कालची गळाली फुले रे,
आज नविन आली
त्यांची अपूर्ण स्वप्ने
आज पूर्ण झाली
सार्या सडक्या बिया त्या
परसात फेकून दिल्या मी
कशा सुरेख लोम्ब्या आल्या
त्यातल्याच काही रूजुनी
कालची रडकी दु:खे
पहा आज सुखे व्याली
त्यांची अपूर्ण...
नभात तुटले तारे
म्हणून कधी तारांगण रडते का रे
आत्म्यास तयांचा शांती
म्हणून कुणी श्राद्ध करते का रे
अरे ,नव्या उमलत्या तार्यास त्याने
फक्त जागा रीकामी केली
त्यांची अपूर्ण...
बंध रेषमी धरून उराशी
झाडाने उगीच गलका केला
म्हणे,फुलपाखरु हळुवार होता होता
सुरवंट नाहीसा झाला
अरे सुरवंट त्यातला संपला कधीचा
फक्त उद्घोषणा आज झाली
त्यांची अपूर्ण...
अखंड फिरत्या चक्राची या
तू एक गिरकी आहेस
उत्तुंग उडत्या चिर स्वप्नांची
अपूर्ण फिरकी आहेस
म्हणून
ना शोक करा, ना लोभ धरा
फक्त या जन्माचे, त्या जन्माला
देणे करावे हवाली
त्यांची अपूर्ण...
-- कौस्तुभ आपटे
प्रतिक्रिया
20 Jun 2008 - 2:29 pm | अरुण मनोहर
वाहवा!
तुमची शैली खूप आवडली.
कालची रडकी दु:खे
पहा आज सुखे व्याली
त्यांची अपूर्ण स्वप्ने
आज पूर्ण झाली
20 Jun 2008 - 5:36 pm | प्राजु
अतिशय सुरेख...
तुमची शैली खूप सुंदर आहे. कवितेमध्ये खूप अर्थ दडलेला आहे...
बंध रेषमी धरून उराशी
झाडाने उगीच गलका केला
म्हणे,फुलपाखरु हळुवार होता होता
सुरवंट नाहीसा झाला
अरे सुरवंट त्यातला संपला कधीचा
फक्त उद्घोषणा आज झाली
हे तर अप्रतिम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Jun 2008 - 2:02 am | चतुरंग
अखंड फिरत्या चक्राची या
तू एक गिरकी आहेस
उत्तुंग उडत्या चिर स्वप्नांची
अपूर्ण फिरकी आहेस
म्हणून
ना शोक करा, ना लोभ धरा
फक्त या जन्माचे, त्या जन्माला
देणे करावे हवाली
त्यांची अपूर्ण...
हे तर फारच छान, कौस्तुभ!
लिहीत रहा.
चतुरंग
21 Jun 2008 - 7:56 am | विसोबा खेचर
वरील सर्वांशी सहमत...
कविता सुंदर आहे!
तात्या.
21 Jun 2008 - 8:24 am | मुक्तसुनीत
रचनेच्या बाबतीत बरेच काम आवश्यक असले तरी , कवितेमधे अनेक उत्तम जागा जाणवल्या. मुख्य म्हणजे , काहीतरी स्वतंत्र , वेगळा नि चमकदार विचार करायची ताकद जाणवली. तंत्रावर थोडे कौशल्य मिळवले तर त्यांच्या हातून पहिल्या दर्ज्याचे काम होईलसे वाटते.
23 Jun 2008 - 5:27 pm | मनिष
मुक्तसुनीत ह्यांच्याशी सहमत!
हरिवंशराय बच्चन यांच्या 'जो बीत गयी सो बात गयी' ह्यातील -
ह्या पंक्ती, तशाच 'रिचर्ड बाक' च्या -
ह्या कोटेशन ची आठवण झाली. रचना ह्या प्रेरणांपासून स्फुरलेली वाटते, रचना छान जमली आहे.
-(काव्यप्रेमी) मनिष
21 Jun 2008 - 2:22 pm | मदनबाण
कौस्तुभराव मस्त आहे तुमची कविता..
(फुलपाखरांच्या मागे धावणारा)
मदनबाण.....
23 Jun 2008 - 4:44 pm | कौस्तुभ
सर्वांचे अभार!!!
23 Jun 2008 - 5:42 pm | शितल
मस्तच कविता.
अखंड फिरत्या चक्राची या
तू एक गिरकी आहेस
उत्तुंग उडत्या चिर स्वप्नांची
अपूर्ण फिरकी आहेस
म्हणून
ना शोक करा, ना लोभ धरा
फक्त या जन्माचे, त्या जन्माला
देणे करावे हवाली
त्यांची अपूर्ण...
हे तर एकदम सह्ही.....
24 Jun 2008 - 9:34 am | कौस्तुभ
आभारी शीतल!