स्त्री सूक्त

योगप्रभू's picture
योगप्रभू in जे न देखे रवी...
8 Mar 2011 - 2:30 pm

राणीच्या राज्यात

ब्रिटिशांसारखी आमच्याकडेही
एक गोष्ट अगदी सेम असते
प्रत्येक घरात एक राणी असते
आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम असते

***

फुलांसाठी

अहंकारांचे भेदक बाण
सुटण्यापूर्वीच खुडून टाका
नाजूक, सुंदर फुलांसाठी
धनुष्य फेकून खाली वाका

***

सक्षमीकरण

शब्द अवघड वाटला तरी
सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ
पुरुषातील कोमल स्त्री जागवा
आणि स्त्रीमधला पुरुषार्थ

***

शांतरसचारोळ्याकविता

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2011 - 2:55 pm | प्रकाश घाटपांडे

आम्ही बी हेच म्हनुन र्‍हायलोय.

मुलूखावेगळी's picture

8 Mar 2011 - 2:59 pm | मुलूखावेगळी

छान हो मस्त.आवडले.
तुमच्या राणीला दाखवा. खुश होऊन जाईल. :)

अमोल केळकर's picture

8 Mar 2011 - 3:05 pm | अमोल केळकर

मस्त :)

अमोल

ज्ञानराम's picture

8 Mar 2011 - 4:58 pm | ज्ञानराम

अप्रतिम

Pearl's picture

8 Mar 2011 - 5:03 pm | Pearl

खूपच छान कविता.

>>
सक्षमीकरण

शब्द अवघड वाटला तरी
सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ
पुरुषातील कोमल स्त्री जागवा
आणि स्त्रीमधला पुरुषार्थ
>>

हे कडवे विशेष आवडले :-)

विकास's picture

8 Mar 2011 - 7:33 pm | विकास

पूर्ण सहमत. शेवटचे कडवे एकदम छान आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2011 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटचे कडवे एकदम छान आहे !

-दिलीप बिरुटे

निवेदिता-ताई's picture

9 Mar 2011 - 8:13 am | निवेदिता-ताई

शेवटचे कडवे छान आहे !

गणेशा's picture

8 Mar 2011 - 6:06 pm | गणेशा

मस्त

प्राजु's picture

8 Mar 2011 - 8:26 pm | प्राजु

मस्तच!

स्पंदना's picture

9 Mar 2011 - 9:34 am | स्पंदना

सगळीच आवडली, पण शेवटच जरा जास्त!

योगप्रभू's picture

9 Mar 2011 - 9:54 am | योगप्रभू

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद...

या तीन स्वतंत्र चारोळ्या कविता आहेत.
तिसरी कविता बहुतेकांना आवडली.

पण मला वाटते, की दुसरीही कविता अंतर्मुख करणारी ठरावी. कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये अलिकडेच एक बातमी वाचली, की विवाहानंतर ३ ते ५ वर्षांतच घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढते आहे. जोडप्याला मूल असले तरी त्याचा विचार न करता इगो हा मुद्दा प्रभावी ठरतो आहे आणि त्यातूनच सहजगत्या विभक्त होण्याचे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ही स्थिती अस्वस्थ करणारी आहे. 'पहावे आपणासी आपण' एवढेच या कवितेतून सांगायचे आहे.

[:)]
तिनही वेगवेगळ्या कोणातून छान मेसेज देणार्‍या कविता आहेत.
मला दुसरीच कविता जास्त आवडली होती... आणि तुम्ही म्हणता तसाच अर्थ लावला होता त्यामुळे तुमच्या स्पष्टीकरनानंतर आनखिनच छान वाटले ..

लिहित रहा .. वाचत आहे

Pearl's picture

9 Mar 2011 - 11:07 am | Pearl

>>दुसरीही कविता अंतर्मुख करणारी ठरावी. कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये अलिकडेच एक बातमी वाचली, की विवाहानंतर ३ ते ५ वर्षांतच घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढते आहे. जोडप्याला मूल असले तरी त्याचा विचार न करता इगो हा मुद्दा प्रभावी ठरतो आह>>>>

दुसरी कविता आता खूपच जास्त भावली. म्हणजे तुम्ही अर्थ स्पष्ट केल्यानंतर.
मला असं वाटत की 'स्त्री-सूक्त' नावाखाली सर्व कविता अस्ल्याने बहुतेक सर्व वाचकांना 'नाजूक सुंदर फुल म्हणजे स्त्री' असं वाटलं असावं. किंवा निदान मला तरी तसं वाटलं होतं :-)

पण आता तुम्ही जो context दिला, त्यावरून ती कविता आत्ता खरी भावते आहे.
लेखकाचा /कविचा view कळणे नेहमीच फायद्याचे असते. त्यामुळे लेखन जास्त कळते असं मला वाटतं.
e.g. एखाद्या नाटककाराने स्वतः लिहिलेले नाटक बसवले तर ते जास्त प्रभावी ठरते. तेच नाटक जर इतरांनी (नाटक वाचून) बसवले तर बर्‍याच वेळा तितके प्रभावी होत नाही. कारण 'Reading between the lines' योग्य प्रकारे होत नाही. I mean लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे, नेमका मतितार्थ काय आहे, context काय आहे हे फक्त लेखकच नीट सांगू शकतो (निदान कविता/नाटक यांच्या बाबतीत तरी.)

सो दुसरी कविता पण खूप आवडेश :-)

हरिप्रिया_'s picture

9 Mar 2011 - 12:22 pm | हरिप्रिया_

मस्त...