महिला दिन ( आमचे मनोगत )
महिला दिन
आम्हाला मक्याचे सातच्या आत घरात ह्या सिनेमातील वाक्य आवडते.
''दिवस कसले साजरे करतात आज अमका दिवस आपल्यात दिवस कधी घालतात ........''
एक दिवस महिला दिवस तोही आंतराष्ट्रीय म्हणून आपण पण साजरा करायच्या म्हणजे काय तर एकमेकांना अभिनंदन करायचे .
सावित्री फुल्यांची जयंती कितीजणांना माहीत आहे (मला माहीत नाही .)
''एक स्त्री शिकली तर सारे घर साक्षर होईल .''
हा संदेश देशात पोहोचला का ?
''त्यांच्या राज्यापेक्षा केरळमध्ये महिला साक्षर आहेत असा विरोधाभास का ?''
हे आशा ताई ह्यांनी विचारले .तेव्हा त्यांनी
महिला दिनाची वाट पहिली नाही
. वहिदा आपाचा लेख आवडला .
मुक्ता सिनेमात नायक नारकर सो कु च्या अमेरिकन मित्राला '' झोपला असशील हिच्या बरोबर '' असे विचारतो .तेव्हा समानता हवी म्हणून संघर्ष करणाऱ्या नेत्याची पुरुषी विषम मानसिकता उफाळून
येते .
शाळांत परीक्षेत मुलांच्या बरोबर बोर्डात येणाऱ्या मुली पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशात जातांना मात्र मुलांची बरोबरी गाठू शकत नाही ही पांढरपेश्या समाजाची मानसिकता. ''त्यांना काय लग्न लाऊन दिले की जाता येते की ''
कशाला कर्ज काढून शिकायला पाठवायचे त्यात मुलीची जात असे बोल कितीतरी वेळा कानावर पडले आहे .
( आम्ही शैक्षणिक कर्तुत्व न गाजवता मुलगा ह्या एका
आधारावर परदेशी आलो .नाहीतर तर भारतात नाहीतर परदेशात आमच्या पालकांनी उजवले असते . )
मु लगा व मुलगी असलेल्या घरात मुलगी अभियांत्रिकी व मुलगा कला किंवा वाणिज्य शाखेत जाताना सहसा चित्र दिसत नाही .
डेली सोप मध्ये स्त्रिया रडक्या दाखवतात व ते पाहणाऱ्या स्त्रिया असतात .
एका परदेशी समीक्षकाने'' मदार इंडियात नर्गिस का बरे त्या लालाशी लग्न करत नाही .तिच्या कुटुंबाला आधार मिळाला असता '' असे म्हटल्यावर देशी समीक्षक लगेच नाक मुरडतात .ह्यांना आपली संस्कृती कळलीच नाही
.
बरोबर आहे .नाहीतर ती त्यागमूर्ती मदार इंडिया कशी होणार .तिची आराधना सफल कशी होणार .
थोडक्यात काय तर महिला आरक्षणासाठी कोणत्याही महिला नेतृत्व एक चळवळ उभारत नाहीत .हा मुद्दा राजकीय डावपेच व त्यामुळे राजकीय आखाड्यात रुपांतर झाला तर त्यात नवल ते काय .
मराठी दिनाला पार्ल्यात सचिनचे शतक पहाणे सोडून मराठी मावळे एकत्र कार्यक्रमाला आले होते .
महिला दिनानिमित्त आझाद मैदानावर सर्व जात /पंथ /वर्ग विसरून सर्व स्तरातील महिला एकत्र येऊन एक भव्य कार्यक्रम केला असता . तर ......
''आम्हाला गृहीत धरू नका'' हे पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात गर्जून सांगितले असते ..त्या निमिताने विविध उपक्रम वर्षभर महिलांसाठी राबविले गेले असते तर ह्या दिनाचे औचित्य पाळल्या गेले असते
.( महिलांनी गावात दारूबंदी आणली .बचतगट चालवले. ते स्तुत्य आहे . आज .शहरात लिज्जत सारखे उपक्रम शेकड्याने झाले तर महिला सबल होतील .एका इमारतीत धूणी भांडी करणारया बाईला पगार देतांना खळखळ का करावी ?
.तिला भविष्य निर्वाह निधी नाही आहे .व तिला दहा तोंड पोसायची आहेत हा विचार आपण का करत नाही .
येथे म्युनिकला काहीही विशेष कार्यक्रम झाले नाही .कुठेही ह्या दिनाची चर्चा झाली नाही .
केट म्हणते .''त्यात काय विशेष''
तिला विशेष जाणवणार नाही. लिंग भेद तिने अनुभवला नाही आणी पहिला नाही .'' ज्याचे जळते त्यालाच कळते .
महिला दिनाच्या दिवशी मला आठवली ही कविता ( सदर कविता तु नळीवर कधी काळी वाचली होती . )
ह्यात पंजाबी समूहाच्या सोहळ्यात मराठमोठ्या राणीची कविता हिंदीत म्हणणारी अमेरिकन कवियत्री अर्चना ह्यांनी ती म्हटली .आहे .
माझ्या बरोबर जर्मन भाषा शिकणारी बिठूर वासी अमिता मालाविया आजही माझ्या संपर्कात आहे .फेस बुक वर व्यनी करून सांगते '
' तुमने पुना दरबार दिखानेका वादा किया था उसका क्या हुआ ?
वचनपूर्ती करणे मला कधीच जमले नाही .
महिला दिनाच्या निमित्ताने उशिरा सवड काढून माझ्या भावना व्यक्त केल्या
.ह्या निमित्ताने एवढेच लिहितो .जर भविष्यात पुढे मला मुलगी झाली तिला चुकून ही परुष प्रधान मानसिकतेचा परीसस्पर्श होऊन देणार नाही ...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
या निमित्ताने लोकसत्ताचा ८
पुरुषप्रधान मानसिकतेचा
तो उपहास आहे . कारण आपल्याकडे
विशेतः उत्तर भारतात ( माझ्या
पूर्वी ''गोरी मुलगी हवी''
तिला भविष्य निर्वाह निधी नाही
लेख आवडला. बर्याच विसंगतींवर
ज्याना गरज आहे त्या महिलांना
+१
भविष्य निर्वाह निधी द्यायला
हम्म
@नाहीतरी नुसता पिऊन पडलेला
माफ करा पण हा मुद्दा उमजला
समजले . माझ्या वर्ग
निनादजी,
निनाद लेख पटला. जर भविष्यात
< div style="text-align:
आज मिपावरच उच्च शिक्षित व