आवडत्या प्राणी/पक्ष्यावरचा निबंध हा नावडत्या प्राणी/पक्ष्यावर अन्याय आहे आसे मनेका गांधी ला वाटते.
मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.
कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात.
कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.
कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.
कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते.
पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना कोंबडीचोर म्हनत. चोरी करणे चूक आहे. चोरी केल्यावर आजकाल जेलमध्ये टाकतात. पुर्वी जेलमध्ये जाणे वाईट मानत व लोक त्यांचा तिरस्कार करत पण आज जेलमध्ये जाणार्याला लोक नेता म्हणुन निवडून देउन "लोकसभा" नावाच्या ठिकाणी पाठवतात. तिथे गेल्याने माणुस खुप श्रिमंत होतो असे माझे बाबा सांगतात.
कोंबदी अंडे देते. ते बहूपयोगी आहे. "आओ सिखाउ तुम्हे अण्डे का फण्डा" या गाण्यात त्याचे वर्णन आहे. त्या गण्यात मोनीका बेदी आहे. तिला जेलमध्ये अंडी देत होते का हे माहित नाही.
अंडे संडे या मंडे खाल्ले पाहीजे. मंडेला काही लोकांचा उपास असतो. नेल्सन मंडेला यांचा उपास असतो का हे मला माहित नाही. असो....
कोंबडीचा बळी देतात. बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. कोंबदीला पळत जाऊन पकडने माणसाला हुशार बनवते.
पुर्वी कोंबडा आरवायचा. कोंबडी झोपुन असायची. आजकाल मोबाईल नावाचा कोंबडा वेगवेगळ्या आवाजात आरवतो.
प्रतिक्रिया
5 Oct 2007 - 11:18 pm | विकास
आज कालच्या मुलांना इतके प्रतिभाशाली निबंध लिहीताना पाहून अगदी भरून आले!
असो. अफलातून ह. ह. पु.वा.!
5 Oct 2007 - 11:20 pm | विसोबा खेचर
बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात.
हा हा हा!
बरं का हरिभाऊ,
आपला छोटेखानी निबंध वाचून मन प्रसन्न झाले! :)
आपल्याकडून अजूनही अश्याच छान छान लघुनिबंधांची अपेक्षा आहे...
आपलाच,
(कोंबडीखाऊ) तात्या.
5 Oct 2007 - 11:46 pm | प्रियाली
कोंबडी शाकाहारी असते पण ती किडे खाते. काल मी प्रोग्रॅममधले बरेच किडे शोधले आणि संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर बरेच किडे केले. ते कोणते ते विचारायचे नाही.
माय नेम इज अँथनी गोन्साल्विस या गाण्यात अमिताभ कोंबडीच्या प्रचंड अंड्यातून बाहेर येतो. अँथनी गोन्साल्विस (गोंझालेझ, अमेरिकेत आल्यावर नाव बदलंल लेकाने) कोल्ट्सच्या फूटबॉल टीममध्ये वाईड रिसिवर म्हणून खेळतो.
क्रिकेटमध्ये बॉल न पकडता त्याच्या मागे सैरावैरा पळणार्या खेळाडूला आम्ही "कोंबडी पकड" म्हणायचो. भारतीय खेळाडू शाकाहारी असावेत कारण त्यांना कोंबडी पकडता येत नाही.
कोंबडी नावाची व्यक्ती मिसळपावाची "मान"नीय सदस्य आहे. पूर्वी कोंबडीची मान मुरगळून बळी देत.
आमचा अभिजीत कोंबडी पळाली गाण्यावर नाचून व्यायाम करतो. गुंडोपंतांनी व्यायामावर लेख लिहिला होता म्हणून मला व्यायाम करणे भाग पडले आहे. :-(
8 Oct 2007 - 1:14 pm | जुना अभिजित
ऑफिसमध्ये(इंग्रजीद्वेष्ट्यांनी कार्यालय वाचावे) कोंबडी पळाली हे गाणं रिंगटोन म्हणून वाजवण्याची जाम इच्छा आहे.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
6 Oct 2007 - 8:00 am | सहज
जिवंत कोंबडीच्या पेक्षा (शक्यतो तंदूरी प्रकारातली) शिजवलेली बरी कारण जिवंत कोंबडीला बर्ड फ्लू झाला की मग आहे मजा.
