स्त्रिया सुद्धा गैरफायदा घेतातच

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
8 Feb 2011 - 4:08 pm

अजाणत्या वयात मी एका मुलीच्या प्रेमजालात फसलो. तिला हव्या त्या ऑडिओ कॅसेट आणून देणं, तिच्यासाठी लेडीज रूमाल, बिंदाया, टिकल्या, मेकअप बॉक्स खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला. परंतु जेव्हा ती मी दिलेली फेअरनेस क्रिम लावून दुसऱ्याच महाभागाला भेटायला गेली तेव्हाच तिचा माझा संबंध (जो कधी नव्हताच) संपला.
*
किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या. माझ्यासाठी त्यांनी अगोदरच पान दुमडलेलं असायचं. ते वाचतांना अंगभर शिरशिरी येई. ठराविक पॅरेग्राफ वाचत असतांना त्या जवळ येत. अगदी चिकटून बसत, त्यांचे डोळे वेगळेच भासत. त्या माझ्या पँटवरून हात फिरवू लागल्या की मला कसंसच होई आणि मी विनाविलंब धूम ठोकीत असे. त्यांचे ते अधाशी स्पर्श, डोळ्यांतील आसक्तीयुक्त भाव घाबरवून टाकीत. काही दिवस मी त्यांना टाळायचो. पुन्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी असाच प्रसंग घडे. एकदा तर त्यांनी मला गच्च पकडून ठेवलं, मी ओरडू लागलो. एक फटका मारून त्यांनी मला हाकलून दिलं. त्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे गेलो नाही.
*
त्यानंतरची काही वर्षे मी खूपच तटस्थपणे काढली. त्यानंतर जरा मोकळेपणा आल्याने मला अनेक मैत्रिणी लाभल्या.
बिंदू नावाच्या मैत्रिणीला मी रोज गुलाबाचे फूल(विकत आणून) द्यायचो. त्याची तिला काडीचिही किंमत वाटत नसे. ती म्हणायची, 'एंदान पुआ कोडतु?' म्हणजे नुसती फुलंच काय देतोस? याअर्थी. तिने मला मल्याळी बोली शिकवली खरी पण त्याबदल्यात मराठी शिकायचं नाव काढलं नाही. मलाच तिच्याशी तोडकं मोडकं मल्याळी बोलावं लागे. मग एखाद्या शब्दाच्या अलग उच्चारामुळे भलताच अर्थ निघायचा. त्यावेळी ती पोटभरून हसत रहायची, मी मात्र कसनुसं तोंड करायचो!
माझ्या बाईकवर मागे बसून मस्तपैकी रायडीँग करायला ती एका पायावर तयार असे. मग ती म्हणेल त्या हॉटेलात तिला खाऊ घालावं लागे. आम्ही पवना डॅम, लोणावळा वगैरे फिरलो... माझ्या खिशाला चाट बसली पण बिचारीनं मला गुंजभरही हात लावू दिला नाही! अखेर खिसाच फाटल्याचं ध्यानात आल्यावर (तिच्याही अन् माझ्याही!) आमचंही फाटलंच..
*
माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मला गोड गोड बोलून कामाला लावायच्या. त्यांना प्रॅक्टीकल जर्नल मध्ये आकृत्या काढून देणं तर नित्याची बाब होती. नवा पिक्चर लागला की अॅडव्हान्स बुकिंगचं काम माझ्याकडेच येई. मग मध्यंतराच्या वेळात वडापाव-चहा आणून देणं अशी सेल्फ सर्व्हिस ओघाने करावीच लागे. इतर मित्र माझ्यावर जळायचे, मला गोपीकांचा कान्हा म्हणून चिडवायचे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्या गोपिका माझ्याभोवती फक्त फेर धरायच्या, दांडिया खेळायला त्यांचे त्यांचे कन्हैये मौजूद होते, हे त्या मित्रांना काय ठावूक? एकप्रकारे कपडे सांभाळायचं कामच माझ्याकडे आलं होतं. मैत्रिणीँच्या गराड्यात आख्खी कॉलेजलाईफ गेली परंतु त्यातील एकही पोट्टी माझी वाईफ बनायला तयार नव्हती. माझ्या स्त्रीदाक्षिण्याचा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फायदाच करून घेतला. इतकेच नाही तर त्यांच्यासाठी वरसंशोधनाच्या कामी माझे नाव त्यांच्या पिताश्रीँना सांगून मलाच नवरे शोधायला पिटाळलं! हे म्हणजे भलतंच अन् भयंकरही. माझ्यालेखी त्यांचं असं वागणं म्हणजे जखमेवर मिरचीचा ठेचा थापण्याचं काम असल्याने मी त्यांच्यापासून फटकून जगू लागलो. ही सल आजमितीला जेव्हा मी त्यांना सांगतो, तेव्हा त्या सगळ्याजणी म्हणतात, 'त्याचवेळी का नाही बोललास? मी लगेच तुला वरमाला घातली असती!' पुलाखालून पाणी वाहून गेल्यावर पूर पहायला जाण्यात काय अर्थय?
*
माझ्या नावडत्या राणीला मी (मनात नसतांनाही) अंगभर सोनं केलं, तेव्हा आवडतीला सवतीमत्सराचा किडा चावला. 'तिला इतकं देतोस, मग मला का नाही?' असं ती प्रत्येक भेटवस्तू स्विकारतांना म्हणतेच. नावडतीच्या दिमतीला नोकर चाकर, स्वैपाक-धुणंभांड्याला बाई. काहीही कमी नसतांना तिनं माझ्यावरचं प्रेम कमी का करावं? हे न उलगडलेलं कोडं. म्हणून कदाचित ती नावडती ठरली.
तिच्याउलट आवडतीनं भरभरून (शारीर) प्रेम केलं, दिलंही. नो डाऊट, पण माझं 'क्षेम' मात्र कधी पुसलं नाही. का बरे? हाही एक अनुत्तरीत प्रश्न.
नावडतीच्या अपरोक्ष, लपवून, चुकवून मी कितीतरी अमूल्य वस्तू आवडतीला नेऊन दिल्या. परंतु त्याबदल्यात तिच्याकडून ना तेल मिळालं ना तूप! आजही माझं धुपाटणंच बनलं आहे. ब्रँडेड रिस्टवॉच, डायमंड रिंग, मोठ्या रिसॉर्टमध्ये तिच्या बड्डेचं सेलिब्रेशन इ. इ. खर्चिक गोष्टी आमलांत आणूनही तिचा हात उताणा तो उताणाच!
*
मग आता मला प्रश्न पडतो की, इतक्या स्त्रियांनी माझा गैरफायदाच घेतला नाही तर दुसरे काय?

