तारका-पुष्प

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
3 Feb 2011 - 3:03 am

माझं नाव डॉ. सुधा देशपांडे. मी एक वनस्पती शास्त्रज्ञ आहे. मी आज इथे हे लिहून ठेवतेय.. कदाचित कोणालातरी आमची परिस्थिती कळेल.. कदाचित त्यांना आमची दया येईल आणि आमचं दुसर्‍या कुठल्यातरी ग्रहावर पुनर्वसन करतील... अर्थात याची शाश्वती नक्कीच नाही.

सत्तावीस वर्ष झाली त्या गोष्टीला... आकाशातून पाउस पडावा तशी पुष्प-वृष्टी होउ लागली होती. सगळा फुलांचा पाउस त्यांनीच पाठवला होता. चिटुकली चंदेरी, सोनेरी रंगांची फुलं... सगळ्या जगभर त्यांची बरसात झाली होती. एकही देश एकही गाव सुटलं नव्हतं. पुष्पवृष्टी संपल्यावर 'सेटी' ला संदेश मिळाला होता..."तुमचा ग्रह खुप सुंदर आहे." कोणालाच यातून काय अर्थ काढायचा समजत नव्हतं. नक्कि त्यांना काय म्हणायचंय हे कोणालाच कळत नव्हतं आणि त्या संदेशानंतर पुन्हा कोणताच संदेश मिळाला नव्हता. हा परग्रहावरूनच आलेला संदेश आहे हे मात्र "सेटी" च्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं होतं.

प्रथम सगळी कडे भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. जगभरातले राजकीय आणि धार्मिक नेते संभ्रमीत झालेले होते. त्यांनाही हे प्रकरण दाबून टाकणं अवघड झालेलं होतं... कारण ज्या दिवशी "सेटी" ला संदेश मिळाला त्याच दिवशी जगभरातल्या प्रत्येक घरातल्या टीव्ही वरून सुद्धा हा संदेश दिसू लागला होता... जगातल्या प्रत्येक भाषेमधून तो संदेश टिव्ही च्या पडद्यावरून दिवसभर दिसत होता. आमच्या सुंदर ग्रहाची त्यांना जणू काही आम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची होती. लोकांना वाटलं की ती फुलं म्हणजे त्यांनी आमच्यासाठी पाठवलेलं गिफ्ट आहे! अर्थात जेव्हा सत्य परिस्थिती समजली तेव्हा आम्ही सगळेच अवाक झालो होतो. दिसतं तसं नसतं हेच खरं!

कित्येक महिने आम्हाला त्या फुलांचं प्रयोजन काही कळलं नाही. सगळे परग्रहावरून आलेल्या त्या संदेशामुळे थोडे गोंधळलेलेही होते... त्यामुळे त्या फुलांवर.. आम्ही त्याला 'तारका-पुष्प' हे नाव दिलं होतं... प्रयोग करायला कोणाला फारसा वेळ मिळाला नव्हता. आम्हा सगळ्यांना तो संदेश दिसत होता.. पण अजूनही खुद्द ते परग्रहवासी पृथ्वीवर उतरले नव्हते. सगळ्यांना वाटलं ते खूप खूप प्रकाशवर्ष दूर असावेत. आमची समजूत किती चुकीची होती !

"डॉ. देशपांडे, तुम्ही तारकापुष्पांवर केलेल्या प्रयोगांचे निष्कर्श पाहिलेत का?" संजयने विचारलं. संजय माझा विद्यार्थी होता. "नाही अजून पाहिले नाहित. तुला काही इंटरेस्टींग निष्कर्श मिळालेत का?" मी विचारलं.

"होय! मला वाटतं, ही तारकापुष्प फक्त फुलं नाहियेत... बघा ना.. इतके दिवस झाले तरी एकही फुल सुरकुतलेलं नाहीये.. आणी...." त्याने थोडं थांबून म्हंटलं.."मला वाटतं की त्या फुलांमध्ये परागकण पण आहेत... जर परग्रहावरच्या वृक्ष-वनस्पती पृथ्वीवर वाढू लागल्या तर...." संजयने वाक्य पूर्ण केलं नाही.."होय संजय, तसं झालं तर काय होईल याचा फार खोलवर विचार करावा लागेल".. चेहर्‍यावरची काळजी लपवत मी म्हटलं.

