उन्नत क्षण

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
9 Mar 2011 - 3:19 am

मी सहसा ढकलपत्रातून आलेल्या, उगम माहित नसलेल्या कथा-कविता पुढे पाठवत नाही, अगदीच आवडल्या तर मित्र-मंडळींना वाचून दाखवतो, नाहीतर कंप्यूटर मध्ये save करून ठेवतो. पण काही वेळा रहावत नाही, कुठलीशी जखम भळभळते, आणि मग, आता इथे केलाय, तसा भावानुवाद करतो...

**************
त्या घरापाशी टॅक्सी नेऊन थांबवली, हॉर्न वाजवला
आणि बरीच मिनिटं थांबलो

शेवटी उतरून दारापाशी जाऊन कडी वाजवली

"आले, आले.."
एक कापरा, वृद्ध आवाज आणि फरशीवरून काहीतरी ओढल्याची जाणीव

बर्‍याच वेळाने दार उघडलं
नक्षीकामाच्या झग्यात आणि फुला-फुलाच्या हॅट मधली
चाळीस सालच्या चित्रपटातून उतरून आलेली
एक नव्वदीची वृद्धा

हातातल्या दोरीमागे नायलॉनची बॅग
आणि त्यामागे एक आवरलेलं, स्तब्ध शांततेतलं निर्मनुष्य घर
बिनभांड्यांचं स्वयंपाक घर, आणि बिन घड्याळाची भिंत

"माझी बॅग नेणार का उचलून गाडीत?"

मी एका हातात बॅग घेऊन दुसर्‍याने त्या वृद्धेला हात दिला
"थॅंक यू!"
"त्यात काय मोठंसं, मी नेहेमीच करतो अशी मदत
माझ्या आईलाही इतरांनी असंच वागवावं म्हणून."

"किती छान बोललास रे बाबा! थॅंक यू!"

तिने पत्ता दिला मला, आणि म्हणाली
"आपण शहरातून जाऊयात का?"
"ते लांबून पडेल.."
"पडू देत रे, मला कुठे घाईये..
वृद्धाश्रमात जातेय मी, आता तोच स्टॉप शेवटचा !"

मी आरश्यातून मागे पाहिलं
तिचे ओले डोळे चकाकले
"माझं कुणी राहिलं नाहीये...
आणि डॉक्टर म्हणतात
आयुष्यही फार राहिलं नाही"

मी हात लांबवून मीटर बंद केलं

"कुठून जावूयात?"

पुढचे दोन तास आम्ही शहरभर फिरलो
गल्ल्या-बोळातून, हमरस्त्यांवरून
ती कुठे काम करायची ते तिनं दाखवलं
ती आणि तिचा नवरा लग्न करून रहायला आले
ते घर दाखवलं
एका जुन्या गोदामापुढे गाडी थांबवून म्हणाली
"पूर्वी इथे नृत्यशाळा होती, मी नाचले आहे इथे"
काही ठिकाणी नुसतीच कोपर्‍यावर टॅक्सी थांबे
ती टक लावून इमारतीकडे पाही, अबोलपणे
मग खुणेने "चल" म्हणे

सूर्य मंदावला
"थकले मी आता, चल जाऊयात"

आम्ही अबोल्यात वृद्धाश्रमात पोहोचलो
टॅक्सी थांबताच दोन परिचारक पुढे आले
तिला व्हीलचेअर मध्ये बसवून तिची बॅग घेते झाले
तिने पर्स उघडली, "किती द्यायचे रे बाळा?"
"काही नाही आई, आशीर्वाद द्या."

"अरे तुला कुटुंब असेल. आणि पोटा-पाण्याची..."
"हो, पण इतर प्रवासीही आहेत, होईल सोय त्याची"
खाली वाकून म्हातारीला जवळ घेतलं
आणि चटकन् टॅक्सीत बसलो, डोळे चुकवत..
"मला म्हातारीला आनंद दिलास रे, सुखी रहा!"

व्हीलचेअर फिरली, गाडी फिरली
माझ्या मागे दार बंद झालं
तो आवाज एका आयुष्याच्या बंद होण्याचा होता

उरल्या दिवसभर मी एकही प्रवासी शोधला नाही
शहरभर फिरत राहिलो
अ-ध्येय, विचारांत हरवून

माझ्या ऐवजी, पाळी संपत असलेला
चिडका ड्रायव्हर भेटला असता तर
मीही स्वतच, एकदा हॉर्न वाजवून, निघून गेलो असतो तर

मला जाणवलं, मी काही खास केलं नव्हतं

उन्नत क्षण आपण शोधून मिळत नसतात
ते क्षण आपल्याला शोधत येतात

आपण फक्त जागं असलं पाहिजे.

कथामुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

गणपा's picture

9 Mar 2011 - 3:35 am | गणपा

अनुवाद सुरेख जमलाय बहुगुणी.
अंमळ हळवं करणार आहे.
शक्य अकसल्यास मुळ पद्य्/गद्य पण लिंकवु शकाल का?

विनायक बेलापुरे's picture

9 Mar 2011 - 3:52 am | विनायक बेलापुरे

मी हात लांबवून मीटर बंद केलं असं लिहीलंत तेंव्हाच
,बहुगुणी, मनात सांजवात लावलीत.

धन्यवाद.

तुम्हाला पाठवणार्‍यालाही लगे हात आभार कळवा.

चतुरंग's picture

9 Mar 2011 - 5:04 am | चतुरंग

बहुगुणी, फारच सुरेख लिहिलं आहेत. मूळ उताराही वाचायला आवडेल.

-रंगा

प्राजु's picture

9 Mar 2011 - 8:18 am | प्राजु

सुरेख!! खूप छान लिहिलं आहे तुम्ही, बहुगुणी!! मलाही मूळ उतारा वाचायला आवडेल. :)

बहुगुणी फारच सुंदर अनुवाद....

स्पंदना's picture

9 Mar 2011 - 9:02 am | स्पंदना

हे अस काही तरी जरुर आमच्या पर्यंत पोहोचवा बहुगुणी. तुम्ही तुम्हाला भावल्या शिवाय आमच्या पर्यंत आणणार नाही याचा विश्वास आहे आम्हाला.

वरील विनायक बेलापुरेंचा प्रतिसाद ही सुन्दर! चार चांद लावणारा.

कुठेस ओरखडुन गेल पण तरीही भाउक गोष्टी आवडतात्च आपल्याला नाही का?

पुन्हा एकदा हे काव्य आमच्या पर्यंत आणल्या बद्दल धन्यवाद!

वपाडाव's picture

9 Mar 2011 - 9:04 am | वपाडाव

मी नेहेमीच करतो अशी मदत
माझ्या आईलाही इतरांनी असंच वागवावं म्हणून

भावुक - उन्नत क्षण..

मृत्युन्जय's picture

9 Mar 2011 - 9:16 am | मृत्युन्जय

मूळ कथाही छान आणि अनुवादही

बहुगुणि, खुप छान गोष्ट आणि अनुवाद. एक चांगली कथा इथे मांडल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

प्यारे१'s picture

9 Mar 2011 - 9:35 am | प्यारे१

सकाळी सकाळी वाचले.

दिवस खराब केलास रे. :-(

दिवसभर आज्जी डोळ्यापुढून जाणार नाही.

चटका लागला.

बहुगुणी's picture

9 Mar 2011 - 9:46 am | बहुगुणी

मला इ मेलने आलेलं हे खालील लिखाण मी श्री. गणपा यांना व्य नि ने आधी पाठवलं होतं. मूळ लिखाण असंच असेल याची खात्री नव्हती म्हणूनच सुरूवातीला धाग्यात उद्धृत केलं नाही, कुणी लिहिलं आहे तेही ठाऊक नाही.

मी केला आहे तो भावानुवाद /रुपांतर आहे, भाषांतर नाही हे मूळ ओळी वाचून लक्षात येईलच.

[मी 'वृद्धाश्रम' शब्द वापरला आहे कारण hospice (terminal care facility) याला मराठी प्रतिशब्द काय आहे ते माहीत नाही.]

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

---
The
Cab Ride

I arrived at the address and honked the horn. After waiting a few minutes I walked to the
door and knocked..

'Just a minute', answered a frail, elderly voice. I could hear something being dragged across the floor.

After a long pause, the door opened.

A small woman in her 90's stood before me.

She was wearing a print dress and a pillbox hat with a veil pinned on it, like somebody out of a 1940's movie. By her side was a small nylon suitcase. The apartment looked as if no one had lived in it for years. All the furniture was covered with sheets.

There were no clocks on the walls, no knickknacks or utensils on the counters. In the corner was a cardboard box filled with photos and glassware.

'Would you carry my bag out to the car?' she said.

I took the suitcase to the cab, then returned to assist the woman. She took my arm and we walked slowly toward the curb. She kept thanking me for my kindness. 'It's nothing', I
told her.. 'I just try to treat my passengers the way I would want my mother to be
treated.'

'Oh, you're such a good boy, she said.

When we got in the cab, she gave me an address and then asked, 'Could you drive
through downtown?'

'It's not the shortest way,' I answered quickly..