("भिन्नावतरण" मधून..)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

8 Feb 2011 - 4:17 pm | विनायक प्रभू

ह्यात गैर काय?

Nile's picture

10 Feb 2011 - 2:11 am | Nile

किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या. माझ्यासाठी त्यांनी अगोदरच पान दुमडलेलं असायचं. ते वाचतांना अंगभर शिरशिरी येई. ठराविक पॅरेग्राफ वाचत असतांना त्या जवळ येत. अगदी चिकटून बसत, त्यांचे डोळे वेगळेच भासत. त्या माझ्या पँटवरून हात फिरवू लागल्या की मला कसंसच होई आणि मी विनाविलंब धूम ठोकीत असे. त्यांचे ते अधाशी स्पर्श, डोळ्यांतील आसक्तीयुक्त भाव घाबरवून टाकीत. काही दिवस मी त्यांना टाळायचो. पुन्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी असाच प्रसंग घडे. एकदा तर त्यांनी मला गच्च पकडून ठेवलं, मी ओरडू लागलो. एक फटका मारून त्यांनी मला हाकलून दिलं. त्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे गेलो नाही.

बाकी कथा अनेक ठिकाणी त्रोटक वाटली. प्रसंग अधिक खुलवुन सांगितले असतेत तर जास्त मजा आली असती. असो, पुढील वेळेस शुभेच्छा.

राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं देत होत्या , तुम्हीच घेतलं नाही .. तरी त्यांनी तुमचा गैरफायदा कसा घेतला ?

बाकी पपलु पोरांना पोरी टोपी लावतातंच .. स्वार्थी जग .. स्वतः किती वापरलं जायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं :) तुम्ही (न भेटलेल्या) गाजराच्या अपेक्षेणे धावत होतात . बाकी लेख छाण विणोदी आहे ... काही काही प्रसंग अजुन खुलवता आले असते तर मज्जा आली असती .

क्रमश: कुठे दिसत नाही ते :)

- (कॉलेज जिवणापर्यंत कोण्त्याच पोरीला साधं फुकाचं चॉकलेट पण खाऊ न घातलेला ) प्रा.डॉ. भामटे

परिकथेतील राजकुमार's picture

8 Feb 2011 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्ही (न भेटलेल्या) गाजराच्या अपेक्षेणे धावत होतात .

हेच बोल्तो !

तुमच्या डोळ्यातली वासना लगेच दिसत असेल हो ;) म्हणुन आपले काम झाले की तुमचा बाजार उठवत असतील.

