भीतीचं इंजेक्शन..!

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
14 Feb 2011 - 3:43 pm

माझ्या "स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा" या पुस्तकातून ..पण सुधारित आणि पुनर्लिखित..

....................

मी रात्री दोन वाजता भकास डोळ्यानी जागत बसलेला असतो..

छोटा बाळ बाजूला झोपलेला..बायको ही बिचारी शांतपणे डोळे मिटून पडलेली..

सुखात आहेत दोघं.. त्यांना काहीच कल्पना नाही..

हे मल्टिपल स्क्लेरॉसिसचं आत्ताच कळलंय... diagnose-me.com वरून..

हो मला मल्टिपल स्क्लेरॉसिस आहे..खूप दिवस डायग्नोसिस होत नव्हतं..आज झालं..wrongdiagnosis.com वर पण तेच कन्फर्म झालं..

सगळी लक्षणं जुळताहेत... साली एकजात सगळी..

पण मलाच का ?? ...आत्ता तर आयुष्य ज़रा सुखात सुरु झालं होतं..आईला सहन होईल ?? तिला किती आनंदात ठेवायचं ठरवलं होतं..

इतक्यात कोणालाच सांगायला नको.. उद्या डॉक्टरना सांगून ब्रेनची एम आर आय करून घेतो..

ब्रेनची करताच आहात तर स्पाईनचीही करा म्हणून सांगतो....कधीकधी ब्रेनचा स्कॅन क्लिअर असतो आणि स्पाईनमधे स्क्लेरॉसिस लपलेला असतो..

एमआरआयमधे चिन्हं दिसतात..स्पॉट्स ..व्हाईट स्पॉट्स..

फॅमिली डॉक्टर म्हणून विश्वास ठेवून गेलो इतक्यांदा.. प्रत्येक वेळी मला काहीच झालं नाहीये असं समजावत राहिले.. त्यांना काय पडलीय ??

इतके दिवस त्यांनी माझ्या सगळ्या शंका उडवून लावल्या.. छे..मीच न्यूरॉलॉजिस्टकडे जायला हवं होतं.. नुसत्या M.B.B.S. ला का दाखवत राहिलो.. ??

चारपाच दिवसांपूर्वी आंघोळ करताना माझ्या मानेत एकदम एक गाठ हाताला लागली. छोटीच आहे..उद्या चेकअपमधे तीही दाखवून टाकतो.. छोटीच आहे..सुरुवात्..स्लो ग्रोईंग ट्यूमर कॉमन असतात लिम्फोमामधे..

आणि देवानं माझे दिवस ठरवूनच टाकले असतील तर मग हा लिम्फोमाच असेल..खात्री आहे तेवढी माझ्या गांडू नशिबाविषयी. लिम्फोमाही मेंदूत पसरू शकतो आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सारखी वाटणारी लक्षणं दाखवू शकतो..

दोन्हीतलं नक्की काय आहे ते एम आर आय आणि बायोप्सीशिवाय कळणार नाही. पण काहीही असलं तरी मी संपलो.

चला.. चालू झालं म्हणता म्हणता संपलं सुद्धा आयुष्य..!!

......

शेवटी मला झालेल्या रोगाचं डायग्नोसिस काय तर:"Cyberchondriasis"

"मेडिकल स्टुडंट सिन्ड्रोम" किंवा "फर्स्ट इयर सिन्ड्रोम" या नावानं मेडिकलच्या विद्यार्थ्यांमधे आधीपासून माहीत असलेला रोग..शिकत असताना भयंकर रोगांविषयी वाचून ती सर्व लक्षणं आपल्यात असल्याची खात्री होणं हे मुख्य लक्षण...

सर्वसामान्य लोकांमधेही खूप जणांना छळणारा हा खराखुरा "रोग" असलेला सिन्ड्रोम..

साधारण खाली दिलेल्या प्रकारचा काहीतरी मजकूर वाचून या भयगण्डाची सुरुवात होते..

"तुमच्या पोटात (सौम्य) वेदना होतात का?
जेवण झाल्यावर तुम्हाला छातीत जड़ वाटतं का?
कधीकधी श्वास घ्यायला त्रास होतो ?? (Shortness of breath)
आजच आपल्या डॉक्टरना भेटा..

ही कॅन्सरची लक्षणं असू शकतात.."

