स्त्रिया सुद्धा गैरफायदा घेतातच

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
8 Feb 2011 - 4:08 pm

अजाणत्या वयात मी एका मुलीच्या प्रेमजालात फसलो. तिला हव्या त्या ऑडिओ कॅसेट आणून देणं, तिच्यासाठी लेडीज रूमाल, बिंदाया, टिकल्या, मेकअप बॉक्स खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला. परंतु जेव्हा ती मी दिलेली फेअरनेस क्रिम लावून दुसऱ्याच महाभागाला भेटायला गेली तेव्हाच तिचा माझा संबंध (जो कधी नव्हताच) संपला.
*
किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या. माझ्यासाठी त्यांनी अगोदरच पान दुमडलेलं असायचं. ते वाचतांना अंगभर शिरशिरी येई. ठराविक पॅरेग्राफ वाचत असतांना त्या जवळ येत. अगदी चिकटून बसत, त्यांचे डोळे वेगळेच भासत. त्या माझ्या पँटवरून हात फिरवू लागल्या की मला कसंसच होई आणि मी विनाविलंब धूम ठोकीत असे. त्यांचे ते अधाशी स्पर्श, डोळ्यांतील आसक्तीयुक्त भाव घाबरवून टाकीत. काही दिवस मी त्यांना टाळायचो. पुन्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी असाच प्रसंग घडे. एकदा तर त्यांनी मला गच्च पकडून ठेवलं, मी ओरडू लागलो. एक फटका मारून त्यांनी मला हाकलून दिलं. त्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे गेलो नाही.
*
त्यानंतरची काही वर्षे मी खूपच तटस्थपणे काढली. त्यानंतर जरा मोकळेपणा आल्याने मला अनेक मैत्रिणी लाभल्या.
बिंदू नावाच्या मैत्रिणीला मी रोज गुलाबाचे फूल(विकत आणून) द्यायचो. त्याची तिला काडीचिही किंमत वाटत नसे. ती म्हणायची, 'एंदान पुआ कोडतु?' म्हणजे नुसती फुलंच काय देतोस? याअर्थी. तिने मला मल्याळी बोली शिकवली खरी पण त्याबदल्यात मराठी शिकायचं नाव काढलं नाही. मलाच तिच्याशी तोडकं मोडकं मल्याळी बोलावं लागे. मग एखाद्या शब्दाच्या अलग उच्चारामुळे भलताच अर्थ निघायचा. त्यावेळी ती पोटभरून हसत रहायची, मी मात्र कसनुसं तोंड करायचो!
माझ्या बाईकवर मागे बसून मस्तपैकी रायडीँग करायला ती एका पायावर तयार असे. मग ती म्हणेल त्या हॉटेलात तिला खाऊ घालावं लागे. आम्ही पवना डॅम, लोणावळा वगैरे फिरलो... माझ्या खिशाला चाट बसली पण बिचारीनं मला गुंजभरही हात लावू दिला नाही! अखेर खिसाच फाटल्याचं ध्यानात आल्यावर (तिच्याही अन् माझ्याही!) आमचंही फाटलंच..
*
माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मला गोड गोड बोलून कामाला लावायच्या. त्यांना प्रॅक्टीकल जर्नल मध्ये आकृत्या काढून देणं तर नित्याची बाब होती. नवा पिक्चर लागला की अॅडव्हान्स बुकिंगचं काम माझ्याकडेच येई. मग मध्यंतराच्या वेळात वडापाव-चहा आणून देणं अशी सेल्फ सर्व्हिस ओघाने करावीच लागे. इतर मित्र माझ्यावर जळायचे, मला गोपीकांचा कान्हा म्हणून चिडवायचे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्या गोपिका माझ्याभोवती फक्त फेर धरायच्या, दांडिया खेळायला त्यांचे त्यांचे कन्हैये मौजूद होते, हे त्या मित्रांना काय ठावूक? एकप्रकारे कपडे सांभाळायचं कामच माझ्याकडे आलं होतं. मैत्रिणीँच्या गराड्यात आख्खी कॉलेजलाईफ गेली परंतु त्यातील एकही पोट्टी माझी वाईफ बनायला तयार नव्हती. माझ्या स्त्रीदाक्षिण्याचा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फायदाच करून घेतला. इतकेच नाही तर त्यांच्यासाठी वरसंशोधनाच्या कामी माझे नाव त्यांच्या पिताश्रीँना सांगून मलाच नवरे शोधायला पिटाळलं! हे म्हणजे भलतंच अन् भयंकरही. माझ्यालेखी त्यांचं असं वागणं म्हणजे जखमेवर मिरचीचा ठेचा थापण्याचं काम असल्याने मी त्यांच्यापासून फटकून जगू लागलो. ही सल आजमितीला जेव्हा मी त्यांना सांगतो, तेव्हा त्या सगळ्याजणी म्हणतात, 'त्याचवेळी का नाही बोललास? मी लगेच तुला वरमाला घातली असती!' पुलाखालून पाणी वाहून गेल्यावर पूर पहायला जाण्यात काय अर्थय?
*
माझ्या नावडत्या राणीला मी (मनात नसतांनाही) अंगभर सोनं केलं, तेव्हा आवडतीला सवतीमत्सराचा किडा चावला. 'तिला इतकं देतोस, मग मला का नाही?' असं ती प्रत्येक भेटवस्तू स्विकारतांना म्हणतेच. नावडतीच्या दिमतीला नोकर चाकर, स्वैपाक-धुणंभांड्याला बाई. काहीही कमी नसतांना तिनं माझ्यावरचं प्रेम कमी का करावं? हे न उलगडलेलं कोडं. म्हणून कदाचित ती नावडती ठरली.
तिच्याउलट आवडतीनं भरभरून (शारीर) प्रेम केलं, दिलंही. नो डाऊट, पण माझं 'क्षेम' मात्र कधी पुसलं नाही. का बरे? हाही एक अनुत्तरीत प्रश्न.
नावडतीच्या अपरोक्ष, लपवून, चुकवून मी कितीतरी अमूल्य वस्तू आवडतीला नेऊन दिल्या. परंतु त्याबदल्यात तिच्याकडून ना तेल मिळालं ना तूप! आजही माझं धुपाटणंच बनलं आहे. ब्रँडेड रिस्टवॉच, डायमंड रिंग, मोठ्या रिसॉर्टमध्ये तिच्या बड्डेचं सेलिब्रेशन इ. इ. खर्चिक गोष्टी आमलांत आणूनही तिचा हात उताणा तो उताणाच!
*
मग आता मला प्रश्न पडतो की, इतक्या स्त्रियांनी माझा गैरफायदाच घेतला नाही तर दुसरे काय?