बाकी गेल्या २/३ महिन्यात इतर कोणाच्या लेखनावर साधी एकोळी प्रतिक्रीया न देता फक्त स्वतःचेच लेखन मिपावर आदळुन तुम्हीपण मिपाचा गैरफायदा घेतच आहात की :)

पर्नल नेने मराठे's picture

8 Feb 2011 - 4:44 pm | पर्नल नेने मराठे

परा मेल्या किती लक्श्य ह्या दागदरावर ;)

अवांतर : पराच एव्ढे लक्श म्हणजे हा डु आयडी तर नाहि ना? :)

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 10:21 am | llपुण्याचे पेशवेll

पराला डुआयडी म्हटल्याबद्दल चुचुचा निषेढ.

धनंजय's picture

10 Feb 2011 - 12:35 am | धनंजय

तुम्ही (न भेटलेल्या) गाजराच्या पुंगीच्या अपेक्षेणे धावत होतात .

गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली!

टारझन's picture

10 Feb 2011 - 1:01 am | टारझन

ही पुंगी तुमची आहे , माझी नाही ... माझ्या प्रतिसादात पुंगी नाही हो ;)

धनंजय's picture

10 Feb 2011 - 1:20 am | धनंजय

मीच घुसडली. वशीकरणासाठी पुंगी वाजवता येईल.

खुलाश्याबद्दल धन्यवाद धनंजय . कारण माझी पुंगी तर माझ्या कडे आहे ,... मग नक्की वाजली कोणाची ? म्हणुन संभ्रमात होतो :)

डॉ. दिवटे यांच्या अनुभवी मित्राची पुंगी कधी वाजली कधी वाजली नाही. राजश्री मॅडमची वाजली नाही.

एकुलता एक डॉन's picture

12 Apr 2014 - 9:55 pm | एकुलता एक डॉन

मॅडमची वाजली नाही.

कशा वरुन?

कानडाऊ योगेशु's picture

8 Feb 2011 - 5:31 pm | कानडाऊ योगेशु

+१
टारूशी सहमत.
राजश्री मॅडम जी गोष्ट तुम्हाला देणार होत्या त्याच्या कल्पनेनेच तुम्हाला घाम फुटला आणि त्याच गोष्टीसाठी तुम्ही इतर स्त्रियांच्या आजुबाजुला गोंडा घोळु लागला.रा.मॅ प्रकरणातुनच धडा घेतला असता तर तुमची तुमच्याचा कडुन इतकी फसवणुक तरी झाली नसती हो!

पर्नल नेने मराठे's picture

8 Feb 2011 - 4:19 pm | पर्नल नेने मराठे

*त्यांना प्रॅक्टीकल जर्नल मध्ये आकृत्या काढून देणं तर नित्याची बाब होती

हि कामे मी पण करुन घेत असे..खोट कशाला बोलु ;)

आयला आमच्या कॉलेज मध्ये पोर नव्हती त्यामुळे स्वतःची जर्नल स्वतःच तयार करावी लागत.
:(

किचेन काकू आहेत. काका नाहीत हे कळलं. :)

मृत्युन्जय's picture

12 Nov 2011 - 1:36 pm | मृत्युन्जय

नक्की का?

ताई म्हणलात तरी चालेल. चालेल पेक्षा आनंदाने उद्या मारेल,नृत्य करेल,गाणीही म्हणेन( आवाज राणी मुखर्जीची आठवण करून देतो म्हणून काय झाल.? हर्षवायू देखील होईल!)

स्त्री काय पुरुष काय दोघेहि सारखेच ...संधि न मिळाल्या मुळे सभ्य तर समाजात बरेच असतिल

प्रकाश घाटपांडे's picture

8 Feb 2011 - 7:20 pm | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत आहे

माझीही शॅम्पेन's picture

8 Feb 2011 - 4:27 pm | माझीही शॅम्पेन

हे काच्या कै ! स्त्रियानि तुमचा नेहमी फायदा करून घेतला ही चुक त्यांची की तुमची ?

कुठलाही बलवान वर्ग कमजोर वर्गाच शोषण करू शकतो किवा गैरफायदा घेऊ शकतो त्यात लिंगभेद कसा काय आला बुवा ?

