स्थळः पान्ढरे सदन
तारीखः केव्हातरी
वेळः कोणतीतरी
बघता बघता येथे येउन दोन वर्षे झाली. येथे आल्यापासून बाहेर जाताना घराला कूलूप लावण्याची सवय साफ गेली आहे. येथून परत शिकागोला गेलो की सुरुवातीला कूलूप लावण्यची सवय परत करून घ्यावी लागणार आहे.
आजचा दिवस जरा धकाधकीचा गेला. आधी ट्युनिशिया आता ईजिप्त. ह्या लोकाना एकदम पेटायला काय झाले समजत नाही. गुप्तचर खाते काय झोपले होते? उद्या एकेकाची तासायला पाहिजे. सुएझ कनॅल ईजिप्तमधूनच जातो आणि आमचे २०% तेल सुएझ कनॅल मधूनच येते. समजा आमचे मित्र सत्तेवर आले नाहीत तर बॅरलचा भाव २०० च्या वर जाईल. आधीच मन्दीमूळे आमची जनता भिकेला लागली आहे आणि त्यात जर गॅसचे भाव वाढले तर त्याना रस्त्यावर जाण्यची वेळ येईल आणि मला २०१२ सालीच परत शिकागोला जावे लागेल.
आज साशा म्हणाली की तिला वर्गामधला शिवम आवडतो. च्यामारी हे देशी लोक कोठे कोठे घुसतील ह्याचा काही नेम नाही. ति टि.व्हि.यू. काढली चिनी लोकनी, त्याल भरले सगळे गूल्टी. ईकडे आले तर आले, सगळे कायदे धाब्यावर बसवले आणि आता कारवाई करावी तर ह्यान्च्या उलट्या बोम्बा. असो, साशा आता मोठी होत आहे. तिच्या लग्नाला काहीही झाले तरी बिलू आणि हिलूला अजिबात बोलावणार नाही.
रात्र बरीच झाली आहे. खूप दिवसात मिशेलला जवळ घेतेले नाही. आज जरा जास्त जागता आले तर जन्गल मे मन्गल.
प्रतिक्रिया
1 Feb 2011 - 8:07 am | नरेशकुमार
फंस गए ओबामा.
हा हा हा हा.
1 Feb 2011 - 8:08 am | ब्रिटिश टिंग्या
:)
1 Feb 2011 - 10:11 am | सुधीर काळे
छान लेख!
शिवाय इराणसारखी इजिप्शियन लोकांनी अमेरिकेची एंबसी ताब्यात घेऊन आपल्या मुत्सद्द्यांना ओलीस धरून ठेवले तर आपलीही वाट त्या जिमीसारखी लागेल त्याचे काय?
1 Feb 2011 - 10:39 am | डावखुरा
बराच डोक्यावरुन गेला..पण खालचे प्रतिसाद वाचुन थोडा प्रकाश पडला....
1 Feb 2011 - 10:57 am | टारझन
हा हा हा .. वा दाबा वा ! खुब लिखा है :)
ह्या नव्या लेखणप्रकाराचे नाव काय ? रोजनिशी का ? आहो पण ती तर पाकृ सदरात येते ना ?
-( खालचा प्रतिसादक) सालसा
1 Feb 2011 - 12:13 pm | मनराव
:)
1 Feb 2011 - 12:24 pm | माझीही शॅम्पेन
आररेच्चा इथे पुन्हा गुल्टई शब्द , अहो दाबा अस जातीवचक लिहु नका
(संपदकांच्या कत्रित सापडलेली)
1 Feb 2011 - 1:37 pm | टारझन
शँपेन .. तु नक्की काका आहेस की काकु ? मै इतना कनफ्युज हो गया हुं .. के .. :)
1 Feb 2011 - 2:02 pm | माझीही शॅम्पेन
टारू मामा !
अरे आता जातीयवादाकडून लिंगभेदवादकडे नकोरे बाबा !
पण गोडबोलेच काय झाल (मारुती कांबळेच काय झाल स्टाइल...)
क्रमशा: प्रेमी
1 Feb 2011 - 2:53 pm | टारझन
हे मला "ब्रिटिश टिंग्या" वाटते. :)
- लाजाळुकर्ण
माझा प्रतिसाद तुम्हाला "ब्रिटिश टींग्या " तर वाटत नाही ना ?
बाकी पळु द्या
1 Feb 2011 - 3:01 pm | वारकरि रशियात
लाजाळुपर्ण असे (लिहायला) हवे होते कां?
1 Feb 2011 - 1:31 pm | गणपा
आपल्या लेखात एक दुरचे काका दिसले. ;)
6 Feb 2011 - 3:49 pm | पर्नल नेने मराठे
=)) वात्र्ट
1 Feb 2011 - 2:24 pm | गणेशा
मस्त आहे पान
2 Feb 2011 - 3:22 am | वाटाड्या...
ह्या प्रकाराला (?) भुमिकेत शिरणे म्हणतात ल्येका..
- वाटीत पादा..
4 Feb 2011 - 7:25 pm | वडिल
ओबामा ला पत्र लिहिणारे इथे भरपुर आहेत.. त्यांना डिसी चा पत्ता बदलुन शिकागो चा द्यायला विसरु नका.
एखादं अमेरीकेत विकत नसलेलं पुस्तक पण मराठि भाषांतरा साठि द्दा पाठवुन.
5 Feb 2011 - 9:57 pm | दादा बापट
सध्या एक नवीन पूस्तक लिहित आहे. हवय भाषांतर करायला? नंतर खडे फोडू नका. तूम्ही अमेरीकेत असता वाटते?
5 Feb 2011 - 10:11 pm | वडिल
वा वा .. उत्तम.
नको.. पुस्तकं जरा मी दुरच ठेवतो..
6 Feb 2011 - 7:27 am | वडिल
दाबा
पुस्तक खपवायचं असेल तर ते अमेरीकन इन्गीश मधे हवं.. म्हणजे भाव वाढतो.
मी तर म्हणतो मराठि पुस्तकांचा खप वाढवायचा असेल तर त्यांचे भाषांतर अमेरीकन इन्ग्लिश मधे करा आणि परत मग मराठि भाषांतर करायला कोणाला तरी द्दा. खप बघा कसा वाढतो ते.
6 Feb 2011 - 5:43 am | बबलु
डायरीची आयडिया आवडली.