इंटरनेटमुळे आता हे भीतीचं इंजेक्शन घरबसल्या घेण्याची फास्ट सोय झाली आहे..
मग काय ?? करा गूगलिंग..

मग साधे रोग दिसतच नाहीत सायबरकॉन्ड्रिअ‍ॅक नजरेला..एकदम जिवावरच उठतो आपण स्वतःच्या..

त्वचेवर लाल ठिपके दिसतात?
दात घासताना रक्त येतं?
अशक्तपणा..लॅक ऑफ एनर्जी..?.. फटिग..?
किंचित फिवरिश फीलिंग? अचानक घाम येणं ?

ल्यूकेमिया ...लवकर डिटेक्ट न होणार्‍या स्लो प्रोग्रेसिंग रक्ताच्या कॅन्सरचा प्रकार..

झालस्तर Amyotrophical Lateral Sclerosis (ALS) किंवा मोटर न्युरॉन डिसीज . हा तर जबरा प्रोग्रेसिव्ह आणि नक्की प्राणघातक.

डोळा फडफडतो ?? विशेषत: वरचेवर एकच डोळा ?
किंवा पायाच्या पोटरीत फ़ड्फ़ड होत रहाते ??
कंप्यूटर चा कीबोर्ड दाबताना एखाद्या बोटाने नीट दाबला जात नाही?

ALSची सुरुवात अशीच होते. मग एकेक हात, पाय, सर्व स्नायू आणि शेवटी गिळण्याचे आणि श्वास घेण्याचे स्नायू बंद होऊन....

गंमत म्हणजे रोग जितका अधिक प्राणघातक आणि भयंकर तितकं त्या रोगाचं ऑब्सेशन जास्त. म्हणजे डायरिया असेल अशी भीती नाही..पण आतड्याचा कॅन्सर असेल ही मात्र लगेच..

हे सर्व रोग प्राणघातक आहेत..जीव नक्कीच घेणार..हे रोग झालेल्या खूप खूप (म्हणजे मेजॉरिटी) केसेस मधे डॉक्टरला लवकर निदान झालेलंच नसतं असं इंटरनेटवरच्या फोरम्समधे कळतं..

आपले फॅमिली डॉक्टर ही त्यातलेच...असं विचारकुंथन सुरु होतं...आपण आपली लक्षणं तिथे लिहीतो. मग कोणीतरी मेंबर येऊन रिप्लाय टाकतो.."माझा ल्युकेमिया गेल्याच वर्षी डायग्नोस झाला. मी आता अमुक केमोथेरपी घेतो. माझीही लक्षणं अशीच होती..तुझ्यासारखी. आय वुड सजेस्ट, यू डोन्ट वेट्..कन्सल्ट युअर डॉक्टर इमिजिएटली.."

की झालो आपण गर्भगळित..

मल्टिपल स्क्लेरॉसिस हा सायबरकाँड्रिअ‍ॅक लोकांचा सर्वात जास्त आवडता आजार. याची लक्षणं इतकी विस्कळीत आणि विविध आहेत की आपण त्यात अलगद फिट होऊन जातो. मल्टिपल स्क्लेरोसिसने हळूहळू अपंगत्व.. मग अन्प्रेडिक्टेबल कोर्स ऑफ डिसीज.. नेमका प्रोग्रेसिव्ह निघाला तर मृत्यु जवळच..

मल्टिपल स्क्लेरॉसिसच्या अनेक लक्षणांपैकी किमान काही आपल्याला झाली आहेत असं कोणीही कबूल करेल..

ही पहा त्यातली काही लक्षणं..यातलं एखादं जरी तुम्हाला होत असलं तरी डॉक्टर ला दाखवणं जरूरी आहे असं वेबसाइट्सवर लिहिलेलं असतं..

-उभं राहिल्यावर किंवा चालताना अस्थिर वाटतं? (Balance problem)
-त्वचेवर हुळहुळल्यासारखं वरचेवर वाटतं??
-हातात किंवा पायात मुंग्या येतात ? (Numbness in extremities?)
-कधीकधी जीभ जड़ वाटते?
-Partial numbness, tingling, buzzing and vibration sensations
- Pain without apparent cause, burning, itching and electrical shock sensations
- Electric shocks and buzzing sensations when moving head
- Loss of awareness of location of body parts
- Facial pain
- Shaking when performing fine movements
- Nausea/vomiting/sensitivity to travel sickness from vestibular ataxia
- Loss of ability to produce rapidly alternating movements, for example to move to a rhythm

मग..आहे ना तुम्हाला मल्टिपल स्क्लेरोसिस??

