महिला दिन
आम्हाला मक्याचे सातच्या आत घरात ह्या सिनेमातील वाक्य आवडते.
''दिवस कसले साजरे करतात आज अमका दिवस आपल्यात दिवस कधी घालतात ........''
एक दिवस महिला दिवस तोही आंतराष्ट्रीय म्हणून आपण पण साजरा करायच्या म्हणजे काय तर एकमेकांना अभिनंदन करायचे .
सावित्री फुल्यांची जयंती कितीजणांना माहीत आहे (मला माहीत नाही .)
''एक स्त्री शिकली तर सारे घर साक्षर होईल .''
हा संदेश देशात पोहोचला का ?
''त्यांच्या राज्यापेक्षा केरळमध्ये महिला साक्षर आहेत असा विरोधाभास का ?''
हे आशा ताई ह्यांनी विचारले .तेव्हा त्यांनी
महिला दिनाची वाट पहिली नाही
. वहिदा आपाचा लेख आवडला .
मुक्ता सिनेमात नायक नारकर सो कु च्या अमेरिकन मित्राला '' झोपला असशील हिच्या बरोबर '' असे विचारतो .तेव्हा समानता हवी म्हणून संघर्ष करणाऱ्या नेत्याची पुरुषी विषम मानसिकता उफाळून येते .
शाळांत परीक्षेत मुलांच्या बरोबर बोर्डात येणाऱ्या मुली पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशात जातांना मात्र मुलांची बरोबरी गाठू शकत नाही ही पांढरपेश्या समाजाची मानसिकता. ''त्यांना काय लग्न लाऊन दिले की जाता येते की ''
कशाला कर्ज काढून शिकायला पाठवायचे त्यात मुलीची जात असे बोल कितीतरी वेळा कानावर पडले आहे .
( आम्ही शैक्षणिक कर्तुत्व न गाजवता मुलगा ह्या एका
आधारावर परदेशी आलो .नाहीतर तर भारतात नाहीतर परदेशात आमच्या पालकांनी उजवले असते . )
मु लगा व मुलगी असलेल्या घरात मुलगी अभियांत्रिकी व मुलगा कला किंवा वाणिज्य शाखेत जाताना सहसा चित्र दिसत नाही .
डेली सोप मध्ये स्त्रिया रडक्या दाखवतात व ते पाहणाऱ्या स्त्रिया असतात .
एका परदेशी समीक्षकाने'' मदार इंडियात नर्गिस का बरे त्या लालाशी लग्न करत नाही .तिच्या कुटुंबाला आधार मिळाला असता '' असे म्हटल्यावर देशी समीक्षक लगेच नाक मुरडतात .ह्यांना आपली संस्कृती कळलीच नाही
.
बरोबर आहे .नाहीतर ती त्यागमूर्ती मदार इंडिया कशी होणार .तिची आराधना सफल कशी होणार .
थोडक्यात काय तर महिला आरक्षणासाठी कोणत्याही महिला नेतृत्व एक चळवळ उभारत नाहीत .हा मुद्दा राजकीय डावपेच व त्यामुळे राजकीय आखाड्यात रुपांतर झाला तर त्यात नवल ते काय .
मराठी दिनाला पार्ल्यात सचिनचे शतक पहाणे सोडून मराठी मावळे एकत्र कार्यक्रमाला आले होते .
महिला दिनानिमित्त आझाद मैदानावर सर्व जात /पंथ /वर्ग विसरून सर्व स्तरातील महिला एकत्र येऊन एक भव्य कार्यक्रम केला असता . तर ......
''आम्हाला गृहीत धरू नका'' हे पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात गर्जून सांगितले असते ..त्या निमिताने विविध उपक्रम वर्षभर महिलांसाठी राबविले गेले असते तर ह्या दिनाचे औचित्य पाळल्या गेले असते
.( महिलांनी गावात दारूबंदी आणली .बचतगट चालवले. ते स्तुत्य आहे . आज .शहरात लिज्जत सारखे उपक्रम शेकड्याने झाले तर महिला सबल होतील .एका इमारतीत धूणी भांडी करणारया बाईला पगार देतांना खळखळ का करावी ?