सविस्तर प्रतिक्रिया नंतर देतो

स्वैर परी's picture

8 Feb 2011 - 4:30 pm | स्वैर परी

त्या गोपिका माझ्याभोवती फक्त फेर धरायच्या, दांडिया खेळायला त्यांचे त्यांचे कन्हैये मौजूद होते

त्यांचं असं वागणं म्हणजे जखमेवर मिरचीचा ठेचा थापण्याचं काम असल्याने

ह. ह. पु. वा!
उत्तम लेख!
बाकी जर्नल च म्हणाल तर, आमच्या इथे परिस्थिती वेगळी होती. आम्ही मुली सरसकट आमच्या वर्गातल्या मुलांना मदत करायचो!
सो, मुली अगदीच काही गैरफायदा नाही घेत बरं का! ;) :)

मुलूखावेगळी's picture

8 Feb 2011 - 4:36 pm | मुलूखावेगळी

काय हो तुम्ही राजश्री आनि बिन्दु दोघीन्च्याही नावाने ओरडताय
तुम्हाला नक्की काय हवे होते मग?
आनि

गोपीकांचा कान्हा

ही पदवी मिळाली ते काय कमी आहे
ती मिळायला पन नशीब लागते.
काहीना तर ती तेवढं पण मिळत नाही
बसतात मग हात चोळत नाहीतर त्या मुलीच्या नावाने शंख करत

बसतात मग हात चोळत नाहीतर त्या मुलीच्या नावाने शंख करत

तुला बरं माहिती मुलं हात चोळत बसतात म्हणुन ? ह्यावरुन चुचु सारखीच शंका येते ,,, हा डु आय डी तर नाही ना ?

मुलूखावेगळी's picture

8 Feb 2011 - 5:00 pm | मुलूखावेगळी

शंकासुर आहात तुम्ही . :)
पन शंका चुचुला आहे का तुला?

मनराव's picture

8 Feb 2011 - 4:38 pm | मनराव

कैच्या कै.......
यात तुमचा फायदा कहिच नाही झाला म्हणुन गैरफायदा काय...... ??

नगरीनिरंजन's picture

8 Feb 2011 - 4:49 pm | नगरीनिरंजन

स्वतः ताकाला जाऊन भांडं लपवायचं आणि दुसर्‍याने लोणी खाऊन ताक संपवल्यावर बोंब मारायची तशातला प्रकार दिसतोय हा.

तिमा's picture

8 Feb 2011 - 5:15 pm | तिमा

हा लेख आहे की कथा ?

बाकी ह्यातल्या मतांशी पूर्णपणे असहमत. एकदा अनुभव आल्यावर पुन्हा तिथे जाणे ह्यातच काय ते आलं.

एकुलता एक डॉन's picture

10 Apr 2014 - 8:28 pm | एकुलता एक डॉन

एकदा अनुभव आल्यावर पुन्हा तिथे जाणे ह्यातच काय ते आलं.???????????????????????????

आत्मशून्य's picture

8 Feb 2011 - 5:19 pm | आत्मशून्य

कोणाची लाभो न लाभो आमची सहानूभुती आहे तुम्हाला. पण असे नीराश होवु नका पुन्हा जोमाने प्रयत्न करा, यश तुमच्या हातात. एक ना एक दीवस शीकारी आपोआप शीकर बनेल... असा धीर सोडु नका. जब है समाधान तो फीर क्यो हों परेशान हा मंत्र ध्यानात ठेवा, आयुश्य आहे चढ ऊतार हे येणारच. असे गडग्डून जाऊ नका.

तसेच एकंदर प्रतीक्रीयांचा रोख वाचून तूम्हाला ऊपरती झालीच असेल की थोडे नालायक आणी हरा*खो*र बनले म्हणजे असले लेख लीहाय्ची वेळ येत नाही ते ?

पूढील लेखनास मनापासून शूभेच्छा... असेच लेखन बहरुदे

मी विनाविलंब धूम ठोकीत असे

मी एक डायलॉग ऐकला होता...
"घर मे नै ज्वारी और अम्मा पुरिया पकारी"
जेव्हा तुमची इच्छा नाही मग कशाला तिकडे जायचं हो !!!!

माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मला गोड गोड बोलून कामाला लावायच्या.

यालाच नानांच्या भाषेत "गोबोगामा" असे म्हणतात !!!

पण माझं 'क्षेम' मात्र कधी पुसलं नाही. का बरे?

तिला जे हवे होते ते तिला मिळायचाच ना...
मग ते द्रव्य असो का प्रेम...
तुम्ही मग काशी का करना त्यासाठी?
आणी तुम्ही आवडतीचा गैर फायदा घेतला नही हे कशावरून ?