संजयची भीती खरी ठरली. पहिल्या वर्षातच जगभरातून तारका-पुष्पांनी जाळं पसरवलं. फुललेल्या तारका-पुष्पांना एक सुखद आणि मादक असा सुगंध येत असे. काही दिवसांनंतर आणखीन एक विचित्र निरिक्षण आम्ही केलं.. कित्येक लोकांना त्या तारका-पुष्पांच्या ताटव्यात तासन् तास बसायला .. त्या मादक सुगंधात डुंबून जायला आवडत असे. त्या फुलांच्या वासामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचं अपायकारक रसायन मिळालं नाही त्यामुळे त्या विरुद्ध तक्रार करायला जागाच नव्हती. सुगंधच नव्हे तर तारका-पुष्प दिसायलाही फार आकर्षक होती. जवळ जवळ प्रत्येक रंगात उपलब्ध होती. कधी कधी तर ऋतूमानाप्रमाणे रंगसुद्धा बदलायची. तारकापुष्प फुलल्यावर एका झुळूकेसोबत त्याचे परागकण सगळीकडे उधळायचे आणि तारका पुष्पांचे ताटवे पसरत होते. गंमत म्हणजे कुठल्याही प्रकारच्या माती मध्ये तारका-पुष्प खुशाल वाढत होती. पाणी असो वा नसो, तापमान थंड असो वा गरम... त्या मुळेच थंड बर्फाळ प्रदेशांपासून वैराण वाळवंटांपर्यंत कुठेही तारकापुष्प दिसून येत होती.

आमचा तारका-पुष्पांचा अभ्यास चालू असतानाच एक बातमी कानावर आली. जगभरातील जननप्रमाण अतिशय घटत चाललं होतं... मी ती बातमी वाचायला लागले. "ज्या भूभागांमध्ये तारका-पुष्पांचं प्रमाण जास्त आहे तेथिल जननप्रमाण सर्वात कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. परंतू तारका-पुष्पांचा आणि जननप्रमाण कमी होण्याचा थेट संबंध असल्याचं अजून तरी खात्रीलायक रित्या म्हणता येणार नाही." ह्या बातमीदाराने नेहमीप्रमाणे कशातूनही कसलाही निष्कर्श काढला आहे असंच मला वाटलं. खरं खोटं समजायला फार वेळ लागणार नाही.

"डॉ. देशपांडे, आज तारका-पुष्पांवर प्रसिद्ध झालेला निबंध वाचलात का?" संजयने काळजीच्या सुरात विचारलं.तारका-पुष्पांचं पृथ्वीवर आगमन होऊन तीन वर्ष झाली होती.

"होय, आणि मी सुद्धा त्याचाच विचार करतेय सकाळ पासून. तारका-पुष्पांपासून निघणार्‍या परागकणांचा मानवी पुनरुत्पादनक्षमतेवर परिणाम होत होता.... ह्याच कारणासाठी तारका-पुष्प पृथ्वीवर पाठवली तर नसतील? आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक जण तारका-पुष्पांच्या संपर्कात आला आहे. आणि नुसतं जननप्रमाण घटतंय एवढच नाही तर भ्रूणमृत्यूंचं प्रमाणही वाढलं आहे. नॉर्वे मध्ये गेल्या चार महिन्यात एकही जन्म नोंदवला गेला नाहि."

शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रयोगांअंती तारका-पुष्पांच्या परागकणांचा मानवी जननक्षमतेवर होणारा परिणाम घातक असल्याचा निर्वाळा दिला. मग जगभरातून ह्या तारकापुष्पांना नष्ट करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर हालचाली घडू लागल्या. पण नाजूक दिसत असूनही तारकापुष्पांना नष्ट करणं फार अवघड आहे हे लवकरच समजून आलं. शिवाय आता कुठल्याही उपाययोजनेला फार उशिर झाला होता. आम्ही सगळेच त्या परागकणांच्या संपर्कात आलो होतो. गेली कित्येक वर्ष आमच्या श्वासातून ते परागकण आमच्या शरिरात शिरले आहेत.