.तिला भविष्य निर्वाह निधी नाही आहे .व तिला दहा तोंड पोसायची आहेत हा विचार आपण का करत नाही .
येथे म्युनिकला काहीही विशेष कार्यक्रम झाले नाही .कुठेही ह्या दिनाची चर्चा झाली नाही .
केट म्हणते .''त्यात काय विशेष''
तिला विशेष जाणवणार नाही. लिंग भेद तिने अनुभवला नाही आणी पहिला नाही .'' ज्याचे जळते त्यालाच कळते .
महिला दिनाच्या दिवशी मला आठवली ही कविता ( सदर कविता तु नळीवर कधी काळी वाचली होती . )
ह्यात पंजाबी समूहाच्या सोहळ्यात मराठमोठ्या राणीची कविता हिंदीत म्हणणारी अमेरिकन कवियत्री अर्चना ह्यांनी ती म्हटली .आहे .
माझ्या बरोबर जर्मन भाषा शिकणारी बिठूर वासी अमिता मालाविया आजही माझ्या संपर्कात आहे .फेस बुक वर व्यनी करून सांगते '
' तुमने पुना दरबार दिखानेका वादा किया था उसका क्या हुआ ?
वचनपूर्ती करणे मला कधीच जमले नाही .
महिला दिनाच्या निमित्ताने उशिरा सवड काढून माझ्या भावना व्यक्त केल्या
.ह्या निमित्ताने एवढेच लिहितो .जर भविष्यात पुढे मला मुलगी झाली तिला चुकून ही परुष प्रधान मानसिकतेचा परीसस्पर्श होऊन देणार नाही ...
प्रतिक्रिया
10 Mar 2011 - 11:36 pm | अप्पा जोगळेकर
या निमित्ताने लोकसत्ताचा ८ मार्चचा अग्रलेख आठवला. अतिशय वाचनीय लेख आहे.
11 Mar 2011 - 12:02 am | मितान
पुरुषप्रधान मानसिकतेचा 'परीसस्पर्श ' ???????????
कळले !
धन्यवाद !!!!
11 Mar 2011 - 12:10 am | निनाद मुक्काम प...
तो उपहास आहे .
कारण आपल्याकडे विशेतः उत्तर भारतात ( माझ्या मित्रांकडून मी ह्याचे कट्टर समर्थन झालेले पहिले आहे )
11 Mar 2011 - 8:01 pm | अप्पा जोगळेकर
विशेतः उत्तर भारतात ( माझ्या मित्रांकडून मी ह्याचे कट्टर समर्थन झालेले पहिले आहे )
उत्तर भारतीयांचे याबाबतीतले एक ऐकीव उदाहरण ऐकून मला सॉलिड शॉक बसला होता आणि हसून मुरकुंड्याही वळल्या होत्या.
आमचा एक दोस्त एका उत्तर भारतीय रंगार्याशी ( त्याच्या घरी तेंव्हा रंगकाम चालू होते) गप्पा मारत होता. लांबी भरता भरता बाता चालू होत्या.
रंगारी - बहुत परेशान हुए हैं. दो साल से घर नहीं गये |
मित्र - इतने दिन. तो कब जाओगे घर ?
रंगारी - जाएंगे अगले महिने. हमरा बच्चा एक साल का हो जाएगा अगले महिने.
मित्र (आश्चर्याने) - अभी तो आपने कहा की दो साल से आप घर नहीं गये? बच्चा एक साल का कैसे होगा |
रंगारी - नही. हमारे बडे भैय्याजी है ना गांव मे .
मित्र (खल्लास) आणि किस्सा ऐकल्यावर आम्ही मित्रमंडळी हसून हसून खल्लास.