स्वाती२'s picture

8 Feb 2011 - 6:01 pm | स्वाती२

एक राजश्री मॅडमचा प्रसंग वगळता मला नाही वाटत तुमचा गैरफायदा घेतला गेला. तेव्हाही पहिल्यांदा असे काही घडल्यावर पुन्हा तिथे जाण्याचा चॉइस तुमचा होता. घडलेली गोष्ट खरे तर कुणा विश्वासातल्या व्यक्तीला सांगायला हवी होती.
खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला.
गैरफायदा कुठे आला?
माझ्या खिशाला चाट बसली पण बिचारीनं मला गुंजभरही हात लावू दिला नाही
तुम्ही गल्ली चुकला डॉक. पैसे मोजून या गोष्टी मिळवायची गल्ली वेगळी...
मैत्रिणीँच्या गराड्यात आख्खी कॉलेजलाईफ गेली परंतु त्यातील एकही पोट्टी माझी वाईफ बनायला तयार नव्हती.
पसंद अपनी अपनी!
आवडती आणि नावडती दोन्ही कडे तुम्हीच स्वतःहून जाताय , खर्च करताय मग तक्रार कसली ?

प्राजु's picture

9 Feb 2011 - 7:15 am | प्राजु

उत्तम प्रतिसाद स्वाती. :)

सूर्यपुत्र's picture

8 Feb 2011 - 6:20 pm | सूर्यपुत्र

माझ्या स्त्रीदाक्षिण्याचा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फायदाच करून घेतला.
आणि आपला फक्त फायदा करून घेतायेत असे लक्षात आल्यानंतर बाजूला झाल्यानंतर "हूंऽऽऽ.. फारच शिष्ट आहे, मेला" असा शेरा मारायला मोकळ्या...... :(

-सूर्यपुत्र.

धमाल मुलगा's picture

8 Feb 2011 - 6:37 pm | धमाल मुलगा

अशी मेख आहे. बाकी काही नाही. :)

नरेशकुमार's picture

8 Feb 2011 - 7:36 pm | नरेशकुमार

खुसखुशीत.

अप्पा जोगळेकर's picture

8 Feb 2011 - 8:18 pm | अप्पा जोगळेकर

कुठे राहतात या राजश्री मॅडम ते सांगाल का ?

प्यारे१'s picture

9 Feb 2011 - 10:04 am | प्यारे१

अप्पा,

मिसळपाव आहे हो हे.

शारिरीक वय १८ पाहिजे असे काही नाहीये इथे....!

वेताळ's picture

8 Feb 2011 - 8:21 pm | वेताळ

आता त्या चावट पुस्तके वाचत नसतील.

लेखन पटले नाही.
मैत्रिणी म्हणता तर फक्त चांगली मैत्री करा की!
असल्या अपेक्षा ठेवल्या कि मुलींना बरोबर काय ते समजते. काहीजणी लगेच लांब जातात तर काहीजणी धडा शिकवतात.
राजश्री बाईंकडे न जाणे हा पर्याय उपलब्ध होताच्.......तो लगेच अनुसरणे कदाचित तुमच्या वयामुळे जमले नसेल पण नंतर तिथून पळून आलात. त्यावेळी तुम्हीही असल्या गोष्टींसाठी तयार नव्हता असाच अर्थ होतो.
काही गोष्टींच्या अपेक्षेनं तुम्ही मुलींशी मैत्री करू पहात होता तो स्वार्थ नव्हता काय? अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून त्यावर लेख लिहून कांगावा करत असल्यासारखे वाटते.

शिल्पा ब's picture

9 Feb 2011 - 5:14 am | शिल्पा ब

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही रोचक...

गोगोल's picture

9 Feb 2011 - 5:25 am | गोगोल

केवळ वेगवेगळे जिवनाभुनव म्हणून या लेखकडे पहिले आणि फार आवडला.
माझ्या मते डॉक काही खरीखुरी तक्रार करत नाहीयेत. ही एक जस्ट लाडीक आणि डॉक ना हविहवीशी वाटणारी गैरसोय असावी.

जे.पी.मॉर्गन's picture

11 Nov 2011 - 6:07 pm | जे.पी.मॉर्गन

>>केवळ वेगवेगळे जिवनाभुनव म्हणून या लेखकडे पहिले आणि फार आवडला.<<

+१ - पटेश ! लेखाकडेच नाही तर प्रतिक्रियांकडेदेखील ह्या नजरेने पाहिले आणि काही वेळ खूप करमणूक झाली.

लेख आवडला !

जे पी

जे.पी.मॉर्गन's picture

11 Nov 2011 - 6:07 pm | जे.पी.मॉर्गन

>>केवळ वेगवेगळे जिवनाभुनव म्हणून या लेखकडे पहिले आणि फार आवडला.<<

+१ - पटेश ! लेखाकडेच नाही तर प्रतिक्रियांकडेदेखील ह्या नजरेने पाहिले आणि काही वेळ खूप करमणूक झाली.

लेख आवडला !

