फोटो

भाग्यश्री's picture
भाग्यश्री in जनातलं, मनातलं
6 Jun 2008 - 2:30 am

नेहेमीप्रमाणेच सगळ्यांचे फोटो पाहून, मी काढलेले फोटो टाकायची इच्छा झाली..
मागच्या विकेंडला जवळपास फिरताना हे फोटोज काढले.. मी काही उत्तम फोटोग्राफर नाही.. छान नविन तंत्रज्ञानाचा कॅमेरा हातात असून मला त्याचा उपयोग कळत नाही.. ऑटो मोड वर, जे चांगल दिसेल तसे फोटो काढायचा प्रयत्न केलाय.. कसे वाटतायत सांगा..

click on the image to view enlarged version..

घराजवळचा समुद्र .. व त्याची काही रूपे !!





सॅंटा बार्बराला जाताना लागणारी झाडांची रांग!


हे सर्व चालत्या/धावत्या गाडीतून काढलेत हं फोटोज!

सॅंटा बार्बरा पिएर..

बीच वर एक लग्न लागत होतं.. त्या नवजोडप्यासाठीची ही बग्गी!!

ओहाय (ojai ) चे सुंदर जंगल अन नागमोडी वाट!

लेक कॅसितास..


ये हसीन वादीया....!



घराच्या वाटेवर लागणारी ही डोलणारी झाडं!

सनसेट आणि विमान !!

अजुन एक सनसेट!

मौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

शितल's picture

6 Jun 2008 - 2:49 am | शितल

ए सगळे फोटो अगदी मस्त, सुर्यास्ताचा जास्तच छान.

बेसनलाडू's picture

6 Jun 2008 - 2:50 am | बेसनलाडू

पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माइल ड्राइव हीच कॅलिफॉर्नियातील सगळ्यात जास्त प्रेक्षणीय स्थळे असल्याचा आजवरचा समज या फोटोंमुळे दूर होईल की काय असे क्षणभर वाटले. फोटो छानच आहेत. सूर्यास्ताचे सर्वाधिक आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

6 Jun 2008 - 2:57 am | भाग्यश्री

हाहा.. पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माईल्स ड्राईव्हची मजाच वेगळी!!
बायदवे, पॅसिफिक कोस्ट हायवेवरून कधी रात्री गेलायत का? सॅन-फ्रान्सिस्कोवरून येताना रात्री आम्ही तिथून आलो होतो!! सगळ्यात भितीदायक रात्र!! डावीकडे काळाकुट्ट डोंगर.. आणि उजवीकडे डार्क निळसर्,धुकं असलेला समुद्र !! :S :S
आणि रस्त्यावर पाट्या येतायत, विस्टा पॉईंट !! :|

बेसनलाडू's picture

6 Jun 2008 - 3:01 am | बेसनलाडू

अद्याप त्या किनार्‍यावरून असा रात्रीच्या प्रवासाचा अनुभव घेतला नाही;पण तुम्ही केलेल्या वर्णनावरून आता घ्यावासा वाटतो आहे.बघू कधी योग येतोय.
(अनुभवोत्सुक)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

6 Jun 2008 - 4:06 am | पिवळा डांबिस

पॅसिफिक कोस्ट हायवेवरून पौर्णिमेच्या रात्री जा. सांता बार्बरापासून ते थेट मालिबूपर्यंत!!
आम्ही अनेकदा जातो. झूमा बीचच्या परिसरात! जरा उशीरा, म्हणजे मध्यरात्रीनंतर! (कारण चंद्र डोंगर चढून पुरता वर यायला तितका वेळ जातो)
लाटांच्या फेसावर चांदणं चमकून एक वेगळंच वातावरण तयार होतं!
अशा वेळेस विस्टा पॉईंटला गाडी थांबवून त्याचा मनसोक्त आस्वाद घ्या...

स्वप्निल..'s picture

6 Jun 2008 - 4:33 am | स्वप्निल..

पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माईल्स ड्राईव्हची मजाच वेगळी!!
एकदम मान्य !!

बे एरियाची मजाच वेगळी आहे.... :)

फोटोस चांगले आहेत...!!

स्वप्निल

मी सॅन रॅमॉनला राहतो... सॅन फ्रांसिस्को पासुन पावूण तास दुर...

बाकी भाग्यश्री ताई फोटो एकदम झकास आलेत... कोण म्हणतं तुला कॅमेरा वापरता येत नाही ?

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

धनंजय's picture

6 Jun 2008 - 2:59 am | धनंजय

क्रमांक १, ४ किनार्‍यावरून अक्षरशः चालवत नेतात. म्हणून जास्त आवडले.

लेक कासीतासचे दोन्ही फोटो छान, माझ्यावर बोटीच्या फोटोने त्यातल्या त्यात अधिक प्रभाव केला.

"घराच्या वाटेवर लागणारी ही डोलणारी झाडं!" कातरला आणि झाडेच ठेवलीत तर मस्त आहे.

सूर्यास्त आणि विमान खासच.

(गाडीतून फोटो काढताना कित्येकदा कॅमेरा बरोबर उभा ठेवायला कठिण जातो.)

भाग्यश्री's picture

6 Jun 2008 - 3:06 am | भाग्यश्री

थँक्स प्रतिसादाबद्दल..
तो झाडांचा फोटो क्रॉप करायला हवा होता खरं, पण कंटाळा केला.. कॅमेराचा तोल साधणे खरच अवघड होते.. शेवटचा फोटो तिरकाच आलाय..
मला पण तो बोटीचा फोटो खूप आवडलाय..शांत तलाव, आणि पाणी कापत जाणारी बोट.. लांबून पण बराच बरा स्पष्ट आलाय..