..जा न्यूरोलोजिस्ट्कडे लवकर..MRI करा..Contrast डाय इन्जेक्ट करून MRI..

किंवा अजून एक उपाय आहे..

गूगलिंग तात्काळ बंद करा.. आलं घालून मस्त चहा करून घ्या आणि त्यात मॉनॅको खारी बुडवून खा झकासपैकी..

टेन्शन क्यूं लेनेका..मोनॅको खानेका..

उगाच स्वहस्ते "भीतीचं इंजेक्शन" घेऊ नका..

मित्रांनो.. एकदा कुठेकुठे लागलेली एका मोठ्या ब्रँडेड हॉस्पिटलची अ‍ॅड-कँपेन पाहिली.. त्यात खूप खूप पोस्टर्स लावून कोणत्या लक्षणांमागे कुठला कुठला कॅन्सर दबा धरून बसलेला असू शकतो हे लिहिलं होतं..

मग लिहिल्याशिवाय रहावलं नाही..

औषधोपचारसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

गोगोल's picture

14 Feb 2011 - 3:52 pm | गोगोल

इंजेक्शनची भीती वाटत आली आहे. त्यामुळे मी हे इंजेक्शन घ्यायची शक्यता अगदी कमीच :)
सुंदर लेख. मला तुमच्या पुस्तकाचे मुखप्रुष्ठ फार आवडले. तुम्ही डिझाईन केलय का?

मृत्युन्जय's picture

14 Feb 2011 - 4:40 pm | मृत्युन्जय

लगेच जाउन मॉनेकोचा पुडा घेउन येतो. :)

मुलूखावेगळी's picture

14 Feb 2011 - 4:40 pm | मुलूखावेगळी

फारच वैद्यकीय माहितीपुर्ण लिहिलेत. खरंच काही लोक असेच असतात. बागुलबुवाच्या छायेत राहनारी.
मला डोळा फडफडने आनि विशेषत: वरचेवर एकच डोळा आणि महिन्यातुन १दा ताप येतोच पण मी कधी लक्षच देत नाही.

स्वाती२'s picture

14 Feb 2011 - 5:10 pm | स्वाती२

आवडले.

गविसाहेबा, लई भारी लिहिलंय तुम्ही, मला पण असं झालं होतं २००६ मध्ये माझ्या साहेबाच आजारपण बघुन, त्याला रुबित घेउन गेले होते, मग मला पण वाटलं की मोठं व्हायचं म्हणजे असं काहीतरी व्हायला पाहिजेल आपल्याला पण.

तुम्हाला भेटायचा योग लवकरच जुळवुन आणावा लागेल मला.

हर्षद.

मी जालावर तर आजारपणाचं काहीच बघायला जात नाही.
सारख्या लक्षणांचे अनेक आजार असतात.
त्यांची नावेही बोजड असतात.
आपल्याला नक्की काय झालय हे समजत नाही आणि उगीच काळजी.
आजारपणावरचं काहीबाही नको असताना वाचनात येऊन मी एकदा अशीच डॉ. कडे गेल्यावर त्यांनी मला हाकलून लावलं
"काही झालेलं नाही, मी कोणतंही औषध देणार नाही. साधा आहार, नियमीत व्यायाम घ्या" एवढं ऐकायला $२० दिल्याने नंतर स्वत:च्या वेडेपणाविषयी खात्री पटली.;)

गोगोल's picture

15 Feb 2011 - 5:53 am | गोगोल

चांगला डॉक्टर दिस्तोय. नाहीतर अमेरिकेत लुटालुटीची संधी सोडत नाहीत असे ऐकून आहे.

साहेब, तो को पे आहे.;)
बाकिचे इंश्योरन्स कं. बघून घेते.;)

महेश काळे's picture

14 Feb 2011 - 8:09 pm | महेश काळे

मनापासुन आभार..