मला तर हे ऐकून 'मातॄभूमी' सिनेमा आठवला. आणि महिला सबलीकरण, त्यांच्यावरील अन्याय असल्या गप्पा ऐकल्या की हा किस्साच आठवतो. महिलांना जिथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही तिथे त्यांचे सबलीकरण व्हायला आणखीन १००० वर्षे जावी लागतील.
11 Mar 2011 - 12:30 am | निनाद मुक्काम प...
पूर्वी ''गोरी मुलगी हवी'' अशी जाहिरात असायची .आज गोरे होण्यासाठी क्रीम विकतात .
आणी आम्ही कोणत्या नैतिक मुद्यावर वर्ण भेदा विरुध्ध गोर्यांशी लढलो .
11 Mar 2011 - 3:32 am | रेवती
तिला भविष्य निर्वाह निधी नाही आहे .व तिला दहा तोंड पोसायची आहेत हा विचार आपण का करत नाही .
बरोबर आहे. तिचा नवरा एकतर दारू पिऊन पडलेला असतो किंवा आधीच पन्नास पोरं बाईच्या पदरात टाकून मेलेला असतो. तिच्या नवर्याने कोणताही विचार नाही केला तरी चालतय कि!;)
या निमित्तानं एक खरी गोष्ट आठवली. माझ्या सासरी कामाला येणारी बाई नेहमी नवर्याच्या दारूकामाबद्दल तक्रारी करायची. त्यानं केलेली मारझोड पाहून एकदा माझ्या सासूबाई रागानं म्हणाल्या कि रडतेस कसली? नाहीतरी नुसता पिऊन पडलेला असतो, हाकलून लाव त्याला. दुसर्या दिवशी तिनं आणि तिच्या मुलीनं खरच त्याला केरसुणीचे फटके देवून पळवून लावले. तो परत काही आला नाही. पुढे तिचे काही अडले नाही. स्वत: कष्ट करून मुलीचे लग्न करून दिले आणि बर्या परिस्थितीत आहे. म्हणजे मीठ भाकरी तरी नियमीतपणे खाते आहे. तिने मुलीपुढे आपल्या वागणुकीतून उदाहरण ठेवले.
11 Mar 2011 - 5:48 am | नगरीनिरंजन
लेख आवडला. बर्याच विसंगतींवर नेमके बोट ठेवले आहे. ज्याना गरज आहे त्या महिलांना हा दिन 'साजरा' करायची उसंत नाही आणि ज्यांना उसंत आहे त्यांना काही फरक पडत नाही. त्यामुळे ठोस काही होत नाही. रेवतीतैच्या प्रतिसादात कामवाल्या बाईला भविष्य निर्वाह निधी द्यायला तिचा नवरा विचार करतो की नाही हे पाहायची काय गरज ते कळले नाही. त्या हिशोबाने सर्वच स्त्रियांना पगार देताना असा विचार केला जावा असेही कोणी म्हणेल.
11 Mar 2011 - 10:56 am | वपाडाव
१००% सत्य.
सहमत
11 Mar 2011 - 6:47 pm | ज्ञानेश...
हेच म्हणतो.
लेख आवडला, निनाद.
11 Mar 2011 - 7:19 pm | रेवती
भविष्य निर्वाह निधी द्यायला तिचा नवरा विचार करतो की नाही हे पाहायची काय गरज ते कळले नाही. नवर्याने नको द्यायला निधी पण तिनं एकटीनच काय म्हणून दहा तोंडं पोसायची जबाबदारी घ्यावी?
मुलं दोघांची आहेत तर तो पिऊन पडलेला, निष्काळजी कसा चालतो? असे माझे म्हणणे होते.
11 Mar 2011 - 9:03 am | आत्मशून्य
.
11 Mar 2011 - 11:05 am | निनाद मुक्काम प...
@नाहीतरी नुसता पिऊन पडलेला असतो, हाकलून लाव त्याला.
माफ करा पण हा मुद्दा उमजला नाही .