भागो रे भागो!!!!!!
अवांतरः- बाकी रोज करोडो लोक अब्जावधी लोकांना, अगणीत ई-मेल्स फॉरर्वड करतात त्यातील एकात हे वाचले होते. बर्याचदा वाटते की हे असे कोणी लिहले असेल. आज आपले नाव कळले हरिप्रसादजी, बरे वाटले.
8 Oct 2007 - 11:37 am | जुना अभिजित
मालक, तंदूरी प्रकारातली कोंबडी शिजवण्याऐवजी भाजलेली असते. म्हणून बर्ड फ्लू चा धोका टाळायचा असेल तर शिजवलेली कोंबडी तंदूरीपेक्षा उत्तम.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
8 Oct 2007 - 11:45 am | सहज
बरोबर तंदूरी म्हणजे भाजणे, "शिजवणे" नाही.
तंदूरी चिकन म्हणले की डोके कमी चालते, लाळ जास्त गळते. :-)
8 Oct 2007 - 12:17 pm | विसोबा खेचर
माझा आवडता पक्षी - कावळा! :)
या पक्ष्यावर माझे मनापासून प्रेम आहे..
मित्रांनो, तात्याला कावळा नाही शिवला तर पिंडाशेजारीच मिसळीची एक प्लेटही ठेवा. तो कावळा पिंडाऐवजी मिसळीला जरी शिवला तरी मला सद्गती मिळाली एवढे समजा! :)
20 Mar 2008 - 9:08 pm | llपुण्याचे पेशवेll
कावळा हा बिचारा सरळमार्गी पक्षी आहे. कायमच सरळ उडतो. सरळमार्गाने उडा उगाच का वळा ? असे बिचारा सारखा सारखा म्हणत असतो. म्हणूनच कदाचित त्याचे नाव कावळा पडले असावे.
भाईकाका म्हणतात त्याप्रमाणे मी देखील कावळ्याची कावळी काळी का गोरी ते पाहीलेली नाही. मध्यंतरी वृत्तपत्रात पांढर्या कावळ्याविषयी वाचले. कदाचित तो बगळा व कावळा या पक्षीगणांमधला हायब्रीड असावा. हायब्रीड द्राक्षात बी नसते. द्राक्षापासून वाईन बनवतात. 'वाईन हा एक मद्याचा प्रकार' आहे का नाही यात विचारवंतांमधे वैचारीक मतभेद आहेत. आणि ते याची चर्चा वाईन पिता पिता करतात. पिता हा 'बाप' या शब्दाला संस्कृत प्रतिशब्द आहे. त्यावरूनच 'पितरे' हा शब्द आला आहे. कावळा पिंडाला शिवला की 'पितरे' तृप्त होतात.
पुण्याचे पेशवे
21 Mar 2008 - 10:43 am | विसोबा खेचर
धन्यवाद पेशवेसाहेब,
तुम्ही मस्तच दुवा दिला आहे. पिंडाभोवती जमलेली कावळेमंडळी काय सुरेख आणि देखणी दिसत आहेत! वा वा!
राहवलं नाही म्हणून ते सुरेख चित्रं इथेही डकवत आहे...
भविष्यात केव्हातरी वर्तमानपत्रात खालील बातमी वाचाल -
संत तात्याबांच्या पिंडाला कावळा शिवण्याऐवजी पिंडाशेजारी ठेवलेल्या मिसळीला शिवला आणि संत तात्याबांना सद्गती प्राप्त झाली! या प्रसंगाला मोजकेच मिपाकर उदास मनाने उपस्थित होते आणि दूरच्या एका कोपर्यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :))
असो..
आपला,
(काकप्रेमी) तात्या.
