लेले..

गवि's picture
गवि in जे न देखे रवी...
5 Nov 2010 - 8:38 pm

अब्द फाटलेले आभाळ रापलेले
इडलीमधून वाफा उ:श्वास तापलेले.

ओठांतुनी निघाला चमचा तसाच उष्टा
त्या कृष्ण कुन्तलाने सांबार गाठलेले..

पार्श्वात काय माझ्या ही वेदना कळेना
पंकातल्या बुटांनी नाकाड घासलेले.

स्वप्नात का असेना तो मेघ प्राशलेला
आयुष्य मात्र सारे श्वानास घातलेले.

कविताविडंबनगझल

प्रतिक्रिया

आयुष्य मात्र सारे श्वानास घातलेले

या एका ओळीत सारं आलेलं आहे.
पण इथल्या सो कॉल्ड काव्यप्रेमींना "आयुष्य श्वानास घातलेले" हे मंजूर होणार नाहीच!

कविता पटेश!

खादाड अमिता's picture

28 Feb 2011 - 1:20 pm | खादाड अमिता

मला वाटलं कुठल्या व्यक्ती बद्दल कविता आहे.. बघितलं तर एक वेगळीच मांडणी! :)

<<आयुष्य मात्र सारे श्वानास घातलेले>> असं का हो म्हणताय? :(

टारझन's picture

28 Feb 2011 - 1:28 pm | टारझन

मला सलमान खान कृत , आयेषा टाकिया पुरस्कृत "वाँटेड" ह्या चित्रपटातले " लेले लेले लेले रे मजा ले .. लेले लेले लेले रे मजा ले .. दारु का जम के मजा ले ... ( इत्यादी इत्यादी) .एम्पी३ " हे गाणी डॉली डिजिटल मधे आठवले .

गुड्डु's picture

28 Feb 2011 - 1:45 pm | गुड्डु

आधी काहि कळलेच नाही मग मात्र...............
बेश्ट्च

विजुभाऊ's picture

28 Feb 2011 - 3:09 pm | विजुभाऊ

लेले....
ओक लेले काळे फडके
लेले दामले
या वावड्या आठवल्या

पैसा's picture

7 Jan 2014 - 8:32 pm | पैसा

:ROFL:

सांबारात पडलेला केस, चिखलमय बूट आणि कुत्र्याला घातलेले आयुष्य; सर्व प्रकारच्या वेदनांचा अनोखा आविष्कार.

वृत्त आणि यमक मात्र फस्कलास जमलंय हो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jan 2014 - 8:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> वृत्त आणि यमक मात्र फस्कलास जमलंय हो !

नै नै वृत्त आणि गझलेची चौकट हुकली आहे असे माझे मत आहे.
मी तसा काही गजलेचा जाणकार नाही, पण तज्ञ मंडली आपलं मत व्यक्त करतीलच.

-दिलीप बिरुटे

पण हे अक्षरगण वृत्त आहे आणि म्हणताना कुठे ओढाताण होत नाही एवढं कळालं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jan 2014 - 9:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अक्षरगणवृत्तात चरणातील अक्षरांची संख्या सारखी असते ती इथे नाही.
हं आता दोन वृत्ताचं मिश्रण आहे, असे वाटते. अक्षरगणवृतात नियमित यती (ओळीत थांबतो ती जागा) दिसतो तोही इथे दिसत नाही,असे वाटते.

आपल्याला असं का वाटतंय की वरील रचना वृत्तात आहे म्हणून ? काही लक्षणे ?

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

7 Jan 2014 - 9:34 pm | पैसा

मिश्रण असावंच. पण पहिली ओळ वगळता इतर ओळीत त र भ र य असे गण साधारणपणे एका पॅटर्नने दिसत आहेत. प्रत्येक दुसर्‍या ओळीत "लेले" आहेत. हे काय आहे शोधा कोणीतरी. पण कवितेचं रसग्रहण आधी करा बघू!

(य-यमाचा न-नमन त-ताराप र-राधिका म-मानावा स-समरा ज-जनास भ-भास्कर हे गण आठवले पण माहिती असलेले कोणतेही वृत्त या कवितेला लागू झाले नाही.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2014 - 1:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओठांतुनी निघाला चमचा तसाच उष्टा
त्या कृष्ण कुन्तलाने सांबार गाठलेले..

स्वप्नात का असेना तो मेघ प्राशलेला
आयुष्य मात्र सारे श्वानास घातलेले.

रसग्रहणाचं मनावर तुम्हीच घ्या. नै तर दोन ओळीचं तुम्ही रसग्रहण करा आणि मी दोन.
अतिशय उच्च पातळीवर, गंभीर, असं रसग्रहण करु... :)
-दिलीप बिरुटे

लेलेंचे भूत आले का पुन्हा परत..

राम राम राम..

गविंनी आता काथ्याकूट टाकावा!

-संपादकांनी संपादकांसाठी वर काढलेला संपादकीय धागा असं म्हणावं का या पेचात प्यारे (हे उगाच्च ;) )

शुचि's picture

7 Jan 2014 - 9:52 pm | शुचि

क्या बात है!!!

बॅटमॅन's picture

7 Jan 2014 - 9:59 pm | बॅटमॅन

=))

लेले लेले हातात पेले *****गेले तिथंच मेले असे प्राचीन काळी ऐकलेले यमक ऐकून गहिवरलो. कृष्ण कुंतलाने सांबार गाठले हे ऐकून बाकी डोळे पाणावले. प्रतिमासृष्टीही उत्तम बैभत्सी आहे =))

वृत्ताचं म्हणाल तर आनंदकंद वाटते आहे चालीवरून. लघुगुरूंची अंमळ ओढाताण झाली तरी ठीक, चालीस तादृश बाध येत नाही. अन अक्षरगणवृत्ताच्या प्रत्येक चरणात अक्षरसंख्या सेमच असते असे वाटत नाही- अर्धसमवृत्त आणि विषमवृत्त या कॅटॅगिर्‍या अंमळ चेकवतो अन मग सांगतो माझी शंका योग्य आहे की कसे ते.

मस्त आणि लयबद्धसुद्धा!!

कवितानागेश's picture

8 Jan 2014 - 12:47 am | कवितानागेश

अर्धबिभत्स गझल?!!
जरा चालीत गाउन बघते आणि मगच पुढचं लिहिते. :)
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
हाच मीटर वापरलाय ना?

तिमा's picture

8 Jan 2014 - 11:51 am | तिमा

हे 'लेले' पूर्वी नजरेतून निसटले
आता सहज सापडले
म्हणून वाचले
आणि तिसर्‍या कडव्यातले
दु:ख जाणवले|