाला आठवेल असे वाटते. काका सत्यकथा लिहितात आणि काका बेश्ट आहेत म्हणुन या गोष्टीचा शेवट करुण होणार नाही याची खात्री आहे.
(अवांतरः बाकी काका साहेब असल्याने काकांना हापिसात बर्यापैकी वेळ मिळतो हे निरिक्षण नोंदवुन ठेवले ;) )
6 Apr 2011 - 11:48 am | मृत्युन्जय
पिडांकाका भाग खुपच लहान आहे हो. पण वाचतोय. आशा करतो की सुखांत आहे.
6 Apr 2011 - 11:50 am | प्रीत-मोहर
:(
6 Apr 2011 - 11:51 am | प्रास
>>>>बालवयातच आयुष्याच्या अखेरच्या प्रवासाला निघालेले ते निष्पाप जीव.....
मला इथे यायला अजिबात आवडत नाही...
कारण हॄदय कळवळतं त्या इवल्याल्या जीवांचे हाल बघून!!!!
आणि संतापतंही!!!!<<<<
एकदम सहमत!
पुढचं लिखाण वाचायची घाई झालेली आहे. लवकर येऊ द्या पिडांकाका.....
6 Apr 2011 - 11:53 am | sneharani
वाचतेय...!
6 Apr 2011 - 11:53 am | साबु
वाचुन रहिलोय....
6 Apr 2011 - 12:02 pm | रामदास
माझा विश्वास आहे. डोळे पुसून झाल्यावर तुम्ही हसवणारच आम्हाला.
6 Apr 2011 - 3:55 pm | श्रावण मोडक
मुनीवर्यांशी सहमत व्हायला आवडेल. पण पाहू. रडवलं तरी हरकत नाही.
बाकी कसेही असो, पिडां लिहिताहेत हा मोठ्या आनंदाचा भाग आहे.
6 Apr 2011 - 12:05 pm | बिपिन कार्यकर्ते
केवळ पिडांची कथा आहे म्हणून पुढे वाचायचं धाडस करणारे.
त्रास होईल बहुधा.
6 Apr 2011 - 12:29 pm | धमाल मुलगा
:(
च्यायला... आता रडिवणार तुम्ही?
6 Apr 2011 - 12:33 pm | टारझन
.
6 Apr 2011 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार
वाचतोय काकानु...
पु.भा.प्र.
6 Apr 2011 - 1:14 pm | गणपा
पुढे काय वाढुन ठेवलं असेल याचा आताशी फारसा विचार न करता (डॉक्याला शॉट न लावता) वाचेन म्हणतो.
पण काकानु वाचायला सुरवात करता करताच संपला.
मनीच्या बाता : मेल्या काकाने उपास सोडलाय ते का कमी आहे?
6 Apr 2011 - 1:21 pm | टारझन
हा गणप्या काका ला मेल्या बोलला .. मी आत्ता पाहिलं .. करड्या आवाजात बोलला .. !!
6 Apr 2011 - 1:29 pm | निखिल देशपांडे
काका वाचतोय...
6 Apr 2011 - 1:46 pm | महेश काळे
लवकर येऊ द्या !!
आतुरतेने वाट पाहतोय म्हटलं..........................
6 Apr 2011 - 2:26 pm | दिपक
पिंडाकाका स्ट्राईक्स बॅक..
लवकर येऊद्या वाचतोय..
6 Apr 2011 - 6:08 pm | चित्रा
वाईट वाटते आहे, पुढे काय वाचावे लागणार म्हणून. (पण पिडा लिहायला लागले याचा आनंदही झाला).
6 Apr 2011 - 6:10 pm | शित्रेउमेश
पुढचा भाग लवकर येऊ दे काका...
सुरुवातच भन्नाट झालीये..... शेवट गोड असेल अपेक्षा करतो.....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
6 Apr 2011 - 7:16 pm | नाटक्या
सांगायचं झालं तर ते पोर मारून बिरून नका टाकू हा.. लहान पोर मारून आडयन्सला रडवून पैसा (प्रतिक्रिया) मिळवायचं ते पापं बघा.. थू!! ( त्यापेक्षा अस्सं कर ते जेनिफर नाय तर ते ग्रेग असतयं का नाही ते म्हातारंच असणार ते, मारा की तेला, काय पब्लीक रडंल तेव्हढं रडू देत )
आणि हो ते सारखे क्रमशः नको हो काका, लवकर एकादाच काय ती पुर्ण करून टंका.
6 Apr 2011 - 9:33 pm | क्राईममास्तर गोगो
आमचं तोंड पण अगदी गटारच की... ;-)
पण खरंच पहिला भाग म्हणून छान आहे.