21 Mar 2008 - 12:03 pm | प्रमोद देव
दूरच्या एका कोपर्यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :))
हे वाक्य बरेच काही सांगून जाते. तात्या अरे जरी तुझ्या पिंडाला...आपले, मिसळीला कावळा शिवला तरी तुझा आत्मा तळमळत राहील हे नक्की.कारण वेलणकरांनी दोन अश्रू ढाळल्याशिवाय काही तुला कायमची सद्गती मिळेल असे वाटत नाही.
मोगलांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी धनाजी दिसत असे काहीसे ऐकलेले आहे(चुभूद्याघ्या),त्याच चालीवर म्हणतो की तात्यालाही सदोदित 'देव'(प्रमोद देव नव्हे!) दिसण्याऐवजी वेलणकर दिसतात.. तात्या गेलाबाजार ३३कोटी देवांपैकी कुणा एकाचेही असे अखंड नामस्मरण जर का तू केले असतेस तर आत्तापर्यंत मोक्षपद मिळवले असतेस. काय? पटतंय काय गाववाल्यांनू? :)))
तेव्हा आता तरी विचार कर!!!!!!!!!!!
11 Oct 2007 - 9:57 am | जुना अभिजित
संत तात्याबांच्या इच्छेनुसार समस्त कावळेमंडळींनी पिंड शिवण्याचा कार्यक्रम पार पाडला आहे.
http://www.saamana.com/2007/Oct/11/Link/Main1.htm
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
11 Oct 2007 - 11:52 am | देवदत्त
चांगली बातमी आहे.
फक्त एक शंका आली.
आज पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी याच किनार्यावर तब्बल ९७४ कावळे उपस्थित होते.
हे कसे काय मोजले? मोजणारे भलतेच कार्यक्षम बुवा ;)
17 Oct 2007 - 10:32 pm | पुरणपोळी
माझ्या कडे एक कोंबडा होता , त्याच नाव बादशाहा होतं...........
17 Oct 2007 - 10:34 pm | विकेड बनी
>>माझ्या कडे एक कोंबडा होता , त्याच नाव बादशाहा होतं...........
हो का? माझ्याकडे एक गाढव होतं त्याचे नाव बिरबल.
18 Oct 2007 - 1:02 am | धनंजय
बादशहा नावाच्या कोंबड्याच्याविषयी जयवंत दळवींनी एक कादंबरी लिहिली आहे. पुढे तिच्यावर हिंदी पिक्चर निघाला. मोठा ऐटदार कोंबडा - गोष्टीत पुढे खाल्ला गेला असे वाटते.
20 Mar 2008 - 9:59 am | विजुभाऊ
माझ्या कडे एक कोंबडा होता , त्याच नाव बादशाहा होतं...........
तो पुरण्पोळी खायचा काय?
18 Oct 2007 - 12:24 am | पुरणपोळी
माझ्या कडे बादशाहाचा फोटो आहे..
18 Oct 2007 - 9:20 am | पुरणपोळी
बादशाहाला हाक मारली कि तो असेल तिथून यायचा...
20 Mar 2008 - 9:12 pm | llपुण्याचे पेशवेll
आमच्या गावाला 'बादशहा बेंडके' नावाचा एक गवंडीकाम करणारा गडी होता. त्याच्या वडीलानी 'मुघले ए आझम' वरून प्रेरीत होऊन त्याचे नाव बादशहा ठेवले होते. तो पण हाक मारली की असेल तिथून यायचा.
पुण्याचे पेशवे
20 Mar 2008 - 6:13 am | सृष्टीलावण्या
आजकाल मोबाईल नावाचा कोंबडा वेगवेगळ्या आवाजात आरवतो.
मग तो मोबाईल आणि त्याचा मालक दोघांचाही गळा दाबायला हात शिवशिवतात.
अवांतर: केसरीच्या वीणा पाटील एकदा हिमेशच्या सुस्वर 'आशिक बनाया आपने' ह्या भूपाळीने जाग्या झाल्या. त्यांनी मुलाला विचारले की इतक्या पहाटे तुला कोण फोन करतं? त्यावर त्यांच्या मुलाने आपल्या आईला जगात काहीच कळत नाही अश्या दृष्टीने पाहिले आणि म्हणाला, "आई तो रिंगटोन नाही, alarm आहे."