'Oh, I don't mind,' she said. 'I'm in no hurry. I'm on my way to a hospice. '

I looked in the rear-view mirror. Her eyes were glistening. 'I don't have any family left,' she continued in a soft voice.. 'The doctor says I don't have very long.'

I quietly reached over and shut off the meter.

'What route would you like me to take?' I asked.

For the next two hours, we drove through the city. She showed me the building where she had once worked as an elevator operator.

We drove through the neighbourhood where she and her husband had lived when they were newlyweds She had me pull up in front of a furniture warehouse that had once been a ballroom where she had gone dancing as a girl. Sometimes she'd ask me to slow
in front of a particular building or corner and would sit staring into the darkness, saying
nothing.

As the first hint of sun was creasing the horizon, she suddenly said, 'I'm tired. Let's go now'.

We drove in silence to the address she had given me. It was a low building, like a small convalescent home, with a driveway that passed under a portico.

Two orderlies came out to the cab as soon as we pulled up. They were solicitous and intent, watching her every move. They must have been expecting her. I opened the trunk and took the small suitcase to the door. The woman was already seated in a
wheelchair.

'How much do I owe you?' She asked, reaching into her purse.

'Nothing,' I said

'You have to make a living,' she answered.

'There are other passengers,' I responded.

Almost without thinking, I bent and gave her a hug.

She held onto me tightly.

'You gave an old woman a little moment of joy,' she said. 'Thank you.'

I squeezed her hand, and then walked into the dim morning light.. Behind me, a door shut. It was the sound of the closing of a life..

I didn't pick up any more passengers that shift. I drove aimlessly lost in thought. For the rest of that day, I could hardly talk.

What if that woman had gotten an angry driver, or one who was impatient to end his shift?
What if I had refused to take the run, or had honked once, then driven away?

On a quick review,

I don't think that I have done anything more important in my life.

We're conditioned to think that our lives revolve around great moments.

But great moments often catch us unaware-beautifully wrapped in what others may consider a small one.

----

कुणाला मूळ लेखकाचं नाव माहित असेल तर जरूर या धाग्यात वाचायला आवडेल.

विकास's picture

9 Mar 2011 - 8:57 pm | विकास

खूप छान आहे. भावानुवाद पण मस्तच आहे.

उन्नत क्षण आपण शोधून मिळत नसतात, ते क्षण आपल्याला शोधत येतात

अगदी सत्य आहे...

hospice (terminal care facility)

मला वाटते "हॉस्पिस" हे केवळ terminal care facility नसते तर ज्यांना मोठी रुग्णालये परवडत नाहीत अशा रुग्णांसाठी असलेली धर्मादाय व्यवस्था असते. ते जरी वृद्धाश्रमाला समान नसले तरी या भावानुवादासंदर्भात ते योग्य आहे असेच वाटते.

स्वाती२'s picture

9 Mar 2011 - 10:43 pm | स्वाती२

हॉस्पिस म्हणजे एकदा मृत्यू अटळ आहे असे कळले की त्या व्यक्तीला आणि तिच्या नातेवाईकांना या वाटेवर चालणे सुसह्य होण्यासाठी दिला जाणारा आधार. यात पेन मॅनेजमेंट, इतर शुश्रुषा करणार्‍या नातेवाईकांना काही काळासाठी रिलिफ, रुग्णाच्या श्रद्धेनुसार दिला जाणारा मानसिक आधार आणि इतर वैद्यकिय गोष्टींचा समावेश होतो. कारण यातील 'वाट पहाणे' सहनशक्तीचा अंत पाहते. ऐपत असूनही काही गोष्टी पैशाने नाही विकत घेता येत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे अशा कठिण प्रसंगी दिला जाणारा दिलासा. त्या बाबत हॉस्पिसच्या कार्याला तोड नाही.

विजुभाऊ's picture

9 Mar 2011 - 12:17 pm | विजुभाऊ

छान लिहीले आहेस रे.
हळव झालो.

मनिष's picture

9 Mar 2011 - 12:19 pm | मनिष

Kent Nerburn आहे असे वाटते.
संदर्भ - http://www.zenmoments.org/the-cab-ride-ill-never-forget/

अनुराग's picture

9 Mar 2011 - 1:41 pm | अनुराग

सुरेख!! खूप छान लिहिलं आहे तुम्ही, बहुगुणी!! मलाही मूळ उतारा वाचायला आवडेल.

निखिल देशपांडे's picture

9 Mar 2011 - 1:45 pm | निखिल देशपांडे

छान अनुवाद केला आहे...
विचारात पाडलत एवढे नक्की

म्रुन्मयी's picture

9 Mar 2011 - 1:45 pm | म्रुन्मयी

अप्रतिम भावानुवाद्...मनाला चटका लावुन गेले.

