दारासमोरचा रस्ता

अवलिया's picture
अवलिया in जे न देखे रवी...
15 Feb 2011 - 12:16 pm

दारासमोरचा रस्त्यावर
असलेले अनेक खड्डे
काही लहानपणी गोट्या खेळतांना पडलेले
क्रिकेटचे स्टंप लावतांना काही
तर काही असेच
काळाच्या खुणा बाळगण्यासाठी तयार झालेले.

चुकार दगडं मधुनच
वर येत पायाला टोचत
आणि
धुळमाती अंगावर उडवत
खेळतांना वेळेचे भान नसे.

पावसाळ्यात डबके झालेल्या
रस्त्यावर थपथप भरलेल्या
पाण्यात मारलेल्या उड्या अन्
पायाला लागलेला
चिखल घरभर पसरत असे.

आता डांबरीकरण झाल्यावर
मऊसुत रस्त्यावरुन चालतांना
उगाचच पाय कुठेतरी ठेचकाळतो
काहीतरी टोचतं
आणि
चिखल लागल्याचा भास
जाता जात नाही.

शांतरसस्थिरचित्र

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

15 Feb 2011 - 12:32 pm | यशोधरा

मस्त..

मस्त
दारासमोरच्या हवं का?

अवांतरः
डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर मालिकेचा कवितेशी काही संबंध आहे का ;)

जागु's picture

15 Feb 2011 - 1:11 pm | जागु

छान.

sneharani's picture

15 Feb 2011 - 1:20 pm | sneharani

मस्त लिहलयं !
:)

टारझन's picture

15 Feb 2011 - 1:23 pm | टारझन

वाह नाना .. जबरा कवीता ..

आता "पांदीकडचा रस्ता " ही येऊ द्या .. बघा पायाला अजुन काही लागतं का !! आजकाल त्या चार भिंती आल्यामुळे 'तो' टच .. 'ते' फिलिंग काळाच्या पडद्या आड हरवलंय कुठेसं .

अवलिया's picture

15 Feb 2011 - 1:25 pm | अवलिया

हा हा हा

ते "विडंबन" टाकण्याचा मान तुमचा !! तुमच्या शिवाय कोण जास्त चांगले लिहू शकेल त्या विषयावर ;)

कवितांचे विडंबन करण्या सारखा सुमार प्रांत आमचा णाही :) गणेशा किंवा प्रकाश१११ किंवा पाषाणभेद गेला बाजार ओगले काका ह्यांनी हे षिवधणुष्य उचलावं असं वाटतं !!
डॉ. दिवटेंनीही 'शेतीला सोनखत' कसं द्यावं ह्यावर मार्गदर्शनपर कविता द्यावी असे जाता जाता णमुद करतो :)

श्रावण मोडक's picture

15 Feb 2011 - 1:33 pm | श्रावण मोडक

हं... :)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2011 - 1:39 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावरच्या सदस्यत्वावर
पडलेले अनेक चट्टे
काही अवांतर केल्यावर पडलेले
पालथे धंदे करताना काही
तर काही बळंच
प्रेमीला मटेरीयलसाठी तयार केलेले.

चुकार धागे मधुनच
इंचा इंचाने बोर्डाला टोचत
आणि
चिखलफेक अंगावर उडवत
लुत्फ उठवताना वेळेचे भान नसे.

लाळेचे डबके झालेल्या
जळजळीनी भरलेल्या
खमंग धाग्यावर मारलेल्या मजा अन्
हाताला लागलेला
इनो किबोर्डभर पसरत असे.

आता प्रतिमा परिवर्तन झाल्यावर
मऊसुत धाग्यावर प्रतिसादताना
उगाचच पालथे धंदे आठवतात
खरडवही दिसते
आणि
मालकांची खरड आल्याचा भास
जाता जात नाही.

टारझन's picture

15 Feb 2011 - 1:47 pm | टारझन

व्वा !@!@

'ती' खरड तुम्हालाही आली होती तर :)

अवलिया's picture

15 Feb 2011 - 1:56 pm | अवलिया

अगागागागा

___/\____

परा महान आहेस !!

गणपा's picture

15 Feb 2011 - 2:37 pm | गणपा

के व ळ
हुच्च :)

श्रावण मोडक's picture

15 Feb 2011 - 2:47 pm | श्रावण मोडक

प्रेमी वगैरे शब्द पाहून जे संदर्भ लागले त्यामुळे ड्वाले पाणावले... :)

मृत्युन्जय's picture

15 Feb 2011 - 4:10 pm | मृत्युन्जय

परा धागा हॅक करायची मकीची सवय लागली तुला.

अवलियासेठ आता परासाठी पण एक गजरा आणि शाल (चुकुन पैठणी लिहिणार होतो पण वेळीच लक्षात आले) तयार करा ५ व्या भागात.

मुलूखावेगळी's picture

15 Feb 2011 - 2:18 pm | मुलूखावेगळी

अवलिया मस्त आहे कविता
अनि परा तुझी पन भारी ;)

गवि's picture

15 Feb 2011 - 3:01 pm | गवि

+१

हेच म्हणतो.

मुळ कविता आनि परांचे विडंबन ही मस्त एकदम

बेसनलाडू's picture

15 Feb 2011 - 10:56 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

मितान's picture

15 Feb 2011 - 3:27 pm | मितान

मस्त ! :)

प्रकाश१११'s picture

15 Feb 2011 - 4:14 pm | प्रकाश१११

सुंदर ,सुरेख ,मस्त !!

पैसा's picture

15 Feb 2011 - 10:34 pm | पैसा

अवलियांची कविता, आणि पराचा प्रतिसाद, दोन्ही दाद देण्यासारख्या मस्त जमल्यात!

ज्ञानेश...'s picture

16 Feb 2011 - 10:31 am | ज्ञानेश...

पर्‍या आणि टार्‍याचे प्रतिसाद वाचून सकाळ सार्थकी लागली.
नानासाहेबांचे काव्य उत्तमच.

मैत्र's picture

16 Feb 2011 - 10:41 am | मैत्र

नाना साहेब... पराने त्यावर षटकार मारला आहे पण मूळ डाव सुरू करण्याचं आघाडीच्या फलंदाजाचं श्रेय त्याला देता येत नाही...
केवळ जबरा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2011 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे.....!

-दिलीप बिरुटे