>
>
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...
21 Mar 2008 - 11:53 am | विजुभाऊ
दूरच्या एका कोपर्यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :))
तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?..मि पा वर वेलणकर आणि मनोगत असे दोन शब्द बरेचदा ऐकतो
प्रस्तुत ग्रुहस्थ मि पा शी कसे काय संबंधीत आहेत ? किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय?( जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष)
बर्याच लेखात त्यांचा उल्लेख येतो.....सदर ग्रुहस्थ मि पा साठी अगदीच नगण्य असतील तर त्यांचा उल्लेख करु नये.मिपा च्या बर्याच सदस्याना त्यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही.पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना
आपला...............अगदीच नगण्य नसलेला
विजुभाऊ
21 Mar 2008 - 12:40 pm | विसोबा खेचर
तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?..
ते माझे मराठी आंतरजालातले गुरू आहेत! :)
किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय?
हो! :)
जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष)
म्हणजे ते कंस आणि मी कृष्ण?!! :) हा हा हा, विजूभाऊ, तु सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :)
पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना
ठीक आहे, सवडीने केव्हातरी एक नाटक लिहिणार आहे, त्यात त्यांचा उल्लेख असेलच!
तूर्तास, त्या नाटकातील वेलणकरच्या तोंडी असलेला शेवटचा संवाद लिहून तयार आहे तो इथे लिहितो..! :)
"चल तात्या, आपण दोघे आता आपले जंगलात जाऊन राहू! पुरे झालं ते मनोगत अन् मिसळपाव! पैसा म्हणशील तर मलाही मनोगतापासून मिळवायचा नाही आणि तुलाही मिसळपावपासून मिळवायचा नाही! प्रसिद्धी म्हणशील तर मराठी आंतरजालीय दुनियेत तुलाही पुरेशी प्रसिद्धी मिळाली आणि मलाही मिळाली! तेव्हा आता इथे, या आंतरजालीय दुनियेत, फार थांबणे नको!
तू माझ्या मनोगतावर होतास, मनोगतामुळे तुला थोडीफार बरीवाईट प्रसिद्धी मिळाली परंतु एक दिवस तू मला शिव्या देऊन, तमाशा करून मनोगत सोडलेस त्याचप्रमाणे दुसरा कुणेतरी तात्या तुझ्या मिसळपाववर निर्माण होईल आणि तोही एक दिवस तुला यथास्थित शिव्या देऊन मिसळपाव सोडून निघून जाईल! तेव्हा आत्ताच धडा घे आणि चल इथून! जंगलच्या राज्यात असलंच जर का आंतरजाल, तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :)
दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सावकाश विंगेत जातात आणि पडदा पडतो!
(समाप्त!)
आपला,
(नाटककार!) तात्या:)
21 Mar 2008 - 12:47 pm | आनंदयात्री
षटकार !! तो पण नो बॉल वर ....
आंतरजालिय नाट्यशिरोमणी - नटसम्राट तात्यासाहेब बेलवरकरांचा विजय असो ...
21 Mar 2008 - 1:19 pm | ॐकार
हे नाटक लिहाच! काय समारोप आहे!
21 Mar 2008 - 3:00 pm | प्रमोद देव
तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :)
देव करो(पुन्हा... मी नाही. आता नेहमी नेहमी नाही सांगणार हां! लक्षात ठेवा सगळ्यांनी!!!!!) आणि तसेच घडो. तथास्तु म्हणतो.
25 Aug 2012 - 7:21 pm | सस्नेह
इति श्री क्षुधानाशकम कोंबडीपुराणम, अफलातूनम ....
26 Aug 2012 - 11:07 am | तिमा
एक कोंबडी घेऊनी संगे
अपुल्या पिल्लांना
शोधित होती खाणे अपुले
हलवीत बहुमाना
त्यांच्यापैकी एकच पिल्लू
होते स्वच्छंदी
दूर पळाले आईपासूनी
साधुनिया संधी
आकाशामधी तळपत होती
एक भली घार
तिने तयाला पकडून नेले
निर्दय ती फार |