("भिन्नावतरण" मधून..)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

ब़जरबट्टू's picture

9 Apr 2014 - 12:49 pm | ब़जरबट्टू

राजश्री मॅडम सध्या ही दुनिया पितेळेची असे म्हणत फिरताहेत का हो ?? =))

एकुलता एक डॉन's picture

9 Apr 2014 - 12:55 pm | एकुलता एक डॉन

सन्दर्भ सान्गु शकाल?
बर्याच ठिकानी हि दुनिया चितळेचे असे पन आइकलेय

एकुलता एक डॉन's picture

9 Apr 2014 - 1:00 pm | एकुलता एक डॉन

ह्या देत होत्या तिकडे घेत्ले नाही मग बाकी कडे का शोधा शोध ????

दिपक.कुवेत's picture

10 Apr 2014 - 5:36 pm | दिपक.कुवेत

तेंव्हा "घेण्याचं" वय नसेल....म्हटलय ना किशोर अवस्था होती!

"दैव देते आणि कर्म नेते" असला प्रकार झाला हा सगळा... ;)

अवातंरः राजश्री मॅडम सध्या कुठे आणि काय करताहेत, काही कल्पना?

प्रसाद गोडबोले's picture

10 Apr 2014 - 1:26 am | प्रसाद गोडबोले

राजश्री मॅडम सध्या कुठे आणि काय करताहेत, काही कल्पना?

किति भाबडा प्रश्न विचारलाय ... खरंच पुरुशांसाठी एका स्वतंत्र ग्रुप ची नितांत आवश्यकता आहे मनातील भावना मोकळ्या करायला

एकुलता एक डॉन's picture

10 Apr 2014 - 12:53 am | एकुलता एक डॉन

मि थोबाड पुस्तका वर शोध घेतोय पण सापड्ल्या नाही

आशु जोग's picture

10 Apr 2014 - 8:33 am | आशु जोग

हे असलं लिखाण इथून हाकलून द्या...
मिपा शुद्ध करा

प्रमोद देर्देकर's picture

10 Apr 2014 - 9:22 am | प्रमोद देर्देकर

मी आगोदरच सांगितलं आहे पण संपा. मं. ऐकतच नाहीये. हे असलं लिखाण ने मि.पा आपली शान खराब करतयं
अनुमोदन आशुतै तुला हे हटवा वे या करता.

प्रसाद गोडबोले's picture

10 Apr 2014 - 11:09 am | प्रसाद गोडबोले

ह्या लेखनात काहीच गैर नाही .... असले प्रकार सर्रास घडतात आसपास ... अरे स्त्रिया सुध्दा माणसेच असतात तुमच्या आमच्या सारखी हाडामासाची ... त्यांनाही भाव भावना स्वार्थ मोह आसक्ती वगैरे असतेच ... प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुषाकडे काही पुत्रवत नजरेतुन पहात नाही ....