मराठे's picture

14 Feb 2011 - 11:24 pm | मराठे

>> विचारकुंथन
शब्द थेट काळजाला भिडला ! =))

वेदनयन's picture

15 Feb 2011 - 3:01 am | वेदनयन

शब्दा-शब्दाला सहमत. पण कधी आचरणात आणू ते देवच जाणे. गुगल कधी-कधी लैच टरकावतो.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2011 - 3:44 am | पिवळा डांबिस

टिपिकल मेडिकल स्टुडंट सिन्ड्रोम चितारलाय!
फनी!!
:)

विनायक बेलापुरे's picture

15 Feb 2011 - 3:47 am | विनायक बेलापुरे

माझ्या लहानपणी डॉक्टरकडे तोंडावर बोट ठेवून गप्प बसवणार्या नर्सचे पोस्टर लावलेले असायचे आणि त्याच्या खाली "तुम्ही स्वतःच स्वतःचा डॉक्टर बनू नका " अशी धमकीवजा सूचना दिलेली असायची.

मॉनेको नेहमीच जवळ बाळगतो , कधी चहा बरोबर लागेल सांगता येत नाही.

मी ८-९ वर्षाची असताना आमच्या बाजूला एक कुटुंब राहायचे...मुलं कॉन्व्हेंटात शिकायची...माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी लहान असेल ...जरा डोकं दुखलं कि त्याचं सुरु व्हायचं " बाबा मला मॅनेन्जॉयटीस झालंय का?..", अनेक रोगांची नावं मला त्याच्यामुळेच माहिती झाली...
बाकी लेख आवडला...घरचे मला बेरड म्हणतात...असो.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2011 - 4:58 am | पिवळा डांबिस

घरचे मला बेरड म्हणतात...असो.
अरेच्या! म्हणजे तुमच्या आयडीतला ब हा त्यासाठी आहे होय?:)
(कृ. ह. घ्या)

तसेही समजा..
मी कित्ती कित्ती घाबरुन घाबरुन राहते हे सगळे जाणतातच...उगाच घरचे लोक माझ्या मनात गैरसमज पसरवतात...

धनंजय's picture

15 Feb 2011 - 5:17 am | धनंजय

गमतीदार आणि गंभीर

राजेश घासकडवी's picture

15 Feb 2011 - 8:33 am | राजेश घासकडवी

नोसिबो इफेक्ट आठवला.

मदनबाण's picture

15 Feb 2011 - 9:31 am | मदनबाण

मस्त हलका-फुलका लेख...

(लव्हेरिया ग्रस्त...;) )

खूप छान लेख ...

अज्ञानात सुख असतं म्हणतात, किंवा मग संपूर्ण ज्ञान असलेलं चांगलं ..
ही मधली स्थिती फार वाईट .

मी पण अनुभवलीय .. मला एम. आर. आय. करायला सांगितलं तेव्हा मी सुद्धा खूप घाबरले ..
नीट माहिती अशी काहीच नव्हती , सगळी ऐकीव..
मग गुगल केले ... त्या वेळी मला होत असलेल्या त्रासाची लक्षणे आणि काही मोट्ठ्या आजारांची लक्षणे सारखी दिसली ..
आणि मग तर फारच वाईट अवस्था...
मग अ‍ॅक्च्युअल स्कॅन रिपोर्ट कळे पर्यंत प्रचंड अस्वस्थता ..

आता ठरवलं आहे , रोज एक सफरचंद खायचे .. आणि त्याचा उपयोग झाला नाहीच तर गुगलला काहीही न विचारता, डॉक्टर वर भरवसा ठेवायचा .

चिगो's picture

15 Feb 2011 - 10:40 am | चिगो

गवि, मस्तच लेख.. आवडेश...

आजानुकर्ण's picture

15 Feb 2011 - 10:50 am | आजानुकर्ण

मस्त लेख

गणेशा's picture

15 Feb 2011 - 8:47 pm | गणेशा

छान .. आम्हीही मस्त चहा बिस्कीटे खात बसतो ...
पण जास्त निष्काळजी पण नसले पाहिजे असे वाटते.. पण फक्त वाटतेच.

लेख छान

गुंडोपंत's picture

16 Feb 2011 - 7:10 am | गुंडोपंत

हं! असे होते खरे!
आमच्या ज्योतिषातही नवीन शिकणार्‍यांचे असे होते.
'हाच योग माझ्याही पत्रिकेत आहे. आता माझे कसे होणार?' असे विचार छळू लागतात. मग त्याचे नक्षत्र, ग्रहयोग, शत्रू मित्र आदी पाहिल्यावर कुठे शांत होतात.
:)