जे पी

डॉ.श्रीराम दिवटे's picture

9 Feb 2011 - 5:58 am | डॉ.श्रीराम दिवटे

मित्रांनो हा माझा वैयक्तिक अनुभव नाहीये. एका मित्राची मुलाखत घेतली होती. तिचा सारांश आहे. भिन्नावतरण हे मीमराठी वर टाकलेले ई-बुक त्याचाच परिपाक आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 8:39 am | llपुण्याचे पेशवेll

सदर लेखातलं पात्रं हे केवळ भिडणं, कटवणं, फिरवणं,चंद्र दाखवणं, सोडून देणं या कॅटेगरीतलं वाटतं आहे. (या सर्व क्रियापदांच श्रेय श्री सूहास) त्यामुळे सदर पात्रं स्वतःचा फायदा करून घेण्याइतकं तयार नव्हतं हे खरं वाटतं आहे.
बाकी प्रेम बीम खरोखर असतं तर प्रेमळ सक्ती वगैरे करता येते असं जाणकार सांगतात.

शिल्पा ब's picture

9 Feb 2011 - 9:06 am | शिल्पा ब

प्रेमळ सक्ती म्हणजे काय?

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 10:19 am | llपुण्याचे पेशवेll

खूप प्रयत्न करूनही शुचितैंची कविता सापडली नाही. आहे मिपावरच कुठेतरी.

कवितेच्या वेळी स्वसंपादन होतं का ? असेल तर मग उडली असेल कवीता :)

-(प्रेमळ) || पुण्याचे हायवे ||

शिल्पा ब's picture

9 Feb 2011 - 12:16 pm | शिल्पा ब

आजकाल लेख, कविता वगैरे चोरी होतात म्हणून लोकांचे वाचून झाले कि लग्गेच काढून टाकायचे हि संकल्पना योग्य आहे याविषयी आपले अमुल्य मत काय आहे ?

एकुलता एक डॉन's picture

9 Apr 2014 - 12:57 pm | एकुलता एक डॉन

नेमके काय काढुन टाकायचे?

शैलेन्द्र's picture

9 Apr 2014 - 7:26 pm | शैलेन्द्र

खोदावं, खणावं पण किती जुनं ?

अरुण मनोहर's picture

9 Feb 2011 - 8:58 am | अरुण मनोहर

कैच्या कै.

ज्ञानेश...'s picture

9 Feb 2011 - 9:13 am | ज्ञानेश...

कॉलिंग युयुत्सु...

महेश-मया's picture

9 Feb 2011 - 10:19 am | महेश-मया

आपल्या दु:खात आम्ही पण सामिल आहोत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Feb 2011 - 10:23 am | निनाद मुक्काम प...

संभोगाव्यातिरिक्त प्रणय क्रीडा करण्याचे वय भारतात १२ वर्ष असावेत अशी सूचना आपल्या सरकारच्या एका खात्याने सरकारला केली आहे .
असा कायदा एकदा का झाला कि तुमच्या मित्राच्या मुलाला किंवा नातवाला अशी मुलाखत द्यावी लागणार नाही .
बाकी हि मित्राची मुलाखत होती .स्वानुभव नव्हता हे मूळ लेखात स्पष्ट केले असते तर खोचक प्रतीकीयांना सामोरे जावे नसते .
कदाचित अश्या प्रतिक्रिया तुम्हाला अपेक्षित होत्या .(हव्या होत्या )
कोण कोणाचा फायदा घेते ? ह्यावरून मुलं व मुलींमध्ये खडाजंगी व्हावी असे तुम्हाला वाटले असेल .

कपड्यांच्या आत सगळेच नागडे असतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 11:39 am | llपुण्याचे पेशवेll

तरीपण सगळेच कपडे घालून फिरतात. :(

अवलिया's picture

9 Feb 2011 - 11:41 am | अवलिया

कारण तशी पद्धत आहे. तिकडे परदेशात काही स्पेशल जागा आहेत असे ऐकले होते.

टारझन's picture

9 Feb 2011 - 11:44 am | टारझन

णिणाद काका मुक्काम पोष्ट पर्भणी ह्यांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक :)

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 11:46 am | llपुण्याचे पेशवेll

तिकडे परदेशात म्हणजे कुठे? आम्हाला तर मुंबईत आलं तरी इकडे परदेशात आल्यासारखं वाट्टं.

हल्ली तर आम्हाला घराबाहेर पडलं की परदेशात आल्यासारखं वाटतं.
कूणी मराठी बोलतच नाही.. हिन्दी, इंग्रजी, अन काय काय काय काय.....

