थोडेसे शब्दवणे

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
4 Apr 2011 - 7:50 pm

तंद्रीमधून अचानक भान यावे तसे आमच्या दारातल्या झाडाला पालवी फुटली. नाजूकश्या पानाने फांदीच्या सालीला फाडून बाहेर येणे हे आश्चर्य. पातळ नाजूक पाने ! वार्यावर डुलून नवजीवनाची द्वाही देणारी. रंग तरी कसा तर शब्द बापुडे. निसर्गाशी असलेली आपली नाळ तुटली असे वाटून आत पोटात कुरतडते. अभिव्यक्तीची मर्यादा अधोरेखित करण्यासाठीच शब्दाने जन्म घ्यावा. आपले शब्द जसे तसेच झाडाला आलेली नवी पालवी. जीवन सातत्या बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठीचे सर्व प्रयत्न. पण जीवन या सर्वांहून फार मोठे व्यापक.

मी नव्या उत्साहाने गुढीसाठी पालवी तोडणार तोच दहा-बारा वर्षांचा कोवळा मुलगा मला म्हणाला, गुढी उभारायची ती त्या नव्या पालवीच्या कौतूकासाठीच ना! मग ती पालवी तोडायची कशाला. हे क्रूर नाही का? आपण त्या फांदीलाच वस्त्र लाऊया. नव्या पालवीचे कौतूक करुया !
माझ्या डोळ्यात कौतूकपाणी तरारले.
आज नवे वस्त्र थेट झाडाच्याच फांदीला लावले.
एका नव्या उमलणार्‍या कळीने नव्या पालवीला दिलेली ती निसर्गनिष्ठ दाद होती.

-- लिखाळ शब्दवणे

वाङ्मयमौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

कल्पनातीत!!

तुमच्या पालवीला सलाम !!

गणपा's picture

4 Apr 2011 - 8:05 pm | गणपा

क्या बात !!!

चतुरंग's picture

4 Apr 2011 - 8:09 pm | चतुरंग

इतक्या कालावधीनंतर अचानक लिखाळाने लिहिले जणू उंबरफूलच! नववर्षाच्या स्वागताला अंतरात्म्यातून उमललेल्या ह्या सुगंधी शब्ददवण्याला सलाम!
बाकी कौतुकपाणी ह्या शब्दाने डोळे अंमळ पाणावले! ;)

-चतुरंगवणे

धमाल मुलगा's picture

4 Apr 2011 - 8:18 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))
=)) =))
=))

अरेऽऽ....
भल्या माणसा.. _/\_
पाय कुठायत तुझे? कापून देव्हार्‍यात ठेवतो. :D

-( आवर रे) ध.

निवेदिता-ताई's picture

4 Apr 2011 - 8:29 pm | निवेदिता-ताई

छानच हो............

आणी आज टी.व्ही. वर पाहिले का इको फ्रेंडली गुढ्या विक्रीस आलेल्या दाखवत होते..
कल्पना छान आहे!!!!!!!!!!

प्रकाश घाटपांडे's picture

4 Apr 2011 - 8:45 pm | प्रकाश घाटपांडे

कल्पना आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2011 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी नव्या उत्साहाने गुढीसाठी पालवी तोडणार तोच दहा-बारा वर्षांचा कोवळा मुलगा मला म्हणाला, गुढी उभारायची ती त्या नव्या पालवीच्या कौतूकासाठीच ना! मग ती पालवी तोडायची कशाला. हे क्रूर नाही का? आपण त्या फांदीलाच वस्त्र लाऊया. नव्या पालवीचे कौतूक करुया !

वरील वाक्यांना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. :)

-दिलीप बिरुटे

संदीप चित्रे's picture

4 Apr 2011 - 9:08 pm | संदीप चित्रे

एकदम सही सही

प्रास's picture

4 Apr 2011 - 9:14 pm | प्रास

लिखाळांचे अत्यंत कमी शब्दात महत् लिखाण!

आवडले. ते कौतुकपाणी आणि नव्या पालवीचे कौतुक, लई म्हणता लईच भारीये......

:-)

येस्स! लिखाळ इज ब्यॅक!!
केवळ केवळ केवळ शब्दातीत!! काय लिहू..!
वरती चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे खरंच उंबराचे फूल आहे.. जियो!!

असुर's picture

4 Apr 2011 - 9:41 pm | असुर

लिखाळभौ अनेक हजार वर्ष कुठे गायप होते कुणास ठौक! पण आज पाडव्याचा मुहुर्त साधून जोरदार वेन्ट्री घेतलेली आहे. टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे!!

गुढी उभारायची नवीन पद्धत आवडलीच! पुढल्या वर्षी घरी करुन पाहीन म्हणतो!!

--असुर

लिखाळभौ अनेक हजार वर्ष कुठे गायप होते कुणास ठौक!