मी एकदा बस मधुन चाललो होतो , एक काका काकु शेजारी येवुन उभे राहिले , स्त्रीदाक्षिण्य(ब्रह्मेफेम) म्हणुन पटकन उठुन काकुंना बसायला जागा दिली , त्यानी ही कृतज्ञतेने स्माईल दिली .... आणि मग जेव्हा पुढच्या स्टॉपवर त्यांचा शेजारचा माणुस उठुन गेला तेव्हा लगेच काका त्या जागेवर बसले , साधं एका शब्दाने मला विचारलही नाही की "बाळा मगाशी तु जागा करुन दिलीस , तुला बसायचं असलं तर बैस "... मी आश्चर्यचकित होवुन उतरे पर्यंत दोघांकडे पहात राहिलो ... त्यांनी एकदाही ढुंकुनही पाहिले नाही माझ्याकडे ...
(तेव्हा गिरीजा मला म्हणाली होती , हे बघ स्त्रीयाही माणसेच असतात , त्यांनाही पहिल्यांदा स्वार्थच दिसतो ... म्हणुन तुच जरा लिमिटेड स्त्रीदाक्षिण्य दाखवायला शिक , नाहीतर तुझाही ब्रह्मे होईल एखाद्या दिवशी )

कृपया स्त्रियांविषयीच्या अवास्तव कल्पना बाजुला सारुन लेख परत एकवार वाचा

कृपया धागा डीलीट करु नये ही नम्र विनंती

एकुलता एक डॉन's picture

10 Apr 2014 - 11:46 am | एकुलता एक डॉन

पुरुष मुक्ती (पण) झालिच पाहिजे

दिपक.कुवेत's picture

10 Apr 2014 - 5:38 pm | दिपक.कुवेत

हवीय तुम्हाला??

आत्मशून्य's picture

10 Apr 2014 - 12:43 pm | आत्मशून्य

करा बरे हे त्वरित हद्दपार. आणिक काही ? जसे लाथ, बेगडी वगैरे शब्द प्रयोगहि ब्यान करूयात. तीव्र तिटकारा निर्माण होउ शकतो यातून धाग्याबाबत

एकुलता एक डॉन's picture

10 Apr 2014 - 9:01 am | एकुलता एक डॉन

असले म्हणजे? खरे?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Apr 2014 - 1:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

लेख जुना दिसतोय. स्त्रियांनी गैरफायदा घेतल्याचे प्रकार पूर्वीच्या काळीही घडत.पण त्याची वाच्यता फार होत नसे.
माई

एकुलता एक डॉन's picture

11 Apr 2014 - 5:50 am | एकुलता एक डॉन

हो

कारण त्यावेळी मिपा नव्हते

बॅटमॅन's picture

10 Apr 2014 - 1:20 pm | बॅटमॅन

स्त्रियांनी गैरफायदा घेतला त्याची सेंच्युरी करण्याचे "लाभले आम्हांस भाग्य" येथ मिपासाठी.

धर्मराजमुटके's picture

10 Apr 2014 - 9:54 pm | धर्मराजमुटके

ऑ ? फारच बुवा स्त्रीद्वेष्टे तुम्ही !
अहो स्त्रिया कधी गैरफायदा घेतात काय ? आता हे वाक्य माझे नसून लेखकांचे आहे असे सांगू नका. त्या धाग्यावर डोळा ठेवून १०० वा प्रतिसाद दिलाच ना ? (ह. घ्या.)

आम्ही स्त्रीद्वेष्टे??? नै हो नै. आम्ही बिनडोकद्वेष्टे.

नाखु's picture

11 Apr 2014 - 3:21 pm | नाखु

नुसता "फायदा" पाहीजे का "कायदा-फायदा" यावर तुम्ही कोण आहात हे ठरवू..
वाचक सभासद.
अ.भा.मु.स्त्री.भा.नि.कें.साप्ताहीक.

बॅटमॅन's picture

11 Apr 2014 - 3:51 pm | बॅटमॅन

फायदा ओ ;)

इरसाल's picture

11 Apr 2014 - 5:03 pm | इरसाल

ॐ भग्नि भागोदरी भगभुगे भग्मासे भट स्वाऽहाऽऽ

ओ तो आत्मा झाला का ट्रान्सफर की अजुन प्रेत्न चालु हैत ?

बॅटमॅन's picture

11 Apr 2014 - 5:07 pm | बॅटमॅन

माझा आत्मा त्याच्यात आणि त्याचा आत्मा बाहेर!!!!!

इरसाल's picture

11 Apr 2014 - 5:16 pm | इरसाल

त्याचं दहावं कधी? जेवायला काय ?

बॅटमॅन's picture

11 Apr 2014 - 5:26 pm | बॅटमॅन

त्याचं दहावं कधी?>> नवव्यानंतर आणि अकराव्याआधी.

जेवायला काय ?>> मिसळपाव चालेल का?

आत्मशून्य's picture

11 Apr 2014 - 3:54 pm | आत्मशून्य

आम्ही बिनडोकद्वेष्टे.

:D मी सुध्दा. आणी इतर बरेच सदस्यही उघड/छुपे बिनडोकद्वेष्टे आहेत, असे निरीक्षण आहे.

ह्या धाग्याचा सुद्धा बर्‍याच जणांनी "फायदा" घेतलेला दिसतोय ! ;)

धाग्या एवढेच प्रतिसाद सुद्धा भन्नाट.

स्वतंत्र पुरुष विभाग व्हावा असे वाटतेय. झाल्यास तिथे काय काय वाचायला मिळेल याची कल्पना आता पासून येतेय