हरिप्रिया_'s picture

9 Mar 2011 - 2:24 pm | हरिप्रिया_

:(
हळवं केल तुमच्या लेखाने..

गणेशा's picture

9 Mar 2011 - 2:35 pm | गणेशा

पुढचे दोन तास आम्ही शहरभर फिरलो
गल्ल्या-बोळातून, हमरस्त्यांवरून
ती कुठे काम करायची ते तिनं दाखवलं
ती आणि तिचा नवरा लग्न करून रहायला आले
ते घर दाखवलं
एका जुन्या गोदामापुढे गाडी थांबवून म्हणाली
"पूर्वी इथे नृत्यशाळा होती, मी नाचले आहे इथे"
काही ठिकाणी नुसतीच कोपर्‍यावर टॅक्सी थांबे
ती टक लावून इमारतीकडे पाही, अबोलपणे
मग खुणेने "चल" म्हणे

खुपच हळवे झाले आहे हो हे .. वाचताना भरुन येते आहे .. आपल्या अवतीभोवतालच्या आश्या माणसांचा चेहरा डोळ्यासमोर येतो आहे ... खुपच टची आहे हे ...

---
अवांतर : आपल्या या भावनावादामुले वृद्धाश्रमाला भेट दिली होती तेथला अनुभव पहिला आठवला सांगावासा वाटत आहे ... सांगतो नंतर .. परत एकदा कविता वाचत आहे ... मनात घर करुन गेलेत शब्द .. अगदी खोल भिडलेत

धिन्गाना's picture

9 Mar 2011 - 3:00 pm | धिन्गाना

उताराहि सुरेख आणि भावानुवाद हिसुरेख

sneharani's picture

9 Mar 2011 - 3:53 pm | sneharani

मस्त अनुवाद!

प्राजक्ता पवार's picture

9 Mar 2011 - 5:53 pm | प्राजक्ता पवार

सुरेख. छान लिहिलं आहे.

मदनबाण's picture

9 Mar 2011 - 5:55 pm | मदनबाण

सुंदर अनुवाद...

पैसा's picture

9 Mar 2011 - 6:20 pm | पैसा

_/\_

:(

सखी's picture

9 Mar 2011 - 6:37 pm | सखी

सुरेख भावानुवाद!! शेवटही खूप समर्पक जमला आहे. वाचनखूण करुन ठेवते आहे.

jaydip.kulkarni's picture

9 Mar 2011 - 8:44 pm | jaydip.kulkarni

अप्रतिम अनुवाद .........................

आनंदयात्री's picture

9 Mar 2011 - 9:37 pm | आनंदयात्री

सुंदर भावानुवाद. अतिशय आवडला.

शिल्पा ब's picture

9 Mar 2011 - 9:54 pm | शिल्पा ब

<<<But great moments often catch us unaware-beautifully wrapped in what others may consider a small one.

हे खुप आवडलं....मुळ कविता अन अनुवाद दोन्ही छान.

स्वाती२'s picture

9 Mar 2011 - 10:44 pm | स्वाती२

सुरेख!

भाग्यश्री's picture

9 Mar 2011 - 11:05 pm | भाग्यश्री

खूप आवडला अनुवाद !!

बहुगुणी's picture

9 Mar 2011 - 11:44 pm | बहुगुणी

हे केंट नर्नबर्न यांचंच लिखाण आहे. धन्यवाद!

थोडी आधिक माहिती मिळाली लेखकाविषयी:

Make Me an Instrument of Your Peace या त्यांच्या पुस्तकातला हा उतारा आहे. ते पुर्वी उदरनिर्वाहासाठी टॅक्सी चालवत असत तेंव्हाचा हा त्यांचा अनुभव होता. केंट नर्नबर्न यांनी Religion and Art या विषयात PhD मिळवली आहे, ते उत्तम शिल्पकारही आहेत आणि त्यांची शिल्पे ब्रिटिश कोलंबियातील वेस्टमिंस्टर बेनेडिक्टाईन अ‍ॅबे आणि जपान मधील हिरोशिमा पीस म्युझियम इथे ठेवलेली आहेत.

त्यांनी लिहिलेलं Simple Truths : Clear and Gentle Guidance on the Big Issues in Life आणि इतर बरीच पुस्तकं अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम वर उपलब्ध दिसली,

रेवती's picture

9 Mar 2011 - 11:53 pm | रेवती

सुंदर भावानुवाद!
शेवटी कसंतरीच वाटलं.