निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी
लेखनप्रकार
आवडत्या प्राणी/पक्ष्यावरचा निबंध हा नावडत्या प्राणी/पक्ष्यावर अन्याय आहे आसे मनेका गांधी ला वाटते.
मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.
कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात.
कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.
कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.
कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते.
पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना कोंबडीचोर म्हनत. चोरी करणे चूक आहे. चोरी केल्यावर आजकाल जेलमध्ये टाकतात. पुर्वी जेलमध्ये जाणे वाईट मानत व लोक त्यांचा तिरस्कार करत पण आज जेलमध्ये जाणार्याला लोक नेता म्हणुन निवडून देउन "लोकसभा" नावाच्या ठिकाणी पाठवतात. तिथे गेल्याने माणुस खुप श्रिमंत होतो असे माझे बाबा सांगतात.
कोंबदी अंडे देते. ते बहूपयोगी आहे. "आओ सिखाउ तुम्हे अण्डे का फण्डा" या गाण्यात त्याचे वर्णन आहे. त्या गण्यात मोनीका बेदी आहे. तिला जेलमध्ये अंडी देत होते का हे माहित नाही.
अंडे संडे या मंडे खाल्ले पाहीजे. मंडेला काही लोकांचा उपास असतो. नेल्सन मंडेला यांचा उपास असतो का हे मला माहित नाही. असो....
कोंबडीचा बळी देतात. बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. कोंबदीला पळत जाऊन पकडने माणसाला हुशार बनवते.
पुर्वी कोंबडा आरवायचा. कोंबडी झोपुन असायची. आजकाल मोबाईल नावाचा कोंबडा वेगवेगळ्या आवाजात आरवतो.
वाचने
49543
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
डोळ्यात पाणी आले!
मन प्रसन्न झाले! :)
कोंबडीपुराण
In reply to कोंबडीपुराण by प्रियाली
रिंगटोन
कोंबडीला
In reply to कोंबडीला by सहज
तंदूरी
In reply to तंदूरी by जुना अभिजित
बरोबर
अवांतर : माझा आवडता पक्षी - कावळा! :)
In reply to अवांतर : माझा आवडता पक्षी - कावळा! :) by विसोबा खेचर
कावळा.
In reply to कावळा. by llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद, :))
In reply to धन्यवाद, :)) by विसोबा खेचर
हाहाहाहाहा!
हे वाचा
In reply to हे वाचा by जुना अभिजित
बरंय...
माझ्या कडे
In reply to माझ्या कडे by पुरणपोळी
बिरबल
In reply to माझ्या कडे by पुरणपोळी
बादशहा नावाचा कोंबडा
In reply to माझ्या कडे by पुरणपोळी
माझ्या कडे
माझ्या कडे
बादशाहाला
In reply to बादशाहाला by पुरणपोळी
आमचा बादशहा
खरे आहे.
वेलणकरालाही ?
In reply to वेलणकरालाही ? by विजुभाऊ
गुरू!
In reply to गुरू! by विसोबा खेचर
हा हा हा
In reply to गुरू! by विसोबा खेचर
:डःडःड
In reply to गुरू! by विसोबा खेचर
देव करो आणि.....
इति श्री क्षुधानाशकम
ऐकलेली कविता