दुधसागर - धबधबा

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
17 Jun 2008 - 12:18 pm

दुधसागर -

मडगाव पासुन २ तासाच्या अंतरावर मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे. काहीसा दुर्लक्षीत असा पण अतीशय प्रेक्षणीय धबधबा आहे. पाण्याच्या दुधासारख्या रंगामुळे कदाचीत त्याला हे नाव पडले असावे. सभोवती अतीशय घनदाट जंगल आहे. आपला जसा कर्जत- लोणावळा रेल्वे मार्ग आहे तसाच मडगाव - दुधसागर- लोंढा मार्ग घाटाचा आहे. अतिशय नयनरम्य प्रवास असे वर्णन करता येईल.

दुधसागरला रहायची फारशी चांगली व्यवस्था नाही. कर्नाटक सरकारच्या फॉरेस्ट डिपारमेंटचे गेस्ट हाऊस आहे. तेथील व्यवस्थेची फारशी माहिती नाही. मडगावहुन एकादिवसात जाऊन येणे बरे. मडगावहुन रेल्वे तसेच रस्ताने ही जाता येते.

गोव्यात गेल्यावर सागर किनारे, देवळे याचबरोबर वेळ असल्यास अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण.

धबधब्याची काही चित्रे ( आंतरजालावरुन साभार)

प्रवासशिफारस

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

17 Jun 2008 - 12:23 pm | धमाल मुलगा

वाह!!!

अक्षरशः 'दूध'सागर आहे.

मस्तच. वेडावलो मी नुसते फोटो पाहून...प्रत्यक्षात काय दिसत असेल नाही?

अमोल, मस्तच फोटो आहेत :)

येऊदे अजुनही असतील तर.

मनस्वी's picture

17 Jun 2008 - 1:07 pm | मनस्वी

सह्हीच्चे एकदम!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

शैलेन्द्र's picture

17 Jun 2008 - 12:48 pm | शैलेन्द्र

अस धबधबा वाहत असताना, त्या रेल्वेने जावुन बघा....

Rainman's picture

17 Jun 2008 - 1:21 pm | Rainman

आइशपतच , सहीच आहे धबधबा .. ट्रेन ला थांबुन ठेवायचं पुलावरच मस्तपैकी , मजाच येइल.

अमोल केळकर's picture

17 Jun 2008 - 1:46 pm | अमोल केळकर

त्या मार्गावरील ( मडगाव ते लोंढा ) बर्‍याच रेल्वे गाड्याना तिथे थांबा आहे. धबधबा स्टेशनपासुन जवळच आहे. पुलावर गाडीचा वेग कमी असल्याने छान द्रूश्य दिसते.

पुर्वी मी लहान असताना मडगावच्या मावशीकडे मिरजेहुन - मडगावला रात्रीच्या गाडीने जायचो. अनेक वेळा रात्री जागुन (आणी आई, बाबांची बोलणी खाऊन) सधारणतः पहाटे ३-४ वाजता धबधबा पाहिल्याचे स्मरते. रात्र असताना दे़खील त्याचा दिसणारा पांढरा शुभ्ररंग केवळ अप्रतिम.त्यावेळी तो मार्ग मिटरगेज होता. आता ब्रॉडगेज झाला आहे.

आपला
अमोल

अवांतर - बहुतेक हा धबधबा कधी कोरडा पडत नाही .

स्वाती दिनेश's picture

17 Jun 2008 - 1:56 pm | स्वाती दिनेश

दूधसागराची चित्रं आवडली,धबधब्यात मनही चिंब भिजल्यासारखे वाटले.
स्वाती

ऋचा's picture

17 Jun 2008 - 1:59 pm | ऋचा

अप्रतिम !!!

मस्त रे मन पाहुनच प्रसन्न झालं

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अमोल केळकर's picture

17 Jun 2008 - 2:00 pm | अमोल केळकर

अभिज्ञ's picture

17 Jun 2008 - 2:01 pm | अभिज्ञ

पहिला फोटो जबरदस्त आलाय.
दुधसागर,आंबोळि घाट हि ह्या भागतली काहि विल़क्षण प्रे़क्षणिय स्थळे.
असेच अजुन फोटो येउ द्यात.

अभिज्ञ.

ऋचा's picture

17 Jun 2008 - 2:29 pm | ऋचा

>>आंबोळि घाट

तिकडे कंदीलांची "फॅक्टरी" आहे का?

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

प्रमोद देव's picture

17 Jun 2008 - 4:06 pm | प्रमोद देव

आंबोळि घाट

तिकडे कंदीलांची "फॅक्टरी" आहे का?

हा विनोद मस्तच आहे. =)) =)) =))

दूधसागर-धबधबा तर अफलातून आहे. नुसती छायाचित्रं पाहूनच इतके प्रसन्न वाटले....मग प्रत्यक्ष दर्शनाने काय होत असेल?...ह्या कल्पनेतच हरवलोय. :?
अमोलशेठ धन्यवाद ह्या धबधब्याची ओळख करून दिल्याबद्दल.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर's picture

17 Jun 2008 - 2:36 pm | विसोबा खेचर

पहिलंच चित्र सगळ्यात क्लास! त्यात दिसणारी कोकण रेल्वेही खास! :)

तात्या.

अमोल केळकर's picture

17 Jun 2008 - 2:48 pm | अमोल केळकर

तात्या ,
माफ करा पण हा मार्ग कोकण रेल्वेचा नाही.
हा मार्ग दक्षिण्-मध्य रेल्वे ( हुबळी सेक्शन ) मध्ये येतो.
पुर्वी मिटर गेज मार्ग होता.