भाग्यश्री ताई,

मी कुणी फार अधिकारी व्यक्ती वगैरे नाही पण "माझं कलेवर होईपर्यंत कले वर प्रेम करणार" अशा अर्थाची एक चारोळी लिहिणारा-छत्रपती संभाजी महाराजांवर - शिवाजी महाराजांच्या माणसांवर पुस्तके लिहिणारा एक सर्वसामान्य माणूस आहे....तरी एक सांगतो ते करून पहा आणि मला मग तुमचा अनुभव कळवा जरूर.....

कुठलाही फोटो "रॉम्बस" किंवा मराठीत "शंकू - शंकरपाळ्याच्या आकारात" तिरका काढून बघा तो जास्त उठावदार वाटतो.....कलात्मक आणि सुंदर दिसतो - बघणार्‍याला जरी मान तिरकी करून बघावा लागला तरी पण , याचे टेक्निकल (तांतिक) कारण पण सांगतो : मूळ फोटो सोडून बाकिच्या गोष्टींसाठी खूपच कमी क्षेत्र (एरिया) मिळतो त्यामुळे जास्त भर (एम्फसीस)तुमच्या लक्ष्यावर(टार्गेट) वर रहाते.....

सगळे फोटो छान आलेत.....मत मांडण्यात आगाऊपणा झालाय असे वाटत असल्यास माफ करा आणि सोडून द्या , मला अजून या जगात बरेच काही शिकायचे शिल्लक आहे.....

आपला विनम्र,

उदय सप्रे

इनोबा म्हणे's picture

6 Jun 2008 - 3:21 am | इनोबा म्हणे

सनसेट आणि विमानाचा फोटू जास्त आवडला.

स्वगतः च्यामारी,आम्हाला फॉरीनात फिरायला कधी मिळणार?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अथांग सागर's picture

6 Jun 2008 - 3:46 am | अथांग सागर

सर्वच फोटो एकदम मस्त आहेत.. :)

आपण व्यावसायिक छायाचित्रकार आहात का?

भाग्यश्री's picture

6 Jun 2008 - 4:24 am | भाग्यश्री

अज्जिबातच नाही हो!! ही जरा जास्तच चांगली कॉम्प्लिमेंट झाली!! हेहे.. धन्यवाद!!

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 5:46 am | विसोबा खेचर

भाग्यश्री, तूही उत्तम फोटोग्राफर आहेस हे ठाऊक नव्हत! सगळेच फोटू छान आहेत.. :)

मदनबाण's picture

6 Jun 2008 - 9:50 am | मदनबाण

सर्वच फोटो छान आहेत..सनसेट आणि विमान हा मस्त वाटला.....

मदनबाण.....

स्वाती दिनेश's picture

6 Jun 2008 - 11:36 am | स्वाती दिनेश

भाग्यश्री,फोटो आणि कॅप्शन्स मस्त!!
सूर्यास्त हुरहुर लावतो तरी नेहमीच आवडतो..
घराच्या वाटेवर लागणारी ही डोलणारी झाडं!
ही कॅप्शन खूप आवडली.
स्वाती

झकासराव's picture

6 Jun 2008 - 7:00 pm | झकासराव

भाग्यश्री
३,४,५ आणि सुर्यास्त विमानासहीत वाला फोटो आवडले. :)

अवांतर : हातात कॅमेरा आणि वेळ असेल आणि शिकण्याची इच्छा असेल तर हे घे लिन्क.

http://digital-photography-school.com/blog/digital-photography-tips-for-...

इथे तुला बर्‍याच बेसिक गोष्टी देखील शिकायला मिळतील.

आता आळशीपणा न करता अजुन भरपुर फोटो काढ आणि इथे टाक बघु. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा's picture

6 Jun 2008 - 7:03 pm | वरदा

छान आलेत सगळेच फोटो...

प्राजु's picture

6 Jun 2008 - 7:03 pm | प्राजु

काय सांगू आणखी...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मन's picture

6 Jun 2008 - 7:43 pm | मन

क्या बात है.
मस्त फोटो आहेत हो........
एक गाणं आठवतय हा फोटो पाहुन
"कशासाठी फोटोसाठी
(सँटा) बार्बराच्या वाटेसाठी"

इतकं सुंदर निसर्ग दृष्य पहायला मिळावं हे तो (भाग्य)श्रींची कृपा!

आपलाच,
मनोबा

चतुरंग's picture

6 Jun 2008 - 7:49 pm | चतुरंग

घराच्या वाटेवर डोलणारी झाडे बघून उंचचउंच बांबूच्या काठ्यांवरुन चालत येणारी लहान मुलं आठवली! ;)
सूर्यास्त तर मला नेहेमीच वेड लावतो, तसाच ह्याही वेळी!

चतुरंग

भाग्यश्री's picture

6 Jun 2008 - 9:42 pm | भाग्यश्री

इतक्या प्रतिक्रिया!! थँक्स सगळ्यांना..!! :)
झकास, ती लिंक सेव्ह करून ठेवली आहे.. शिकीन आता हळू हळू.. थँक्स..

http://bhagyashreee.blogspot.com/

संजय अभ्यंकर's picture

6 Jun 2008 - 10:20 pm | संजय अभ्यंकर

स्तुतिस शब्द अपुरे पडावेत!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

ऋषिकेश's picture

7 Jun 2008 - 1:30 am | ऋषिकेश

लई भारी!!!!!!!!!!!!!
फोटु एकापेक्षा एक आले आहेत. सुर्यास्त तर भन्नाट
अजून येऊ देत!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

भडकमकर मास्तर's picture

7 Jun 2008 - 3:02 am | भडकमकर मास्तर

मस्त फोटो...
मजाच आली पाहून... :)
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/