असे समजू की काही बायकांचे नवरे काम करतात .(गवंडी /सुतार /रिक्षा )
त्यांना अचानक वाढलेले कांद्यांचे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे /नैसर्गिक वायू ह्यांचे वाढलेले भाव ( अचानक आलेली आजारपण किंवा शस्त्रक्रिया ) भेसळयुक्त रॉकेल विकत घेणे .ह्याचे आर्थिक गणित बसवतांना तारांबळ उडते
.हा मुद्दा अचानक मला सुचला नाही .(महिला दिनाचे औचित्य साधून ) माझ्या आख्यानात सुद्धा मी लिहीले आहे ' जे 'श्रम करतात त्या मजूर वर्गाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे .कारण परदेशात स्वतःचे काम स्वतः करताना झालेली तारांबळ मी लिहिली होती
.त्यांच्या मुलांना शिकायचे असते .( शिक्षणाचा खर्च .....)
येथे त्यांना योग्य मोबदला द्या हे लिहितांना तिला पोस्टात पैसे शिल्लक टाक किंवा मुलांच्या शिक्षणासाठी प्रेरित करणे असे अनेक पर्याय असतात .( सुंबरान मधील मुक्त बर्वे म्हणते ''भटक्या आयुष्यातून बाहेर पडून स्थिर व मानाचे आयुष्य जगण्यासाठी शिक्षण हाच मुख्य आधार .
येथे आय टी वाल्यांना जास्त पगार म्हणून त्या उल्लेखाने चर्चा झाली .त्यांची मनोगते झाली .( जो कष्ट करतो .त्याला पैसा मिळाला .तर त्यात काहीच वाईट नाही .म्हणूनच मी त्या लेखात उगाच मी प्रतिसाद दिला नाही .)
दूरदर्शन वर पूरब से .. हि जाहिरात पहिली होती . घरातील मोलकरीण जेव्हा स्वतःचे नाव लिहायला मालकीण बाई कडून शिकते .व एके ठिकाणी तिला जेव्हा शाई चा डब्बा दिला जातो .तेव्हा ज्या अभिमानाने ती पेन उचलते ते पाहून कौतुक वाटते .
माझ्या बालपणी माझा मित्र हा शन्ना नवरे ह्यांच्या इमारतीला लागून एका पडवीत राहायचा ( ते शन्नाचे भाडेकरू आहेत .) त्याची आई धुणी भांडी करायची .पण त्याचा शिकण्यासाठी व इतर अनेक बाबतीत त्या भागातील लोकांनी तिला खूप मदत केली .सध्या माझा बालमित्र पदवीधर असून नोकरी करतो .( आईला काम करावे लागत नाही .)
आम्ही सांभाळायला होतो त्या मावशींकडे त्याची आई काम करायची तिला घरची एक सदस्य असल्यासारखी त्यानी प्रचंड मदत केली .आम्ही सांभाळायला येणाऱ्या चाकरमानी मुलांच्या पालकांनी जमेल ते केले .
कळत नकळत हा सिनेमा टिळक थेटरात पहिला आलो .तेव्हा बाल्कनीत त्याच्या आईने आम्हाला शन्ना नवऱ्या नी पास दिल्याचे अभिमानाने सांगितले .( त्याच्या वडिलांना ताई म्हणतात तसे वाईट वर्तनामुळे सोडून त्यांच्या आईने त्याला शिकवला
.समाजात तिच्या आईला आमच्या पालकांसह त्या भागातील रहिवाशांचा पाठिंबा होता .( त्याने शन्ना ह्यांच्या घरी लहानपणी खेळायला नेले होते .त्यांची नात राधिका व इतर अनेक मुल त्याला बरोबरींच्या नात्याने वागवत होते .)
आज ह्या'' बायकांची खूप नाटके असतात'' अशी विधान कानावर पडतात .
काही बाबतीत खरे असेल .पण ''टाळी एका हाताने वाजत नाही ''
''प्यार दो प्यार लो '' ( ती दमली असेल व शक्य असेल तर एका चहाचा कप व काही गप्पा /सल्ला/ अल्पशी मदत त्या बाईचे तुमच्या प्रती मन बदलते.)
माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला मुलांचे उच्च शिक्षण मुलांचे झेपत नव्हते . .मी त्याला . इंटर शिप करायला लावली.) बल्लवाचार्य म्हणून
आज त्याला नोकरी आहे. '' पदवीचे शिक्षण घे'' .तुला दुबई किंवा आखतात मी नोकरी साठी प्रयत्न करेन असे सुध्धा सांगितले आहे
.अर्थात कुशल /अनुभवी बल्ल्वाचार्यांना . जगभरातून .मागणी आहे .प्रगत देशात त्यांच्यासाठी वेगळे विसा असतात .व भारतीय उपहारगृह चालू करायचे असेल तर भारतातून शेफ आणू शकतो .( युरोपात तशी खास विसाची सोय आहे .)
11 Mar 2011 - 7:31 pm | रेवती
माफ करा पण हा मुद्दा उमजला नाही .
कितीतरी बायका नवर्याच्या व्यसनांसाठी त्यांच्या तुटपुंज्या मिळकतीतून पैसे देतात. प्रसंगी उधार उसनवारी करतात. मोलकरणींचे नवरे दारू पिउन येतात आणि मारझोड मात्र करतात. घरात चार मुलं आहेत त्यांची जबाबदारी, इतर घरखर्च याची काळजी फक्त त्या बाईनं करायची. मोलकरणींची अवस्था बघवत नाही. कधी डोळा सुजलेला तर कधी पाठीवर वळ, कधी पाय सुजलेला..... अश्या बायकांनी बिनकामाच्या आणि मारकुट्या नवर्याला काय म्हणून पोसायचे?
या बायकांना मुलबाळ होत नाही किंवा फक्त मुलीच होतात या कारणानं नवरे सोडून देतात. हा तर सारखी मारझोड करणारा गडी होता, शिवाय दारू पिऊन तब्येतीचं मातेरं झालेलं ते वेगळच. म्हणूनच सासूबाईंनी तिला सांगितलं कि रोजरोज असलं सहन करण्यापेक्षा एकदाच काय ते घरातून घालवून दे. तिनं ते केलं हे महत्वाचं. 'कुंकवाचा धनी' म्हणत सहन करत राहिली नाही.
11 Mar 2011 - 8:39 pm | निनाद मुक्काम प...
समजले .
माझ्या वर्ग मित्राच्या आईने हाच पर्याय निवडला
.( तुमच्या सासू बाईंचे विशेष कौतुक )
नाहीतर दिवाळीला साडी किंवा पैसे दिले की दौलतजादा करत आहोत असा आव आमच्या येथे काही शेठानी करतात .
11 Mar 2011 - 11:32 am | प्रास
छान मनोगत आणि प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया....
टंकलेखन हळू हळू सुधारतंय हे तर नक्कीच.... ;-)
हार्दिक शुभेच्छा! :-)
11 Mar 2011 - 11:52 am | विजुभाऊ
निनाद लेख पटला.
जर भविष्यात पुढे मला मुलगी झाली तिला चुकून ही परुष प्रधान मानसिकतेचा परीसस्पर्श होऊन देणार नाही ...
हा प्रयत्न करणे काही प्रमाणात आपल्य हातात आहे. भारतात रहात असताना मात्र हे पूर्णपणे अशक्य आहे.
