ढीस्क्लेमर : धमुने "नागपुरी खाक्या" दाखवणारे काहीतरी लिहायला सांगितलं होतं. पण मला लिहीताही येत नाही आणि कधी दाखवला नसल्याने नागपुरी खाक्या पण माहीत नाही...
ही कविता प्रा. ज्ञानेश वाकुडकरांची आहे. त्यांचे "सखी साजणी" हा काव्यसंग्रह आणि "फक्त तुझ्यासाठी" हा चारोळीसंग्रह प्रसिद्ध आहे.. ही कविता कदाचित तो खाक्या दाखवु शकेल, असं वाटतं..
**************************************************************
ताजमहाल हॉटेलचा कमरा नंबर बावण
अचानक तिथे मला परवा भेटला रावण
म्हणाला, "हॅलो !
मी नुकताच नरकातून आलो.
यार, इथली सुव्यवस्था पाहुन
भयंकर प्रभावित झालो.
अरे, आमच्या वेळी सामाजिक परीस्थिती
जर एवढी बिघडली असती
तर मला सितेसाठी लढाई करण्याची
गरजच पडली नसती."
मी म्हणालो, "रावणा !
चाय पियेंगे, आव ना !"
रावण हसला.
खुशीत येवून खांद्यावरती हात टाकुन बसला.
म्हणाला, "यार ! वास्तविक, सिताप्रकरणात
जगामध्ये केवढा बदनाम झालो !?
त्यानंतर प्रथमच भारतामध्ये
दौर्यावरती आलो."
"पण काय सांगू?
जिथे-तिथे माझा सत्कार खास होतो आहे.
मी कुणी महात्मा असल्याचा भास होतो आहे.
दोस्ता, मी माझं सर्वत्र होणारं
हे गरम स्वागत पाहीलं.
तेव्हापासुन मला एकच आश्चर्य
वाटुन राहीलं....
अरे, काळ बदलल्याबरोबर
मी केवढा ग्रेट झालो आहे !
पण दु:ख एवढंच वाटतं,
थोडा लेट झालो आहे."
दोस्ता,
आता येण्याऐवजी
मी जर थोडा आधी आलो असतो.
तर, आतापर्यंत
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो...."
प्रतिक्रिया
27 Feb 2011 - 2:39 pm | पैसा
आम्हाला रावण राजा "झालाच पायजे!"
27 Feb 2011 - 3:52 pm | स्पंदना
हो ! मान्य!
पण त्यान नक्की कोणाला पळवुन नेल पाहिजे ते जरा सांगशील का?
27 Feb 2011 - 3:56 pm | पैसा
आता सीता पण नाही आणि तिला सोडवायला राम पण नाही. रावण कोणाला पळवणार आता? हिंदी सिनेम्यातल्या सुंदर्या तर "मला पळव" म्हणून रावणाच्या मागे धावतील. "रावण" सिनेमा बघितला नाहीस का?
27 Feb 2011 - 5:16 pm | स्पंदना
हा! हा! हा!
कुणी सांगाव, त्याच रावणाला पळवतील!
बाकि चिगो तुमचे डब्बल आभार.
27 Feb 2011 - 6:48 pm | JAGOMOHANPYARE
सीता पळवापळवी हे प्रकरण सोडलं तर रावण हा एक आदर्श राजा होता म्हणे. मग तो म्हाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा बनु शकेल?
27 Feb 2011 - 7:56 pm | विकास
कविता एकदम मस्त!
सीता पळवापळवी हे प्रकरण सोडलं तर रावण हा एक आदर्श राजा होता म्हणे. मग तो म्हाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा बनु शकेल?
एकदम सहमत!
28 Feb 2011 - 11:42 am | ramjya
कविता एकदम मस्त आहे