6 Apr 2011 - 7:28 pm | प्राजु
पिडा इज ब्यॅक!!
काका... मस्त!! सॉल्लिड आनंद झालाय ..तुम्हाला पुन्हा लिहिताना पाहून. :)
6 Apr 2011 - 7:37 pm | ५० फक्त
अतिशय संवेदनशील विषय आहे, आणि तुमच्या लेखणीतुन तेवढ्याच सहजतेनं उतरतो आहे. पुढचं वाचणं होईल का नाही ते माहित नाही, पण जमलं तर वाचेन.
तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
6 Apr 2011 - 8:09 pm | विकास
पुढचा भाग लवकर येउंदेत...
6 Apr 2011 - 8:41 pm | निनाद मुक्काम प...
येऊ दे अजून
ह्या वैद्यकीय शेत्रातील लोकांचे आयुष्य अजब असते .
म्हणजे समजा
विकांताला बायकोचा किंवा एखाद्या मित्राचा वाढदिवस म्हणून घरी बायको वाट पाहत आहे .व डॉक्टर अश्या प्रकारची केस हाताळून घरी येत आहे .तेव्हा त्यांना लगेच आपला मूड स्वीच कसा काय करून लगेच आंनद साजरा करेन .?
अश्या घटना त्यांच्या वयक्तिक आयुष्यात प्रभाव टाकतात का ?
हा प्रश्न नेहमी मला पडतो
6 Apr 2011 - 9:39 pm | धनंजय
पुन्हा लिहायला घेतले हे उत्तम!
6 Apr 2011 - 10:04 pm | गोगोल
तुम्ही डॉक्टर आहात?
6 Apr 2011 - 10:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढचा भाग लवकर टाका.
-दिलीप बिरुटे
6 Apr 2011 - 10:58 pm | शिल्पा ब
पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
7 Apr 2011 - 1:59 am | बहुगुणी
..भरपाई चांगलीच होणार असं दिसतंय! येऊ द्या लवकर पुढचे भाग..
(पुढचं कथानक CRO आणि clinical trials शी संबंधित असेल का असा विचार करतोय..)
7 Apr 2011 - 4:12 am | भाग्यश्री
काका, वाचतेय!!
रडावू नका प्लीज!!
7 Apr 2011 - 7:15 pm | लिखाळ
वाचतोय...
7 Apr 2011 - 11:44 pm | नीधप
मस्त सुरूवात सिडॉ!
8 Apr 2011 - 11:15 am | सविता००१
...
8 Apr 2011 - 11:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढे?
(रोमन लिपीतलं मराठी आणि देवनागरी लिपीतलं इंग्लिश वाचायला त्रास होतो खरा!)
8 Apr 2011 - 3:10 pm | चिगो
पकड घेणारी सुरुवात आहे.. कुठल्याही अपेक्षा न ठेवता आणि मागण्या न करता, पुभाप्र.
8 Apr 2011 - 3:18 pm | विनायक प्रभू
पु.भा.ल्.टा.
8 Apr 2011 - 5:39 pm | नगरीनिरंजन
पुढे काय आणि कधी? या भागावरून काहीच अंदाज लागत नाहीये.
8 Apr 2011 - 6:20 pm | भडकमकर मास्तर
चांगली सुर्वात पण छोटा भाग .. येउद्या
8 Apr 2011 - 10:55 pm | राजेश घासकडवी
पुढची कथा येऊ द्यात.
हे वर्ष मिपावरील एकंदरीत लेखनाच्या दर्जाच्या बाबतीत सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं जाणार अशी चिह्नं दिसत आहेत.
8 Apr 2011 - 11:04 pm | प्राजक्ता पवार
वाचतेय ...
9 Apr 2011 - 1:46 am | शहराजाद
वाचतेय. पुढचा भाग लवकर टाका.
26 Jun 2015 - 11:18 pm | NiluMP
ह्या लेखाचा पुढचा भागाचा दुवा कोणाला माहित आहे का?
28 Jun 2015 - 1:53 pm | मी-सौरभ
खाण कामगार झिंदाबाद
29 Jun 2015 - 12:56 pm | शि बि आय
काय छान सस्पेंस क्रिएट केलात हो !
अगदी सुरुवाती पासूनच पकड घेतली आहे कथेने.
पुढचा भाग कधी टाकणार आहात?
30 Jun 2015 - 4:51 pm | तुडतुडी
आणि हो ते सारखे क्रमशः नको हो काका, लवकर एकादाच काय ती पुर्ण करून टंका.>>+11111111
पहिला भाग फारच छोटा झाल्यासारखा वाटतोय
15 Apr 2024 - 12:55 pm | शित्रेउमेश
या कथेचे पुढचे भाग कुठे मिळतील??