उत्तरभारतात पुरुषांची मनोवृत्ती फार विचित्र आहे. माझा एक दिल्लीकर कलीग पुण्यात आला होता त्याने प्रथमच एखाद्या मुलीला बाईक चालवताना पाहिले. त्याच्या तोम्डून अभवीतपणे एक वाक्य निघून गेले " अरे अगर दिल्ली मे या नॉर्थ मे कहीभी अगर कोई लडकी ऐसी बाई क्चलाती दिखगये तो शाम तक उसपर रेप हो जायेगा" मल ते वाक्य प्रचन्ड खटकले. मुलीनी बाईक चालवणे आणि रेप होणे यात काय नक्की सांगड आहे तेच कळत नव्हते. पण इकडे दिल्लीत आल्यानन्तर त्यामागची विचारसरणी जाणवली. स्त्री ही कायम अबलाच असावी. तीने बाईक चालवणे म्हणजे ती काहितरी विगळी आहे तीला तिची जागा दाखवून द्यायलाच हवी" असे काहिसे इथल्या समाजाची मानसीकता आहे. गुरगावसारख्या शहरात थोडीशी कमी असेल पण हरीयाणात स्त्रीयानी घराबाहेर येवून काही करण्याची त्याना मुभाच नाही. एक मित्र सांगत होता. तो कोणाच्यातरी लग्नाला गेला होता त्या गावात संध्याकाळी नावाला म्हणून स्त्री दृष्टीस पडायची नाही . एकूण हरीयाणात हीच परीस्थिती आहे. तेथे स्त्री गर्भहत्येचे प्रमाण प्रचंड आहे. मुलाना लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून केरळ ,नागालॅन्ड मधून मुली विकत आणल्या जातात.
स्वतःला पुरोगामी म्हणवणारा समाजवादी पक्ष महीला आरक्षणाच्या विधेयकाला कडाडून विरोध करतो तो त्याच उत्तरभारतीय मानसीकतेतून
बीहार मधून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या सुशिक्षीएत तरुणाला एकदा विचारले की तुला पुण्यात आल्यावर काय विषेश जाणवले.... त्यावर त्याचे उत्तर होते " इथे स्त्रीया फारच मोकळेपणे इन्डीपेन्डन्ट फिरतात. मला उत्तरेत हे कुठेच जाणवले नाही.
समाजाची ही मानसीकता बदलायला किती वर्षे जातील कोण जाणे.
आपण आपल्यापुरते निदान प्रयत्न करुयात. मात्र हे नक्की की अशी मानसीकता असलेल्या कुटुंबात आमच्या मुलीला आम्ही पाठवणार नाही . तिला आम्ही नेहमीच भक्कम मानसीक पाठबळ देऊ. तिच्या कौटुंबीक अडी अडचणीत भक्कपणे पाठीशी उभे राहु.
11 Mar 2011 - 6:27 pm | निनाद मुक्काम प...
<div style="text-align: left;">भारतात रहात असताना मात्र हे पूर्णपणे अशक्य आहे.
अवघड आहे पण अशक्य नाही आहे .
आज मिपावरच उच्च शिक्षित व आपले मत ठामपणे मांडणाऱ्या विदुषी आहेतच की
आज जेसीकाची केस तिच्या बहिणीने शेवट पर्यत लढली .
तुम्ही उत्तमरीत्या माझा मुद्दा मांडला आहे .
ह्यांचा महिला आरक्षण आणण्यात विरोध ह्यासाठीच आहे की ह्यांच्या पक्षात महिला कार्यकर्त्यांची फळी नाही आहे
.अर्थात आरक्षणाचा हेतूच हा आहे की ह्या निमित्ताने महिला राजकारणात येतील .
घराची चूल सांभाळणाऱ्या देशाची चूल सुध्धा उत्तमरीत्या सांभाळू शकतील .
11 Mar 2011 - 7:48 pm | अप्पा जोगळेकर
आज मिपावरच उच्च शिक्षित व आपले मत ठामपणे मांडणाऱ्या विदुषी आहेतच की
ठाम भूमिका आणि औद्धत्य यातली सीमारेषा बर्याचदा अतिशय पुसट असते असे आमचे मत आहे. :) (हे छद्मी हास्य आहे.)
शिवाय इथे ठामपणे भूमिका मांडली म्हणजे महिला सबलीकरणाच्या दॄष्टीने काही विशेष घडले असे खरोखरंच वाटत नाही.
आज जेसीकाची केस तिच्या बहिणीने शेवट पर्यत लढली .
हे मात्र खरोखरच महिला सबलीकरणाचे उदाहरण आहे.