आणि मग एके दिवशी "सेटि" आणि आम्हा सगळ्यांनाच आणखी एक संदेश मिळाला.

"तुमचा ग्रह खुप सुंदर आहे.
पण त्याची काळजी घेण्यात तुम्ही कमी पडलात.
ह्यासारखा ग्रह सापडणं ह्या विश्वात खरोखरच खुप दुर्मिळ आहेत.
म्हणूनच ह्या ग्रहाला तुमच्यापेक्षा जास्त जबाबदार जमातीसाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुम्हा मानवांसारखे आम्ही क्रूर नाही.
जनन-क्षमता हळूहळू कमी करणे हा मानवजात नामक रोगाचं निर्मूलन करण्याचा सगळ्यात सोपा आणि क्षमाशील उपाय आहे.
आम्ही तुमच्या ग्रहावर तुमच्या कालमापन पद्धतीप्रमाणे एकशे पन्नास वर्षांनी परत येऊ.
तोवर तुमची जमात संपुष्टात आली असेल.
तुम्ही तुमच्याच एका यानामधून पाठवलेल्या तुमच्या ग्रहाच्या नकाशाबद्धल धन्यवाद."

कित्येक वर्षांपूर्वी व्हॉयेजर यानातून पृथ्वीबद्धलची माहीती आणि पृथ्वीवरिल सगळ्या भाषांमधून रेकॉर्ड केलेला संदेश सूर्यमालेच्या बाहेर पाठवण्यात आला होता. त्याचाच वापर करून त्यांनी आम्हाला शोधून काढलं होतं. आज २०४६ साल चालू आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच गेल्या दोन दशकांमधे जगात कुठेच एकही बाळ जन्माला आलेलं नाही. तारका-पुष्पांच्या परागकणांवर मात करणार औषध शोधून काढणं आजवर जमलेलं नाही. जगातील सरासरी आयुर्मान आता ५५ झालेलं आहे. म्हातारं होऊन मरणाची वाट बघण्याखेरिज आमच्या हातात काही उरलेलं नाही.

(समाप्त)

कथाविज्ञानविरंगुळा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

3 Feb 2011 - 8:13 am | अर्धवटराव

कथा छानच जमलीय.

अर्धवटराव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Feb 2011 - 9:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कथा आवडली.

नन्दादीप's picture

3 Feb 2011 - 11:23 am | नन्दादीप

+१....
कथा आवडली... हेच म्हणतो...

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 11:42 am | नरेशकुमार

वाचुन मजा आली.

परग्रहवासी नकु.
मुक्काम पोस्ट पंडोरा ईस्ट.

प्यारे१'s picture

3 Feb 2011 - 11:55 am | प्यारे१

गोष्ट छान जमलीय.

अरुण मनोहर's picture

3 Feb 2011 - 12:02 pm | अरुण मनोहर

बीज उत्तम आहे. पूर्णपणे दुसर्या बागेतले किंवा हायब्रीड आहे / नाही ह्याचा खुलासा कृपया करावा. नो ऑफेन्स मेन्ट.

एकदम झकास....

अजून मोठी हवी होती....
मानव आणि परग्रहवासी यांची लढाई रंगवली अस्तीत, तर अजून मजा आली असती..

पण कॉनसेप्ट अप्रतिम,

माझ्याकडून तुम्हाला ९ पदकं ;)

रामदास's picture

3 Feb 2011 - 12:16 pm | रामदास

आणि भिती पण वाटली.
खरंच असं काही झालं तर .
उदाहरणार्थ -एकाएकी अन्नपदार्थ आंबवणार्‍या जंतूंची जनन क्षमता नाहीशी झाली तर ...

