दारासमोरचा रस्ता
दारासमोरचा रस्त्यावर
असलेले अनेक खड्डे
काही लहानपणी गोट्या खेळतांना पडलेले
क्रिकेटचे स्टंप लावतांना काही
तर काही असेच
काळाच्या खुणा बाळगण्यासाठी तयार झालेले.
चुकार दगडं मधुनच
वर येत पायाला टोचत
आणि
धुळमाती अंगावर उडवत
खेळतांना वेळेचे भान नसे.
पावसाळ्यात डबके झालेल्या
रस्त्यावर थपथप भरलेल्या
पाण्यात मारलेल्या उड्या अन्
पायाला लागलेला
चिखल घरभर पसरत असे.
आता डांबरीकरण झाल्यावर
मऊसुत रस्त्यावरुन चालतांना
उगाचच पाय कुठेतरी ठेचकाळतो
काहीतरी टोचतं
आणि
चिखल लागल्याचा भास
जाता जात नाही.
मस्त..
मस्त दारासमोरच्या हवं
छान.
मस्त
वाह नाना .. जबरा कवीता ..
हा हा हा ते "विडंबन"
काय नाना , अप्रगल्भ सदस्याची अशी कुचेष्टा ?
हं...
मिपावरच्या सदस्यत्वावर पडलेले
=)) =)) =))
हा हा हा
के व ळ हुच्च
हाहाहाहा
परा धागा हॅक करायची मकीची सवय
गुरु-शिष्याची जुगलबंदि मस्त
अवलिया मस्त आहे कविता अनि
+१
मुळ कविता आनि परांचे विडंबन
हेच म्हणतो
मस्त !
सुंदर ,सुरेख ,मस्त !!
वाहवा!
आई गं !
जियो...
बेष्ट