बालगीते

वपाडाव's picture
वपाडाव in जनातलं, मनातलं
23 Feb 2011 - 11:07 am

मी लहान म्हणजे अगदीच शिशुमंदीरात शिकत असताना जुन्याश्या कॅसेट प्लेयरवर (टेप रेकॉर्डर) बाल गीते ऐकत असे.
उत्तरा केळकर यांच्या स्वरधारा ह्या अल्बममधील गाणी होती ती.
शाळेतुन घरी आलो की उचकपाचक करायला सुरुवात व्हायची. आईला ही घरघर पसंत नसे. ती मग टेप रेकॉर्डर चालु करुन देई. मग पुढचा अर्धा-एक तास हा बाल गीते ऐकण्याचा कार्यक्रम चालायचा. मी ही गाणी तब्बल तीन-चार वर्षे तरी ऐकली असावीत . त्यानंतर माझ्या लहान बहिणीने सुद्धा ऐकली. पण काळाच्या ओघात जसं CDचं चलन वाढलं, हे कुठेतरी मागे पडलं.
माझ्या संग्रही ती कॅसेट आता नाहीये. मी जालावर शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही मिळाली.
त्यातील काही गाण्यांची यादी, जी मला आठवतात अशी, खाली नमुद करत आहे.

१. फुगेभाउ, फुगेभाउ ढमढेरे, फुगु नका आणखीन, आता पुरे.
२. चांदोबा रे चांदोबा तु येतोस कुठुन, मउ मउ ढगांच्या रथात बसुन.
३. दख्खनच्या राणी तु नेतेस का मला, पेशवाई पुणे पाहायचंय मला.
४. परीताई ए ए परीताई, खाउ मी देइन तुला, पर्यांच्या देशात नेशिल मला?

हे लिहिताना केळकरांचा आवाज माझ्या कानात गुंजरव करत आहे.

मिपाकरांना या अल्बम मधील आणखी काही गाणे आणी त्यांच्या MP3 प्रती, किंवा दुवे माहीती असल्यास प्रतिसादात लिहावे.

आपला आभारी
-वपाडाव

संगीतबालगीतमाहिती

प्रतिक्रिया

माझ्याकडेदख्खनच्या राणि आहे, कसे पाठवु कळवा. शुक्रुवारी रात्रि पर्यंत पोहोच केले जाईल. बाकी इतर मिळाल्यावर मला पाठवाल हा विश्वास आहेच.

पाषाणभेद's picture

23 Feb 2011 - 1:00 pm | पाषाणभेद

जुनी गाणी परत ऐकणे हा एक आनंददायक अनुभव आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

23 Feb 2011 - 1:52 pm | अविनाशकुलकर्णी

शी...बालगीते काय? चांगले मराठीत Nursery Rhymes म्हणायचे....

कच्ची कैरी's picture

23 Feb 2011 - 2:26 pm | कच्ची कैरी

आमच लहानपण नुकतच गेलय म्हणुन आम्ही लहानपणी एकलेली बालगीते आताही सीडीच्या स्वरुपात आमच्याकडे आहेत .तुमची बालगीते मिळाल्यावर आम्हालाही एकवा.

गणेशा's picture

23 Feb 2011 - 3:23 pm | गणेशा

ही गाणी आम्हाला पण द्या मिळाल्यावर ..
...

आमच्या काळात ..

ससा .. ससा दिसतो कसा.. अशय टाईपची बालगीते होती .

अवांतर :

मी शाळेत असताना शाळेत जायच्या टाईमला एक कार्यक्रम लागायचा ( ११-१२ च्या दरम्यान) रेडिओ ला.
बहुतेक लोकगीतांचा असेल तो ..

रोज हे गाणे लागायचे ..

तुला जोडीने --- फिरवीन ... अग मैना ...
हा कार्यक्रम आण इअशी गाणीच ती काय लक्शात आहेत ..

खडूस's picture

23 Feb 2011 - 3:30 pm | खडूस

जरा गुगलले तर तूनळी वर 'दख्खनच्या राणी तू नेतेस का मला' हे गाणे मिळाले.

अवांतर - बर्याच लोकांना spoon-feeding ची सवय असते. ह्याची मुळे शालेय शिक्षणात की एकंदर जडणघडणीतच

वपाडाव's picture

23 Feb 2011 - 6:38 pm | वपाडाव

आपले खरंच खूप खूप आभार.
आपल्या प्रतिक्रिये मुळे रागात येउन मी भरभर गुगललो तर सगळी गाणी मिळाली मला.
खरोखर धन्स.
http://www.manoramic.com/music/marathi/albums/etuklya-pituklyaichi-baalg...
हा दुवा आहे.
पुनश्च आभार.

वपाडाव's picture

24 Feb 2011 - 10:10 am | वपाडाव

काल गाणी मिळाली त्यावेळी हापिसात असल्याने गाणी घरी जावुन ऐकली.
तर ती "व्हर्जिनल" नसल्याचं लक्षात आलं. गाणी उत्तरा केळकरांच्या आवाजातील नव्ह्ती.
पण ठीक आहे. चालवुन घेऊ.

५० फक्त's picture

23 Feb 2011 - 4:09 pm | ५० फक्त

@ गणेशा, तु म्हणतो आहेस ते गाणे बहुधा आनंद शिंदेंच्या वडिलांचं आहे,

अग मैना तुझी हॉस पुरविन
तुला जोडिनं कोल्हापुर फिरविन

हे पण आहे माझ्याकडे बहुधा, पाहतो घरी गेल्यावर.

अमोल केळकर's picture

23 Feb 2011 - 4:50 pm | अमोल केळकर

काही बालगीते इथे वाचा

अमोल केळकर

पक्या's picture

24 Feb 2011 - 7:10 am | पक्या

कोणाकडे ही गाणी आहेत काय?
नुसते शब्द मिळाले तरी चालतील.

कवी - रविन्द्र भट
१) वळिवाचे ढग आले वरती , धरती खाली आसुसली , झाडासंगे वारा खेळे , भिंगोर्‍या अन भातुकली
२) झाड म्हणतं धारा दे , पाखरू म्हणतं चारा दे, सृष्टीमधल्या चराचराला देवा , सौख्य निवारा दे.