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 12:02 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. दुर्दैवाने.
पण मग बाहेर आलं की दिवटे साहेबांसारखा चान्स मारून बघायचा ना! ;)

शिल्पा ब's picture

9 Feb 2011 - 12:09 pm | शिल्पा ब

चान्स त्यांनी मारला नसुन मित्राने मारला असं त्यांचं म्हणणं आहे..

पेशव्यांना बहुतेक "कृती " (पक्षी : चान्स मारणे) अपेक्षित असावी. "कर्ता" ( दिवटे किंवा दिवटेमित्र) येथे गौण आहे. चान्स मारणे महत्वाचे आहे. ..

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 12:19 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. टारूभौंनी योग्य जाणले आहे.

आजकाल पुपे आणि टार्‍याची युती झालिये वाटतं.;)

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 9:15 pm | llपुण्याचे पेशवेll

नाही हो... त्याला जाणकार WPTA म्हणतात. ;)

स्वत:चं कित्ती कौतुक गं बाई!;)

टारझन's picture

10 Feb 2011 - 10:47 am | टारझन

स्वत:चं कौटू़क करण्याची परंपरा असलेल्या ह्या अखिल अंतरजालिय मराठी संस्थळिय महासागरातले आम्ही दोन षार्कमाषे आहोत .. :) बाकी मग झुंडाने फिरणार्‍या माष्यांपेक्षा काहीतरी वेगळं णको का द्यायला :)

बाकी कच्ची कैरी आणि पियुषा ह्या दोन सुंदरींशी सहमत :)

-

शाहरुख's picture

9 Feb 2011 - 9:31 pm | शाहरुख

धागा गमतीने लिहिला असेल कदाचित पण विषय वाचून एक अनुभव आठवला.

मध्यंतरी भारतीय रेल्वेने प्रवास करायचा योग आला..ई-तिकीट कन्फर्म न झाल्याने ते रद्द झाले होते..सोबतची २ तिकीटं कन्फर्म होती, त्यामुळे बर्थ अ‍ॅडजस्ट करायचे ठरले..वेळेआधी २ तास स्टेशनवर पोहचुन रांगेत थांबलो..प्रचंड गर्दी होती.एक रेल्वेचा शिपाई रांगेत न उभारता इकडेतिकडे फिरणार्‍यांना सरळ हातातल्या दांडक्याने हाणत होता..ती गंमत बघत मी नंबर कधी येईल याची वाट बघत शांतपणे उभा होतो...थोड्या वेळाने बहुतेक त्याची ड्युटी संपली आणि तो निघून गेला..लोकांचीही हळूहळू घुसाघुशी चालू झाली.रांग सरकत सरकत मी तिकीट-खिडकीच्या बराच जवळ आलो आणि तिकीट क्लार्कची पण ड्युटी बदलली :) . पण दुसरा ५ मिनिटात आला आणि परत रांग सरकू लागली.

माझ्यापुढं ३-४ जण असताना एक बाई आली. थोडा वेळ बाजुला उभी राहिली आणि मग रांगेत माझ्यापुढं घुसू लागली..मी चिडून बोललो तिला "आम्ही काय झक मारायला तासभर रांगेत थांबलोय काय..या मागून"..त्यावर ती म्हणाली (तिच्या तोंडचे शब्द) " इथं उभं राहू दे मला..नाहीतर तू दाबादाबी केलीस म्हणून बोंब मारीन मी" !!

मी त्या बाईला घाबरलो नाही तसा पण तिनं बोंब मारली असती तर तासभर त्या रांगेतल्या वातावरणात वैतागलेल्या लोकांचे फ्रस्ट्रेशन आपल्यावर निघालं तर काय घ्या असा विचार करुन तिला रांगेत घुसू दिले.

सदर घटनेची युयुत्सू यांनी आपल्या रजिष्टरात नोंद करुन घ्यावी अशी मी त्यांना विनंती करत आहे !!

तुमच्या मागे असणार्‍याचं आणि आजुबाजुच्या लोकांचं लक्ष असेलच नव्हे असतचं...तुम्ही आवाज चढवायचा...ती बाई मधेच घुसतेय म्हणुन...

टारझन's picture

9 Feb 2011 - 11:30 pm | टारझन

हा हा हा ... बाई णक्कीच विषिष्ठ सुविधा पुरवणारी असावी. ... अन्यथा जनरली बाई एवढ्या चटकन दाबादाबी पर्यंत पोचेल असे वाटत नाही :) अशा बायांच्या तोंडी ण लागलेलं उत्तम .. :)
शंका : एवढे सगळे फ्रस्ट्रेटेड असताना कोण लायनीत घुसतंय ह्याकडे फक्त तुमचंच लक्ष असणे , त्या बाईचा आवाज इतरांना न जाणे मात्र रोचक वाटुन गेले

>>त्या बाईचा आवाज इतरांना न जाणे मात्र रोचक वाटुन गेले<<

टार्‍या,
तुला खोचक म्हण्याच आहे का ??