गणपा's picture

3 Feb 2011 - 12:51 pm | गणपा

वेगळच कथानक...
अजुन फुलवता आली असती, पण एवढ्या कथेवरही एखादा कुशल हॉलिवुड निर्माता/दिग्दर्शक छान चित्रपट काढु शकतो. :)
अश्या वेगळ्या विषयांवरचे धागे वाचायला आवडतील.
तस्मात लिहिते रहा. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Feb 2011 - 2:58 pm | निनाद मुक्काम प...

मस्त कथा आहे .
खरच पृथ्वीवर आजपर्यत मानव हा तिच्या आयुष्यात सगळ्यात प्रगत प्राणी .
तोही लाखो वर्ष जनावरासारखा राहिला .
त्याचा मेंदू मग टप्याटप्याने विकसित झाला .
ते होण्यामागे नैसर्गिक उत्क्रांती हा शब्द थिटा पडतो .
प्रगत मेंदू हे फक्त मानवाच्या बाबतीत का घडले .
कदाचित परग्रह वासियांनी प्रयोगासाठी तर नव्हे ना हा बदल मानवात घडवून आणला .
आपण नाही का प्रयोग शाळेत उंदरांच्या किंवा जीवाणूच्या अनेक पिढ्या जन्माला घालतो .अनेक प्रयोग करतो .
अनेक चाचण्या करतो .
उंदरावर केलेली चाचणी किंवा औषध हि नंतर मानवासाठी वापरली जातात .
थोडक्यात मानवासाठी वापरण्यात येणारे औषधे किनवा प्रयोग पहिल्यांदा उंदीर .किंवा माकडांवर केले जातात .
कशावारीन मानव हा कोणा परग्रह वासियांचा गीनिपिक नसेन .

कलप्ना शक्ती खुप छान वापरली आहे येथे.

आवडले लिखान

असुर's picture

3 Feb 2011 - 4:47 pm | असुर

मस्त! गोष्ट आवडली!!

--असुर

+ १
जयंत नारळीकरांच्या यक्षांची देणगी कथा संग्रहातली 'धोंडू' कथा आठवली.

धमाल मुलगा's picture

3 Feb 2011 - 6:30 pm | धमाल मुलगा

बर्‍याच काळानं विज्ञानकथा वाचायची संधी मिळाली :)
छान लिहिलीए. !

सेरेपी's picture

3 Feb 2011 - 9:52 pm | सेरेपी

कथा आवडली!

प्रतिसादाबद्धल धन्यवाद

प्राजु's picture

3 Feb 2011 - 11:12 pm | प्राजु

कथा आवडली.

मराठे ताई, खुप आवडला कन्सेप्ट आणि कथा पण थोडक्यात संपवलीत असं वाट्लं पण तेच छान आहे.

हर्षद.

ताई नाय वो! बाप्या हाय म्या!

स्वाती दिनेश's picture

4 Feb 2011 - 1:42 am | स्वाती दिनेश

गोष्ट आवडली,
स्वाती

धनंजय's picture

4 Feb 2011 - 1:54 am | धनंजय

गमतीदार कथा.

नेत्रेश's picture

4 Feb 2011 - 2:32 am | नेत्रेश

टेस्ट ट्युब बेबी, क्लोनिंग वगैरे वापरुन लोकसंख्या नक्कीच वाढवता येईल. अगदीच काही नाही तर अंतराळात, चंद्रावर मानव वंश वाढवतील. २०४६ मध्ये माणुस असा हार मानेल हे शक्य नाही.

छान कथाबीज आहे. चांगला हॉलिवुडपट निघेल यावर (पण त्यात शेवटी माणुस जिंकेल :) ).

अरुण मनोहर's picture

4 Feb 2011 - 7:37 am | अरुण मनोहर

तुमचे लेखन मी आवडीने वाचत असतो. इतर गोंधळात खुलून दिसणारे जे थोडे लिखाण इथे मिळते त्यात तुमचे असते. असेच लिहीत रहा. पुढील लिखाणासाठी खूप शुभेच्छा.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Feb 2011 - 8:24 am | llपुण्याचे पेशवेll

छान कथा आहे.