विसोबा खेचर's picture

17 Jun 2008 - 2:54 pm | विसोबा खेचर

येस्स! तुमचं बरोबर आहे,

मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे.

हे मी विसरूनच गेलो. माझ्या डोक्यात मडगाव-मुंबई मार्ग होता! :)

प्राजु's picture

17 Jun 2008 - 5:21 pm | प्राजु

नुसते चित्रे बघून.. चिंब भिजलयासारखे वाटले..
अप्रतिम फोटो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

17 Jun 2008 - 2:41 pm | भडकमकर मास्तर

मस्तच...
याबद्दल खूप ऐकून होतो.. पण फोटो पाहिले नव्हते....
इथे दिलेले सर्व फोटो बेस्ट आले आहेत...
( आणि रात्री जागून पहाटे धबधबा पहायची आठवण मस्तच आहे)...
....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अरुण मनोहर's picture

17 Jun 2008 - 3:02 pm | अरुण मनोहर

आम्ही पाच वर्षापुर्वी दूधसागरला गेलो होतो. त्यावेळची आठवण म्हणजे धबधब्याच्या पायथ्याशी एक कुंड आहे त्यात मनसोक्त पोहोलो होतो. धबधब्याखाली बसून येवढा प्रचंड प्रवाह अंगावर घेणे हा एक इलेक्ट्रीफाईंग अनुभव आहे.
अमोलने जुन्या आठवणी ताज्या केल्या.

सहज's picture

17 Jun 2008 - 3:13 pm | सहज

पावसाच्या आगमनानंतर इतक्या कवितांचा पाउस पडुन जो परिणाम साधला नाही तो या काही फोटोनी साधला. ;-)

अफलातुन फोटो..

धन्यवाद

िमसळपाव's picture

17 Jun 2008 - 3:49 pm | िमसळपाव

पहीला अप्र्ितम फोटो पाहून मनात िवचार आला की हे कीती वर्षांपूर्वी छोट्याशा ओघाने सुरू झालं असेल देव जाणे!

अरुण मनोहर's picture

17 Jun 2008 - 4:42 pm | अरुण मनोहर

आणखी काही फोटो. पायथ्यापाशी.

बाजूचे रान व झरा--->

आर्य's picture

17 Jun 2008 - 5:02 pm | आर्य

शब्दच नाहीत वर्णन करायला !
धबधबा छान आहेच पण फोटो सुद्धा छान आहेत.
मज्जा आली बघून,
या नेत्र सुखद अनुभूती बद्दल ..............धन्यवाद >:D<

(निसर्गप्रेमी )आर्य

शितल's picture

17 Jun 2008 - 5:02 pm | शितल

सर्वच फोटो एकदम मस्त.
दुधाचाच धबधबा असल्यासारखे वाटते.

गणा मास्तर's picture

17 Jun 2008 - 5:31 pm | गणा मास्तर

सरसर काटा आला अंगावर !!!मस्त आहे धबधबा

वरदा's picture

17 Jun 2008 - 6:08 pm | वरदा

शब्दच नाहीत्...खरोखर दुधाचा सागर आहे....
आणि फार पॉप्युलर नसल्याने स्वच्छ दिसतोय एकदम.....जायलाच हवं इथे...

धनंजय's picture

17 Jun 2008 - 7:51 pm | धनंजय

कोणूय म्हणत की गोंयांत किते? फकत बीच, रेव आणिक फोरिनर आसात, तांका अमोलान काडिल्ले हे फोटो दाकयचेत.

या रेल्वेमार्गात हांव केन्नाय वता तेन्ना कॅमेरा घेंवन दारान उबो आसता. चडता वखतां सोनावली स्टेशनार हांव गाडियेच्या दांवेकडील दारान उबो रावता - जायत्या टूरिस्टांक खबर नासता की पयली त्यामेरेन दूरसान दूदसागर दिशटी पडता. ताजी सोबीत चित्रां दिल्ली आसात.

चतुरंग's picture

17 Jun 2008 - 8:05 pm | चतुरंग

सॉल्लिड!! एकदम आत्ताच्याआत्ता भारतवारी करावी आणि फक्त दूधसागर बघून यावा असं वाटलं!!
फारच सुंदर प्रकाशचित्रे. फार वर्षांपूर्वी एकदा ह्या धबधब्याबद्दल वाचले होते पण त्या आठवणी फार अंधुक झाल्या होत्या.
पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद!

चतुरंग

ध्रुव's picture

18 Jun 2008 - 11:47 am | ध्रुव

चित्रे लै भारी...

--
ध्रुव

चित्रा's picture

20 Jun 2008 - 6:41 pm | चित्रा

असेच!

झकासराव's picture

20 Jun 2008 - 6:53 pm | झकासराव

प्रकाश चित्रे :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2008 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच चित्रे सुरेख !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

21 Jun 2008 - 1:12 am | प्रियाली

फारा वर्षांपूर्वी एका मैत्रिणीबरोबर गोव्याला गेले असता मडगावातील काही मित्रमैत्रिणींबरोबर दूधसागरला गेलो होतो. ती ट्रेन धबधब्यावरून जाताना दारात उभे राहिले तर मस्त शॉवरबाथ होतो. खूप मजा आली होती. दूधसागर हे नाव अगदी सार्थ आहे या धबधब्याला.

मदनबाण's picture

21 Jun 2008 - 2:27 pm | मदनबाण

अरे व्वा,,लय झ्याक फोटो आहेत.....

(धबधब्याखाली चिंब भिजण्यास आतुर)
मदनबाण.....

अमोल केळकर's picture

21 Jun 2008 - 3:18 pm | अमोल केळकर

मुळ लेखातील चित्रे दिसत नसल्याने परत चिकटवत आहे ( असे कसे झाले ? :$ )