शाहरुकने काहीही केलं असतं तर तिनं ते आनंदानं मिरवलं असतं

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Feb 2011 - 12:55 am | निनाद मुक्काम प...

लेखाच्या सुरवातीला मला ते रेड रोज (ह्या राजेश खन्ना व पूनम धिल्लो चा / सायकोची हिंदी आवृत्ती ) सिनेमाचे पूर्वपरीक्षण किंवा त्याच्या अनुषंगाने एखादी कथा वाटली .

केरळात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण लोकसंख्येमधे अधिक आहे

त्यामुळे इतर राज्यांमधे शोध सुरू असतो

प्रसाद गोडबोले's picture

9 Apr 2014 - 10:13 am | प्रसाद गोडबोले

लेख शोधुन काढुन वाचला ....

मिपावर असले महान साहित्य निर्माण होत होते तेव्हा आम्ही कुठे गेलो होत कडमडायला ...

आदूबाळ's picture

9 Apr 2014 - 4:20 pm | आदूबाळ

मिपावर असले महान साहित्य निर्माण होत होते तेव्हा आम्ही कुठे गेलो होत कडमडायला

अगदी अगदी!!

लेख तर भन्नाट आहेच, पण प्रतिक्रिया त्याहून महाण आहेत ;)

ते पूर्ण ईबुक आहे का कोणाकडे?

बॅटमॅन's picture

9 Apr 2014 - 5:49 pm | बॅटमॅन

ते पूर्ण ईबुक आहे का कोणाकडे?

असेच म्हणतो. जाणकारांनी प्रकाश पाडावा.

माझीही शॅम्पेन's picture

10 Apr 2014 - 10:06 am | माझीही शॅम्पेन

मिपावर असले महान साहित्य निर्माण होत होते तेव्हा आम्ही कुठे गेलो होत कडमडायला

अहो आठवून बघा ...
तेंव्हा तुम्ही गिरीजाअवतारात अस्तिवात असाल ना ..
कृ. ह. घ्या. हे वे. सा. न. ल. :)

असे धागे होते आणि आम्ही त्याची पीस पण काढायचो हे आठवून अम्मळ मौज वाटली :)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2014 - 10:39 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/love/butterfly-heart-smiley-emoticon.gif

एकुलता एक डॉन's picture

9 Apr 2014 - 11:01 am | एकुलता एक डॉन

चूक कि बरोबर ते सांगा .......??

मुलींच्या मागे फिरतो म्हणून आम्ही नाही वेडे कि खुळे..

मुलींच्या मागे फिरतो म्हणून आम्ही नाही वेडे कि खुळे..
...
... निसर्गाचा नियमचं आहे चुंबक तिकडे खिळे.

दिपक.कुवेत's picture

10 Apr 2014 - 5:33 pm | दिपक.कुवेत

काय चपखल स्मायली टाकली आहेस रे!!!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2014 - 3:12 pm | अत्रुप्त आत्मा

:D ... :D ... :D

निलरंजन's picture

9 Apr 2014 - 11:43 am | निलरंजन

माणूस ओळखणे ही एक कला आहे ती ज्यांना जमते त्यांचाच या जगात किंबहुना प्रेमाच्या खेळात यशस्वी होतात बाकीचे आयुष्य भर कुढत राहतात ....
आपण साधू नाही आहोत माहीतेय ना मग निदान संधीसाधू तरी बनाव माणसानं...
आणि ताकाला जाताय तर भांडे का लपवायचे.
मूड बघून दिल की बात बोलले असते तर अशी वेळच आली नसती

प्रमोद देर्देकर's picture

9 Apr 2014 - 11:53 am | प्रमोद देर्देकर

मिपावर असले महान साहित्य निर्माण होत होते तेव्हा आम्ही कुठे गेलो होत कडमडायला ...>>>
आयला प्र. गो. माझी तर ह.ह.पु. वा. हे वाचुन
खरचं सं.पा. मं. ने हा धागा अजुन ठेवलाच कसा आत्ता पर्यंत.

एकुलता एक डॉन's picture

9 Apr 2014 - 11:54 am | एकुलता एक डॉन

गुन्डा चित्र पटाचि आठ्वण आली

अनुप ढेरे's picture

9 Apr 2014 - 12:33 pm | अनुप ढेरे

लेखापेक्षा प्रतिक्रिया धन्य आहेत __/\__