गेली हजार वर्षे शब्दसमाधीस्थ होतो. इकडे वसंत सुरु झाला आणि शब्दपालवी फुटू लागली. समाधी भंगली.
आता अशीच शब्दफुलांची परडी घेऊन पुन्हा येईन. ;)

चित्रा's picture

6 Apr 2011 - 7:51 am | चित्रा

लिखाळभाऊंचे हायबरनेशनमधून वसंत ऋतुत स्वागत! :-)

लेख आवडला.

बहुगुणी's picture

4 Apr 2011 - 9:45 pm | बहुगुणी

लिखाणाची खूप वाट पहायला लावून प्रतीक्षेचं चीज केलंत!

आता ही शब्द-पालवी अशीच तरारू द्या नव्या वर्षात!

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Apr 2011 - 11:21 pm | बिपिन कार्यकर्ते

आज पाडवा आहे म्हणून लिखाळाला श्या घालत नाहीये. एरवी कधी भेटच रे तू. निषेध म्हणून लेखनावर प्रतिक्रिया देत नाहीये. ;)

धनंजय's picture

4 Apr 2011 - 11:46 pm | धनंजय

पालवीसारखेच नवथर लुसलुशीत लेखन.
लिखाळांनी डोळ्यांत कौतूकपाणी आणले अगदी.

- - -
(रिव्हर्स-इंजिनियरिंग करून याचे सुडंबन करायला हात शिवशिवत आहेत. पण नको... मला पेलायचे नाही.)

दीविरा's picture

4 Apr 2011 - 11:51 pm | दीविरा

एकदम सही :)

भडकमकर मास्तर's picture

5 Apr 2011 - 7:42 am | भडकमकर मास्तर

जबरी...
प्राध्यापक लिखाळांचे शब्दवणे आवडले....

नंदन's picture

5 Apr 2011 - 8:11 am | नंदन

अगदी प्रातःदवणीय लेख ;)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Apr 2011 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार

अगदी हेच लिहायला आलो होतो =))

__/\__

राजेश घासकडवी's picture

5 Apr 2011 - 8:18 am | राजेश घासकडवी

लिखाळांची शब्दवणी... आपलं शब्दवही सापडलेली दिसत्ये. मस्त. अजून येऊद्यात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Apr 2011 - 4:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी हेच लिहायला आले होते. :-)

सहज's picture

5 Apr 2011 - 8:41 am | सहज

मासूम (शेखर कपूर दिग्दर्शीत सिनेमा) मधील झाड/वेलींना इजा झाल्यावर हळवा होणारा तो लहान मुलगा (जुगल हंसराज) आठवला.

फोटो - passionforcinema.com येथुन

लिखाळसाहेबांचे स्वागत!!

५० फक्त's picture

5 Apr 2011 - 9:29 am | ५० फक्त

चारच ओळी पण फार सुंदर लिहिल्या आहेत तुम्ही. अतिशय धन्यवाद तुम्हाला.

सुहास..'s picture

5 Apr 2011 - 10:02 am | सुहास..

या लेखावर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पहिजेत.

साबु's picture

5 Apr 2011 - 2:42 pm | साबु

सहिच... _/\_

श्रावण मोडक's picture

5 Apr 2011 - 4:03 pm | श्रावण मोडक

.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2011 - 4:35 pm | llपुण्याचे पेशवेll

लेख आवडला. आम्हाला दवण्यांचे लेखनही आवडत असल्याने तुमचाही लेख आवडला. असो. असेच (म्हणजे दवणीय किंवा अदवणीय पण) लिहीत रहा.

sneharani's picture

5 Apr 2011 - 4:43 pm | sneharani

सुंदर लिहल आहे!मस्त!!
:)

लिखाळ's picture

5 Apr 2011 - 5:25 pm | लिखाळ

शाब्दिक प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार.
अशाब्दिक प्रतिसादासाठी श्रामोंना '!'

केवळ सुरेख..

सांजसखी's picture

6 Apr 2011 - 8:12 am | सांजसखी

>>>अभिव्यक्तीची मर्यादा अधोरेखित करण्यासाठीच शब्दाने जन्म घ्यावा.

व्वा !!! फारच छान लिखाण आहे .आवडले.

तीन फुल्या तीन बदाम's picture

17 Apr 2011 - 10:40 pm | तीन फुल्या तीन बदाम

'तंद्रीमधून अचानक भान यावे तसे आमच्या दारातल्या झाडाला पालवी फुटली. ' या पालवीने माझी तंद्री मात्र मोडली. एव्हाना वसंत आला... या धकाधकीत हे ध्यानातच आलं नाही रे.. या रोजच्या रहाट-गाड्यात ह्या पालवीची तुला जाणिव होते हेच तुझं भाग्यं.. इथे फुललेली पालवीच जिथे grasp होत नाहीये तिथे प्रतिभेची पालवी कसली फुलणारं...
असो..